कोकणचा विकास की विनाश? रिफायनरी येतेय...

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2023 - 00:43

मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.

तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?

दोन्ही मार्ग कोकणात जातात.

एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.

तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.

IMG_20230504_095101.jpg

कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?

असल्यास कळवणे,
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा फारसा अभ्यास नसल्याने मी पास देणार आहे.
पण पूर्वीच्या प्रकल्पाचे परिणाम काय झाले (पर्यावरणावर पण आणि तिथल्या रहिवाश्यांच्या आर्थिक परिस्थितीवर), आत्ताच्या प्रकल्पाने पर्यटनावर किती परिणाम होऊ शकतो इत्यादींवर रीडिंग मटेरियल असेल तर इथे टाकावे.

इत्यादींवर रीडिंग मटेरियल असेल तर इथे टाकावे.
>>>
+७८६
मी सुद्धा तेच चेक करत आहे सध्या.
पॉलिटीकल अजेंडा नसलेले मटेरीअल..

कोकणचा काय आपला सगळ्यांचा विनाश जवळ येत आहे. AI गुरु हिंटन काय म्हणतोय वाचा.
Hinton has been fielding a new request to talk every two minutes since he spoke out on Monday about his fears that AI progress could lead to the end of civilisation within 20 years.
येऊ द्या रिफायनरी.

मलाही माझे मत इथे द्यावेसे वाटत नाहीये. पास.
कुणीतरी मेहनत घेऊन माहितीपूर्ण धागा काढला तर वाचून काही मत बनले तर विचार करता येईल. धागाच इतका अपुरा तर त्याचं कापड कसं विणणार ?

Hinton has been fielding a new request to talk every two minutes since he spoke out on Monday about his fears that AI progress could lead to the end of civilisation within 20 years.>>>

everyone is trying their best to do things that will altimately finish everything on this planet that is alive and kicking …. so it’s obvious that very soon someone or other will find success in this field…

i am only praying that the end will be as peaceful as possible….

जगाचा विनाश अतिशय भयंकर स्थिती नी होणार आहे.
आणि त्याला फक्त मूर्ख माणूस च जबाबदार असणार आहे..
निसर्गाने एकदा चूक केली परत असले मूर्ख प्राणी पूर्ण ब्रह्मांड मध्ये कधीच निसर्ग निर्माण करणार नाही

विरोध करण्यापेक्षा प्रदूषणाचे नॉर्म पाळून काम होतंय का पाहणे जास्त योग्य वाटतंय. बाकी पर्यावरणाच्या नावाखाली विरोध म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा प्रकार आहे. पुनर्वसन नोकऱ्या वगैरे आनंदी आनंद आहे. तरी पण हित होऊ देण्यातच आहे.

रिफायनरी म्हटली की प्रदूषण हे आलेच. पण काही एकरावर पसरलेल्या रिफायनरी मुळे पूर्ण 600-700 kmच्या कोकण पट्टीचाच नाश होईल असे चित्र उभे केले जातेय ते माझ्या मते चुकीचे आहे. कोकणातले राजकारणी विकासाचे माध्यम असलेला मुंबई गोवा महामार्गच गेली 10-12 वर्षे होऊ देत नाहीत आणि आता लोकांना रिफायनरीला विरोध करायला लावताहेत. आंदोलने करायची असतील तर खालील गोष्टी साठी करावीत.

1. लोकांना त्यांच्या जमीनीचा जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल, खास करून ज्यांच्या आंब्याच्या व इतर बागा आहेत त्यांना मार्केट रेट पेक्षा जास्त रेट कसा मिळेल.

2. प्रदूषण कमी करण्यासाठी काय तरतूदी आहेत आणि त्यात अजून काय करता येऊ शकते.

3. त्या तरतूदी काटेकोर पणे अमलात आणण्यासाठी काय करता येईल.

4. त्या प्रकल्पात दरवाजाच्या वॉचमन पासून प्रकल्पाच्या हेड पर्यंत भूमीपूत्र कसे सामावून घेता येतील त्या संदर्भात प्लॅनिंग करणे.

प्रकल्प विदर्भात न्या किंवा फायदा असता तर तो प्रकल्प एव्हाना गुजरात ने पळवला असता अश्या आर्ग्यूमेंट्स अगदी काहीच्या काही आहेत. विदर्भात समुद्र नाही आणि गुजरातमध्ये जामनगर येथे याहून मोठी रिफायनरी अगोदरच आहे. त्यामुळे विरोध न करता या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे पहावे.

आणखी जाणून घ्यायला आवडेल. सध्यातरी प्रविणपाच्या कमेंटशी सहमत.
मुंबईत, पुण्यात, अमेरिकेत, कॅनडात राहुन प्रकल्पाला विरोध किंवा पाठिंबा देणार्‍यांच्या मताला काहीही किंमत नाही. या धाग्यात लिहिल्याप्रमाणे तुम्हाला कोकण हिरवं हवंय. का? तर वीकेंडच्या व्हेकेशनची सोय म्हणून. तिथले तरुण नोकरीधंद्याच्या निमित्ताने गेली कित्येकवर्षे मुंबईची वाट का धरत असावेत? काय प्रदुषण करायचं ते शहरात करा. गाव कसं गावासारखं दिसलं पाहिजे ही वृत्ती बघितली की तिडिक जाते. आपण सगळ्या सुखसोयींनी आनंदात रहायचे आणि इतरांनी पर्यावरणासाठी त्यांच्या जमिनींची वाट लावायची/ किंवा जे काय करायचं असेल ते करायचं नाही. हा शुद्ध आपमतलबीपणा आहे.

खरं म्हणजे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना त्यातील फायदे तोटे समजाऊन सांगण्याचे काम सरकार आणि कोकणातील सर्व राजकारणी लोकांचे आहे .
पण दोन्ही पातळीवर सकारात्मक हालचाली दिसत नाही , सरकार प्रकल्प राबवण्यासाठी दडपशाही करत आहे तर उध्दव , राऊत आणि त्यांचे सहकारी आंदोलनकर्त्यांची बाजू घेत आहे .
आशियातील सर्वात मोठी रिफायनरी जाम नगर ला असताना आजपर्यंत तेथे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला नसताना विनाकारण बाऊ केला जातोय ,आणि त्याला खतपाणी उध्दव आणि त्यांचे सहकारी घालत आहेत.
जामनगर मधील रिफायनरी ७५०० एकर्स मध्ये पसरलेली असून त्यातील १६०० एकर मध्ये ग्रीन बेल्ट आहे .
त्यात ६०० एकर मध्ये आंब्याच्या बागा आहेत , अंबानी भारतातील सर्वात मोठा आंबा निर्यातदार असल्याचे गुगलून केल्यावर समजले .

थोडक्यात कोकणी लोकांच्या आंब्याला त्रास नाही , प्रदूषण चा त्रास नाही , फक्त कोकणी लोकांची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे . कोकणी लोकं आणि तेथील राजकारणी उठा आणि राऊत च्या राजकारणाला बळी पडून होऊ घातलेला सर्वात मोठ्ठा प्रकल्प घालवून बसणार हे निश्चित .
सात आठ दिवसांपूर्वीच राऊत ने या प्रकल्पाचा उल्लेख करताना इस्लामिक प्रकल्प म्हणून केली होती .
म्हणजे यांना कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाला विरोध करायचा आहे , बाकी काही माहीत नाही ....

सुवर्णमध्य साधताच येणार नाहीये का? परदेशात नसतात रिफायनरीज? पण नॅशनल पार्क्स, हरित सॄष्टीने नटलेली हायवे आयलंडस यांचे मुद्दाम नियोजन केलेल असते.
कोकणचा 'विकास' नक्की व्हावा. पण काही भाग राखिव ठेवावा. अर्थात इतका साधा उपाय नसावा Happy पण माझी गुडविल.

गुजरात ला मोठ्ठी रिफायनरी असताना ही पण गुजरात ला मिळण्याची शक्यता कमीच आहे . कर्नाटक , आंध्र किंवा तामिळनाडू ला मिळेल मग भोगा कर्माची फळे .
गुजरात ला प्रकल्प गेला की शिंदे/ f२० च्या नावाने बोंबमारणारे हा प्रकल्प कोकण मध्ये झालाच पाहिजे या साठी प्रयत्न देखील करत नाही .
मुख्यमंत्री पद गेल्याचा राग कोकणवासीयांना अजून दारिद्र्यात ढकलून कमी होणार आहे का ?
कोणीतरी विचारा उठा ला .

परदेशात नसतात रिफायनरीज? पण नॅशनल पार्क्स, हरित सॄष्टीने नटलेली हायवे आयलंडस यांचे मुद्दाम नियोजन केलेल असते. >> परदेशात रिफायनरी आणि स्पिल्स आणि जमिनीतील पाणी आणि वनसंपदा आणि इ. इ. यांची कशी धरबंध नसलेली वाट लावतात! नॅशनल पार्क केलं आणि तिकडे रहाणार्‍या लोकांच्या जीवाची किंमत वसुल झालीच समजा. फर्स्ट नेशन्स का विरोध करतात पाईप लाईन्सला?
असं सगळं असुनही जवळचा विचार करायचा असेल तर तो करुन विकास साधायचा असेल तर त्याला नाही म्हणण्याचा आपल्याला अधिकार कोणी दिला? माझा हिटर, एसी काढून घेतलेला, हवी तशी गाडी उगाच कारण नसताना चालवायला पेट्रोल सप्लाय काढून घेतलेला मला चालणार नाही आहे. मला कुठलंच कॉम्प्रोमाईज माझ्या जीवनात करायचे नाही आहे. पण कोकणातील माणसांनी करावे वाटते. ही त्या कोकणातील माणसांची फसवणूक आहे. पृथ्वीचा अंत होणारच असेल तर तो किमान मी आणि माझे ऑफस्प्रिंग आनंदात जगून व्हावा. सॅक्रिफाईजने जगून नको हे मी ठरवलं आहे. तर ते कोकणाला ही ठरवू दे.

>>>>परदेशात रिफायनरी आणि स्पिल्स आणि जमिनीतील पाणी आणि वनसंपदा आणि इ. इ. यांची कशी धरबंध नसलेली वाट लावतात! नॅशनल पार्क केलं आणि तिकडे रहाणार्‍या लोकांच्या जीवाची किंमत वसुल झालीच समजा. फर्स्ट नेशन्स का विरोध करतात पाईप लाईन्सला?

ओह ओके. माहीत नव्हते आमच्या सुपिरीअर विस्कॉन्सिन मध्ये रिफायनरीला लोक विरोध करतायत हे खरे आहे.

कोकणी माणसाचा आमच्याकडे नको, इतरत्र न्या हा पवित्रा त्यांना एकटे पाडणारा आहे. अशाने कुणी त्यांच्या सोबत येणार नाही.
पण त्यांचा पवित्रा चुकीचा आहे म्हणून रिफायनरीला विरोध चुकीचा आहे का ?
अमेरिकेतल्या रिफायनरीज कमी का होत गेल्या ? अमेरिकेतले प्रदूषणाचे कडक कायदे वाचून जरी काढले तरी रिफायनरी का हवी असा प्रश्न पडेल.
कॅलिफोर्नियात रिफायनरीजला झालेले जबरा दंड का झालेत ? गेल्या तीन दशकात अमेरिकेत फक्त एक (किंवा दोन) रिफायनरी उभ्या राहिल्या आहेत.
गुगलले तर सर्व रिपोर्ट्स हात जोडून हजर होतील.

विदर्भात समुद्र नाही ह्याचा काय संबंध? जगातील सगळ्या रेफायनरीज समुद्राच्या किनारी आहेत का? लिंक शोधून टाकतो, किती किलोमीटर ची पाईपलाईन टाकून तेल वाहून नेलं जातं ते.

रिफायनरी सोर्स किंवा समुद्राच्या जवळपासच असाव्यात. किमान तेच लॉजिकल आहे. जगात आहेत हे काही कारण असू शकत नाही मिडल ऑफ नो व्हेअर बांधायला.

काही दिवसांपूर्वी मिळालेले एक फॉरवर्ड : (Forwarded as received)

*प्रदूषण आणि दिशाभूल करणाऱ्या आंब्याच्या बागा.*
प्रा. भूषण भोईर.
*नुकताच एक मराठी पेज वरती जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रात तब्बल दीड लाख आंब्याची आमराई रिफायनरी ने फुलवली आहे, तिथे आंब्याचे भरघोस उत्पन्न कंपनी घेत असून जामनगर येथील रिफायनरी मधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराई वर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणाऱ्या नसतात असे भासविण्याचा प्रयत्न लेखातून होतो आहे अशी शंका आली. सदर लेखात येथील रिफायनरी ने अगदी विपरीत परिस्थितीत शेती करून दाखवली आहे जिथे प्यायला पाणी नाही तिथे एवढ्या मोठ्या आमराई साठी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपनी ने समुद्राचे पाणी निक्षरिकरण करून (desalination) आमराई वाढवली आहे. आणि प्रदूषण करी कंपनी आणि तिथेच शेती ह्या दोन टोकाच्या गोष्टी सहज शक्य आहेत असे भासाविण्याचा प्रयत्न केला आहे.*
*त्या मागचं सत्य काय आहे हे आता समजून घेऊ. हे खरं आहे की सदर रिफायनरीच्या अगदी जवळ तब्बल दीड लाख आंब्याची झाडे कंपनी न लावली आहेत पण त्यावर प्रदूषणाचा काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी खोटं ठरेल. कारण ही आमराई रिफायनरी च्या चिमणी पासून सात किमी उत्तरेकडे बनवण्यात आली आहे. इथेच फार मोठी गोम आहे. कारण कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाचा प्रभाव चिमणीच्या अगदी जवळ म्हणजे पाच ते सात किमी अंतरावर होतच नाही*
*कारण चिमणी मधून निघणारे घातक वायू जे तुलनेने खूपच हलके असतात ते कधीच चिमणीच्या खाली वसलेल्या क्षेत्रावर पडत नाहीत ते उंचावर फेकले जातात. आणि उंचावरून वाहणारी हवा त्यांना दूर घेऊन जाते आणि रिफायनरी क्षेत्रात कुठेच प्रदूषणाचा परिणाम दिसत नाही परंतु रिफायनरी क्षेत्रा पासून वीस ते पन्नास किमी अंतरावर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो.*
*आत्ता आणखी एक महत्वाची गोष्ट कंपनीने केली आहे ती म्हणजे चिमणी पासून आमराई ही तब्बल सात किमी उत्तरेला आहे. (ही बाब ज्या लेखाचा मी उल्लेख करत आहे त्यात खोटी लिहिली असून सदर बागायत रिफायनरीच्या पश्चीम दिशेला आहे असे लिहिलं आहे.) समुद्राजवळ हवा रात्री जमिनी कडून समुद्रा कडे आणि सकाळी समुद्राकडून जमिनी कडे वाहते. म्हणजेच पूर्व पश्चीम असा हवेचा प्रवास आहे. त्या मुळे चिमणी पासून उत्तरेला असलेल्या आमराईकडे चिमणीतून निघालेला धूर पोहोचतच नाही. तो आमराई च्यामागील बाजूस पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करतो.*
तसेच, ऋतू बदल झाल्यावर देखील उन्हाळी मान्सून वारे पश्चिम नैऋत्ये कडून पूर्व -ईशान्य दिशेला वाहतात तर हिवाळी मान्सून (परतीचा पाऊस) हा ईशान्य कडून पश्चिम -नैऋत्य दिशेला प्रवास करतो. त्या मुळे रिफायनरी मधून निघणारा धूर कधीच ह्या आमराई मधे जातच नाही कारण तो नेहमी आमराईच्याविरुद्ध दिशेला जातो आणि अश्या रीतीने ही आमराई रिफायनरी क्षेत्रात असून देखील तिच्यावर प्रदूषणाचा अजिबात परिणाम होत नाही.
*सदर बाब ठामपणाने मांडण्या साठी ह्या लेखासोबत सदर आमराई आणि चिमणीची दिशा दर्शवणारा गुगल फोटो जोडत आहे. ज्यात रिफायनरीच्या चिमणीमधून निघालेले धुराचे लोट देखील उपग्रहांनी टिपले असून रिफायनरीमधून उपग्रहवरून देखील प्रदूषण दिसते आहे. तसेच धुराचे लोट आमराईच्या विरुद्ध दिशेला जाताना दिसत आहेत. तसेच मान्सून वारे कश्या प्रकारे वाहतात ते दर्शवणारा फोटो देखील शेयर करत आहे.*
आता आणखीन एक बाब इथे नमूद करावी असं मला वाटतं ती म्हणजे सदर *लेखात आमराई साठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून वापरले जाते असं सांगितलं आहे आणि समुद्राचे पाणी निक्षारीकरण करणे कित्ती सोप्पे आणि फायदेशीर असल्याचे गळी उतरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु असे करत असताना जेवढे समुद्राचे पाणी निक्षारी करन केलं जातं त्याच्या दीडपटीने अतिशय क्षार युक्त(hyper saline brine) पाणी तयार होतं ज्या सोबत घातक अशी क्लोरीन आणि कॉपर युक्त विषारी द्रव्ये देखील तयार होतात जी थेट समुद्रात सोडावी लागतात ज्या मुळे समुद्रातील जीवसृष्टीचा विनाश होतो.*
*आता वर उल्लेख केल्या प्रमाणे जर १.५ लाख आंब्याच्या झाडांना निक्षारीकरण केलेलं पाणी दररोज दिलं जात असेल तर त्याचा हिशोब मांडल्यास एकट्या आंब्याच्या झाडाला दिवसाला १५० लिटर इतक पाणी लागत. त्या हिशोबाने १.५ लाख आंब्याच्या झाडांना दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी जर निक्षारीकरण केलेलं आहे असं धरलं तर त्याच्या दीड पटीने अतिशय क्षार युक्त आणि विषारी द्रव्ये तयार झालेलं पाणी जे जवळपास २२.५ दशलक्ष लिटर घातक असे अतिक्षारयुक्त पाणी असेल ते दररोज कुठे टाकले जात असावे हा संशोधनाचा विषय असायला हवा.*
तर सांगायचं तात्पर्य हेच की अश्या दिशाभूल करणाऱ्या आमराईपासून आणि अश्या प्रकल्पापासून आपण सावधच राहिलेलं बरं.
राहिली गोष्ट सदर मराठी पेजने छापून आणलेल्या लेखाचा दाखला देऊन जर कोणी कोकणात रिफायनरीच समर्थन करीत असेल तर इथे आणखीन एक अति महत्वाची बाब मांडावी असं वाटतं. ती म्हणजे *कोकणात सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला जिथून मान्सून येतो त्या बाजूस रिफायनरी ऊभी केली तर तिचा खूप वाईट परिणाम संपूर्ण सह्याद्री वरती होईल रिफायनरी तून निघालेले धुराचे लोट दररोज सकाळी पश्चिम दिशे कडून पूर्वेस वाहणाऱ्या हवे मुळे पूर्वे जवळ असणाऱ्या डोंगराळ भागात जातील. (जामनगर येथे भूभाग डोंगराळ नाही त्या मुळे धुराचे लोट डोंगराळ भागात अडले जात नाहीत. ) त्या मुळे पूर्वनियोजित नाणार येथे किंवा बारसू सोलगाव येथे जर रिफायनरी उभी राहिली तर त्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात असलेल्या डोंगराळ भागातील जंगल आणि गावं रिफायनरी मधून आलेल्या प्रदूषणाला बळी पडणार हे निश्चित. तसेच मान्सून वेळी, पश्चिम -नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रिफायनरीमधून निघालेले धुराचे लोट कित्येक किलोमिटर उत्तर -पूर्व दिशेला असलेल्या गावांमध्ये आणि समुद्राच्या पूर्वेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतावर जातील ज्यामुळे त्यावर उभ्या असलेल्या वनराजीला आणि त्यात राहत असलेल्या माणसांसहित कित्येक जीवांना त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल. त्याच सोबत जेव्हा मान्सून येईल तेव्हा ढगांच्या सोबत वाफेमधे रिफायनरी मधून निघालेल्या विषारी वायूचे लोट यांचे संयुग होऊन पावसासोबत खाली येतील आणि मग कोकणातील सर्व जमीन आणि नद्या देखील त्याची किंमत मोजतील आणि विषयुक्त होऊन माणसाला त्याच्या करणीचे फळ देतील.
तरी उध्वस्त झालेल्या उत्तर कोकणातील एक भूमिपुत्र आणि पर्यावरण अभ्यासक म्हणून सदर माहिती मांडणे माझे कर्तव्य होते जे मी पूर्ण केले. आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.

धन्यवाद.
प्रा. भूषण भोईर,
M. Sc. Zoology
८२३७१५०५२३.

यात आणखी एक माहिती हवी. बारसू ची जी नियोजित जागा आहे तिथे डोंगररांग असल्याने वारे उत्तरेला सुद्धा वाहते जे जामनगरला होत नाही. बोल भिडू चा व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे.

छान पोस्ट हीरा.
अशीच पर्स्पेक्टिव्ह वाचायला आवडतील.

मिझोरम राज्याचा एक चिंचोळा भाग समुद्र ल मिळतो तिकडे असेल प्रदूषणकारी उद्योग घेवून जा ना?
एका बाजूला म्यानमार आणि एका बाजूला Bangladesh आहे .
जे काही प्रदूषण होईल ते दुसऱ्या देशाचे.

प्रदूषण करणारे उद्योग भारत सरकार ल मोठ्या शहरां जवळ किंवा बागायती शेती जिथे असते तीथेच का लागतो?
हा खरे तर प्रश्न आहे.
भारतीय प्रशासन व्यवस्थेत उच्च शिक्षित आणि सर्व बाबींचा कठोर अभ्यास असणारे अधिकारी च नाहीत.
सत्तेत बसलेले नेते तर अडाणी च आहेत त्यांना काय कळतंय प्रदूषण न मुळे किती मोठे नुकसान देशाचे होत आहे tem

मिझोरम राज्याचा एक चिंचोळा भाग समुद्र ल मिळतो >>> धन्यवाद या माहितीबद्दल. आता चिकन नेकची चिंता मिटली.

मिझोरम राज्याचा एक चिंचोळा भाग समुद्र ल मिळतो तिकडे असेल प्रदूषणकारी उद्योग घेवून जा ना? >>>>>>
काहीही .....
समुद्रा पासून ८० की मी लांब आहे हो मिझोराम.

Pages