अंमली! - भाग ५

Submitted by अज्ञातवासी on 22 January, 2023 - 21:12

याआधीचा भाग -

https://www.maayboli.com/node/82899

नाशिकमध्ये द्वारका आहे, नाशिकमध्ये पंचवटी आहे.
नाशिकमध्ये एक एमआयडीसी देखील आहे, तिचं नाव सातपूर एमआयडीसी. नाशकातल्या झाडून सगळ्या मोठ्या कंपन्या या एरियात आहेत.
तर, त्र्यंबक रोडवरून एक सर्कल लागतो. महिंद्रा सर्कल. त्या सर्कलवरून आत गेलं, तर पुढे एक रस्ता लागतो. तिथून डावीकडे वळून तिसरा राईट घेतला, तर एक मोकळंच्या मोकळं मैदान लागतं.
तिथे तुम्हाला चाळीस पन्नास कंटेनर उभे दिसतील. वीस ते तीस ट्रक अशाच उभ्या असतील. पाच लाल रंगाचे कंटेनर ओळीने रचून ठेवलेले दिसतील.
तुम्ही त्यातील मधल्या कंटेनरची कडी उघडून आत जा. सगळे रिकामे फ्रिजचे बॉक्सेस रचून ठेवलेले आढळतील. त्याच्या टोकाला जा, आणि एक मोठं बॉक्स बाजूला सरकवा.
खाली एक गोल झाकण दिसेल. ते उचलून बाजूला ठेवा.
एक शिडी तुम्हाला खाली जाताना दिसेल.
सावकाश उतरा...
...वेलकम टू गौडाज वेरहाऊस...
... उर्फ मानसची लॅब...
*****
गौडा आणि मानसच्या भेटीनंतर मानसने सगळ्यात आधी निर्णय घेतला, तो रूम खाली करण्याचा...
नाही नाही म्हणता म्हणता गौडाने दोन हजाराच्या पन्नास नोटा त्याच्यासाठी ठेवल्या होत्या.
'मनुष्य ओळखायला चुकत नाही गौडा कधी.' त्याचं वाक्य.
गौडा नावाच्या रसायनाचा मानसला थांगपत्ता लागत नव्हता.
असो, गंगापूर रोडवर एक दोन रूम किचन त्याच्यासाठी सज्ज झाला होता.
...आणि अंगावरच्या कपड्यानिशी तो इथे आला होता.
इथे त्याला कशाचीही ददात नव्हती. तो एक थेंब दारू घेत नसला, तरी फ्रिज दारूच्या बाटल्यानी खच्चून भरला होता.
हेमंतला घरी जातोय, असं सांगून तो इथे आला होता.
हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं.
रात्रभर त्याला झोप लागली नाही.
गौडा सकाळी हजर झाला.
"कसा वाटला आमचा बंदोबस्त?"
"अण्णा, मला काम सुरू करायचंय. मजा करायला आयुष्य पडलंय."
"त्याचीच तयारी करत होतो. आता एकदम टीपटॉप हो. इथल्या सगळ्या पब्लिकला वाटलं पाहिजे, तू एकदम मोठा ऑफिसर आहे. कुणीही तुझ्यावर डाऊट घ्यायला नको. ठीक एक वाजता तुझ्या मोबाईलवर पाठवलेल्या पत्त्यावर ये."
"ओके."
"फोर व्हीलर चालवता येते?"
"हो."
"मग आजपासून ही गाडी तुझी." त्याने चावी समोर धरली.
"अण्णा..."
"अण्णाने दिलं, घ्यायचं गपचूप. "
"अहो पण कोणती गाडी आहे ही?"
"खाली गेल्यावर अनलॉकचं बटन दाब. जी गाडी वाजेल, ती तुझी."
मानस त्याच्याकडे बघतच राहिला.
"ठीक एक वाजता. देर होऊ देऊ नको." अण्णा तिथून निघूनही गेला.
मानसही त्याच्यामागे धावला.
लिफ्टचं बटन दाबून तो खाली आला.
चावीवरच अनलॉकचं बटन त्याने दाबलं...
...एक व्हाईट कलरची रेनॉल्ट डस्टर अनलॉक झाली.
"रिक्षा..." गेटच्या बाहेर कुणीतरी आवाज दिला.
रिक्षा थांबली.
...गौडा रिक्षात बसून निघूनही गेला.
*****
दुपारी एक वाजता, ठीक एक वाजता, मानस दिलेल्या ठिकाणी हजर झाला.
समोर कंटेनर, ट्रक वगैरे.
गौडा त्याच्या माणसांबरोबर हजर होता.
हात मागे बांधून.
मानसने गाडी नीट साईडला लावली, व तो गौडासमोर हजर झाला.
गौडाने त्याला निरखून बघितले, व बोलायला सुरुवात केली.
"तू आता ज्या एरियात उभा, तो शेट्टी ट्रान्सपोर्टचा एरिया असतो. इथेच गौडाचं सगळं काम चालतं. हा धंदा गुप्तता आणि भरोसा फक्त दोन गोष्टीवर चालत असतो. तर माझा मुद्दा असा, की हा क्षण निर्णयाचा आहे. जर तुला वाटलं, परत फिरावं, तर आता फिरू शकतो... गाडीची चावी माझ्याकडे दे, आणि सरळ तुझ्या जुन्या रूमवर जा. दोन लाख तुझेच आहेत. गौडा काहीतरी धडा शिकला, त्याची फी समज. पण जर पुढे जायचं म्हणशील, तर..."
गौडाची कणखर नजर त्याच्यावर रोखली गेली होती...
त्याच्या चेहऱ्यावर आता अंगार होता... नेहमीचा शांत गौडा कुठल्या कुठे नाहीसा झाला होता...
"...तर मरणच तुझी सुटका करेल!!"
आकाशवाणी व्हावी तसे गौडाचे शब्द त्याच्या कानावर आदळले.
क्षणभर मानसचे डोक्यात प्रचंड मोठं विचारचक्र सुरू झाले.
त्याचे आई-वडील,कॉलेज,डिग्री,नोकरी, खूपसलेला चाकू सगळं...
... आणि सरते शेवटी समोर आली पुडी.. पांढरीपुडी...
तो निर्धाराने गौडाच्या समोर गेला.
...आणि त्याच्या हातात चावी टेकवली.
"अण्णा, मला गाडी आणि रूम नको....फक्त लॅब पाहिजे...समजलं पार्टनर? आता जीव गेला तरी अँग्री यंग मॅनचा सप्लाय थांबणार नाही."
गौडा समाधानाने हसत त्याच्याकडे बघत राहिला व त्याचा खांद्यावर त्याने हात ठेवला.
...एक क्षणभर मानसला कुणीतरी आपलं भेटल्याची जाणीव झाली...
"शेट्टी." त्याने हाक मारली.
"बोलिये अण्णा."
"ध्यान ठेव." आम्ही येतो.
आणि तो मानसला घेऊन मधल्या कंटेनरकडे निघाला.
दोघेजण खाली उतरले.
मानस चकितच झाला.
त्या छोट्याशा झाकणातून ते महाकाय अशा रूममध्ये आले होते. कमीत कमी आठ हजार स्क्वेअर फुटांच ते गोडावून होतं.
कोकेनच्या अक्षरशः छोट्या गोणी तिथे रचून ठेवलेल्या होत्या. गांजा तर पोत्यात भरून ठेवलेला होता...
गौडाने त्याला एका ड्रमकडे नेले...
"तू मला ब्राँकाईड च्या गोळ्या मागितल्या, त्या मिळाल्या नाहीत.
...पण हे सुडोएफेड्रीन मिळालं."
मानस आ वासून त्याच्याकडे बघतच राहिला.
"गौडा गौडा नाही मानस, गौडा किंग आहे. ड्रगकिंग. गौडा मुंबईशी नाही, तर दुबईशी डील करतो... दुबईत कुणीतरी फार मोठं बसलंय... त्याला चेहरा नाही, त्याला नाव नाही. मुंबईत एकदा अकबरभाईने त्याच्या उल्लेख केला होता. नाशिक, शेलार आणि ड्रग्स ऐकून त्याने हा ड्रम मला दुबईहून पाठवून दिला. विश्वास बसणार नाही तुला, फुकट."
"अण्णा हे कमीत कमी...
एकशे वीस किलो... कमीत कमी एकशे वीस कोटी..."
आणि जर रेग्युलर मेथ बनवलं, ज्याच्यात तू भेसळ केली तरी कुणाला कळणार नाही, कमीत कमी पाच हजार कोटी."
मानस पूर्णपणे चक्रावून गेला होता.
"तमा, हा खेळ खूप मोठा. यात आपण प्यादे. दुबईला दादासाहेब शेलार संपवायचाय हे मला पक्क कळलं, म्हणूनच हे एकशेवीस कोटी माझ्यावर असे फुकट उधळले. तिथे कोण बसलय खरच कुणाला माहीत नाही. पण तो जो कुणी आहे, तो प्रचंड मोठा. आपण विचार करू नाही शकत इतका. शेलार नाशिक जरी चालवत असेल, तरीही तो दुबईला बसलेला हळूहळू अजगरासारखा नाशिकवर फास आवळत चाललाय."
'युद्ध होईल. ' मानसला पुन्हा एकदा ते शब्द आठवले.
"तू एकदा कामाला सुरुवात कर. आपण पूर्ण भारतात नंबर वन असू. कोकेन बंद. फक्त मेथ. सगळं जग जिंकायचं. तयारीला लाग."
गौडा तिथून निघून गेला.
मानसच्या डोक्यात शब्द घुमत होते...
दुबई...शेलार... युद्ध...!!!!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसाच पैसा!
थोड अवांतर. ते द्वारका आहे की द्वारिका? .

महिंद्रा सर्कल, सातपूर रस्ता त्र्यंबकेश्वर ला जाताना पाहिलंय त्यामुळे नजरेसमोर आलं.
जोरात सुरुय.

अवांतर:

हिरो नाशिक फेमस मिसळ वै खात नाही का? Lol
आम्ही तिथून पुढे जाउन उजवीकडे शामसुंदर मिसळ खाल्ली होती बॉ.

अहो झकासराव! इथे हिरोच मिसळ बनवायला बसलाय.
अज्ञातवासींना नाशिक खुपच माहितेय. माझ्याही डोळ्यासमोर आला तो चौक.

पटापट भाग येत आहेत.
नवीनच कथासूत्र.. या विषयावर पूर्वी मराठीत फार काही वाचले नाहीय.

@केशवकूल - धन्यवाद! बदल केलेला आहे. (गुगलला हे असे शब्द कुठून सुचतात काय माहिती.) ते द्वारका आहे, नाशिकचा मध्यवर्ती भाग. इथून मुंबई आग्रा हायवे, औरंगाबाद रोड आणि पुणे हायवे एकमेकांना कनेक्ट होतात.
@झकासराव - धन्यवाद! तुम्ही म्हणत असाल तर पाठवू एखाद्या भागात मिसळ खायला Happy
@निकु - धन्यवाद Happy
@धनवन्ती - धन्यवाद Happy
@आबा - धन्यवाद Happy
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद Happy