रामराम घ्यावा!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2023 - 03:16

गेले कित्येक दिवस मी लिहितोय. लीहीतच राहतोय.
बऱ्याच कथा बाकी आहेत...
गेले वर्षभर मी आजारी होतो, आता वाटलं ठणठणीत बरा होतोय तर जीवघेणं दुखणं पाठीमागे लागलंय.
यातून बरा होईन का नाही, माहिती नाही... सावरेन का नाही माहिती नाही, जगेन की नाही तेही माहिती नाही.
निराशा नाही, हताशा म्हणू शकतो, काहीतरी खूप सुंदर गमावल्याची...
जे गमावलं ते कधीही परत येणार नाही,
आता राख झालो आहेच, तर स्वतःच स्वतःला विचारतोय... की फिनिक्स होईन की वाहून जाईन...
जस्ट, कथा अपूर्ण ठेवायच्या नाहीयेत, कारण हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत...
पण सध्या तरी, स्वतःवर लक्ष द्यायचं आहे. स्वतःच स्वतःला ओळखायचं आहे.
सो, हा ब्रेक समजा नाहीतर निरोप.
क्षमस्व...

अवांतर : हे इथे धाग्याच्या हेडर मध्ये लिहितोय, कारण नाईलाज आहे. Admin ला मी चार वेळा विनंती करूनही माझ्या कथेचे भाग उडवले नाहीत. ( .) असलेले. प्लीज, माझी मानसिक अवस्था खरच ठीक नाही, त्यात हे नको.
कृपया इथल्या कुणा आयडीचा admin शी सरळ संपर्क असल्यास एवढं करा प्लीज... _/\_

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< तब्बेती साठी शुभेच्छा!
परंतू, स्वतःचे लेख डीलीट करून जो कुजकेपणा केलाय त्याचा निषेध.
मागे दिनेशदा ह्या आयडी ने पण असेच केले होते...ह्यात त्यांना कसले समाधान मिळते हेच कळत नाही.
नवीन Submitted by aashu29 on 12 May, 2023 - 00:51 >>

------ तुम्ही प्रेमाखातर म्हटले आहे हे समजते, पण याला कुजकेपणा म्हणता येणार नाही.

त्यांचे लिखाण आहे, आणि त्यावर त्यांचा अधिकार आहे, हे मान्य करायचे. ते कुठल्या मानसिक / शारिरीक परिस्थितीमधून जात असतील याचा अंदाजही नाही. येथे लिहीलेले वाचण्यासाठी ते फिरकतील असेही नाही.

आपण केवळ आरोग्यासाठी शुभेच्छा द्यायच्या... आणि त्यांना हवी असलेली स्पेस द्यायची.

स्वतःच्या लेखनाचं काय करायचं याचा अधिकार प्रत्येक लेखकाला असतो , त्याला कुजकेपणा नाही म्हणत . आणि लेख डिलीट करण्याचे व मायबोली सोडण्याचे पुरेसे कारण त्यांनी दिलेले आहे ........ +१.

Pages