जेव्हा उपसंपादकांना जाग येते अर्थात लेखननियम
आपण आपले विचर बोलून किंवा लिहून दाखवतो. त्या बोलण्याला भाषा म्हणतात. भाषा हे विचारांच्या देवघेवीचे मौलिक साधन आहे . लेखनव्यवहारात तेच विचारविनिमयाचे लिखित साधन बनते. लिखित भाषा हे भाषेचे दृश्य रूप. विचार एकमेकांना समजायला हवे असतील तर एका विशिष्ट लेखनपद्धतीचे पालन करणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरेल. अशा नियमांनाच आपण शुद्धलेखनाचे नियम म्हणतो.
भाषा प्रवाही असते. सतत बोलल्या जाणार्या म्हणजे जिवंत भाषेत कालानुसार व प्रांतपरत्वे बदल होत राहतात. भाषेत बदल झाला की लेखननियमांतही बदल होतात. पूर्वी आपण संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांच्या शेवटचे इकार व उकार र्हस्व असले तर र्हस्व लिहीत असू. पण आता आपण मराठीचे लेखन मराठी उच्चारानुसार करतो, तेव्ही हे इकार व उकार दीर्घ लिहितो. क्रियापदांच्या केलें, गेलें अशा रूपांवरील
स्प्ष्ट उच्चार न होणारे अनुस्वार आता आपण लिहीत नाही. थोडक्यात लेखनाचे नियम बदलत असतात. तेव्हा शुद्धलेखनाचे नियम म्हणजे लेखनविषयक आजचे नियम. हे नियम ठरवणारी संस्था आहे. त्या नियमांना शासनाची मान्यता असते. ल आणि श या अक्षरांच्या लेखनात काही बदल होत असल्याची बातमी आपण वाचली असेल.
शुद्ध या शब्दाबरोबरच अशुद्ध शब्द येतो. अनेकांना असे वाटते की बोली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा. तर तसे नाही. महाराष्ट्रात निरनिराळ्या भा गांत निरनिराळ्या बोली बोलल्या जातत. पुण्याच्या परिसरातील पुणेरी भाषा गेल्या चारशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजव्यवहाराची भाषा होती . सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी हीच भाषा प्रमाण मानून दादोबा पांडुरंगांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण रचले. याच भाषेत ग्रंथरचना होऊ लागली, शासन व्यवहार, शिक्षण आणि प्रसार माध्यमांत ती रूढ झाली. शुद्धलेखनाचे , व्याकरणाचे नियम या प्रमाण भाषेबद्दलच आहेत.
बोली भाषेचा वापर अर्थातच बोलण्यापुरता मर्यादित असतो. त्या भाषेत लेखन होऊ लागले आणि ती वापरली जाणारा भूभाग विस्तारला की तिला लिखित भाषा ही मान्यता मिळते.
यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण खेळातून शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे नियम घोटून घेणार आहोत.
आम्ही काही वाक्यांचे संच देऊ. त्यातल्या चुका दुरुस्त करून तुम्ही ती वाक्ये पुन्हा लिहायची आहेत. यात र्हस्वदीर्घ आले , अनुस्वार आले, व्याकरणाचे नियम आले; क्वचित कुठे वाक्यरचनेतही चुका असतील. कुठे चुकीचा शब्द वापरला असेल.
नियतकालिकांतील मजकुरांत आढळलेल्या भाषेसंबंधी चुकांवर आधारिए उपसंपादकांच्या डुलक्या हे पानपूरक अमृत मासिकात येत असे.
आपल्याला अशा डुलक्यांचे परिणाम शोधून काढायचे आहेत.
चला तर मग, हसत खेळत लेखननियमांची आणि व्याकरणाची उजळणी करूया.
संच १
संच १
.
१. पर्वा तुझी बहिण आली होती ना?
२. गेल्या वीस मिनिटापासून तू "एक मिनिटं , एक मिनिटं" करत आहेस !
३. तंमय आणि वेदांत आताच शाळेत गेले.
४. सर्वांना सारखाच प्रकाश देणे ही सुर्याची निती.
५. पेला लवडंला आणी पाणी सांडून गेल.
६. पारंपरिक पोशाख दिनी मी धोतर घालणार आणि फेटा चढवणार.
७. कठीण प्रसंगी आपले डोके शांत राहायला हवे.
८. तुझ्याशी बोलताना वेळ कशी गेली ते कळलेच नाही.
९. आता आपण घरी जावूनच जेऊ.
१०. तु माझी मदत केली असतीस तर माझे पैसे पाणीमध्ये गेले नसते.
पहिला संच - उत्तरे
१. परवा तुझी बहीण आली होती ना?
२. गेल्या वीस मिनिटांपासून तू "एक मिनिट , एक मिनिट" करत आहेस !
३. तन्मय आणि वेदान्त आताच शाळेत गेले.
४. सर्वांना सारखाच प्रकाश देणे ही सूर्याची नीती.
५. पेला लवंडला आणि पाणी सांडून गेलं.
६. पारंपरिक पोशाखदिनी मी धोतर नेसणार आणि फेटा बांधणार.
७. कठीण प्रसंगी आपले डोके शांत राहायला हवे.
८. तुझ्याशी बोलताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
९. आता आपण घरी जाऊनच जेवू.
१०. तू मला मदत केली असतीस तर माझे पैसे पाण्यात गेले नसते.
--------------------------------------
संच २
१. त्यातल्या त्यात जर मौल्यवान, भरजरी, आकर्षक, उत्तम रंगसंगत व सुंदर नक्षिकाम असणारी पैठणी साडी असेल, तर मग विचारायलाच नको; कारण प्रत्येक स्त्री ची इच्छा असते कि आपल्या कडे एकतरी पैठणी असावी.
२. भगवान दत्तात्रय यांच्या मातेचे नाव अनुसया होते.
३. बारक्या गेले दोन महिने विष्णुसहस्त्रनाम पाठ करतो आहे.
४. मुंबईत मराठीभाषिक खूप कमी उरले आहेत.
५. कठीण समय येता जो कामास येतो, तोच खरा मिञ.
६. लहानपणी झाडावरून कैर्या पाडून खायला मजा येत असे.
७. पंत, तुम्ही मौन सोडा. हि शब्दब्रम्हाची ऊपेक्षा आहे.
८. मोरपीसाच्या टोकाशी जो रंग असतो, दुकानदाराने मला तो वाला दाखवावा अशी माझी इच्छा होती.
९. संगीत जाणणार्या माणसाला संगीतज्ञ म्हणतात आणि संगितात पारंगत असणार्या माणसाला संगीततज्ञ म्हणतात.
१०. लंबोदर पितांबर फणिवर वंदना | सरळ सोंड वक्त्रतुंडत्रि नयना ||
सुधारित वाक्ये
संच २ उत्तरे
१. त्यातल्या त्यात जर मौल्यवान, भरजरी, आकर्षक, उत्तम रंगसंगत व सुंदर नक्षीकाम असणारी पैठणी साडी असेल, तर मग विचारायलाच नको; कारण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपल्याकडे एकतरी पैठणी असावी.
२. भगवान दत्तात्रेय यांच्या मातेचे नाव अनसूया होते.
३. बारक्या गेले दोन महिने विष्णुसहस्रनाम पाठ करतो आहे.
४. मुंबईत मराठीभाषक खूप कमी उरले आहेत.
५. कठीण समय येता जो कामास येतो, तोच खरा मित्र.
६. लहानपणी झाडावरून कैऱ्या पाडून खायला मजा येत असे.
७. पंत, तुम्ही मौन सोडा. ही शब्दब्रह्माची उपेक्षा आहे.
८. मोरपिसाच्या टोकाशी जो रंग असतो, दुकानदाराने मला तो वाला दाखवावा अशी माझी इच्छा होती.
९. संगीत जाणणार्या माणसाला संगीतज्ञ म्हणतात आणि संगीतात पारंगत असणार्या माणसाला संगीततज्ज्ञ म्हणतात.
१०. लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
------------------
संच ३
१. काय म्हणता? मधमाशांनी सश्याला पळवून लावलं?
२. आप्तेश्ट कुटुंबियांसह कार्याला नक्की या.
३. बेसनच्या लाडूंसाठी साखर आणायला हवी.
४. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरास होते.
५. तुझी आवडनिवड जपतांना मला माझ्या आवडनिवडी वर पाणी सोडावे लागते
६. काल आपल्या दाराचा पारिजातक काय फुलला होता!
७. मी बशीतून उतरलो तर गाडी स्टेशनात शिरतच होती.
८. कोहलीने आपल्या एकशे तिसर्या सामन्यात चाळीसवे शतक झळकवले.
९. आज पहिला तास शारिरिक शिक्षणाचा आहे.
१०. पु. ल. देशपांड्यांनी विनोदीलेखनाबरोबरच विचारपूर्वक लेखनही केले.
संच ३ उत्तरे
१. काय म्हणता! मधमाश्यांनी सशाला पळवून लावलं?
२. आप्तेष्ट, कुटुंबीय यांसह कार्याला नक्की या.
३. बेसनाच्या लाडवांसाठी साखर आणायला हवी.
४. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरास होते.
५. तुझी आवडनिवड जपतांना मला माझ्या आवडीनिवडीवर पाणी सोडावे लागते.
६. काल आपल्या दारचा पारिजातक काय फुलला होता!
७. मी बसमधून उतरलो, तर गाडी स्टेशनात शिरतच होती.
८. कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या सामन्यात चाळिसावे शतक झळकावले.
९. आज पहिला तास शारीरिक शिक्षणाचा आहे.
१०. पु. ल. देशपांड्यांनी विनोदी लेखनाबरोबरच वैचारिक लेखनही केले.
------------
संच ४
१. तुमचे आशिर्वाद पाठीशी आहेत म्हणुन हे शक्य झाले.
२. उंदिर मला खुप आवडतो असं गोष्टितली मांजर म्हणली
३. तुला प्रेम करणे मला जमलेच नाही.
४. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जूनाने सुभद्रेला हरण केले.
५. नलदमयंतीच्या गोष्टीत चित्रातला हंस मोती खाल्ला.
६. रामरायाचा जन्म भर माध्यान्नी झाला.
७. हे लिखाण लिहिताना मला एक कविताही सूचली.
८. याचा मतिथार्थ काय होतो?
९.रोज दुपारी वामकुक्षी केल्याने वजन वाढते.
१०. उकाडा हळुहळू वाढू लागला आहे.
संच ४ उत्तरे
१. तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून हे शक्य झाले.
२. उंदीर मला खूप आवडतो, असं गोष्टीतली मांजर म्हणाली.
३. तुझ्यावर प्रेम करणे मला जमलेच नाही.
४. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले.
५. नलदमयंतीच्या गोष्टीतील चित्रातल्या हंसाने मोती खाल्ला.
६. रामरायाचा जन्म भर माध्यान्ही झाला.
७. हे लिखाण लिहिताना मला एक कविताही सुचली.
८. याचा मथितार्थ काय होतो?
९. रोज दुपारी वामकुक्षी घेतल्याने वजन वाढते.
१०. उकाडा हळूहळू वाढू लागला आहे.
---------------------------------
संच ५
१. प्रश्ण असा आहे की उत्तर काय आहे?
२. ह्या विशिष्ठ स्पर्धेत उत्कृष्ठ शरीरसौष्ठव असणाराच श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले जाईल.
३. अकबर मशीदीत गेला तेव्हा अँथनी ही चर्च मध्ये जाण्यास निघाला होता.
४. पेस्तन काकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली.
५. युध्दात आणि प्रेमात सगळं माफ असतं.
६. आमच्याकडची अनेक जोडपी पहिल्यांदा लग्न झाल्यावर शिर्डीला जातात.
७ माझ्या आधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
८. मराठी भाषा गौरव दिनासाठी उपक्रम, लेख, खेळ , कोडी म्हणी वैगरेंचे आयोजन करताना आमची खूप धांदल उडाली. अगदी परीक्षाच म्हणा ना!
९ तू रहा म्हणालास म्हणून त्याने महिनाभर राहाणे उचित आहे का?
१० तुझे ला जून हसणे आणि हसून पहाणे माझ्या लक्शात आहे.
उत्तरे
१. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे.
२. ह्या विशिष्ट स्पर्धेत उत्कृष्ट शरीरसौष्ठव असणाराच श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले जाईल.
३. अकबर मशिदीत गेला तेव्हा अँथनीही चर्चमध्ये जाण्यास निघाला होता.
४. पेस्तन काकांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली.
५. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं.
६. आमच्याकडची अनेक जोडपी लग्न झाल्यावर पहिल्यांदा प्रथम शिर्डीला जातात. .
७ माझ्याआधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
८. मराठी भाषा गौरव दिनासाठी उपक्रम, लेख, खेळ , कोडी म्हणी वगैरेंचे आयोजन करताना आमची खूप धांदल उडाली. अगदी परीक्षाच म्हणा ना!
९ तू रहा म्हणालास म्हणून त्याने महिनाभर राहणे उचित आहे का?
१० तुझे लाजून हसणे आणि हसून पाहणे माझ्या लक्षात आहे
२ या विशिष्ट स्पर्धेत
२ या विशिष्ट स्पर्धेत उत्कृष्ट शरीरसौष्ठव असणाराच श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले जाईल.
नाहीए की नाहीये?
नाहीए की नाहीये?
नाहीए.
नाहीए.
हे लिहावे नेटके मधले.
कुणी तरी (चिनुक्स) नक्की सांगा.
मायबोलीवर चिनुक्सला 'कुणीतरी'
मायबोलीवर चिनुक्सला 'कुणीतरी' म्हणालं नव्हतं हो कोणी आजवर!
इथे आमचं ततपप होतंय , तुम्ही
इथे आमचं ततपप होतंय , तुम्ही ध चा मा करून भांडणं लावा अजून
(No subject)
आता मी 'नारायण नारायण' म्हणते.
माझ्या आधी पास झालेल्या
माझ्या आधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
माझ्याआधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाहीए.
हे वाक्य संवाद भाषेत आहे. लेखन भाषेत ते
माझ्याआधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाही आहे.
असं लिहावं लागलं असतं.
संवाद भाषेतलं एक रूप चूक आणि एक बरोबर असं करता येईल का ते मला माहीत नाही.
'आधी' हे शब्दयोगी अव्यय तोडून लिहिल्याने ते क्रियाविशेषण अव्यय ठरून वाक्याचा अर्थ बदलतो हे दाखवण्यासाठी ते वाक्य घेतले होते.
स्वाती
स्वाती
>>> हे वाक्य संवाद भाषेत आहे.
>>> हे वाक्य संवाद भाषेत आहे. लेखन भाषेत ते
माझ्याआधी पास झालेल्या मुलांना अजून नोकरी मिळत नाही आहे.
असं लिहावं लागलं असतं.
<<<
होय, खरं आहे.
नाही आहे. >> हे
नाही आहे. >> हे व्याकरणदृष्ट्या बरोबर असले तरी नाही आणि आहे हे परस्परविरोधी शब्द स्टाइलिस्टिकली ( शैलीच्या दृष्टीने ?) काही बरे वाटत नाहीत.
नोकरी मिळत नाही , मिळालेली नाही, मिळालेली नाही अशी परिस्थिती आहे असे लिहावे 'नेटके '
स्वाती - ते मास्तरांना
स्वाती - ते मास्तरांना कोणीतरी "कुणीतरी" म्हंटले यापेक्षा ते कोणीतरी "कोणीतरी" असे म्हंटले नाहीत याचा राग जास्त येइल अशा अर्थाने ना?
शांत बसा रे! नाहीतर दामले
शांत बसा रे! नाहीतर दामले मास्तर छडी घेऊन येतील.
कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या
कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या सामन्यात चाळिसावे शतक झळकावले. >> हे कितीही वेळा वाचले तरी काहितरी खुपत राहते आहे. मेधाच्या शब्दांमधे सांगायचे तर अजिबात 'नेटके' वाटत नाही. मी आपले सामना क्रमांक १०३ मधे असे लिहून मोकळा झालो असतो
हे कितीही वेळा वाचले तरी खुपत
हे कितीही वेळा वाचले तरी खुपत राहते आहे
बदलले हो विकु - ते खुपसत पण
बदलले हो विकु - ते खुपसत पण खुपत होते पण काय खुपत होते कळत नव्हते.
खूपते तीथे गूप्ते, आडले तीथे
खूपते तीथे गूप्ते, आडले तीथे दामले
एकशे तिनावा / तिनावी हे बरोबर
एकशे तिनावा / तिनावी हे बरोबर आहे.
मास्तर ते चूक आहे असे म्हणत
मास्तर ते चूक आहे असे म्हणत नाहीये तर फ्लो मधे वाटत नाही असे म्हणतोय.
कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या
कोहलीने आपल्या एकशे तिनाव्या सामन्यात चाळिसावे शतक झळकावले. >>
तीन ही कार्डिनॅलिटी (अंक) झाली आणि तिसरा ही ऑर्डिनॅलिटी (क्रम). तसेच चाळीस (अंक) आणि चाळीसावे (क्रम).
ह्या न्यायाने 'कोहलीने आपल्या एकशे तिसर्या (तीनाचे ऑर्डिनल रूप) सामन्यात चाळिसावे शतक झळकावले.' असे योग्य होणार नाही का?
१०१ हा क्रम कसा विचार?
१०१ हा क्रम कसा वाचाल?
चाळीस चाळिसावा
चाळीस चाळिसावा
नव्वद - नव्वदावा
शंभर शंभरावा
एकशेएक- एकशेएकावा
एकशे दोन - एकशेदोनावा
एकशेतीन - एकशेतिनावा
आलं का फ्लोमध्ये?
आणि न्याय्य सुद्धा?
एक, दोन , तीन, चार यासाठीच
एक, दोन , तीन, चार यासाठीच फक्त पहिला , दुसरा , तिसरा, चौथा येऊ शकतं. शंभर नंतर त्या अंकांची किंमत तीच राहत नाही. माझा मुलगा शंभर आणि पहिला आला असे होईल का ?
माझ्या मते:
माझ्या मते:
कोहलीने आपल्या एकशे तीनव्या सामन्यात चाळीसवे शतक झळकवले.
'नागपूरचे' आणि 'नागपुराचे' हे दोन्ही बरोबर, तसे 'तीनव्या' आणि 'तिनाव्या' दोन्ही बरोबर. 'तीनचा पाढा' आणि 'तिनाचा पाढा' कसेही बरोबर असावे. पण 'तिनातून दोन वजा करा' हे 'तीनतून' असे चालणार नाही.
ह्याच न्यायाने "बेसनच्या लाडूंसाठी" हे देखील चालून जायला काही हरकत नाही. सामान्यरूपांच्या बाबतीत लवचीक धोरण ठेवणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. “गाढव” शब्दाचे अनेकवचन आपण बोलताना बहुतेक वेळा "गाढवं" असं म्हणतो. लिहिताना मात्र "गाढवे” असे प्रमाण भाषेत लिहिण्याचा आग्रह नसावा. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. स्पेल चेकच्या सॉफ्टवेअरमध्ये बहुतेक सर्व शब्दांना तुम्ही दिलेले शब्दच सुचविले जात आहेत.
अर्थात कोणी "बेसन च्या लाडूं साठी” असे हिंदीसारखे विभक्ती प्रत्यय तोडून लिहिले की माझा सॉफ्ट कॉर्नर कुठल्याकुठे पळून जातो. असे लिखाण मी पुढे वाचत नाही. प्रतिसादातून जमेल तशी विनंती करतो कारण अशा स्पेसमुळे वाचनाची लय बिघडून जाते. उदाहरण म्हणून ही जुनी चर्चाः
https://www.maayboli.com/node/72368
गमभन स्पेलचेकमध्ये दिसलेले लेखातील इतर काही शब्द:
स्प्ष्ट > स्पष्ट
भा गांत > भागांत
जातत > जातात
विचर > विचार
आधारिए > आधारित
करूया > करू या
Shantanuo,
Shantanuo,
व्याकरणाचे नियम जाणून / समजून न घेता तुम्ही सामान्यरूपांबद्दल लिहिलं आहे.
गाढवं म्हणजे प्रमाणभाषा नाही, हा समजही चूक आहे.
मोबाईलवरून लिहायचा कंटाळा आला. दोनेक आठवड्यांनी सविस्तर लिहीन.
"विधीमंडळाचे" हा शब्द बरोबर
"विधीमंडळाचे" हा शब्द बरोबर असून "विधिमंडळाचे" हा शब्द चुकीचा आहे असे अरुण फडके यांच्या "शुद्धलेखन ठेवा खिशात" ह्या ॲपमध्ये स्पष्ट म्हटले आहे. त्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यांच्या मते "मंडळ” हा शब्द मराठी असल्यामुळे हा शब्द बरोबर आहे. पण तो जर "मंडल” असा संस्कृत असता तर "विधिमंडल” असे ऱ्हस्व लिहावे लागले असते. हा मुद्दा वादाचा असून संबंधित नियमदेखील संदिग्ध आहे. पूर्वपदावरील ऱ्हस्वान्त संस्कृत शब्द जसाच्या तसा लिहावा इतकेच नियमात म्हटले आहे. उत्तरपदावरील शब्दाच्या मुळाचा उल्लेखच नाही! त्याचा अर्थ उत्तरपदावरील शब्द मराठी अथवा संस्कृत कसाही असला तरी फरक पडत नाही असा मानला तर "विधिमंडळ" हा शब्द बरोबर ठरतो. हा तर्क बरोबर नाही असे मानले तर "विधीमंडळ” हा शब्द बरोबर ठरतो पण मग नियम अर्धाच लिहिला असा ठपका ठेवता येतो. या नियमाच्या गोंधळामुळे मंत्रीमंडळ / मंत्रिमंडळ, संधीसाधू / संधिसाधू हे शब्द देखील मनःपूत लिहिले जातात. ज्याला जे सोयीचे असेल ते किंवा गूगल ॲटोकरेक्टच्या लॉजिकला जे बरोबर वाटेल ते स्वीकारणे भाग पडत आहे!
माझ्यामते विधिमंडळ, मंत्रिमंडळ, संधिसाधू, बुद्धिबळ हे ऱ्हस्व शब्द बरोबर आहेत. तसे असले तरी स्पेलचेकच्या सॉफ्टवेअरमध्ये मात्र ते चुकीचे समजून त्यांना दीर्घ ईकार सुचविला जात आहे कारण मी व इतर स्वयंसेवकांनी कोश प्रमाण मानून शब्द जमा केले आहेत. जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
गूगल डॉक्समध्ये हा लेख कॉपी पेस्ट करून पाहिला तर "ऊपेक्षा, आप्तेश्ट, आशिर्वाद, म्हणुन, माध्यान्नी, प्रश्ण, लक्शात" अशा काही ठरावीक शब्दांना अपेक्षित पर्याय दिसत आहेत. पण अगदी १००% अचूकता नाही, तशी अपेक्षाही करता येणार नाही. गुगलने बहुसंख्य लोकांना काय वाटते त्याचा विचार केलेला दिसतो. उदा. पद्धत, पध्दत हे दोन्ही शब्द डॉक्समध्ये शुद्धच ठरतात. गूगल डॉक्सचा स्पेल चेकर कामचलावू आहे. अशा परीक्षांमध्ये तो उपयोगी ठरणार नाही!
हा उपक्रम आणि या धाग्यावरचे
हा उपक्रम आणि या धाग्यावरचे मान्यवरांचे प्रतिसाद माझ्यासाठी खूप उपयोगी ठरले आहेत.
अनेक आभार _/\_
कालच एक गृह कर्जाची जाहिरात
कालच एक गृह कर्जाची जाहिरात पाहिली.
सरळ स्पष्ट बोलणे !! त्यामधे ष्ट वर चक्क अनुस्वार दिलाय.
मला इथे तो टाइप करता येत नाहीये !!!
कुणीच मुद्रित शोधन करत नाही का ?
म्हणुन हा शब्द म्हणून असा आहे
म्हणुन हा शब्द म्हणून असा आहे? हे माहीत नव्हते.
नव्हते बरोबर की न्हवते?
गूगल डॉक्स, मनोगत डॉट कॉमचा
गूगल डॉक्स, मनोगत डॉट कॉमचा स्पेलचेकर आणि सामूहिक योगदानातून बनलेले गमभन लिब्रे ऑफिस एक्स्टेंशन या तिन्ही ठिकाणी "न्हवते" या शब्दाखाली लाल रेघ येत आहे म्हणजे तो शब्द नक्कीच चुकीचा असणार. खूप लोकांना असे काही पर्याय मराठी लेखनासाठी उपलब्ध आहेत हे माहीत नसते. म्हणून विषयांतराचा दोष पत्करून स्क्रीन शॉटसह अधिक माहिती देत आहे.
१) गूगल डॉक्समध्ये फाईल – लॅंग्वेजेस या पर्यायात मराठी निवडल्यावर काही शब्दांखाली लाल रेघ दिसेल. पण यात खूप सारे चुकीचे शब्द देखील समाविष्ट झालेले दिसतात. उदा. "म्हणुन" हा शब्द यात अधोरेखित होत नाही. वर दिलेल्या पहिल्या संचातील सर्व वाक्ये मी यात कॉपी पेस्ट करून पाहिली त्यातील कोणतीही चूक गूगलला समजू शकली नाही.
२) त्या मानाने मनोगत डॉट कॉम या साईटवरील स्पेलचेकर खूपच चांगला आहे. पण तो वापरता येण्यासाठी तिथे रजिस्टर करावे लागते आणि एकेक शब्द तपासून घ्यायला खूपच वेळ लागतो. ही एक मोठी अडचण जाणवते.
३) गमभन स्पेल चेकर हे एक एक्स्टेंशन असून ते वापरण्यासाठी फायरफॉक्स किंवा लिब्रे ऑफिस इंस्टॉल करावे लागते. ते करण्याची तयारी असेल तर स्पेल चेक बरोबरच समानार्थी शब्द (synonym) ॲटो-करेक्ट, ॲटो-कम्प्लीट, हायफनेशन अशा बऱ्याच सुविधा आपोआप मिळतात.
या तीन प्रमुख पर्यायाव्यतिरिक्त स्टार २१ नावाच्या एका वेबसाईटवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे.
https://www.stars21.com/spelling/marathi/
यात देखील गूगल डॉक्सप्रमाणे अनेक चुकीचे शब्द निवडले जात नाहीत असे दिसते. तसेच जास्तीत जास्त दोन अथवा तीन पॅरेग्राफ चेक होतात. त्यामुळे मोठे लिखाण यात तपासता येत नाही. गूगल डॉक़्समध्ये लॉग-इन करण्याइतका देखील वेळ नसेल तर हा पर्याय वापरून बघता येईल. "म्हणुन" हा शब्द यात शुद्ध दाखविला जात आहे तर "न्हवते" या शब्दाला "नव्हते" हा पर्याय मला यात दिसत आहे.
फिडबॅक देण्याची सोय सगळीकडे आहे. गमभन मध्ये काही सुधारणा हवी असल्यास मला तर मनोगतसाठी manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर संपर्क करावा. गूगल डॉक्समध्ये तर प्रत्येक शब्दासाठी प्रतिसाद देण्याची सोय आहे ती वापरून बघण्यासारखी आहे. वर दिलेल्या स्टार २१ या साईटने मात्र प्रतिसादाची काहीही सोय ठेवलेली नाही.
वरील सर्व पर्याय मोफत आहेत हे बरोबर पण फक्त गमभन या पर्यायात आपण त्याचा "सोर्स" म्हणजे शब्दयादी आणि हन्स्पेल रूल्स पाहू शकतो, त्यात सुधारणा देखील करू शकतो. त्यासाठी 7-zip सारखे एखादे सॉफ्टवेअर वापरून एक्स्टिंशन फाईल अनझिप करावी लागते.
थोडक्यात सांगायचे तर बोली भाषेत कदाचित "न्हवतं" हा शब्द खपून जाईल. पण प्रमाण भाषेत नाही!
धन्यवाद shantanuo.
धन्यवाद shantanuo.
Pages