म.वि.आ. : असून अडचण नसून खोळंबा

Submitted by pkarandikar50 on 25 April, 2023 - 00:29

म.वि.आ. : असून अडचण नसून खोळंबा
शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर आता म.वि.आ.चा अध्याय संपला का? अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली आहे. वास्तविक पहाता, २०१४ च्या विधान सभा निवडणूकीत शिवसेना - भा.ज.प. युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी केली होती. तथापि शिवसेनेची महत्वान्कांक्षा अचानकपणे अनावर झाली आणि भा.ज.प.ला एकदाचा धडा शिकवायचाच या भूमिकेतून शिवसेना अडून बसली. त्यांच्या युतीत असे वितुष्ट यावे हा काही राष्ट्रवादीचा डाव नव्हता. पण तसे आपसूक घडून आल्यावर सत्ता काबीज करण्यासाठी म.वि.आ. हा एक संधीसाधू प्रयोग करून पहाण्याची आलेली चांगली संधी राष्ट्रवादी वाया घालवणार नव्हती.
मुळातच म.वि.आ. म्हणजे गाजराची पुंगी होती. एकदा सत्ता हातातून निसटल्यानंतर आता तिची गरज राष्ट्रवादीला उरलेली नाही. यानंतर निवडणूकीच्या मार्गाने पुन्हा म.वि.आ. सत्तेत येऊ शकत नाही हे राष्ट्रवादीला चांगले ठाऊक आहे. युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतरही अवास्तव महत्वान्काक्षेपायी जे उद्धव ठाकरे भा.जा.प.ला ‘बाय बाय’ करू शकतात; ते उद्या जागा-वाटपाच्या वेळीही म.वि.आ. मध्ये पेचप्रसंग निर्माण करू शकतात हीच जाणीव शरद पवार यांच्या वक्तव्यामागे दिसते आहे. लोकसभा किंवा विधानसभेआधी उद्या म.न.पा. निवडणूका लागल्यानंतर हा प्रश्न उफाळून येणारच आहे. त्यावेळी म.वि.आ. तून बाहेर पडणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांना भाग पडणार आहे. त्याचे सूतोवाच शरद पवार यांनी करून ठेवले आहे, इतकाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ घ्यावा लागेल.
महाराष्ट्राच्या सत्तांतरावरून सर्वोच्च न्यायालयातल्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निकाल हाती येईपर्यंत तरी उ.बा.ठा.सेनेला आपले आस्तित्व टिकविण्यासाठी म.वि.आ. आवश्यक वाटत असली तरी आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दृष्टीने खरे तर उ.बा.ठा. सेना म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ होऊन बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने लागला तर उ.बा.ठा.सेना आणखीनच अडचणीत येणार आहे पण तसे झाले तरी उद्धव ठाकरे जागा-वाटपाच्या चर्चेला बसल्यावर काही वास्तववादी भूमिका घेतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आतापासूनच म.वि.आ. च्या विसर्जनाच्या तयारीला लागणे व्यवहार्य ठरेल हेच पवार सूचित करत आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भविष्यातील आघाड्या मुळे निर्माण होणाऱ्या राजकिय अंधाधुंधित सगळ्यात बेक्कार परिस्थिती उठाची असणार हे निश्चित !
भविष्यात भाजपने काँग्रेस बरोबर युती केली तरी चालेल पण ढोंगी उठा बरोबर केली नाही पाहिजे ,नाहीतर आपले मत राष्ट्रवादीला ......

#घर का ना घाटका

जी माजी मामुने आधीच केली आहे. प्रत्येक सभेत मामु , माझा बाप पळवला, खोके ओके, माझा शिवसैनिक ( अरे बाबा शिवसैनिक तुझा कधी होता? तो तुझ्या पिताश्रींचा होता. तू आणी तुझा प्वारगा तर आयत्या बिळावरचा फुस्स ! ) गद्दार ब्ला ब्ला ब्ला ! एवढेच बोलतो.
आधी वसुल्या करुन उद्योजकांना धमकवायचे, त्यांना बाँब वगैरे ठेऊन घाबरवुन टाकायचे ( मग त्यांच्या घरी हादडुन यायचे ) आणी असल्या वातावरणामुळे उद्योग महाराष्ट्रा बाहेर गेले की वचावचा तिन्ही त्रिकाळ ठणाण बोंबलत् सुटायचे. झाकणझुल्या तर मध्यरात्री पण येऊन बोंबलेल, पण चॅनेलवाले घाबरलेत. डबल ढोलकी फावड्या नी ज्यु फावड्या.

ज्यु फावड्या तर सारखा गेंगाण्या आवाजात रडत असतो.

साहेबांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला .
राष्ट्रवादी हा लोकशाहीची परंपरा पाळणारा पक्ष असल्यामुळे अजित किंवा सुप्रियाची निवड होण्याची शक्यता आहे .
माझे राजकारणातील बळी या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना त्यांनी अचानक राजीनाम्याची घोषणा केली असता कार्यकर्ते खूपच भाऊक झालेले दिसले .
१.१३ वाजता मी लाईव्ह रीपोटिंग करतोय .
मला १०० टक्के खात्री आहे , कार्यकर्त्यांना आणि जनतेला प्रचंड भाऊक करून साहेब राजीनामा मागे घेतील आणि राष्ट्रवादी पुन्हा भक्कम होईल .
सध्यातरी साहेबांनी राजीनामा मागे घेवू नये म्हणून दादा पाण्यात देव ठेवून बसलेले दिसत आहे .

विकिचं सायबांचं पान वाचलं. आघाडी आणि बिघाडी. विधानसभा ते लोकसभा राऊंड ट्रिपा. बाकी काही नाही. तरी अजून पंप्र किंवा राष्ट्रपती होण्याच्या इच्छेवर दीदींनी पाणी फिरवलं नसतं तर . . .
तरीही महाराष्ट्राची जनता आज अध्यक्षपद सोडल्यावर सद्गदीत झाली.(फोडाफोडी भाजपच करते अशी डफली हल्ली जोरात वाजवली जात आहे ते सोडा.)

त्या लालुंच्या नावावर गरीब रथ गाडी तरी आहे. जॉज फर्नांडिसच्या नावावर कोकण रेल्वे प्रतिष्ठान होऊन पाच वर्षांत सुरूही झाली. (त्यात गोवा सरकारने दोन वर्षे अडवणुक केलेली होती.)

Paid आयटी सेल वाली मेंबर च हा प्रतिसाद आहे.
सर्वसामान्य लोकांची ही भाषा असू च शकत >>>>>
हेमंत ,
याच भिंगातून भरत, झंपू , भ्रमर चे प्रतिसाद पण तपासात जा !
म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होईल .
हो की नाही ?

आपले प्रतिसाद सोडा. पृ.चव्हाणांनी मविआबद्दल साशंकता व्यक्त केली आज. आता राष्ट्रवादी फुटली* की कसं होणार? नाना पटोळेंनाही आतून विरोध झाला आहेच. तोही पक्ष फुटणार वाटतंय. खरी कसोटी मतदारांचीच आहे. माझा कुणा म्हणू मी?
(#* ही शंका वर्तमानपत्रांत ही आली आहे आज.)

Pages