अंमली! - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 16 January, 2023 - 02:25

मागील भाग

https://www.maayboli.com/node/82876

टप... टप...
सिव्हिल हॉस्पिटल नाशिक!
पावसाची संततधार चालू होती. एका जुनाट बेडवर तो पडलेला होता.
हाताला एक सुई टोचत होती. वरून सलाईनमधून काहीतरी त्याच्या शरीरात घुसत होतं.
"फुकट ऑपरेशन झालं तुझं," शेजारून एक आवाज आला.
त्याने त्याच्याकडे बघितले.
"हेमंतभाऊ!"
"हो पडून रहा. कुणीतरी चाकू मारला तुला. एवढ्या रात्री गोदावरीच्या किनारी काय जीव द्यायला गेला होतास का?"
"माझी पुडी?" त्याने क्षीण आवाजात विचारले
"महाराज. तुम्हाला इथे कुणी आणलंय कळतय का? ती पुडी कोकेनची होती. २०० ग्रॅम हाय ग्रेड कोकेन. पंधरा ते वीस लाखाचा माल होता तो."
...आत त्याला कळलं, की ती पुडी त्याला बोलवत का होती...
...का तो जीव जात असतानाही त्या पुडीला घट्ट आवळत होता.
...कारण ती पुडी नव्हती...
... तू त्याच्यासाठी नशीबाची चावी होती...
..की एक नवीन अभिशाप?
"थांब मी नर्सला बोलवतो." हेमंत बाहेर गेला. थोड्यावेळाने नर्स आत आली.
"जखम खोल आहे, रिकवरीला वेळ लागेल. डॉक्टर येतील राऊंडला. पोलिससुद्धा येतील. त्यांनाही जबानी घ्यायचीय तुमची."
त्याने क्षीणपणे मान हलवली.
नर्स निघून गेली.
"हेमंतभाऊ, माझे सगळे पैसे संपलेत. रूम खाली करावी लागेल."
"आधी ही रूम खाली कर, मग बघू. आराम कर."
"माझा फोन."
"हा घे. पण आराम कर, जास्त खेळू नकोस."
"नाही रे."
त्याने मोबाईल हातात घेतला, आणि गुगल सर्चवर पहिलं सर्च टर्म टाईप केलं.
'...कोकेन...'
क्षणार्धात अनेक सर्च रिजल्ट त्याच्या समोर आले.
...आणि तो अधाशासारखा वाचू लागला.
दिवस रात्र, तो फक्त वाचत होता...
कोकेन, एलएसडी, मॅरीयुआणा, सगळच...
जिथून माहिती मिळेल तिथून तो वाचू लागला. त्याला खाण्या पिण्याचीही शुद्ध नव्हती. तो फक्त वाचत होता...
...आणि त्याच्या नजरेसमोर फक्त येत होती ती पांढरी पुडी...
*****
"नमस्कार, मी सबइन्स्पेक्टर धुमाळ. बरं वाटतंय आता."
"हो साहेब." त्याने उठून बसण्याचा प्रयत्न केला.
"पडून रहा. तुला अजून बरंच रिकवर व्हायचंय. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, ती पुडी तुझ्याकडे आली कशी?"
"साहेब, कुणीतरी मला चाकू मारून पळालं. त्या नादात ती पुडी खाली पडली. मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल, म्हणून आवरून ठेवली इतकंच."
"भाड** हाय ग्रेड कोकेन आहे ते, आणि तुला असच सापडलं होय. नशीब तुझं एफआयआर दाखल न करता इथे आणून सोडलं. पुडी आता जप्त झाली आहे. विसरून जा. आणि तू, याला घरी घेऊन जा. बस झाली शुश्रुषा."
हेमंतने मान हलवली.
"हो हेमंतभाऊ, आपण रूमवर जायला हवं. आजच."
"अरे बाबा, तू पडून राहा. जाऊ आपण. हेमंत म्हणाला."
"मी डॉक्टरला सांगतो. आजच डीसचार्ज देतील. आणि तोंड बंद ठेव. आधीच डोक्याला कमी ताण नाही." धुमाळ वैतागाने म्हणाला आणि तिथून निघून गेला.
तो निवांत पडून राहिला.
*****
संध्याकाळी तो हॉस्पिटलमधून रूमवर आला.
खिशात अठ्ठावीस रुपये अजूनही तसेच होते.
"हेमंतभाऊ, थँक्यू यार."
"अरे गप. आराम कर तू."
तेवढ्यात दारावर थाप वाजली.
कोण असेल?
"पोलिस!" तो म्हणाला.
हेमंतने घाबरून दरवाजा उघडला.
एक अर्धवट टक्कल पडलेला, पांढरा आखूड शर्ट घातलेला, खाली लांब गोल धोतर नेसलेला, जाड मिशीवाला आणि माणूस समोर उभा होता.
"नमस्ते जी. मैं गौडा. वसंता गौडा... थोडा बाजू हटो जी, पेशंट देखना."
दाक्षिणात्य हिंदीत तो बोलत होता.
"सर, वेरी बॅड. खूपच वाईट अवस्था झाली की हो तुमची. गेट वेल सून. पण आमचाही नुकसान झालं की हो, तुमच्यामुळे..."
"माझ्यामुळे?" त्याने प्रश्न केला.
"पोलिसांना पुडी तुमच्याकडूनच मिळाली. आता त्याचा पैसा नको चुकवायला. पण शेट्टी अण्णा दरियादिल... मटला, तुमच्याकडून अर्धाच पैसा घेणार. फक्त दहा लाख...."
"दहा लाख?" हेमंतने आ वासला.
"हो. नाहीतर आमचा कोयता चालणार. कोयता खूप त्रास देते मरताना..."
तो हसला.
"मी पंधरा लाखाचा माल दिला तर चालेल?"
"काय बोलते... वेडा झाला की काय तू???" गौडा चक्रावला.
"वेडा नाही, शेट्टी अण्णाला सांगा, बिजनेस करायचा आहे त्यांच्यासोबत."
गौडा खदखदून हसला.
"बिजनेस? तुमच्यासोबत? सांगेन हो, पण काय बिजनेस आम्हाला बी कळू द्या की."
"ते मी अण्णालाच सांगेन."
"बरं, या आमच्या जागेवर. दुधबजार...
पैसे नाहीत माझ्याकडे, आणि येण्याची ताकदही नाही. उद्या शेट्टी अण्णा इथे आले, तर त्यांची लाईफ बदलेल आणि माझीही. नाहीतर मला मारून टाकलं तरी चालेल. या तुम्ही." मानस म्हणाला.
गौडा क्षणभर विचारात पडला, आणि नंतर खळखळून हसायला लागला.
"चालेल जी. येतील शेट्टी तुमच्याकडे. सावधान रहा, अण्णा खूप गरम डोकं."
"धन्यवाद गौडाआण्णा." तो म्हणाला.
गौडा चक्रावला. त्याच्या डोळ्यात क्षणभर मायेची झाक आली.
"आते हम." तो तिथून निघाला.
मानस त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटापट भाग येत आहेत..
कथानायक काय साध्य करतो याची कल्पना आलीय मागच्या कादंबरीत.
ते कसे साध्य करतो हे वाचणे औत्सुक्यपूर्ण असेल.

@धनवन्ती - धन्यवाद!
हो, या कथेचा क्लायमॅक्स म्हणा, किंवा इंडगेम म्हणा, तो अज्ञातवासीच्या दुसऱ्या सिजनच्या शेवटच्या भागात ऑलरेडी सुरू झाला आहे.
ही कथा मोस्टली मानसच्या प्रवासावर डीपेंड असेल. यात अनेक नवीन कॅरेक्टर येतील, काही जुने लोक येतील, आणि काही पॉइंट्स अज्ञातवासीच्या तिसऱ्या सिजनशी कनेक्ट होतील.
क्रॉसओवर समजा हवं तर, किंवा स्पिन ऑफ!

वाचला....

Chemistry scholar drug बनवणार? छान चालूये

@केशवकूल - धन्यवाद
@च्रप्स - धन्यवाद
@ShitalKrishna - धन्यवाद
@रूपाली विशे - पाटील - धन्यवाद