कोरियन व्हेज. पॅनकेक

Submitted by maitreyee on 22 March, 2023 - 13:41
korean pancake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाज्या- कांद्याची पात, मश्रूम्स, गाजर, सिमला मिरच्या, रंगीत मिरच्या , पत्ता कोबी वगैरे, आवडीच्या कोणत्याही भाज्या. चिरुन १ लहान बोल भर
बाइंडिंग साठी - ऑल पर्पज फ्लार, मैदा, किंवा गव्हाचे, किंवा तांदळाचे पीठ. - ३-४ चमचे
सॉस साठी - सोया सॉस ३ चमचे, राइस व्हिनिगर २ चमचे, तिळाचे तेल किंवा भाजलेल्रे तिळ

क्रमवार पाककृती: 

ही रेसिपी मला इन्स्टा रील्स मधे एकदा दिसली होती तेव्हापासून करायचे डोक्यात होते. काल करायला मुहूर्त लागला. लो कार्ब, फायबर रीच, झटपट आणि तरी पण चटपटीत रेसिपी हवी असल्यास हा एक मस्त ऑप्शन आहे. यात मुख्य चव आणि टेक्स्चर त्यातल्या भाज्यांचे असते. सोबतच्या सॉस ने चटपटीत खाल्ल्याचे समाधान मिळते. पॅनकेक म्हणा किंवा धिरडे Happy प्रकार तोच.
कृती अगदी सोपी आणि खूप वर्सटाइल आहे. हा नसेल तर तो इन्ग्रेडियन्ट वापरा असे.
सॉस - सोयासॉस, व्हिनेगर एकत्र मिक्स करा , त्यात काही थेंब तिळाचे तेल - सेसमी ऑइल घाला, हवा तर हॉट सॉस घाला. झाला सॉस तयार! तिळाचे तेल नसेल तर भाजलेले तीळ वरून घाला. मस्त चटपटीत चवीचा सॉस तयार.
IMG_5665_0.jpg
पॅनकेक - वर दिलेल्या पैकी असतील त्या भाज्या बारीकचिरून घ्या. मी एक लहान बोल भरून भाज्या घेतल्या . त्यात आवडीचे सीझनिंग घाला जसे हिरव्या मिर्च्या, आले लसणाचे बारीक तुकडे , किंवा नुसते मीठ मिरी पण चालेल. आता बॅटर तयार करण्यासाठी १ बोल भाज्यांना अगदी २-३ चमचे पीठ आणि थोडे पाणी असे कालवा. IMG_5666.jpg
गरज वाटली तर अजून एखादा चमचा . पिठ जास्त नाही झाले पाहिजे. बाइंडिंग साठी जस्ट इनफ किंवा थोडे कमीच पीठ वापरायचे आहे. IMG_5668.jpg
हे पहा असा दिसतो कच्चा पॅनकेक . मला शंकाच आली होती हे धिरडे उलटायचे कसे! पण झाले बरोबर.
मिडियम हाय वर पॅनकेक नीट खरपूस भा़जून घ्या. भाज्या मस्त क्रिस्पी होऊ देत. झाला पॅनकेक तयार!! सॉस बरोबर गरम गरम खा!
IMG_5671.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात एका व्यक्ती साठी २ पॅनकेक झाले. त्यानुसार प्रमाण वाढवा.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह मस्त वाटतो आहे प्रकार.
पॅनकेकसारखं पसरण्याऐवजी थालिपिठासारखं थापायचं का हे? आणि मिश्रणात तेल अजिबात नाही?

नाही अगदी थापण्याइतके घट्ट नाही होत. अलगद पसरायचे. ओतलेले, फेकलेले तसे पसरलेले थालिपिठ Happy मी तेल नव्हते घातले. ऑथेन्टिक रेसिपीत असते की काय बघायला पाहिजे. तव्यावर भाजताना थोडे घातले तेल अर्थात.

मस्तच!
मी एकदा असंच आप्पे पात्रात टाकून त्याचे आप्पे हे मंचुरिअन म्हणून बनवलेले आणि मग ग्रेवी बनवून त्यात टाकलेले. गरम गरम खायला चांगले लागलेले फ्राईड राईस सोबत.

मस्त आहे हे. करून बघणार. फोटोतले भाजी चे तुकडे जाड कापले गेले आहेत असे मला वाटतेय,
चॉपर मधून बारीक निघतील, सिमला सोडून. नास्त्या साठी छान पदार्थ आहे

छान आहे
Chizumi
चीझूमी असं म्हणतात बहुतेक
आवडता पदार्थ आहे पण कधी घरी केला नव्हता

यात नॉन व्हेज मध्ये बारीक कोळंबी पण छान लागते.

आशु२९, एकदम बारीक गाळ कापून नाही चालणार, कारण त्या भाज्या क्रिस्पी होतात त्या चवीचे / टेक्स्चर चे महत्त्व आहे. नेट वर पाहिले तर याच्याहून मोठे तुकडे आहेत, पातळ पण आकाराने मोठे.
सावली, Yachae jeon असे आहे नाव.

आशु२९, एकदम बारीक गाळ कापून नाही चालणार, कारण त्या भाज्या क्रिस्पी होतात त्या चवीचे / टेक्स्चर चे महत्त्व आहे. नेट वर पाहिले तर याच्याहून मोठे तुकडे आहेत, पातळ पण आकाराने मोठे.
सावली, Yachae jeon असे आहे नाव.

मी केले कालच, छान झाले होते.कोबी-झुकिनी-गाजर-कान्दा पात-लसुन-मिरची-मिरपुड अस मिसळुन ठेवल मग थोड पिठ आणि पाणी घालुन डावाच्या उलट्या बाजुन पसरवल... बहुधा झुकिनी घातल्याने मौ पडले आणी धिरड्यासारखे लागत होते.

भारी दिसतोय पॅनकेक. असं काहीतरी ट्रेडर जोज मधून आणून खाल्लं होतं आणि आवडलं होतं. आता हे करून पाहाणार.

मला काकडी/झुकिनी थालिपीठाची आठवण आली , थोडी ट्रेडर जो च्या बर्डनेस्टचीही !
आता हे असे मिक्स व्हेज करून पहायला हवे, मैद्या ऐवजी तांदळाचे/ज्वारीचे पीठ वापरीन बहुतेक !

मैत्रेयी ओके उलटवता येईल इतके जाड तुकडे कापता येतील..
वॉव सर्व जुन्या माबो मैत्रिणींचे आयडी वर आलेले बघून आनंद झाला Happy

केले मी, ज्या होत्या त्या भाज्या + बॅटर मधेही तीळाचे तेल वापरले, बाइंडिंग साठी १ चमचा तांदळाचं , १ चमचा ज्वारीचं पीठ वापरून हेल्दीयर व्हर्जन करायचा प्रयत्नं केला, फारच टेस्टी झाले !
मी कान्दा, पालक, स्वीट पोटॅटो, पनीर, रंगीत सिमला मिर्ची हे वापरले.
काल नेमकी कान्द्याची पात आणि कोबी नव्हती, नेक्स्ट टाइम !
0C299364-4BEE-4EC1-9F90-2297D523C42A.jpeg

कोरियात रहात असताना याचं रेडीमेड पीठ मिळायचं. त्यात भाज्या घालून केलं जायचं. Puchimgae (पूचिंमगे) म्हणतात याला. Yachae याच्चे म्हणजे व्हेजिटेबल.

मस्त दिसतंय एकदम. आसपास कोरियन सामान मिळणारी दुकानं असतील तर याचं पीठही मिळेल. Puchim-Garu लिहीलेलं असेल.

डीजे चे पॅनकेक भारी दिसतायत!
आडो, तयार पीठ म्हणजे काय असेल? असा विचार करते आहे. कारण पिठात काहीच वेगळे नाहीये. जनरल ऑल पर्पज फ्लार किंवा तांदळाचे पिठ असेच दिसते रेसिपीज मधे. त्यात अजून काही घालतात का ?

आपल्याकडे पॅनकेकचं वेगळं पीठ मिळतं तसंच असावं. ते ही ऑल पर्पज फ्लावरचं असतं. जपानमध्ये तेंपुराचं वेगळं पीठ मिळतं. मो बी सोडा वगैरे घालत असावेत आत.

मै, कल्पना नाही ग मला. एका मैत्रिणीकडे खाल्लं होतं मग मी पण घरी करायचे तेव्हा. कोरियन वाचता वगैरे येत नव्हतं तेव्हा.

सोय सॉसमध्ये कलर्ड पेपर्सपण बारिक चिरून घालायचे असं अंधुकसं आठवतंय मला.

मे आणि डिजे, छान दिसत आहेत पॅनकेक्स!

कोरीअन पॅनकेक मिक्स - buchimgaru एशियन दुकानात मिळते. मला किंमत जरा जास्त वाटली . म्हणजे ऑल परपझ फ्लोर
+ कॉर्न स्टार्च आणि चिमूटभर बेकिंग पावडरला एवढे असे झाले म्हणून नाही घेतले.

यावेळेस आपले रेग्युलर पॅनकेकच पिठ वापरल होत त्याने छान क्रिस्पी झाल होते, भाज्या जितक्या पातळ कापुन घेवु तितके पॅनकेक पसरावायला सोपे जातात.
मला आवडली ही रेसिपी.काहीवेळेस एखादी सिमला मिरची,झुकिनी अस काहितरी उरलेल असत त्याची मोट बान्धायला सोपी नो ब्रेनर रेसिपि.
8C46D34D-E0F3-417C-99B7-7D608A14AE5E.jpeg

वॉव, माझ्या फोटोपेक्षा तुझे आणि डीजेचे पॅनकेक्स जास्त फोटो जेनिक दिसतायत एकदम Happy
माझी पण फेवरेट रेसिपी झाली आहे ही. सॉस हल्ली ट्रेडर जोज चा ग्योझा सॉस आणि श्रीराचा असा मिक्स वापरते मी.

Pages