काय करावे.

Submitted by केशवकूल on 16 January, 2023 - 09:41

आज मी कामानिमित्त बॅंकेत गेलो होतो. काम संपवून बाहेर आलो तेव्हा रस्त्रात एका बाईने मला आडवले. म्हणाली, “अहो, मला जरा नाश्त्यासाठी पैसे द्याल का? सकाळ पासून चहा सुद्धा प्यालेली नाही हो. तेव्हा प्लीज.”
बघितले तर बाई गरीब अजिबात वाटत नव्हती. बऱ्यापैकी साडी नेसली होती. विशेष म्हणजे डोळ्यावर काळा चष्मा होता!. वय असेल चाळीस पंचेचाळीस. एकदा वाटलं करावी मदत. हिला हॉटेल मध्ये नेऊन सरळ जेवण खायला घातले तर?
मी सावध झालो आणि तिला टाळून झपाझप पुढे निघून गेलो. नंतर मात्र मन खात राहिले. बिच्चारी खरच उपाशी असेल का? पैशाचा प्रश्न नव्हता. अनेक कल्पना मनात आल्या. हिने आपल्याला फसवून कात्रीत पकडून लुबाडले तर? ही नंतर जाऊन आपल्या गंगला जाऊन सांगेन, “क्या बकरा मिला आज. मला राईस प्लेट खायला घालत होता...”
आणि हा पण एक किस्सा.
रस्त्यात एक गावाकडचा एक माणूस भेटतो. रस्त्याच्या कडेला एक बाई आणि दोन मुल उकिडवी बसून मुरमुरे खात बसलेले असतात. तो बाप्या जवळ येऊन आपली सॉब स्टोरी सांगतो.
“साहेब अडचणीत आहे. गावी जायचे आहे. पण खिशात एस टी च्या भाड्याला दमडी पण नाही. कोर्टाच्या कामासाठी पुण्याला आलो होतो. तिथेच कोणीतरी पाकीट मारले. काय करू. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. लाज वाटतेय...”
एकदा मी मदत केली होती. पण काही दिवसांनी असाच एक गाववाला भेटला. जवळ जवळ सेम स्टोरी.
माझ्या मायबोलीकर मित्रानो अशा वेळी काय करावे काही समजत नाही. एका बाजूला मदत करायची इच्छा असते. तर दुसऱ्या बाजूला आपण चेहऱ्यावरून एव्हढे बावळट दिसतो का की सगळ्यांना सोडून हे भामटे आपल्यालाच पकडतात.
तर अश्या प्रसंगाला कस सामोर जायचं? ह्या बद्दल आपले विचार वाचायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीक मागणे हा व्यवसाय झाला आहे. अनेक क्लृप्त्या ही लोक करतात भीक मागण्यासाठी.
मग फॅमिली बरोबर ठेवायची गावी जायला पैसे नाहित असे सांगायचे..
फाटकी कपडे घालायची आणि भूक लागली आहे असे सांगायचे.
रिॲलिटी ही आहे ग्रामीण भागात शेत मजूर मिळत नाहीत.
खूप मोठा रोजगार आहे जो पोट भर जेवण आणि राहण्यास निवारा पण देवू शकतो.
पण असे काही न करता मोठ्या शहरात भीक मागणे ही वृत्ती आहे.
ह्या लबाड लोकांच्या दुनियेत काही लोकांस खरेच गरज असते.
त्यांस खरेच अडचण असते .
पण अशी लोक कशी ओळखणार.
गरजू व्यक्ती ल मदत करणे हे चांगलेच.

Pages