कोकणचा विकास की विनाश? रिफायनरी येतेय...

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2023 - 00:43

मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.

तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?

दोन्ही मार्ग कोकणात जातात.

एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.

तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.

IMG_20230504_095101.jpg

कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?

असल्यास कळवणे,
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केरळात (देवभूमी) रासायनिक उद्योगच नाही तर इतरही उद्योग नाहीत म्हणूनच निसर्ग टिकून आहे.
(कोची बंदरात बोटिंचं डिझलवालं पाणी जमा होऊन मासे गायब झाले आहेत. खूप दुर्गंधी येते. चायनिज नेटस फक्त शोभेसाठी आणि पैसे कमावण्यासाठी (रु २५० दोरीला हात लावण्याचे) आहेत.

हा प्रश्न फक्त रिफायनरी शी नाही.
कोकणी लोकांचा कोकण शी संबंध खूप कमजोर आहे.
हापूस आंबा फळांचा राजा आहे.
पण हापूस अंबा खरेदी वितरण आणि विक्री ह्या वर पर परप्रांतीय लोकांचे वर्चस्व आहे.
काजू बदाम ल टक्कर देत भावात.
पण त्या मध्ये जिथे हे दोन्ही पिकते.
ती कोकणी लोक कुठे आहेत.
Hk मध्ये मुंबई मध्ये नोकरी करत आहेत,security,puen mahnun nokri karat aahet.
कोकण ची वाट लागण्यास कोकणी लोक च जबाबदार आहेत.
हजारो एकर जमीन ह्यांनी विकली मुंबई मध्ये दहा bye दहा च्या खोलीत राहण्यासाठी.
राज ठाकरे योग्य च बोलले.
आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय लोकांना लोक जमीन विकणार च नाहीत.

फेसबूक ग्रूप आहे साधा.
फक्त पाच तासात ८८०० लोकांनी मत दिलेय ते असे. कोकणच्या जनतेला काय हवेय हे उघड आहे.

IMG_20230508_014929.jpg

ठीकै ! कोकणात रिफायनरी नकोच. पण कोकणी लोकांनी सुद्धा आपले उद्योग हे भरभराटीला कसे आणता येतील हे बघावे. उगाच आपली पोरे बाळे मुंबई वा परदेशात आहेत म्हणून परप्रांतीयांना जमिनी विकण्यापेक्षा आपल्याच कोकणी बांधवांना त्या विकाव्यात.

रिफायनरी आली किंवा नाही तरी मला पुण्यात काय फरक पडणार आहे ?>>>>
पुण्यात नाही पण केळशीला (आणि आमच्या दापोलीला) पडेलच की.

पण कोकणी लोकांनी सुद्धा आपले उद्योग हे भरभराटीला कसे आणता येतील हे बघावे. उगाच आपली पोरे बाळे मुंबई वा परदेशात आहेत म्हणून परप्रांतीयांना जमिनी विकण्यापेक्षा आपल्याच कोकणी बांधवांना त्या विकाव्यात.## कोकणातली स्थानिक लोकं आपल्या जमिनी विकत नाहीत. एकतर कोकणात सलग एकर च्या एकर जमिनी कोणाकडे नाहीत. स्थानिक राजकारणी (सर्व पक्षांचे) दबाव टाकून लहान तुकडे विकत घेतात. जमीनी नको असत्या तर प्रकल्पाला विरोध कशाला केला असता?

हर्पेन - बँग ऑन.
शहरांची वाट लावलेली आहेच, जे वाचलय त्याच्या का मागे लागलेत.

जिथे जागतिक स्तरावर सगळेच डूम्ड आहेत तिथे असे लोकल मायक्रो एनवायर्नमेंट आपली वाचण्याची शक्यता निर्माण करतं, तिथेच आग लावून शेखचिल्ली पणा का करताहेत?

ज्यांचा आपल्या हिंदू धर्मावर आ णि भूतदया वगैरे भाकड गोष्टींवर विश्वास नाही, त्यांनी ही पुढची पोस्ट वाचू नका.
-----------------------------
फुरोगामी - रिफायनरी आली तर पुण्याला फरक पडणार नाही म्हणता, तर रिफायनरीचा बाकीच्या ठिकाणांवर परिणाम काय होईल हे सांगणारी अभ्यासू पोस्ट ह्याच धाग्यावर आहे, ती वाचलीत का? तुम्हाला, मला फरक पडणार आहे!

तुम्ही कोण मला माहित नाहीये - पण तुम्हाला हिंदू धर्माबद्दल चाड असावी असे बाकीच्या पोस्टमधून वाटते, म्हणून पोस्ट:
अशा वेळेस निसर्गासंबंधी - सर्व सजीवांमध्ये देव दिसणार्‍या हिंदू धर्माची शिकवण, सीतेचे वनांसंबधीची मतं असलेले उतारे, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" म्हणणारे तुकोबा, रयतेच्या झाडांना हात लावू नका म्हणणारे महाराज - ह्या सगळ्यांच काय?
सगळं एकट्या मनुष्य प्राण्याचच आहे का बसून संपवायला? विश्वा (तील सर्व जिवांचे) चे आर्त आपल्या मनी प्रकाशले तर किती छान होईल!
आणि माणसाचच म्हणायचं तरी शहरी माणसाच्या सोयीसाठी ज्यांचं आहे त्यांचं हिरावून घेत रहाणं बरोबर आहे का?

--------------------

ज्यांना वाटतय की लोकल माणसाला रोजगार मिळेल -
त्यांनी पाचगणी महाबळेश्वरला जाऊन बघा आणि रिसॉर्ट मधल्या सपोर्ट स्टाफ (स्वच्छता कर्मचारी आणि तत्सम) बोलून बघा.
आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण अनुभवायला येईल.

जर कोकणी माणसाला निसर्ग देतोय त्यात समाधान आहे (आणि निसर्ग खरच द्यायला सक्षम आहे! it provides services worth billions of dollars which we dont recognize!) तर आपण त्यांना "नोकरी" चे आणि महिना हमाली चे लालूच का दाखवायचे / लादायचे?

खरंच कठीण आहे.प्रदूषण आणि परिणामाची पोस्ट वाचली.वाईट वाटलं.
कमीत कमी हिंसा व नुकसानीत यातून स्थानिक जनतेच्या फायद्याचा मार्ग निघो(इथे लांब बसून, कीबोर्ड बडवत किमान ऑनलाईन सपोर्ट दाखवू शकतो.)

अनु, नि दान पुण्यातल्या झाडांसाठी आणि नद्यांसा ठी तरी उभे रा हुया!
Our kids/grandkids won't forgive us otherwise.
आता पीसीएमसी मधली नदी काठची ३००+ झाडं कापण्याचं चाललय..

आ ज पीएमसी क डे ज्यांनी आक्षेप नोंदवलेले (पूर्वी), त्याची सुनावणी होती. वृक्ष विभागाचे प्रमुख मात्र सुनावणी करता आले नाहीत Sad

सुनावणी मध्ये एकही बॉटनिस्ट, एकही रिवर इकॉलोजिस्ट, नुसता ईकॉलॉजिस्ट पालिकेच्या बाजूने हजर नव्हता.

ही सुनाव णी ह्या प्रोजेक्ट मधल्या वृक्षतोडीविरोधात होती. तर प्रोजेक्ट चा माणूस/माण से वृक्षविभागाच्या बरोबरीने बसला होता.
थोडक्यात वृक्ष विभाग स्वायत्त विभाग म्हणून काम करणे अपेक्षित आहे, तसे अर्थातच दिसत नव्हते!

डँग, ह्यावर वेगळे लिहिले पाहिजे!

फुरोगामी - रिफायनरी आली तर पुण्याला फरक पडणार नाही म्हणता, तर रिफायनरीचा बाकीच्या ठिकाणांवर परिणाम काय होईल हे सांगणारी अभ्यासू पोस्ट ह्याच धाग्यावर आहे, ती वाचलीत का? तुम्हाला, मला फरक पडणार आहे !>>>>>>>>>>>>
खरं सांगू का ?
ती रिफायनरी व्हावी याच मताचा आहे मी पण भाजप समर्थक आहे म्हणून नाही .
वोट बीट मी काही टाकलेले नाही , उगीचच ऋन्मेश साठी ढीशक्यावं केले होते .
जामनगर मध्ये प्रदूषणाची बोंबाबोंब नसताना रिफायनरी मुळे कोकणात मात्र प्रदूषण होईलच , हे आज पर्यंत मला समजलेले नाही .
ग्रीन बेल्ट असतील , फळबागा असतील तर काय प्रोब्लेम आहे ?
आणि पुण्यातील वेताळ टेकडी वरून होणारा रस्ता देखील झालाच पाहिजे हे ही माझे ठाम मत !
जितकी झाडे तोडतील त्याच्या १०० पट लावण्याचे आणि टिकवण्याचे बंधन घातले गेले पाहिजे पण विकासाला आडकाठी नकोय !
२० वर्षापूर्वी पुणे नगर रोड ला येरवड्या पासून शिक्रापूर सणसवाडी पर्यंत १००/१५० वर्षांची दुतर्फा वड चिंच पिंपळ ची हजारो झाडे होती . रस्ता रुंदीकरणात तोडणे किंवा पुनर्लागवड करणे हेच पर्याय होते , त्यातील बरीचशी शास्त्रीय दृष्ट्या उपटून दुसरी कडे लावली आणि आज देखील दिमाखात वाढत आहेत .
विकास करताना निसर्गाचे भान ठेवून विकास केला गेला तर काय प्रॉब्लेम आहे ?
आणि झाडा बद्दल माझे प्रामाणिक मत सांगतो , मी कंपाऊंड च्या आत नारळ आंबा चिकू ची झाडे लावली वाढवली आणि झाडाचे महत्व कळावे म्हणून बाहेरील २० फुटी सामाईक रस्त्यावर एक अंबा आणि जांभूळ , बहावा चे झाड लावले आहे .त्याला फळे आली की कोणीही घेवू शकते या हिशोबाने .
लहानपणी शिव्या खाल्ल्या आहेत , दुसऱ्यांच्या फळ बागेत शिरून फळे तोडल्यामुळे !
फोटो टाकायला आवडले असते पण अपलोडींगला जास्त kb चा प्रॉब्लेम येतो येतोय .
थोडक्यात झाडे आणि निसर्ग ची मला लहानपणापासून आवड आहे .

कोकणाला समुद्रकिनारा आहे आणि मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय आहे, हा एक मूलभूत फरक कोंकण आणि इतर स्थाने ह्यात आहे. मासे आणि भात हे तिथल्या ८०-९० टक्के लोकांचे staple food आहे. समुद्राचे प्रदूषण हे तिथे खूपच हानिकारक ठरेल.
इतरही आणखी लिहिता येऊ शकेल.

जितकी झाडे तोडतील त्याच्या १०० पट लावण्याचे आणि टिकवण्याचे बंधन घातले गेले पाहिजे
>>>

आणि समुद्राचे काय कराल?

म्हणूनच उत्सुकता वाढते की जामनगर मध्ये प्रदूषण झाल्याच्या , समुद्रातील पाणी जलचर साठी धोकादायक बनल्याच्या आणि आजूबाजूची शेती उध्वस्त झाल्याच्या खात्रीशीर बातम्या आहेत का ?
पण धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी अवस्था प्रकल्प विरोधक राजकीय नेत्यांची झालेली आहे हे मात्र नक्की !
कारण intellectual लोकं प्रदूषण मुळे विरोध करत आहेत तर राजकीय विरोधक प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केल्या शिवाय राबवू नका म्हणत आहेत .

जामनगरला तुमच्या सारखे अभ्यासू , ज्ञानी नसतील असे वाटते का?
आणि प्रदूषण च्या नावाने आपण विनाकारण आरडाओरड करतो असे वाटते कारण....
रोजचे भेसळयुक्त दूध , पाणी , रासायनिक भाजीपाला , चटकन पिकवलेली केळी / आंबे घेणाऱ्यांनी प्रदूषण वर बोलावे म्हणजे अतीच झाले नाही का ?

पुरोगामी
एक तर तुम्हाला प्रदूषण ही किती गंभीर समस्या आहे त्याची जाणीव नाही.
माहीत नक्कीच असणार.
पूर्ण जग चिंतित आहे.
पृथ्वी वरील जीवसृष्टी च नाहीशी होईल इतके प्रदूषण ना चे प्राथमिक लक्षण दिसायला लागली आहेत.

आयटी सेल कडून दोन पैसे कमी घ्या पण काही ही कॉमेंट करू नका.
"प्रदूषणाची आपण विनाकारण काळजी करत आहोत"
हे तुमचे वाक्य खूप अज्ञान दर्शवत आहे.
समजदार लोकांसमोर आणि आणि अंध भक्त नसलेल्या लोकांसमोर असली वाक्य टाकू नका.
लोक जोड्याने पूजा करतील.

रोजचे भेसळयुक्त दूध , पाणी , रासायनिक भाजीपाला , चटकन पिकवलेली केळी / आंबे घेणाऱ्यांनी प्रदूषण वर बोलावे म्हणजे अतीच झाले नाही का ? >>> याच लॉजिकने जो लुबाडला जातोय त्याला कुठल्याच गोष्टीवर बोलायची बंदी असेल ना ?
बँका बुडवणार्‍यांना पळून जायला सरकारने मदत केली म्हणून त्या बँकेच्या ग्राहकांनी मुकाट्याने त्या पैशाची भरपाई केली पाहीजे. कुणी कुणाचा खून केला तर त्याच्या घरातल्या व्यक्तींनी कायदा सुव्यवस्थेवर बोलू नये, न्याय मागू नये इ..

आयटी सेल कडून दोन पैसे कमी घ्या पण काही ही कॉमेंट करू नका.
"प्रदूषणाची आपण विनाकारण काळजी करत आहोत"
हे तुमचे वाक्य खूप अज्ञान दर्शवत आहे.
समजदार लोकांसमोर आणि आणि अंध भक्त नसलेल्या लोकांसमोर असली वाक्य टाकू नका.
लोक जोड्याने पूजा करतील.>>>>>>>>>>

समजदार ? आग आया ! आया ! या !!!
Lol
ते तुमचं औरंग्या , टिप्या आणि अकब्र्या वरील प्रेम चार चौघात उघडकीस आणल्याचा राग अजून गेला नाही वाटतं ?
इथे आय टी सेल वाले असतील असे तुम्हाला खरंच वाटते का ? Happy

प्रदूषण ची आपण विनाकारण काळजी करत आहोत.
असा लीहणारा व्यक्ती आयटी सेल वाला च असू शकतो.
असे मला तरी वाटते.

रिफायनरी देशाच्या सध्या तरी आवशकय च आहे.
पण देशाचे वातावरण कमीत कमी प्रदूषित होईल .
अशा ठिकाणी च ती हवी.
वाऱ्याची दिशा,लोकवस्ती,पिण्याच्या पणायचे सोर्स, शेती.
ह्या वर कमीत कमी परिणाम व्हावा.
समुद्र लांब असेल तर थोडा खर्च वाढेल .
पण सहन करणे परवडेल.
समुद्रातील प्रदूषण ian कमीत कमी कसे होईल ह्याची काळजी घ्यावीच लागेल..
भारतात प्रदूषण विषयी कायदे काटेकोर पाळले जात नाहीत.
भ्रष्ट व्यवस्था,सरकार इथली जास्त संवेदन शील नाहीत.
त्या मुळे कोंकण ची जास्त काळजी वाटते.

रिफायनरी देशाच्या सध्या तरी आवशकय च आहे
Really? This refinery is strategically located to do mainly export. Saudi Aramco want to become competetive in export mainly for far east, south east or africa market.Even RIL Jamnagar is also doing majority export. At present all refineries in India are under going massive expansion to cater domestic market and a new refinery is coming in Rajasthan. I have doubt if we need this refinery to cater domestic market. Yes this refinery will create huge job opportunities for people like me :-). But yes there will be damage to bio diversity and marine life. Even if we follow all fire and safety norms (even Saudi Aramco standards, which are very stringent than Indian codes) an accident can ruin everything. Is Kokan ready to take that risk for development is the question.

Pages