मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -3

Submitted by Sujata Siddha on 20 January, 2023 - 06:15

आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया ईथे टिचकी मारा

https://www.maayboli.com/node/80856

https://www.maayboli.com/node/80926

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -3

मध्ये काही दिवस गेले, असंच एकदा जेवता जेवता शौर्य ने विचारलं , “ मेखला तुझ्या उल्का ताईला भेटत नाहीस वाटतं सध्या ? बहोत दिनोसे जिक्र नही किया तुमने उसका “ हल्ली तो वाक्याची सुरूवात मराठी ने करतो आणि मग ईतर भाषेवर येतो , तेवढी सूट दिली आहे मी त्याला . बाकी त्याची मराठी भाषेतली प्रगती विचाराल तर ,’छोट्यांसाठी गोड़ गोड गोष्टी ‘ ही मीच लिहिलेली पुस्तकं आवडीने वाचण्याईतपत झालेली आहे .
“ नाही भेटले रे , खरं तर मी मिस करतेय खूप तिला , तुला नेईन एकदा भेटायला . “
“ मै उनसे मिल चुका हु , “
“आं ? … कधी ? ..”
“ लास्ट मंथ , मेरे एक फ्रेंड के साथ गया था , ,उल्का मॅम का एक एक्सपेरिमेंट चल रहा है , साउंड और लाईट का , तो उसके लिए उनको कुछ चेंजेस करने थे उनके बंगलो मे ,उनकी मेडिटेशन रूम भी देखी है मैने “
“आणि हे तू मला सांगितलं नाहीस ? बराच आतल्या गाठीचा आहेस की, कोणत्या मित्राबरोबर गेलेलास ?”
“You don’t know him ,हर बात बताना जरूरी है क्या ?”
“हा बिलकुल ...even i tell you everything ..”
“Ok बाबा I forgot , कान पकडके माफी मांगू क्या ? ..”
“ हे बरं आहे , असं म्हटलं की झालं , पण तु हे नाही सांगितलंस की कशी वाटली तुला ती ?
“अमेझिंग !... “
“हं .. , जास्त लाडात येऊ नकोस ,दिसत नसली तरी २० वर्षांनी मोठी आहे ती तुझ्यापेक्षा ..” मी फणकाऱ्याने म्हटलं .
“अगं तसं नाही गं .. don’t take it otherwise !.. i mean to say ,she is different than others , मैने कभी इस तरह कीं पर्सनॅलिटी नाही देखी “
“मतलब ? “
“मतलब वो औरोसे कुछ अलग लगती है , ऐसा लगता है , ईस दुनिया मे ऐसे भी लोग है जो name , fame ,और पैसे के पीछे नाही दौड रहे है , फेक नही है ,और फिर भी खूष है , हमसे ज्यादा खूष है , और जो बेवजह लोगोंसे प्यार कर सकते है , रिटर्न मे उनको कुछ नही चाहिए होता , उनके पास बैठने से ही
एकदम शांत लगता है, सब फालतू विचार बंद हो जाते है , ऐसी कुछ अलग सी व्हायब्रेशन्स है उनकी , समज मै आया कुछ ? “
“ परफेक्ट ऑबझर्वेशन , कळतात रे म्हणजे माणसं तुला , अगदीच माठ नाहीयेस ! डोकं आहे तुला, हे दिसतं बरं कधी कधी “ मी डोळे मिचकावत हसू लागले , यावर रागारागाने शौर्य ने पाण्याचा ग्लास माझ्या डोक्यावर धरला , आणि म्हणाला , “क्या तुमको मै मॅड लगता हू ? Say sorry immediately !..देखो नही तो सारा पानी तुम्हारे सिर पे डाल दूंगा ..”
“ ई sssss काहीही …. , ठेव तो ग्लास खाली…. , मी जेवतेय ना ? “ ग्लास पासून डोकं लांब करत मी शक्य तेवढ्या मोठ्याने ओरडले .
“ म्हण सॉरी “
“नाही म्हणणार जा !.. “
“लास्ट बोलता हू ,से सॉरी “
“ नाही …”
“नही ?…ये लो .. “ शौर्य ने पाण्याचा ग्लास माझ्या डोक्यावर ओतायला सुरुवात केली,
मी रागारागाने उठून त्याला दोन गुद्दे मारले आणि त्याने पण मला दोन ठोसे लावले , मग आम्ही अशी लुटुपुटुची मारामारी करता करता हसायला लागलो , माझा शौर्य , oh i love him so much !..

निशी साधारण दोन वर्षाची झाली आणि एके दिवशी ताईचा फोन आला , तेव्हा म्हणजे साधारण १९९४-९५ च्या काळात घरी फोन असणं हि एक चैन होती , अर्थात सासरी आमच्या कडे फोन नव्हता , वाड्यात खालच्या घरात एक जणा कडे फोन होता , जेव्हा केव्हा बोलायचं असेल तेव्हा त्या नंबर वर ताई बाहेरच्या ‘ एस. टी डी . बूथ ‘ वरून एक रूपायचा कॉईन टाकून कॉल करायची .तर ती म्हणाली “ एक लोकल बातम्यांचं चॅनेल आहे , त्यांना निवेदिका हवी आहे, बघ ऑडिशन देऊन “ ती तेव्हा आकाशवाणीत कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून जायची ,माझं माहेर सधन नसलं तरी आर्टिस्टिक होतं , आजोबा उत्तम हार्मोनिअम वाजवायचे , आम्ही भावंडं छोटे मोठे गाण्याचे प्रोग्रॅम्स करायचो , त्यावेळी मी निवेदन आणि गाणं या दोन्ही भूमिका बजावायचे , त्यामुळे मी अगदी लगेचच इंटरव्ह्यू द्यायला गेले , सिलेक्ट पण झाले , बातम्या द्यायची वेळ संध्याकाळी ५ ते ९ ,साडे चार वाजताच सगळं आवरून मी वेळेवर हजर होई , निशी आता L.KG . त जाऊ लागली होती .

…… आज खूप दिवसांनी उल्का ताईची पुढची स्टोरी सुरू झाली होती , लागोपाठ दोन -तीन सुट्ट्या मिळाल्यामुळे मी तिच्याकडे आज मुक्कामालाच आले होते ,आणि शौर्य त्याच्या आई -बाबांकडे गेला होता.
संबंध दिवस थिसीस च्या डिस्कशन मध्ये घालवल्यावर , मग संध्याकाळी आम्ही दोघी निवांत तिच्या ,जाई -जुई च्या वेलींनी बहरलेल्या पर्णकुटीत कॉफी पीत आणि सँडविचेस खात बसलेलो असताना, तिने पुढे सांगायला सुरूवात केली . खरं तर मला ती जे बोलतेय ते सगळं टाईपही करायचं होतंच पण ऊफ !.. ये लॅपटॉप ..बेट्याला अचानक update व्हायची तल्लफ आली , मग मी त्याचा नाद सोडून, घाईघाईने रेकॉर्डर ऑन केला, उल्का ताईच्या ओघवत्या वाणीतून कथा केव्हाच पुढे सरकू लागली होती ..
… बातम्यांचे पैसे फार मिळत नसले तरी हळूहळू लोक मला ओळखू लागले , बायका माझ्या साड्यांचं कौतुक करू लागल्या , कधी कधी लोक मला रस्त्यात थांबवून तुम्ही खूप छान दिसता , खूप छान बोलता , तुम्ही बातम्या द्यायला लागल्यापासून आम्ही रोज न चुकता बातम्या बघतो , ई. ई . कॉम्प्लिमेंट्स द्यायला लागले , कधी कधी तर ऑटोग्राफ ही मागायचे ,बाहेर हा सीन असला तरी घरच्या वातावरणात फारसा काही बदल झाला नव्हता, त्यामुळे बाहेर असलं की छान वाटायचं , घरी जाऊच नये असं वाटायचं,’ अशातच एके दिवशी माझ्या एका सहकारी निवेदिकेने तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये एक असिस्टंट ‘हवी आहे ,त्यासाठी तु अप्लाय करतेस का? असं विचारलं ,मी तयार झाले कारण तसंही ‘वृत्त निवेदन’ हे पार्ट टाईम होतं , आणि हा जॉब ही पार्ट टाईमच होता , सकाळी ‘आठ ते दोन ’ ऑफिस आणि संध्याकाळी पाच ते नऊ बातम्या , असं वेळेचं गणित होतं . अजूनही जसाच्या तसा आठवतो तो दिवस , इंटरव्ह्यू साठी त्यांनी मला दुपारी तीन ला बोलावलेलं , मानसनेच मला गाडीवर सोडवलं , कुठेही बोलावलेल्या वेळेच्या आधी दहा मिनिटं जाऊन बसायची माझी सवय , त्याप्रमाणें जाऊन बसले , सहज वर नजर गेली तर जवळजवळ अर्धी भिंत सर्टिफिकेट्स ने भरली होती ,एकाच माणसाच्या एवढ्या पदव्या ? मला नवल वाटलं , ते एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट होतं , दहावी बारावीनंतरचे राऊटर आणि इंटरनेट शी रिलेटेड काही कोर्सेस तिथे शिकवले जायचे . तेव्हा इंटरनेट हा प्रकार नुकताच भारतात आला होता , अजूनही मंडळी पेजर वापरत होती तर काही ऍडव्हान्स मंडळी नोकियाचा फोन वापरू लागली होती . या अशा काळात यांची सकाळी सहापासून ते रात्री दहा पर्यंत प्रत्येक बॅच फुल्ल होती . तितक्यात मला आत केबिन मध्ये बोलावलं गेलं ,समोरच्या खुर्चीत सावळ्या ,सतेज कांतीचा आणि कुरळ्या केसांचा एक तरुण बसला होता , माझ्यापेक्षा फार तर दोन एक वर्षांनी मोठा असेल ,कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे , त्यावर हाफ स्लीव्जचा ग्रे कलरच ऊंची हाफ जॅकेट , एकदम एक्झिक्युटिव्ह पर्सनॅलिटी , मागच्या रॅक वर शास्त्रीय संगीताच्या cds ओळीने लावलेल्या आणि त्याच्या वरच्या रॅक मध्ये खूप सारी पुस्तकंही रांगेत ठेवलेली, ते बघेपर्यंत मलाही सांगीतिक आणि साहित्यिक बॅकग्राउंड होती हे मी साफ विसरूनच गेले होते .ते रॅक बघूनच त्याच्या बद्दलचे माझे मत एकदम अनुकूल झाले , मी खुर्चीत बसल्यावर काहीतरी विनोदी बोलून त्याने आधी माझं दडपण दूर केलं आणि त्यानंतर एकदम खेळीमेळीच्या वातावरणात माझा इंटरव्यू पार पडला , त्याच्या वागण्या बोलण्यातला प्रचंड आत्मविश्वास आणि समोरच्याला आपलंस करायची , कम्फर्टेबल करायची हातोटी विलक्षण होती . पहिल्या भेटीतच मी भारावून गेले , माझ्या २८ वर्षांच्या आयुष्यात मी एवढी व्हर्सेटाईल आणि कॉन्फिडन्ट पर्सनॅलिटी पहिल्यांदाच बघितली होती . मी सिलेक्ट झाले . आता प्रश्न होता घरचं आणि निशीचं कसं मॅनेज करायचं , सर्वानुमते असं ठरलं की सकाळचा स्वयंपाक मी करणार , संध्याकाळचा वहिनी ‘,निशी ‘ला काही काळ आईकडे ,काही काळ ‘मानस’ घरी आल्यावर त्याच्याकडे . अशा तऱ्हेने एकदाचं माझं ऑफिस सुरू झालं, सकाळी आठ वाजता ऑफिस उघडायचं काम माझ्याकडे असायचं ,’मीनाक्षी पुरम ‘नावाच्या भल्या मोठ्या ईमारतीत दुसऱ्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांचे क्लासेस चालायचे . ,पहाटे लवकर उठून , स्वयंपाक वैगेरे करून , मी निशीचं आवरायला घ्यायचे , बिचाऱ्या निशीला झोपेत असतानाच उचलून मी सरळ बाथरूम मध्ये न्यायचे . मी ऑफिसला पोहोचेपर्यंत , बॉस म्हणजे ‘ उदयन सहस्रबुद्धे ‘ आणि त्याच्या टीम ची सकाळी सहाची एक बॅच घेऊन झालेली असायची,त्यानंतर ते सगळे मिळून ब्रेकफास्ट ला जायचे, खरं तर मला ही खूप भूक लागलेली असायची, कारण सकाळी सगळं करायच्या नादात मी काही खायचेच नाही ,पण संकोच वाटून त्यांच्याबरोबर मी कधी गेले नाही. त्यांचा टिचिंग स्टाफ , वैगेरे मिळून पाच सहा लोक असतील, ते सगळे खूप धम्माल करायचे ,आमचा बॉस म्हणजे एक आनंदाचा आणि उत्साहाचा झराच होता ,बऱ्याचदा ते आठवणीने माझं पार्सल आणायचे ,मला फार आश्चर्य वाटायचं, कारण लग्नानंतर कोणी आपल्या खाण्यापिण्याची काळजी करतंय ही मला सवयच नव्हती , ऑफिसचं वातावरण आणि लोक चांगले असले तरी मला खूप दडपण असायचं ,सतत काही चुकेल ही भीती आणि टेन्शन ,याआधी मी काही दिवस एक जॉब केला होता पण तो लग्नाआधी ,त्यालाही सहा वर्षे होऊन गेली होती , ऑफिस कामाची सवय नव्हती , त्यातच सकाळी आठ पर्यंत ऑफिस गाठायचं , तीन वाजता घरी आले की तासा दोन तासात परत आवरून बातम्या द्यायला पोहोचायचं , मधल्या वेळेत निशी ला आईकडे सोडवायचं , येताना रात्री घेऊन यायचं , मग रात्रीची जेवणं ,आवरा आवरी सगळं उरकून झोपायला ११ वाजायचे , गादीवर पडायचे तेव्हा सगळं घर भोवती फिरतंय असं वाटायचं ,अंगात त्राणच नसायचं ,कधी झोपले कळायचं देखील नाही .शारीरिक आणि मानसिक दगदग मला सहन होईना , पण ते समजून घेणं हे घरच्यांच्या स्वभावात बसत नव्हतं , मानसचीही चिडचिड वाढायला लागली ,’निशी ‘च्या वाट्याला तर मी यायचीच नाही त्यामुळे तीही सतत रडत असायची , जाऊ बाईही सदैव घुश्श्यात राहू लागल्या कारण नाही म्हटलं तरी आधी मी दिवसभर घरी असल्याने जी कामं व्हायची ती आता माझ्याच्याने होईनात , वाटलं तितकं दोन दोन नोकऱ्या करणं तेही घरातले सगळे सण -वार , आणि बाकीचं सगळं सांभाळून सोपं नव्हतं . जिथे एकाग्रता लागते तिथेच मग नेमक्या जास्त चुका होऊ लागल्या , साधी पर्चेस ऑर्डर काढायची तरी त्यात कॅल्क्युलेशन चुकायचं , स्टुडंट्सच्या फी इंस्टॉलमेंट चं गणित चुकायचं ,त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखीनच डळमळायला सुरूवात झाली . खूप वेळा वाटायचं सोडून द्यावं आणि पळून जावं लांब कुठेतरी , पण घरात पैशांची गरज होतीच कारण मानस एकटा सगळ्यांचा भार सांभाळूत होता , वाहिनी जरी कमावत होत्या तरी त्यात त्या स्वतः चा आणि मुलीचा खर्च भागवायच्या घरखर्चाला काहीही देत नसत . त्यामुळे मानस ला आर्थिक हातभार लावला पाहिजे हे माझ्या मनाने स्वतः:वर घेतलेलं लोढणं . सगळ्या गोष्टींचा तोल सांभाळण्याच्या नादात मी स्वतः:ला हरवून बसले होते , स्वतः:चं असं ना काही अस्तित्व उरलं होतं ना काही व्यक्तिमत्व. सगळं यांत्रिक पणे चालू होतं . अशातच एके दिवशी सहजच जाई शी बोलताना मला कळलं की ‘उदयन सर ‘मला मूर्ख समजतात . म्हणजे त्यांच्या भाषेत मी ‘Below Average’ आहे , केवळ सिन्सिअर आहे म्हणून मला ते सांभाळून घेतात , हे ऐकून मला खूप कसंतरी झालं . .चुका होतात हे मलाही मान्य होतं ,आत्मविश्वास कमी होता हे हि मान्य होतं , पण मी मूर्ख नक्कीच नव्हते. , मग स्त्री सुलभ स्वभावाला अनुसरून मी जाईला, घरातली परिस्थिती , दिरांच न कमावणं , त्यामुळे होणारी घरातली भांडणं ,जाऊ बाई आणि सासूबाईंचा धाक , मानसचं आपल्याच नादात असणं , दोन-दोन नोकऱ्या आणि घरकाम , लहानग्या निशीचं संगोपन करताना मी तोकडी पडते याचं आलेलं अपराधीपण त्याचा माझ्या मनावर पडणारा ताण , सारं काही सांगितलं ,त्यावर तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले , ती म्हणाली की त्या सर्वांना माझ्याकडे बघून असं वाटायचं की मी एखाद्या बंगल्यात राहते आणि वेळ जात नाही म्हणून काम करते आहे .घरी मला अगदी ईकडची काडी तिकडे करावी लागत नसेल. कसलंच काम करायची सवय नसल्यामुळे मला ऑफिस चं ही काम जमत नसावं. मी बातम्या देते ,छान छान साड्या घालते , छान आवरून येते , त्यामुळे असा सर्वांचा गैरसमज झाल्याचं तिने कबूल केलं , त्यांचा गैरसमज बघून मला हसावं की रडावं कळेना , काहीही समज करून घेतात लोक . मग म्हटलं “जाई तु सकाळी झोपेतून उठत असशील ना तेव्हा माझा निम्मा दिवस झालेला असतो . “ , मी सहा लोकांचं धुणं आणि भांडी करून शिवाय स्वयंपाकही करते यावर तिचा विश्वास बसेना ,तुम्ही बाई का लावत नाही हा तिचा साधा प्रश्न , बाई आमच्याकडे होतीच अगदी सासूबाईंच्या तरुणपणापासून , पण ती बऱ्याचदा दांड्याच मारायची . माझा प्रॉब्लेम काम खूप पडतं हा नव्हता , माझा प्रॉब्लेम हा होता की मी निमूटपणे सारं सोसत होते आणि ते कोणाच्या गावीही नव्हतं , ना मानसच्या , ना सासूबाईंच्या ना जाऊबाईंच्या . दिरांना तर कोणी जमेतच धरत नव्हतं . मग दुपारी लंच च्या वेळेस ती माझ्या जवळ आली ,बहुधा तोपर्यंत तिचं ‘यु डी ‘शी , (म्हणजे उदयन सहस्त्रबुद्धे ) माझ्याबद्दल सगळं बोलून झालं होतं . जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवत तिने म्हटलं ,” उल्का रोज एकटीच बसतेस जेवायला आज आमच्याबरोबर बस ना , यु .डी .विचारत होते की उल्का मॅडम एकट्या का बसतात ?” यावर मी उठले आणि त्यांच्यात जाऊन बसले ,त्या दिवशी माझ्या डब्यात कोबीची भाजी होती . यु डी नी एक घास घेतला तसं माझ्या छातीत धडधडलं ,तेवढ्यात ते म्हणाले , ‘wow ..!..fantabulous.. आज तुमची भाजी मीच संपवणार “ मी हुश्श म्हणून सुस्कारा टाकला ,कारण ते खूप चांगले खवय्ये होते , त्यांनी खरंच सगळा डबा संपवला ,नंतर दररोज ते माझी भाजी आवडीने खायला लागले , म्हणायचे तुम्ही सुगरण आहात ,मला बरं वाटू लागलं , निदान काहीतरी यांना आपलं आवडतंय .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users