भाग २!
https://www.maayboli.com/node/82890
'भज मन राधे, राधे, राधे गोविंदा...'
मोठा मंडप. मंडपात भाविक तल्लीन होऊन नाचत गात होते.
एक मुलगा मात्र कोपऱ्यात बसून होता. शांतपणे,.सगळ्यांकडे बघत.
ना त्याच्या मुखातून स्वर फुटत होता, ना त्याच्या पायांची हालचाल होत होती.
तो शांत होता, निवांत. शून्यात नजर लावून बसलेला.
"बेटा." एका हाकेने त्याची तंद्री भानावर आली.
"नाचो बेटा, राधाकृष्ण के प्रेम रंग मैं तुम भी रंग जाओ."
तो हसला.
"भगवानने इतना खुशहाल नही बनाया, की नाच सकू."
तो माणूस हसला.
"कोणत्या खुशीच्या शोधात आहेस बाळा."
तो चमकला.
"तुम्हाला मराठी येतं."
"हो, थोडं थोडं येत. बोल, कोणत्या आनंदाच्या शोधात आहेस. काय हवंय तुला? भगवान वासुदेवाच्या दरबारात आहेस, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो!"
तेवढ्यात नाचगाण्याचा आवाज पूर्ण थांबला.
एक भारदस्त व्यक्ती आत आली...
दाढी वाढलेली. लांब केसांचा नीट भांग पाडलेला. बाह्या वर केलेल्या.
तेजस्वी, चेहऱ्यावर एक मंद हसू, कृतार्थ नजर.
...आणि सोबत वीस-तीस सशस्त्र लोक.
"दादासाहेब.... दादासाहेब शेलार." त्या व्यक्तीने मुलाला सांगितले.
आजपर्यंत दंतकथा म्हणून ऐकलेल्या दादासाहेबाना तो प्रत्यक्ष बघत होता.
"इब्राहिमला मारणारा, एकटा गफुरवर चालून जाणारा, मुंबईत घुसून दुष्मनांचा खात्मा करणारा, भारतातील सगळ्यात मोठा बंदुकीचा कारखाना उभा करणारा, आशिया खंडातील सगळ्यात मोठी वायनरी उभी करणारा... नाशिकचा राजा, सहा भुतांचा राजा, शत्रूचा काळ...
... वेताळ..."
"मला दादासाहेब बनायचंय." त्याच्या तोंडून अभावितपणे शब्द बाहेर पडले.
समोरची व्यक्ती हसली.
"बाळा, त्यासाठी तर तुला युद्ध करावं लागेल, जसं कौरव आणि पांडवांचं झालं होतं."
"करेन मी."
"तथास्तु, युद्ध होईल, आणि यात जो विजयी होईल, तो नवा राजा होईल."
ती व्यक्ती हसून त्याला म्हणाली, आणि दिसेनाशी झाली.
...हा भास होता, की भ्रम, की मिथ्या की सत्य, त्यालाच कळत नव्हतं...
तो मंडपातून निघाला.
शेलार हे नाव त्याच्या मेंदूत पक्क कोरलं गेलं होतं.
******
"अरे काय, इंटरव्ह्यूला निघालास की काय."
"नाही, इथेच थांबणार."
"कशासाठी?"
"इंटरव्ह्यू घ्यायला."
हेमंत चक्रावला.
मानस हसला.
"हेमंतभाऊ, टेन्शन घेऊ नको. आज काहीतरी मस्त होईल बघ."
"ठीक आहे. मी ऑफिसला निघतो. आणि त्या पैशाचं टेन्शन घेऊ नको, करू काहीतरी."
"तू टेन्शन घेऊ नको. रात्रभर झोपला नाहीस तू."
हेमंत वरमला.
"जा." उशीर होईल.
हेमंत तिथून निघून गेला.
हेमंत गेल्यावर त्याने दार लावलं, आणि त्याचा जुनाट लॅपटॉप काढला.
त्याचवेळी तो मोबाईलवर नंबर डायल करत होता.
दुपारी दारावर थाप पडली.
तो उठला आणि त्याने दार उघडलं.
"भें**" एक सणसणीत ठोसा त्याच्या गालावर पडला.
"अण्णाला बोलवतो. शेट्टी अण्णाला बोलवतो तू? आला शेट्टीआण्णा, काढ पंधरा लाख."
"अण्णा काय करतात, मरेल की तो. शांत. उठवा रे त्याला." मागून गौडा म्हणाला.
दोन जणांनी त्याला उठवलं. आणि कॉटवर बसवलं.
"अण्णा, पैसे आता नाहीत पण येतील."
आण्णा हसला, "कसे येतील?"
मेथमफेटामिन...
अण्णाची चर्या गंभीर झाली.
आणि नंतर तो जोरजोरात हसू लागला.
"डोक्यावर पडला का? काहीही नाव घेतं. काय बोलला, मेथम... काय?"
एक खाडकन मुस्कटात मारल्याचा आवाज आला...
मानस चक्रावून बघतच राहिला...
वसंता गौडाने शेट्टीच्या मुस्कटात लगावली...
"गौडाअण्णा?" शेट्टी पूर्णपणे गांगरला.
"बाजूला बस. आता येडे चाळे नको." गौडा किंचाळला.
मानस विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिला.
"मी, वसंता गौडा, नाशिकचा सगळ्यात मोठा डीलर. तू जे नाव घेतो, ते तुला माहिती आहे काय?"
"मेथ..." मानस म्हणाला.
"हो मेथ... कुठून आणणार?"
क्षणभर शांतता पसरली
"मी बनवणार..." मानस म्हणाला.
"येडे चाळे नको. बीजनेस बोल."
"बिजनेसच आहे. आणि फुल प्रुफ आहे. मला तीन दिवस आणि काही मटेरियल आणून दिलं, तर मी दीडशे ग्राम 95 टक्के शुद्ध क्रिस्टल मेथ बनवून देईल. एक ग्रॅम मेथ दहा हजाराला विकलं जातं. दहा ग्रॅम, एक लाख. शंभर ग्रॅम, दहा लाख."
"तू मला वेडा समजतो? हा काय गांजा आहे, सपासप पुड्या बांधायच्या, आणि पॅक करायच्या?"
"नाही, म्हणून ही ऑफर मी तुम्हाला दिली आहे. अण्णा, मी केमिकल इंजिनीरिंगचा टॉपर आहे, चार वर्षे फक्त आणि फक्त केमिकल्समध्ये खेळलोय. तुम्ही हे कोकेन, मेथ म्हणतात ना, हे काही आकाशातून पडलेलं नाही. फक्त कॉम्प्लेक्स केमिकल्स आहेत."
"... पण जे सामान तुला लागेल, ते तर आकाशातून नाही पडणार."
"सगळे पत्ते मला माहिती आहेत. बापावर ताण पडू नये, म्हणून लॅब असिस्टंट म्हणूनही काम केलंय. यादी कशावर पाठवू?"
गौडा अजूनही विचारचक्रातच होता.
"शेट्टी," त्याने आवाज दिला.
"जी आण्णा," भेदरलेला शेट्टी समोर आला.
"भुऱ्याकडून किती झाली वसुली."
"अण्णा?"
"किती झाली वसुली?"
"दहा लाख."
गौडा थोडावेळ शांत बसला.
"धुमाळला किती दिले?" त्याने शांततेचा भंग केला.
"पाच लाख."
...आता मानस चक्रावून गेला...
"तमा, हा खेळ असाच असतो. पोलिसांनी तुला उगाच सोडून दिला? ती पुडी आमच्याच ताब्यात. तुला चाकू मारणारा, त्याच्याकडून दहा लाख वसूल. नफा, पाच लाख."
"...आणि जर मी पैसे दिले असते तर." मानस म्हणाला.
"पंधरा लाख. पण आता तुझे पैसे नको, डोकं पाहिजे. करशील का काम, माझ्यासाठी."
मानस हसला...
"अण्णा, मी ही ऑफर तुमच्यासाठी काम करण्यासाठी दिलेली नाहीये."
"मग?"
"बरोबर काम करू. पार्टनर."
अण्णा हसला. "किती टक्के पाहिजेत?"
"तुम्ही आता महिन्याला किती कमावतात?"
"एक कोटी नफा."
"एक कोटीपर्यंत एक रुपया मला नको. एक कोटीच्या वर, फिफ्टी फिफ्टी."
"ये, अण्णाला तुझ्या लेव्हलचा समजतो तू?" शेट्टी ओरडला.
"कबूल..." गौडा शांतपणे म्हणाला.
मानसने समाधानाने मान हलवली.
"लिहून दे, नासिकला कुठे काय मिळेल हेही सांग, उद्याच सामान आणून देतो. पण त्यानंतर सगळं काम तुझं."
"अण्णा, हे काम काही घरात होणार नाही. त्यासाठी मला कमीत कमी तीन चार हजार स्क्वेअर फुटाची जागा लागेल. वेगवेगळे इक्वीपमेंट लागतील, आणि सोबत दोन माणसे देखील."
"सगळा इंतजाम होईल, माल चांगला बनला पाहिजे."
"नक्की बनेल. जगात बेस्ट."
"आता एक शेवटची बात. नाशिकमध्ये अण्णा सगळ्यात मोठा असला, तरीही एका माणसासमोर तो सगळ्यात लहान आहे. चूजा म्हण, पण आहे."
"कोण अण्णा?"
"दादासाहेब शेलार..."
मानसला तो दिवस लख्ख आठवला.
'युद्ध होईल.'
त्याच्या चेहऱ्यावर एक भीषण हसू उमटलं.
"हसू नको. शेलारला कळलं जरी ना आपण ड्रग विकतो, तर तो आधी तुझी कातडी सोलेल, मग त्यावर ड्रग चोळेल, आणि मग तुला मारेल."
त्याचं हसू क्षणात भितीत बदललं...
"अजून एक... शेलार मला काहीही करू शकत नाही, कारण ज्या दिवशी हे शेलारला कळेल, त्याच क्षणी मी सुसाईड करेन."
मानस अजूनही भीतीतच होता...
...शेलार हे नाव पुन्हा एकदा त्याच्या मेंदूत पक्क कोरलं गेलं होतं...
क्रमशः
वाचतोय. थोड थोड समजतेय. लिंक
वाचतोय. थोड थोड समजतेय. लिंक लागतेय.
दोन्ही कथानक फ्यूझन मोडमध्ये
दोन्ही कथानक फ्यूझन मोडमध्ये भारी वाटतेय वाचायला. हाफ राइस दाल मारके सारखी ही सर्व पात्र सुद्धा फेवरेट बनत चाललियेत
आधीचे भाग पूर्ण वाचल्यावर
आधीचे अज्ञातवासिचे भाग पूर्ण वाचल्यावर कदाचीत चांगली स्पष्टता येईल. पण कळतंय.
मी अलीकडेच "अज्ञातवासी" सुरु
मी अलीकडेच "अज्ञातवासी" सुरु केले आहे. पण आता नेटाने वाचणार आहे. आता पार्श्वभूमी समजली आहे. त्यामुळे कथेत सहजगत्या गुंतत चाललो आहे.
ह.. आता शेट्टी अण्णा एखादी
ह.. आता शेट्टी अण्णा एखादी laundry टाकतील की काय, त्याच्याखाली तळघरात मोठी लॅब असेल?
वाचतोय!
वाचतोय!
नवीन दिसली म्हणून वाचायला
नवीन दिसली म्हणून वाचायला सुरुवात केली, मग कळलं पाढे पाठ केल्याशिवाय गुणाकार जमत नाही, ....मग दोन दिवसात अज्ञातवासी चे दोन्ही सिजन भकाभक रटले; Netflix च्या वेब सीरिज पण अशा कधी बघितल्या नाहीत, पण पर्याय नव्हता, प्रत्येक भाग पुढे वाचायला भाग पाडत होता. वाचताना कधी "ओंकारा" तर कधी "विरासत" तर कधी अशाच कुठल्या वेबसिरीज समोर यायच्या, सुरुवात तर महाभारता सारखी वाटली, कुठला तरी भाग गंगापुत्र होता ना ..
काही म्हणा, आता ह्या अंमली ची चटक लागली आहे आता... सप्लाय चालू ठेवा लेखक महाशय....
पूर्ण झाल्यावर वाचू, असा
पूर्ण झाल्यावर वाचू, असा विचार होता पण curiosity kills the cat.
मोक्ष चा प्रतिस्पर्धी का हा?
हा भाग छान मोठा लिहीलाय, धन्यवाद अज्ञातवासी.
खूप विचार करून छान लिहीताय..
मी वेगळी कथा म्हणून वाचतेय.
मी वेगळी कथा म्हणून वाचतेय. आधीचे काही माहिती नाही.
मी पण!
मी पण!
@केशवकूल - धन्यवाद!
@केशवकूल - धन्यवाद!
@अज्ञानी - धन्यवाद!
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद. अज्ञातवासीचा पत्र परिचय आणि दुसऱ्या सिजनचा शेवटचा भाग वाचला तरी चालेल.
@अजिंक्यराव पाटील - अपेक्षित प्रतिसाद.
@आबा. - धन्यवाद!
@manya - सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हा सप्लाय चालूच राहील. त्यानंतर अज्ञातवासीचा सप्लाय चाकू होईल.
@गौरी - धन्यवाद. बघुयात पुढे काय होतं ते.
@ShitalKrishna - धन्यवाद. अज्ञातवासीशी डायरेक्ट कनेक्ट आहे, पण कथा पूर्णपणे स्वतंत्र आहे.
वाचतोय हां
वाचतोय हां
रंगत येतेय.
अभ्यास जोरदार आहे लेखकाचा.
मेथमफेटामिन......
मेथमफेटामिन......
ब्रेकिंग बॅड आठवला.....
वाचतोय!
@झकासराव - धन्यवाद!
@झकासराव - धन्यवाद!
@संजय पाटिल - धन्यवाद!