लेख वाचायचा आळस असेल तर आधी विडिओ बघू शकता,
विडिओ लिंक - Incredible INDIA - I AM A SOLDIER BORN TO DIE..! !!
पण विडिओची खरी मजा नंतरच. जेणेकरून दर्दी वाचकांना पुस्तकाची मजा चित्रपटात नाही, तसे लेखाची मजा विडिओत नाही असे मत मांडता येते 
तर गोष्ट तशी जुनीच आहे. साधारण तीन वर्षांपूर्वीची. कोविडकाळाच्याही आधीची. जेव्हा आमचे कन्यारत्न मोठ्या शिशुवर्गात होते.
अॅन्युअल फंकशन म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की थेट "पापा कहते हैs बडा नाम करेगाss" आठवणारी आपली एटीज आणि नाईनटीजची पिढी. आता स्वतः पापा आणि मम्मी बनून आपल्या मुलांच्या अॅन्युअल फंक्शनला हजेरी लाऊ लागले आहेत. आताची जनरेशन मुळातच स्मार्ट, तरी आपल्या वंशाचे पणती आणि दिवे आपले काय नाव करते याची हुरहूर कायम असतेच.
यात कधी मनासारखे होते, तर कधी नाही. तर मग कधी हे असे होते....
साधारण महिनाभर रोज नाचाची प्रॅक्टीस करून झाल्यावर एके दिवशी अचानक कळते की तुमच्या मुलीचे नाव नाचातून वगळले आहे. तुम्हाला ऐकताच धक्का बसतो. कारण आपली पोरगी बॉर्न डान्सर वगैरे आहे असे तुम्हाला ऊगाचच वाटत असते. एक रात्र याच टेंशनमध्ये जाते. असे का केले असावे? जाब विचारावा का? लेकीच्या हक्कासाठी भांडावे का? असे म्हणत तुमच्यातला टिपिकल बंडखोर पालक जागा होऊ लागतो.
पण मग दुसर्या दिवशी कळते की नाचातून वगळून लेकीला निवेदनाला म्हणजेच ॲंकरींगला टाकले आहे. कारण पोरीत बोलीबच्चन हा देखील एक गुण(!) आहे. मग मात्र तुम्हाला आनंद होतो, चला पोरगी ईथे जास्त चमकेल.
आता नाचाऐवजी त्या संवादांची प्रॅक्टीस सुरू होते. चौघांचे मिळून स्किट असते त्यामुळे तुम्हालाही एकेक कॉपी हातात धरून प्रॅक्टीसमध्ये सहभागी व्हावे लागते. आधीच दिवस कमी राहिले असतात. त्यात ती लंबीचौडी स्क्रिप्ट पाहून ही आपल्यालाच पाठ होणार नाही, तर आपल्या लहानग्या नातीला कसे जमणार हा प्रश्न आज्जीला पडलेला असतो. एकूण घरभर आबालवृद्धांत वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागले असतात.
बघता बघता ॲन्युअल फंक्शनला फक्त साडेतीन दिवस शिल्लक राहतात आणि तुमच्यावर अजून एक बाँम्ब येऊन पडतो.
दुसरा एक मुलगा जो एक पोएम बोलणार असतो. तो ऐनवेळी कच खातो. ती पाठ होत नाही म्हणून माघार घेतो. पोएम थोडी मोठी असते, थोडी डिफिकल्ट असते. पण ती पोएम म्हणजे ॲन्युअल फंक्शनच्या स्क्रिप्टचा क्लायमॅक्स असते. "Incredible India" या थीमचा आत्मा असते. आता ही वाढीव जबाबदारी कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर कोणाच्या नाजूक खांद्यावर टाकायची हा स्कूल मॅनेजमेंटला प्रश्न पडतो.
आतापर्यंतची सर्व तयारी ऊत्तम झालेली असते. टीचर्सना स्टेजवर यायची गरज पडणार नाही, साधे विंगमध्येही प्रॉम्प्ट करायला उभे राहावे लागणार नाही, ईतकी परफेक्ट झाली असते. त्यामुळे आता थोडक्यासाठी गालबोट लागलेले शाळेलाही नको असते. आणि मग पुन्हा तुमच्या बोलबच्चन मुलीवरच विश्वास ठेवला जातो...
शाळेतून निरोप येतो. दोन दिवसात ही पोएम पोरीकडून घरी पाठ करून घ्या. आम्हीही आमच्या परीने शाळेत तिची प्रॅक्टीस घेतोच. पण तुमचे सहकार्य अपेक्षित.
शाळेने दोन दिवस दिलेले असतात. पण तुमची मुलगी ती पोएम एका दिवसात, आय मीन एका रात्रीत पाठ करते. प्रिन्सिपल मॅडमचा जीव भांड्यात पडतो. त्यांनी केलेल्या कौतुकाचे मेसेज आणि पोरीचा शाळेतील प्रॅक्टीसचा विडिओ तुमच्या व्हॉटसपवर येतो. तुम्हाला प्राऊड पॅरेंट फिलींग येते. जणू तुमची मुलगी आधीच स्टार झाली असते. पण स्टेजवरचा फायनल परफॉर्मन्स अजून शिल्लक असतो!!
ॲन्युअल फंक्शनच्या दिवशी तुम्ही ऑफिसला सुट्टी टाकता. पण तरीही भल्या पहाटे उठता. आंघोळ वगैरे ऊरकून, टापटीप कपडे घालून, आणि तरीही सर्वांच्या आधी पोहोचून, हॉलच्या प्रवेशद्वाराशी पहिल्याच क्रमांकावर शिस्तीत ऊभे राहता. हॉलचे दरवाजे उघडताच पहिल्या रांगेतील सेंटरस्टेज खुर्ची पटकावता. आणि काय योगायोग, विंगेत टिवल्याबावल्या करत बसलेली तुमची पोरगी तुमच्या नजरेस पडते. ती कूल असते. तुम्हीच नर्वस असता!
पहिला गणेशपूजनाचा मोरया मोरया गाण्यावरचा नाच होतो आणि तुमची लाडकी ॲंकर आपल्या फ्रेण्डससोबत स्टेजवर एंट्री मारते. तुम्ही तिचे चुरचुरीत संवाद ठसकेबाज आवाजात ऐकता आणि आता तुम्हालाही कॉन्फिडन्स येतो.
पुढचा सारा कार्यक्रम याच कॉन्फिडन्समध्ये पार पडतो. मुलगी शेकडो लोकांसमोर स्टेजवर परफॉर्म करतेय. मुलगी ईंग्रजी बोलतेय. हेच तुम्हाला मंत्रमुग्ध करायला पुरेसे असते. पण तरीही, दर दोन नाचांच्यामध्ये ॲंकरींगला स्टेजवर आल्याआल्या आपला माईक आपणच ॲडजस्ट करणे, थोडी सोबतच्या फ्रेंडसनाही मदत करणे, बोलताना योग्य ते हातवारे करणे, एखादा डायलॉग ठसक्यात बोलून त्याची पंचलाईन बनवणे, स्टेज आपल्याच बापाचा असल्याप्रमाणे वावरणे... तिच्या व्यक्तीमत्वाचे काही पैलू तुम्हालाही नव्यानेच समजतात.
..आणि मग अखेरीस कार्यक्रम क्लायमॅक्सला पोहोचतो.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. असे मनातल्या मनात म्हणून तुम्ही खुर्चीत कॅमेरा सरसावून बसता. पण आता ती शेवटची पोएमसुद्धा चांगलेच परफॉर्म करणार याची तुम्हाला मनोमन खात्री असते.
आणि तसेच होतेही.. तरीही पहिल्याच वाक्याला सुरू झालेला टाळ्यांचा कडकडाट आणि शेवटाला पोहोचताना मिळालेली वन्समोअरची दाद तुम्हाला विशेष सुखावते.
पण ही अनुभुती एवढ्यावरच थांबत नाही.. संध्याकाळी तुम्हाला तिच्या टीचरचा फोन येतो. त्यांच्याकडून समजते की ईतर पॅरेंटसचे त्यांना मेसेज येत आहेत, ती पोरगी कोण होती? तिच्याकडून तुम्ही हे कसे करून घेतले, अश्या चौकश्या होत आहेत. शाळेतल्या काही टीचर्सनादेखील तिच्या या ऐनवेळच्या तयारीची कल्पना नसते. त्या देखील आश्चर्याने थक्क होतात. तुमच्यासाठी नेहमीच स्टार असलेली तुमची पोरगी आता ईतरांसाठीही स्टार झाली असते. आणि आता स्टार परफॉर्मरचे पॅरेंटस या नात्याने तुम्हीही चमकले असता.
स्टेज फिअर वगैरे सर्व अंधश्रद्धा आहेत. स्टेज पॉवर हे फॅक्ट आहे. स्टेज तुम्हाला जास्तीत जास्त लोकांसमोर चमकायची संधी देत असते. हे तुम्हाला तुमचीच पोरगी नव्याने शिकवते.
ते म्हणतात ना, सुख सुख म्हणजे आणखी काय असते..
तर ते हेच असते! आणि आता हे तुम्हाला पुढचे कित्येक दिवस, कित्येक वर्षे पुरणार असते 
विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=ZyGHr8E8IHE
पोएम पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष 
if i die in a war zone,
if i die in a war zone,
box me up and send me home.
Put my medals on my chest,
Tell my mom i did my best.
Tell my father not to bow,
he won't get tension from me now.
Tell my brother to study perfectly,
keys of my bike will be his permanently.
Tell my sis not to be upset,
Her bro will not rise after this sunset,
Tell my nation not to Cry...
'BECAUSE I AM A SOLDIER BORN TO DIE....! ! !
- (vishal angel sharma हे नाव गूगाळल्यावर सापडले, पण खात्री नाही)
ते म्हणतात ना, सुख सुख म्हणजे
ते म्हणतात ना, सुख सुख म्हणजे आणखी काय असते..
तर ते हेच असते! आणि आता हे तुम्हाला पुढचे कित्येक दिवस, कित्येक वर्षे पुरणार असते >>+११११... हे क्षण मी सुद्धा बऱ्याच वेळा अनुभवले आहेत. अगदी अगदी असंच वाटतं.
Proud of you Pari!!! Lots of love...
मस्त!!! परीला खूप शुभेच्छा.
मस्त!!! परीला खूप शुभेच्छा.
मस्त. परी खरंच स्टार
मस्त. परी खरंच स्टार परफॉर्मर आहे. तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खूप छान परी. :टाळ्या:
खूप छान परी. :टाळ्या:
कौतुक आणि शुभेच्छा !
खूप छान परी!!! परीला खूप
खूप छान परी!!! परीला खूप शुभेच्छा.
शैलपुत्री, सामो, निल्सन,
शैलपुत्री, सामो, निल्सन, वर्णिता, शर्मिला... धन्यवाद
अप्रतिम !!! परी ला खूप खूप
अप्रतिम !!! परी ला खूप खूप शुभेच्छा
परीचं खूप कौतुक व शुभेच्छा!
परीचं खूप कौतुक व शुभेच्छा!
धन्यवाद सामा आणि मंजूताई
धन्यवाद सामा आणि मंजूताई
अतिशय उत्तम सूत्रसंचालन परीच.
अतिशय उत्तम सूत्रसंचालन परीच. फारच धीट आहे। परी ला खूप खूप शुभेच्छा.
ओढणी पडली म्हणून धावत मागे आली हा हा हा हा हा हा MAJJACH .
खुप कौतुक परीचं. धीट,
खुप कौतुक परीचं. धीट, चुणचुणीत आहे छोकरी तुझी. तू लिहीलंयस पण छान.
अजनबी, धनुडी धन्यवाद
अजनबी, धनुडी धन्यवाद
ओढणी पडली म्हणून धावत मागे आली हा हा हा हा हा हा MAJJACH .
>>.
हो, विडिओ युट्युबला टाकल्याने काल घरीही बघणे झाले. तेव्हा या सीनचीच चर्चा होती
धीट, चुणचुणीत आहे छोकरी तुझी.
>>>
ह्ममम.. हा एक गुण माझ्याकडून घेतलाय हे बरं
मस्त. अगदी आत्मविश्वासाने
मस्त. अगदी आत्मविश्वासाने बोलली. खूप शुभेच्छा परीला.
त्या चौघांची स्टेजवर जी काही बालसुलभ गडबड चालू होती ती पाहायला पण मजा आली
छान. मस्त आहे परी. खरोखरीच
छान. मस्त आहे परी. खरोखरीच धीट आणी चुणचुणीत. तीला माझ्याकडून शाबासकी आणी खूप शुभेच्छा.
फारच धिटुकली आहे तुमची परी !
फारच धिटुकली आहे तुमची परी ! गोड गोड !
अतिशय सुंदर परफॉर्मन्स..! मला
अतिशय सुंदर परफॉर्मन्स..! मला आवडते तुमची परी. फार गोड आहे.
परीचे खुप खुप कौतुक आणि शुभेच्छा..!
अरे वा. गोड बोललीये अगदी.
अरे वा. गोड बोललीये अगदी. खणखणीत. अभिनय शाळेत घालायला हरकत नाही.
धन्यवाद रमड, ssj, ट्युलिप,
धन्यवाद रमड, ssj, ट्युलिप, दियू, सुनिधी
अभिनय शाळेत घालायला हरकत नाही. >>>>> अच्छा, अश्या शाळेबद्दल कल्पना नाही. सगळे गुण थोडे थोडे दाखवते त्यामुळे कळत नाही कश्यासाठी जास्त प्रोत्साहन द्यावे. पण हा पर्यायही चाचपून बघायला हरकत नाही. शेवटी तिच्याच आवडीवर आहे.
खूपच छान सादरीकरण चौघाही
खूपच छान सादरीकरण चौघाही मुलांकडून आणि खास परीकडून. तिचा मंचावरचा वावर खूप सहज आणि आत्मविश्वास पूर्ण होता. मंचभय अजिबात नव्हते. शिवाय सोबत्यांना सांभाळून घेण्याचा दिलदारपणासुद्धा आवडला. गुणी आहे पोरगी.
सुंदर परफॉर्मन्स. खूप
सुंदर परफॉर्मन्स. खूप confident आहे परी. तिला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद हीरा, मनीम्याऊ
धन्यवाद हीरा, मनीम्याऊ
मंचभय मस्त शब्द आहे.
असा शब्द वापरात आहे की स्टेज फीअरचे शब्दश: भाषांतर केले आहे. कारण मी सभाधीटपणा हाच शब्द ऐकला आहे.
सभाधीट असणे म्हणजे मंचभय नसणे
सभाधीट असणे म्हणजे मंचभय नसणे .
मंचभय म्हणजे सभाधीट नव्हे किंवा सभाधीटपणाही नव्हे.
हे दोन्ही शब्द विरुद्ध अर्थी आहेत.
अरे हो की
अरे हो की

पण मला तेच म्हणायचे होते की ज्याला मंचाचे भय नाही त्याला सभाधीट असे म्हटले जाते. मंचभय हा शब्द कोणाला फार वापरताना ऐकला नव्हता ईतकेच. असो. नोंदवून ठेवतो
जबरदस्त पर्फॅामन्स.. खणखणीत
जबरदस्त पर्फॅामन्स.. खणखणीत आवाज, बोलतानाचे हातवारे, चुरचुरीत बोलणं..सगळंच मस्त.. परीचं करावं तितकं कौतुक कमीच आहे..
पोरगी नक्कीच आईवर गेलीए
परीचे खूप अभिनंदन आणि
परीचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!
धन्यवाद म्हाळसा आणि रुपाली
धन्यवाद म्हाळसा आणि रुपाली
पोरगी नक्कीच आईवर गेलीए >>> हे असले टोमणे तिच्या लहानपणापासून झेलतोय मी
.. तरीही धन्यवाद !
अतिशय छान परफॉर्मन्स......
अतिशय छान परफॉर्मन्स...... परी फार गोड आहे.
परीचे खुप खुप कौतुक आणि शुभेच्छा..!
खूप छान सादरीकरण केले आहे.
खूप छान सादरीकरण केले आहे.
परीचे कौतुक व तिच्या मित्रमैत्रिणींनाही शाबासकी.
मी परीला गंमत वाटावी म्हणून यूट्यूब व्हिडिओ वर कमेंट केली होती. पण आता दिसत नाहीये.
सामी, धन्यवाद
सामी, धन्यवाद
अस्मिता, अच्छा... मी पाहिलेली बहुधा ती कॉमेंट आणि दुसरीच अस्मिता समजलेलो

येनीवेज, कॉमेंट डिसेबलच दाखवत होते. मी चेक केले आता. तर त्या युट्यूबवाल्यांनी स्वत:च हा विडिओ मेड फॉर किड्स ठरवून कॉमेंट डिसेबल केल्या होत्या. मी सेटींग बदलली. आता दिसेल बहुधा.. दाखवतो परीलाही कॉमेंट.. आणि ईथल्याही दाखवतो. तसेही या वर्षी फंक्शन नाहीये. तर तेवढेच समाधान
Pages