अंमली! - भाग ४

Submitted by अज्ञातवासी on 20 January, 2023 - 12:22

भाग ३ - https://www.maayboli.com/node/82892

भूतकाळात कधीतरी....

जेजे कॉलेजची लॅब... रात्रीचा एक वाजलेला...
जेजे कॉलेजच्या लॅबचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ही लॅब बॉइज हॉस्टेलला लागूनच होती. कॉलेजपासून थोडी वेगळी, खाली वर्कशॉप, आणि वर लॅब.
एवढ्या रात्री लॅबचं कुलूप उघडलं गेलं.
दोन जण आत आले...
"दादा, काही होणार तर नाही ना?" मानस म्हणाला.
"काही नाही होणार. मी आहे ना." सोबतची व्यक्ती म्हणाली.
...सुशीलकुमार...
"उंच, लांब चेहऱ्याचा, लांब नाकाचा तरतरीत मुलगा."
लास्ट इयर, केमिकल इंजिनीरिंग... कायम टॉप टेनमध्ये. कॉलेज न करता...
मात्र केमिकल म्हणजे चित्रपटातले कॅरेक्टर असावेत, आणि रियाक्शन या चित्रपटातील प्लॉट असावा असं मानणारा.
"त्या ब्रोंकाईड च्या गोळ्या काढ."
मानसने एक पाकीट काढल.
सगळ्या काढ रे.
त्याने एक पूर्ण बॉक्स रिकामं केलं. एक्सपायरी संपल्याने मेडिकल कॉलेजने पूर्ण बॉक्स फेकलं होतं.
"तर आपल्या आजच्या चित्रपटाची निरूपा राय आहे, ही एक गोळी. कळलं. या मातेच्याच उदरातून जन्म होईल, आपल्या बच्चनचा. ज्याचं नाव आहे सुडोएफेड्रीन!!!"
मानस हसू लागला.
"हसू नको, या सगळ्या गोळ्या कुटून काढ. आपल्या निरूपाला कष्ट सहन करण्याची शक्ती आहे. कर सुरू."
त्याने गोळ्या कुटायला सुरुवात केली.
"आता ही पावडर आहे ना, तिचं वजन कर."
"चारशे ग्रॅम दादा!"
"ओके. निरूपाचे कष्ट संपले, आता तिचाही निरुपाय आहे. एंट्री होईल कादर खानची, जो बच्चनला निरुपापासून वेगळं करेल. त्याचं नाव आहे, क्लोरो बेंजेन. ते मोठं फ्लास्क घे, आणि त्यात अकराशेपंचवीस मिली क्लोरोबेंजेन ओत."
माणसने निमूट तसच केलं.
"आता हे फिल्टर करून, त्या लिक्वीड नायट्रोजनच्या बॉक्समध्ये ठेव.
आता बच्चनला मोठं व्हायचय, म्हणून थोडा वेळ तर द्यावा लागेल. आणि आपला कादर खानच त्याला बच्चन बनवेल. म्हणून आपण भेटू उद्या सकाळी, ठीक सातला."
मानस त्याच्याकडे बघतच राहिला.
तो मात्र रात्रभर इथेच थांबणार होता...
...बच्चन कसा मोठा होतो ते बघत...
सकाळी सुशील उगवला.
"इथेच आहेस?"
हो रात्रभर बघत बसलो.
"सच्चा केमिकल इंजिनियर... काढ ते फ्लास्क."
त्याने फ्लास्क काढलं.
"आता ती पांढरी पावडर दिसतेय ना ती नीट गाळून घे. आपला बच्चन तयार..."
मानसने तसंच केलं.
"आपला बच्चन तयार आहे, पण एकदम शुद्ध, निर्मळ. त्याला आपल्याला या जालीम दुनियेची सत्यता दाखवावी लागेल. म्हणून ते रेड फॉस्फरस घे, आणि त्यासोबत हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळ. आता याला अर्धा तास ठेव."
मानसने तसंच केलं.
"आता पुन्हा यातून रेड पोस्फरस फिल्टर कर."
मानसने तसच केलं.
"आता मध्यांतरानंतरची अजून एक फायट. यात आता बेकिंग पावडर आणि पाणी मिसळ, म्हणजे बच्चनची सगळी ॲसीडीटी निघून जाईल."
मानस फक्त त्याला फॉलो करत होता.
सुशील हसला...
"तुझ्याकडे आता काय आहे माहिती आहे?"
मानसने नकारार्थी मान हलवली.
"लिक्वीड मेथ..."
मानस आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिला.
"मित्रा, अजून सांगतो, बच्चन शुद्ध राहून चालणार नाही... म्हणून आता यावर हायड्रोजन क्लोराईड गॅस बबल कर...
...आणि याला आता फिल्टर कर... थोडावेळ कोरडे करत ठेव. चल थोडावेळ बाहेर जाऊयात."
मानस आणि सुशील बाहेर आले.
सुशीलने एक सिगरेट पेटवली.
"घेणार?"
मानसने नकारार्थी मान हलवली.
"घे रे... हेसुद्धा केमिकल आहे. डोक्यात भिनत जातं."
मानसने सिगरेट घेतली.
"लक्षात घे, डोक्यात प्रक्रिया पक्की असेल ना, तर समोर व्हायला वेळ लागत नाही. सगळं जगच केमिकल आहे. तू, मी, समोरची भावना... सगळं..."
तो हसतच राहिला.
"चल आत जाऊयात."
दोघेजण आत आले.
समोर एका फडक्यावर पांढरेशुभ्र खडे पसरले होते...
"मानस, चाळीस ग्रॅम हंड्रेड परसेंट प्युर मेथ...
आपला बच्चन...
...आपला अँग्री यंग मॅन...."

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बराच अभ्यास दिसतोय..
हा भागही छान जमलायं...
बापरे तुम्हाला सगळं माहीत आहे...पकडतील>>> दत्तात्रेयजी, लेखक अज्ञातवासात आहेत.. कदाचित सापडणार नाहीत..( ह. घ्या.. अज्ञातवासी..)

@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद Happy
कुणी पकडेल म्हणूनच तर मी अज्ञातवासात राहतो.
@रूपाली विशे - पाटील - धन्यवाद Happy
You get it right Lol
@केशवकूल - धन्यवाद Happy
मराठी पाऊल पडते पुढे!!!
@आबा. - धन्यवाद Happy

काय अभ्यास! काय अभ्यास!
तपशीलवार वर्णन केले आहे अगदी. >> +११

खुपच छान चालू आहे. पुलेशु