भयाण (भयकथा) भाग 3

Submitted by shrinand kamble on 27 October, 2018 - 07:53

तो तिकडून नजर चोरून घेत म्हणाला.
'' अगं असल्या वाळलेल्या झाडांवर घुबडं नेहमी बसत असतात, त्यात भ्यायसारख काय आहे''
खरंतर राजपण त्या घुबडाचं ते अमानवी पाहणं बघून मनातून थोडासा घाबरला होता.पण त्याने तसं दाखवून दिलं नाही.कारण तोच जर भ्यायला तर सुमीत्राची काय अवस्था होईल हे त्याला चांगलच ठाऊक होतं.
वातावरणात एक वेगळाच कुंदपणा जाणवत होता.दुरून कुठूनतरी कुत्र्याचे ओरडणे कनावरती ऐकू येत होते. त्याच्या त्या ओरडण्याने वातावरणात आणखी भयानता पसरली होती.
समोरच तो वाडा आ वासून बसला होता यांना आत घेण्यासाठी. घुबडाच्या पंखाचा फड्फड असा आवाज झाला. ते घुबड आता दुसऱ्या फांदीवर येऊन बसलं होतं यांच्याच रोखणे पाहत.
ते तिकडे दुर्लक्ष करीत त्या वाड्याच्या दारापाशी आले. दार खूपच जुनाट होतं.त्याला कोळ्यांनी जाळ्यांनी आछादल होतं. दार कुलूपबंद होतं ते कुलूप पण गंजलेलं दिसत होतं.
त्यावरून असा अंदाज येत होता की हा वाडा खूप दिवसांपासून बंद आहे. जवळच एक लोखंडी झोपाळा होता तो पण खूपच जुनाट झालेला, गंजलेला तो न हलता एकाच जागी स्थीर होता.
दाराच्या जवळच एक पाण्याने भरलेला माठ होता. आणि त्या माठावर एक जर्मलचा तुटका फुटका ग्लास पालथा घातलेला होता.
राजने दाराकडे पहिलं दाराला कुलूप असल्या कारणाने त्यांना ते उघडता येनार नव्हतं.
सुमित्रा त्या कुलुपाकडे पाहत म्हणाली
'' दाराला तर कुलूप आहे, जाऊदे चल आपण परत जाऊ''
अचानक पावसाचा जोर वाढला आणि पाऊस ओसंडून पडू लागला.विजा कडाडू लागल्या मोठ्यांनी मेघगर्जना होवू लागल्या. राजने आजूबाजूस पाहीलं जवळच पडलेला एक दगड त्याच्या दृष्टीस पडला. कुलूप तोडण्यासाठी तो दगड पुरेसा होता. त्याने तो दगड उचलला आणि जुनाट झालेल्या त्या कुलुपावर जोराने प्रहार केला. कूलूपावरती झालेला तो खण असा आवाज सर्वत्र दुमदुमला. रात्रीच्या शांततेच्या साखळ्या तोडत तो आवाज दूरपर्यंत निघून गेला. राजने सुमित्राकडे पाहिलं तीच्या डोळ्यांतील भीती याला जाणवत होती.
त्याने परत दुसरा प्रहार केला. यावेळी झाडावर बसलेले ते घुबड त्वेषाने ओरडू लागलं.
रात्रीच्या भयाण शांततेत त्याचा तो आवाज मनाला भेदरवून टाकत होता. भीतीने रक्त गोठून जाईल असा त्याचा आवाज होता. एक वेगळ्याच प्रकारच भय तेथे जमा होत होतं. यांना त्याची कल्पना आली. वातावरणात जडपणा जाणवू लागला काळोख आणखीनच निबिड झाला होता.एक अमंगळ दुर्गंधी तेथे पसरत होती.त्या दुर्गंधीचा वास अगदी श्वास कोंडवुण सोडत होता. जणू कोणीतरी जोराने आपला गळा आवळतोय असं वाटत होतं. पण ती भीती ते जडपण, ती दुर्गंधी कांही क्षणांपुरतीच होती. थोड्या वेळाने सर्वकाही पूर्ववत झालं. ती दुर्गंधी नाहीशी झाली आणि हवेतील जडपणापण आता कमी झाला होता. पण घुबडाचं ते ओरडणं चालूच होतं.तिसरा जोराचा प्रहार करताच जवळच असलेला तो झोपाळा हलायला लागला.
जणू त्यावर कुणीतरी बसलं होतं आणि झोपाळा हलवत होतं. त्याच्या हलण्याचा भास सुमित्राला झाला. आणि तिच्या मनात भयाची लहर उमटली. चोरट्या नजरेने तिकडे पहाव असं सुमित्राला वाटलं पण मनात भीती इतकी होती की तिकडे पाहणं तीला शक्य नव्हत.
तिने राजला हळूच आवाज दिला.
ती बोलताना भीतीने तीचे ओठ थरथरत होते.
'' राज...राज... झोपाळा हलतोय ''
तो तीच्या विलक्षण घाबऱ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
'' काय झालं ?''
'' तो बघ झोपाळा आपोआप हलतोय ''
सुमित्रा उत्तरली.
तीच्या बोलण्याला दुजोरा देत राजने वळून तिकडे पहिलं. तो निर्जीव झोपाळा आपोआप हलत होता. त्याच्या गंजलेल्या साखळ्यांचा हलताना होणारा कर्र कर्र....कर्र कर्र....असा आवाज खूपच भीतीदायक वाटत होता.
'' अगं वाऱ्याने हलत असेल कदाचित ''
तो तिला हिम्मत देण्याच्या हेतूने म्हणाला.
'' पण राज वारा कुठे वाहतोय ''
तीच म्हणनं अगदी योग्य होतं. कारण वाऱ्याची झुळूकही तेथे जाणवत नव्हती.
'' मला खूप भीती वाटतेय राज..चल परत जाऊया ना ''
सुमित्रा घाबऱ्या स्वरात म्हणाली.
'' अगं घाबरू नकोस मी आहे ना, काही होणार नाही ''
राजने दाराला एक हलकासा धक्का दिला. जुनाट झालेल ते दार कर्र.....कर्र.... आवाज करत हळुवारपणे उघडलं.
समोरचं ते भयानक काळं वीवर यांना आत घेण्यासाठी आ वासून बसलं होतं.राजने मोबाईलचा टॉर्च चालू केला.तेथे जमलेल्या काळ्या वीवरला मागे सारत तेथे प्रकाशाचं वलय तयार झाल.
त्या उजेडाणे त्यांना थोडा दिलासा आला.
मनातली भीती थोडीफार ओसरली होती. ते दोघे हळूहळू आपली पावले उचलत आत आले. राजने सभोवार टॉर्चचा प्रकाश फिरवला. सगळीकडे जाळ्या जमल्या होत्या. भिंतीचे रंग केंव्हाच उडून गेले होते. भिंतीला कांहीकांही ठिकाणि भेगा पडल्या होत्या. संम्पूर्ण वाड्यात एक भयाण शांतता पसरली होती. फक्त यांच्या पावलांचा प्रतिध्वनी तेथे उमटत होता.राजने शेजारील दाराला हलकासा धक्का दिला. दार हळुवारपणे उघडलं. राजने खोलीत प्रकाश फिरवला.सज्ज्यावरच उंदीर चुंई....चुंई... करत पळालं. ते दोघे आत आले खिडकीशेजारी एक कॉट होता खूप दिवसांपासून वापरात नसल्याने त्यावरती धूळ जमली होती.
कॉट पाहून राज म्हणाला
'' झोपण्याची व्यवस्था तर झाली ''
राजने कॉट साफसूफ केला. कांही वेळांनी सर्व ठीकठाक केल्यानंतर राज सुमित्राकडे पाहत म्हणाला.
'' चल आता झोपून घेऊया ''
दोघे झोपण्याच्या तयारीला लागले.
बाहेर पाऊस ओसंडून पडत होता. कडाडक्ड्ड्ड
विजा कडाडत होत्या. बारा वाजत आलेले. तो निर्जीव झोपाळा अजूनही हलत होता. तहानेने सुमित्राचा घसा कोरडा पडला होता. आजूबाजूस कुठे पाणीही दिसत नव्हतं. तिने बाजूस पहिलं राज गाढ झोपेत होता.
'' राज... राज...''
ती राजला हलवत म्हणाली.
'' अं काये...''
तो झोपेतच कंटाळवाण्या स्वरात म्हणाला.
'' अरे उठ ना मला खूप तहान लागलीय ''
'' अं झोपूदे ना ..गप '' तो झोपेतच म्हणाला.
राजला झोप खूप प्रिय होती. सुमित्राला ते ठाऊकच होतं. तहान तर खूप लागलेली.काय कराव तिला सुचत नव्हतं.अचानक तिला आठवलं की तीने आत येताना दाराशेजारी पाण्याचा माठ पहिला होता. तहानेने घसा कोरडा पडल्याने ती जागेवरून उठत बाहेर निघाली. मनात थोडीफार भीती होती तरी पाणी पिणं गरजेच होतं. ती बाहेर पाण्याने भरलेल्या माठाजवळ आली. तीने झाकण उघडून पहिलं आतमध्ये पाणीच नव्हतं. तिला खूप राग आला होता. तिला ह्या गोष्टीची जाणीव सुध्दा राहिली नव्हती की ती एकटीच बाहेर आहे. अचानक तिला तो निर्जीव झोपाळा हलत असल्याची जाणीव झाली. अंगावर सर्रकन काटाच उभा राहिला.
कर्र कर्र ...कर्र कर्र आवाजात तो झोपाळा हलत होता. भयभीत नजरेने तीने मान वळवली आणि तिकडे पाहतच भीतीने तिला धक्काच बसला.
कारण त्या निर्जीव झोपाळ्यावर एक जेमतेम दहा बारा वर्षांची पांढऱ्याफेक चेहऱ्याची मुलगी बसली होती. सुमित्राचे पाय जागीच स्तब्ध झाले होते. हातापायांत भीतीने कापरं भरलं होत घशातून आवाज बाहेर निघत नव्हता. ती पांढऱ्याफेक चेहऱ्याची, निर्जीव डोळ्यांची मुलगी हिच्याकडे पाहून मंदपणे हसत होती. तीच्या त्या मंद हसण्याने शेवटी सुमित्राच्या घशातून भीतीने किंकाळी बाहेर पडली. अचानक तिच्या खांद्यावर कुणाचातरी हाथ पडला. तिने दचकून मागे पहिलं. मागे राज उभा होता. त्याला पाहताच तिच्या जीवात जीव आला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. आणि मुसमुसत रडू लागली. रडताना तीचा श्वासोच्छ्वास अगदी लहान मुलांसारखा होत होता. राज तिला म्हणाला.
'' काय झालं सुमित्रा अशी का रडतेयस ''
सुमित्रा मुसमुसत कापाऱ्या स्वरात म्हणाली.
'' राज तो झोपाळा....तो झोपाळा...
त्यावरती कुणीतरी बसलयं. बघ ना तिकडे ''
'' सुमित्रा कोणाशी बोलत आहेस ''
पाठीमागून राजचा आवाज आला. सुमित्राने मागे मान वळवली.तिला भीतीचा दुसरा धक्काच बसला. कारण राज तर दारात उभा होता आणि हिला आवाज देत होता. तिने झटक्यात समोर पाहिलं पण समोर कुणीही नव्हतं. तिला काहीच कळत नव्हतं.
'' ईकडे एकटीच वेड्यासारखी काय करत आहेस चल आत '' राज तिला म्हणाला. तिला काहिच कळेना काय होतयं ते. काही वेळांनी.....
ती कॉटवर पहुडलि होती.
'' हे घे पाणी पी थोडसं बरं वाटेल तुला ''
राजने कारमध्ये असलेली पाण्याची बॉटल हिच्या पुढ्यात धरली.
पाण्याचे दोन चार घोट आत गेल्यानंतर तीला आता थोडसं बरं वाटलं.
क्रमशः
© श्रीनंद कांबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली चाललेय..पण इतक्या दिवसांच्या बंद वाड्यात आणि इतके सगळे वाईट सिग्नल मिळत असताना मी तरी कुलूप तोडून आत गेली नसती झोपायला Sad

उमानु +100
आणि इतके दिवस ओसाड पडलेल्या वाड्याबाहेरील माठातलं पाणी कोणी का घेइल ??
आणि पलंगावर का झोपेल