भानामती विठूची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 January, 2023 - 23:44

माझ्या देवापाशी मज
राहू देईना भानामती
काम, क्रोध, लोभ, मद
मोह, मत्सराची साडेसाती

मज पाहून एकला
असे असे छळताती
श्वासा भारता विठ्ठल
दूर देशी पळताती

विठू हसत हसत
माझी मजाच पाहतो
देवा कशापाई असा
खेळ मायेचा खेळतो

वह्या तुक्याच्या डोहात
तूच की रे बुडविल्या
तुक्या ढळेना म्हणूनी
तूच की रे तारिल्या

माझी पाहतो‌ परीक्षा
पास मीही होईल
तुझ्या नावाचाच गंडा
जन्मोजन्मी बांधीन
जन्मोजन्मी बांधीन

© दत्तात्रय साळुंके
१४-०१-२०२३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी पाहतो‌ परीक्षा
पास मीही होईल
तुझ्या नावाचाच गंडा
जन्मांतरीही बांधीन
जन्मांतरीही बांधीन>>> Happy
कविता आवडली.

देवा कशापाई असा
खेळ मायेचा खेळतो
विठोबा जसा ठेवेल तस राहायचं.

>>>>देवा कशापाई असा
खेळ मायेचा खेळतो>>>

जरा तुझं ध्यान करायला लागलो की मनात विषयवासना जागतात आणि मी तुझ्या पासून दूर जातो. हा मायेचा खेळ थांबव. या अर्थाने लिहिलंय...तसा पांडुरंग एकमेव आहे. ज्याकडं काही मागितलं जात नाही.

केशवजी खूप धन्यवाद

कुमार १
सामो
हीरा
हाडळीचा आंशिक
अस्मिता
अज्ञातवासी

अनेकानेक धन्यवाद

सुंदर!

विषेशतः शेवटचे कडवे फारच आवडले! एकदम पॉझिटिव्ह! तु कितीही परिक्षा घे विठ्ठला, मी पास होईनच! क्या बात!

आंबा
Nikhil
निकु
रूपालीताई

अनेक धन्यवाद