कोकण सहल

Submitted by रेव्यु on 5 February, 2023 - 01:16

आम्हाला कोकण करायचे आहे , आरामात, संथपणे, 5 ते 6 दिवस, कोणी चांगला ऑपरेटर सुचवाल का? 20 फेब्रुवारीच्या आसपास जायच म्हणतोय? बजेट मर्यादा फारशी नाही
आम्ही नासिक हून निघू... वरिष्ठ नागरिक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच दोन दिवस गोवा सीमेवर शिरोडा बीच वर पण जरूर रहा.
शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळा. मी सांगितलेली दोन्ही ठिकाणे माझ्या मते स्वर्ग आहेत.

प्रवास थोडा जास्त झाला तरी सहन करा पण मुंबिच्या आजुबाजूस जसे अलिबाग वगेरे कृपया जावू नका.
राहण्याची उत्तम सोय असलेले दूरध्वनी सुद्धा देवू शकेन.
गणपती पुळे, तारकर्ली अश्या ठिकाणी जाणे मला तरी वेडेपणा वाटतो. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

चांगला टुअर ऑपरेटर ''नाशिकहून कोकण' पाहिजे., स्वतः जात नाही.
मुंबईतील एक चांगला आहे. सांगतो.(पण तो मुंबईहून निघतो.) बरेच वरिष्ठ नागरिक त्याने जातात कारण त्यांच्या कुलदैवताला जायचं असतं आणि कोकणातली घरं आता सोडली आहेत.

कोकणामध्ये दोन-तीन ठिकाणी

कोकणामध्ये दोन-तीन ठिकाणी तुम्हाला छान राहून उत्तमपणे कोकणाचा आनंद घेता येईल
सर्वात उत्तरेला मुंबईच्या जवळ पण तसे अंतरावर दिवेआगारला जाऊ शकाल. इथून श्रीवर्धन, हरी हरेश्वर हे अतिशय जवळ आहेत. दिवे आघार अतिशय शांत सुंदर गाव आहे, तिथला बीच निर्मनुष्य असतो, आणि घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. हॉटेल्स ही चांगली आहेत. येथून मुरुड जंजिरा हे पण करता येतात
दुसरा टप्पा आहे तो दापोलीचा. दापोलीला गेलात तर तिथून खूप जास्ती समुद्रकिनारे आणि गावे जवळ आहेत, जसं की लाडघर , कर्वे , हर्णे, मुरुड ! इथून आवास वगैरे जवळ आहे, कड्यावरचा गणपती आहे, केशव लक्ष्मी मंदिर आहे! वर सांगितलेले चारही ठिकाणाचे बीज अतिशय सुंदर आहेत.
इथे राहायची सोय पुण्या मुंबई सारखी होऊ शकते , उत्तम हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत.
तिसरा टप्पा आहे तो गुहागरचा! गुहागरला राहून तुम्हाला हेदवी , वेळणेश्वर, गणपतीपुळे इथपर्यंत खूप प्रदेश उत्तमपणे पाहता येईल !गुहागर मध्ये पुणे मुंबई सारखी हॉटेल्स -रेस्टॉरंट आहेत, रिसॉर्ट्स आहेत ,प्रवासाच्या सोयी आहेत. गुहागर ऐवजी तुम्ही गणपतीपुळे च्या जवळ मालगुंड या गावात राहू शकतात तिथे अप्रतिम रिसॉर्ट्स आहेत.

Konkan paryatan नावाची टुअर कंपनी होती.(वडाळा ऑफिस,विनोद तावडे यांची बहुतेक.) पण आता ती सेना भवन ऑफिस, मुळीक यांची दाखवत आहे. पण मुंबईतल्या पर्यटकांसाठी सोयीस्कर.
___________
नाशिकहून मी सुचवेन की रविवारी लवकर ०१:०० नागपूर-मडगाव (01139)गाडीने चिपळूणला (८:३०)उतरावे. गुहागर (३६किमी) येथे हॉटेल बुक करून ठेवल्यास तो तुमची दोन चार दिवसांची फिरण्याची सोय करेल. मग तिथूनच (चिपळूण, ०९:००) मंगला एक्स्प्रेस पकडली की थेट नाशिक १६:३०. या पद्धतीने
चिपळूणला सहज जमेल.
याच गाडीने 'माणगाव'( ०७:१०)उतरून श्रीवर्धन,दिवेआगर,हरिहरेश्वर,मुरुड,जंजिरा करता येईल. मात्र परतीसाठी माणगावहून ट्रेन नाही.

चिपळूणहून गुहागर,हेदवी,वेळणेश्वर करता येते.

खर्च टुअरवाले घेतात तेवढाच येईल पण प्रवास फक्त तुमचाच असेल. ग्रूप नसेल.

याच गाडीने 01139रत्नागिरी उतरून तिकडचे किनारे पाहू शकता. कुडाळ (तारकर्लीसाठी),करमाफी (गोव्यासाठी)

एकदा करून पाहा. दूरचा प्रवास रेल्वेने बरा.