भयाण (भयकथा) 4

Submitted by shrinand kamble on 21 February, 2023 - 11:28

काही वेळाने सुमित्रा राजकडे पाहत म्हणाली.'राज मला खूप भीती वाटतेय मला वाटतं आपण या वाड्यात येऊन खूप मोठी चूक केलीय. मला येथे क्षणभर सुद्धा थांबावं वाटत नाही आपण आत्ताच्या आत्ता येथून निघुया’
'हे बघ..हे बघ शांत हो मी आहे ना.. मी आहे येथे'
राज तिला आपल्या गळ्याशी लाऊन घेतो
'घाबरु नकोस मी आहे काही होणार नाही '
राज तिची समजूत काढतो.सुमित्रा शांत होते
घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता रात्रीचे 3 वाजत आलेले.राज व सुमित्रा गाढ झोपेत होते. बाहेर भयाण काळोख पसरला होता.घड्याळातील काटा सेकांदा सेकंदाने पुढे सरकत होता.हवेच्या झुळुकेने शेजारची खिडकी हळूच उघडली गेली.आणि बाहेरची थंड हवा आत येऊ लागली सुमित्रा खिडकी कडे तोंड करून झोपली असल्याने गार वारा तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. त्यामुळे तिची झोपमोड होऊ लागली.तिने कुस बदलून झोपण्याचा प्रयत्न केला पण खिडकीतून येणाऱ्या हवेने तिला झोप येईना. कंटाळुन ती खिडकी बंद करण्यासाठी उठली.डोळे चोळत ती खिडकी जवळ आली.खिडकी झाकनार एवढ्यात तीच लक्ष बाहेर गेलं बाहेर रस्त्यावरील पथदिव्याच्या मंद प्रकाशात एक छोटं बाळ रडत पुढे चाललं होत. तिकडे पाहून सुमित्राने विचार केला एवढ्या रात्री कोणाचं बाळ रडत चाललय.त्याचे आईवडील कोठे असतील बेचार कदाचित आईवडिलांपासून हरवलं असेल.तिला त्या बाळाची कीव येऊ लागली.मागचा पुढचा विचार न करता ती सरळ त्या बाळाच्या दिशेने निघाली दाराबाहेर येताच गार हवेने तीच स्वागत केलं.अश्या निर्जन परिसरात आणि काळोख्या रात्री एखाद्या लहान बाळाचं रडत जान म्हणजे हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. सुमित्राला ते जाणवलं नाही उलट तिच्या चेहऱ्यावर तर त्या बाळाबद्दलची चिंता स्पष्ट दिसत होती. सुमित्रा त्या बाळाला हाक देत त्याच्या दिशेने जाऊ लागली.त्या एवढ्याश्या लहान बाळाला काय समजणार की कोणीतरी आपल्याला पाठीमागून आवाज देतय.ते आपल्याच धुंदीत रडत रडत तसच पुढे जात होत. सुमित्रा त्याला पाठीमागून आवाज देतच होती.
'ए बाळा.... ए....अरे ऐक'
ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती.
'अरे थांब ना’
पण ते आपल्याच धुंदीत पुढे पुढे जात होत. इकडे राजने कुस बदलली व शेजारी हात टाकला.पण सुमित्रा तिथे नव्हती. त्याने डोळे चोळत आजुबाजूस पाहिलं पण सुमित्रा खोलीत दिसेना.तो ताडकन उठला व सुमित्राला शोधण्यासाठी बाहेर निघाला. इकडे सुमित्रा त्या बाळाला थांबवण्याचा प्रयत्नात मागे मागे जात होती.राज तिला शोधत आता वाड्याच्या बाहेर आला होता.आजुबाजूस पाहता पाहता त्याची नजर त्या बाळाच्या मागे मागे जाणाऱ्या सुमित्रावरती पडली.त्याने तिला आवाज दिला
'सुमित्रा'.....'सुमित्रा'
पण ती थोड्याशा दूरवर असल्याने तिला ह्याचा आवाज ऐकू गेला नाही
त्याने पुन्हा आवाज दिला परंतु काही फायदा नाही जणू एखादी अज्ञात शक्ती तिला कैद करून स्वतःसोबत घेऊन जात होती.समोरच्या वळणावरून ट्रकच्या हॉर्न चा आवाज येत होता.एक मालवाहू ट्रक वेगाने यांच्याच दिशेने येत होत. तिने त्या बाळाकडे पाहिलं बाळ रस्त्याच्या मधोमध चालत होत.तिला समजलं की ट्रक ह्याला उडवणार.ती घाईघाईने पुढे निघाली.ट्रक हॉर्न वाजवत जवळ येत होत.
'सुमित्रा.....सुमित्रा'
राज पाठीमागून आवाज देत होता.
हॉर्न वाजवत वाजवत ट्रक आगदी जवळ आल होत .सुमित्रा बाळाच्या अगदी जवळ आली होती.त्याचा हात धरून मागे खेचणार तेवढ्यात....ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशने तिचे डोळे दिपले.तिला समजलं की आता खूप वेळ झाला आहे.ट्रक मुलाच्या अगदी जवळ होत.तिने आपला हात मागे घेतला व घाबरून डोळे मिटून घेतले. ट्रक भर्रकन तिच्या अगदी जवळून निघून गेला. त्याच्या वाऱ्याने ती थोडीशी मागे ढकलली गेली. भीतीने तिची छाती धडधडू लागली.डोळे उघडून समोर पाहण्याच धाडस तिला होईना. ट्रकने आपल काम केलं असणार बाळाला उडवून....... बेचार बाळ...सुमित्राने डोळे कीलकीले करत समोर पाहण्याच धाडस केलं.तिने जेंव्हा समोर पाहिलं तेंव्हा आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले गेले. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना कारण ते लहान बाळ आपल्या लहान लहान पावलांनी तसच पुढे चाललं होत. हा काय प्रकार आहे हे सुमित्राला क्षणभर कळेना.तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.आता तिच्या डोळ्यातली त्या बाळाबद्दलची आपुलकी हळूहळू विरू लागली आणि त्या ठिकाणी भयाने आपली जागा घेतली.ते बाळ अचानक जागेवर थांबलं. सुमित्रा भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याने हळूच आपली मान वळवली आणि तीच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा पाहताच तीच संपूर्ण शरीर अगदी बर्फासारख थंड पडलं. हातापायातील आवसानाच गळून गेलं भीतीने सर्वांग थरथरू लागल. कारण त्या बाळाचा तो निर्जीव पांधराफेक चेहरा, गडद काळे काचेचे डोळे, चेहऱ्यावरील गूढ हास्य. तिच्याकडे पाहून ते अगदी विचित्रपणे हसत होत.त्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर त्याचीही अवस्था सुमित्राप्रमानेच झाली असती.भीतीने सुमित्राचे पाय जागीच खिळले होते. अचानक तिच्या पाठीमागून एक वाहन वेगाने आल आणि काही कळायच्या आतच ते सूमित्राला उडवून भर्रकन पुढे निघून गेलं. सुमित्रा दूरवर जावून कोसळली. तीच्या डोक्यातून नाकातून रक्त वाहू लागलं. राज तिकडे पाहून जवळ जवळ ओरडलाच.
'सुमित्रा'......................

क्रमशः

©श्रीनंद कांबळे

मागील भाग
https://www.maayboli.com/node/67878
https://www.maayboli.com/node/67883
https://www.maayboli.com/node/67906

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users