पुस्तक परिचय : Are You Posture Perfect?

Submitted by शैलपुत्री on 6 January, 2023 - 05:50

खरं तर गेली वर्षभर, मी दुखण्यामुळे घरातच नैराश्याच्या गर्तेत अडकून पडले होते. ज्या डॉक्टरांनी (डॉ. विनायक देंडगे, पुणे) मला या सगळ्यातून बाहेर काढले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी आणि डॉ. राजश्री लाड यांनी लिहिलेल्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

या धाग्याच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात मी माझा स्वानुभव आणि उरलेल्या अर्ध्या भागात पुस्तक परिचय मांडलेला आहे. कारण त्याशिवाय माझी हा धागा लिहिण्यामागे असलेली कळकळ तुम्हांपर्यंत पोचू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. असो.

साधारण वर्षभरापुर्वी माझी दोन्ही पायांची Knock knee (Genu Valgum) ची सर्जरी झाली होती. सर्जरी तर व्यवस्थित पार पडली पण नंतर घ्यावयाची काळजी माझ्याकडून घेतली गेली नाही. तसेच अतिशय घनघोर अज्ञानामुळेच माझी बसण्याची, झोपण्याची, चालण्याची, उभे राहण्याची पद्धत अतिशय चुकीच्या पद्धतीने विकसित झाली. आणि नंतर शरीराला तशीच सवय लागून गेली. सर्जरी झाल्यावर काही दिवसांनी मी चालायला सुरुवात केली होती. पण नंतर नंतर मी लंगडायला लागले. हळू हळू लंगडण्याचे प्रमाण जास्तच वाढले. चालताना दहा पंधरा पावले टाकली की पाय प्रचंड दुखायला सुरुवात व्हायची. अगदी दोन मिनिटे जरी उभी राहीले तरी डाव्या पायावर
सगळा भार दिला जाऊन तो दुखायला सुरुवात व्हायची. कारण व्यवस्थित उभे राहणंच मी विसरले होते. रात्री झोप लागल्यावर पाठ प्रचंड दुखायची. कारण मी योग्य रीतीने झोपत नव्हते. हळू हळू खुब्याची ठेवण बदलून तो तिरका झाला कारण मी चुकीच्या पद्धतीने बसत होते.

आणि या सगळ्याचा परिणाम हा की मी वर्षभर घरात बसून राहीले आणि नैराश्याच्या तीव्र गर्तेत गेले. मी माझी स्थिती सुधारण्यासाठी फिजिओथेरपी तसेच अन्य उपचार घेतले नाहीत असं नाही. पण फरक पडला नाहीच. मी रोज देवाला प्रार्थना करत होते की बाबा रे या सगळ्यातून मला लवकर बाहेर काढ. मला माझं पूर्वीचं स्वावलंबी आयुष्य परत दे, ते ही लवकरात लवकर. अक्षरशः रोज नको नको ते विचार मनात यायला लागले होते.

आणि मग एक दिवस यूट्यूब स्वामी आणि गूगल महाराजांच्या कृपाशीर्वादाने मला कायरोप्रॅक्टीक (Chiropractic) ट्रीटमेंट बद्दल कळलं. मी त्याचे बरेच व्हिडिओज पाहिले आणि मग पुण्यातल्या (Chiropractor) चा शोध घेण्यासाठी परत एकदा गूगल महाराजांना नवस केला. आणि गूगल महाराज अतिशय prompt असल्यामुळे त्यांनी लगेचंच खूप साऱ्या डॉक्टरांची यादी माझ्या झोळीत टाकली. आणि अर्थातच कर्म धर्म संयोगानेच म्हणा, मी डॉ. विनायक देंडगे सरांची अपॉईंटमेंट घेतली.

सुरुवातीच्या दोन मिनिटांच्या निरीक्षणातच त्यांच्या लगेच लक्षात आलं की हा सगळा घोळ फक्त माझ्या चुकीच्या बसण्याउठण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीमुळे झालेला आहे. त्यांनी मला संपुर्णपणे आश्वस्त केलं आणि एकूण बारा दिवसांची ट्रीटमेंट सुचवली. कारण माझं दुखणं बरंच मोठे होतं. त्यामुळे मला पहिल्या चार दिवसांत काहीच फरक जाणवला नाही. पण नंतर नंतर झपाट्याने फरक जाणवू लागला. त्यांनी मला कशा पद्धतीने बसलं पाहीजे, उभे राहीलं पाहीजे, चाललं पाहिजे, आणि झोपलं पाहीजे हे सगळं शिकवलं. आपण आपल्या शरीराची ठेवण चुकीच्या पद्धतीने राखल्यामुळे कितीतरी आजार होतात हे मला आयुष्यात पहिल्यांत कळलं. बारा दिवसांनंतर मी आता रोज एकटी घराबाहेर पडते आणि अर्थात कामावर सुद्धा रुजू झाले आहे.

आता येऊ या मुख्य विषयावर. डॉ. विनायक देंडगे, पुणे आणि त्यांच्या सहकारी डॉ. राजश्री लाड, मुंबई यांनी इंग्रजीमध्ये "Are You Posture Perfect?" हे अतिशय महत्त्वाचे पुस्तक लिहीले आहे. मराठी अनुवादाचे काम जलदगतीने सुरू आहे. १०७ पानांच्या या छोट्याश्या पुस्तकाचा उद्देश अर्थात लोकांना वेदनांपासून वाचवणे आणि असलेल्या वेदना कमी करणे हाच आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे. प्रस्तावना डॉ. विनायक सरांचे गुरू डॉ. नरकीश अरुमुगम यांनी लिहिली आहे. पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये सर्वसाधारण खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे -

१. "शरीराची ठेवण" म्हणजे काय असते?
२. जीवनशैलीचा आपल्या शरीराच्या ठेवणीवर कसा परिणाम होतो?
३. योग्य ठेवण चुकीची ठेवण तसेच त्यांचे फायदे/तोटे, आणि त्याच अनुषंगाने जडणाऱ्या पाठीच्या, मानेच्या, कंबरेच्या, गुढग्यांच्या, आणि अशाच तत्सम व्याधी.
४. चुकीची ठेवण आणि वेदनेचा संबंध.
५. वेदना सुरु झाल्यानंतर सर्वप्रथम काय पावले उचलली पाहीजेत.
६. शरीराच्या वेगवेगळ्या स्थितीमधील, जसे की उभे राहताना, बसताना खाली वाकताना अवलंबल्या जाणार्या योग्य तसेच चुकीच्या पद्धतींची छायाचित्रांसहीत विस्तृत माहिती.
७. रोज करावयाच्या व्यायामांची छायाचित्रांसहीत माहीती.

हे पुस्तक किंडलला उपलब्ध आहे.

पेपरपॅक हवे असेल तर,

Amazon prime ची लिंक -
https://amzn.eu/d/cqvzbnU

Flipkart ची लिंक -
https://dl.flipkart.com/s/M35quINNNN

Kobo ची लिंक -
https://www.kobo.com/in/en/ebook/are-you-posture-perfect?utm_source=goog...

या विषयावर अजूनही सर्वसामान्य लोकांची म्हणावी तशी जागृती झालेली नाही. जर याबाबत जागरुकता वाढली तर आपण सर्वांच्या हॉस्पिटल्सच्या खेपा कमी होतील हे निश्चित.

आणि हो शेवटचं एक, जर कधी भविष्यात तुमची, आणि डॉ. विनायक देंडगे यांची भेट झाली तर या धाग्याचा किंवा आयडीचा संदर्भ दयायला विसरू नका, कारण माझी कृतज्ञता त्यांच्यापर्यंत कितीही मार्गांनी पोहोचली तरी कमीच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुखण्यातून बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन. >> धन्यवाद वावे.

बसण्याची, उभं राहण्याची, चालण्याची पद्धत योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. >> हो. हे खरं आहे.

दुखण्यातून बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन आणि हा परिचय इथे लिहिल्याबद्दल आभार.
तुम्हांला होत असलेल्या त्रासाचं वर्णन वाचत असताना आणि शीर्षकावरून Chiropractor बद्दल लिहिलं असेल असं वाटत राहिलं.
मी कोणे एके काळी Chiropractor चा शोध घेतला होता आणि तेव्हा तरी कोणी मिळाला नव्हता. आताही ज्याची माहिती मिळाली आहे तो नवी मुंबईत आहे.
त्यांनी तुम्हांला फक्त पोस्चर्स शिकवली की आणखीही काही ट्रीटमेंट दिली? मी जी ट्रीटमेंट ऐकली ती घाबरवणारी वाटली. अर्थात त्याने फरक पडलेला ही कळला.
पुस्तक घेतोय.

वाह!!! तुमचा प्रवास इथे मांडल्याबद्दल खूप आभार. पोश्चर बद्दल काहीच सजगता नाही. फक्त ताठ बसायचे एवढेच माहीत आहे.

दुखण्यातून बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन. >> धन्यवाद.

त्यांनी तुम्हांला फक्त पोस्चर्स शिकवली की आणखीही काही ट्रीटमेंट दिली? >> त्यांनी मला या osteopathy, chiropractic, physiotherapy, matrix therapy आणि अजून बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स दिल्या. माझ्या वडिलांना पाठीच्या दुखण्याकरिता cupping therapy पण दिली. प्रत्येक पेशंटच्या दुखण्यानुसार संपूर्ण वेगळी ट्रीटमेंट आखली जाते.

मी जी ट्रीटमेंट ऐकली ती घाबरवणारी वाटली >> खरं तर तशी ती अजिबात नसते. मी पण सोमी वर व्हिडिओज पाहून आधी घाबरले होते. पण अलाईन्मेंट करताना मोठा आवाज येतो तसे दुखत मात्र नाही. आपल्याला बोटे मोडायची सवय असते ना तसेच. आणि पूर्ण ट्रीटमेंट मध्ये तसं फक्त एकदा, फार फार तर दोनदा केलं जातं, गरजेनुसार.

पुस्तक घेतोय. >> नक्की घ्या. मी बऱ्याच जणांना भेट दिली आहे.

दुखण्यातून बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन आणि हा परिचय इथे लिहिल्याबद्दल आभार. + 1.
पुस्तक वाचेन नक्की. >> धन्यवाद मानव Happy