अभियांत्रिकी शिक्षण आता मातृभाषेत..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2022 - 13:27

अभियांत्रिकी शिक्षण आता मातृभाषेत..
देर आये, दुरुस्त आये!

गृहमंत्री अमित शहा यांनी एमबीबीएससाठी वैद्यकीय पाठ्यपुस्तके हिंदीमध्ये लाँच केल्याने आता सर्वच राज्यांनी एकामागून एक, त्यांच्या प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षण देण्याच्या योजना सुरु केल्या आहेत.

आपला महाराष्ट्रही यात मागे नाही. नुकतेच १४ नोव्हेंबरला अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तकांचा पहिला संच प्रकाशित झाला आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मराठी भाषेत भाषांतरित केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या नऊ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ११ पाठ्यपुस्तकांचे वितरण मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आले.

बातमी ऐकून माझी पहिली प्रतिक्रिया होती, अरे वाह मस्तच!

कारण, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे.
तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. तर ऊच्चशिक्षण तरी का त्यापासून वंचित राहावे.

फक्त आता आधीपासूनच सुरू असलेल्या ईंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात हा मराठी अभ्यासक्रम कसा सामावून घेतला जाईल हा प्रश्न पडला आहे.
तसेच मराठीत शिकलेल्या मुलांना पुढे करीअरबाबत तितक्याच संधी उपलब्ध असतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

याबाबतच्या घडामोडी शेअर करायला, आणि नेमके आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? यावर चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख खान कोणत्या माध्यमातून शिकला ? दिल्लीच्या फर्डा इंग्लीष कॉन्वेन्ट मधून शिकलाय. मग आपण मातृभाषेतल्या शिक्षणाला समर्थन कसे देऊ शकतो. शाहरूखच नाही तर त्याचे नाना (आईचे वडील) इफ्तिकार अहमद हे सुद्धा ऑक्सफर्ड मधे शिकले आहेत. ते त्या काळी चीफ इंजिनियर या पदावर मेंगलोर इथे होते. शाहरूख खान जन्मानंतर पाच वर्षे त्यांच्याकडेच होता. तिथे तो इंग्रजी, आणि उर्दू शिकला. चीफ इंजिनीयर ही पोस्ट त्या काळी खूपच महत्वाची होती. कलेक्टरचे अनेक अधिकार चीफ इंजिनियरकडे असायचे.
Capture-10.pngCapture-8.png
त्याचे वडील पेशावर इथे कॉन्वेन्ट मधे शिकले. घरी ते उर्दू बोलत. आईकडे घरी हिंदको (कश्मीरी) बोलत. पण त्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकल्या. त्याचे वडील १९४८ साली भारतात आले. पण बाकी कुटुंब आजही पेशावर इथेच आहे. ते सर्व सधन आहेत. त्याचे चुलत चुलत नातेवाईक अफगाणिस्तानात आहेत. ते ही इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यातले सर्वच जण हे इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत. शाहरूखची मुलंही मुंबईच्या महागड्या कॉन्व्हेन्ट स्कूल मधे शिकतात.

वडील इंडियन नॅशनल काँग्रेसमधे होते. तरूण असताना खुदाई खिदमतगार मधे काही दिवस होते. तर त्याचे काका इंडीयन आर्मीत मेजर होते. ते ही इंग्रजी माध्यमातून शिकले.
image.png

खूप संघर्षातून पुढे आल्याने आणि त्यामुळे आयडॉल असलेल्या शाहरूखची ही पार्श्वभूमी असेल तर आता आपण या निर्णयाचे स्वागत कसे करावे ?

<‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे.
तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. >
म्हणजे आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घातलं असेल किंवा घालणार असाल . अभिनंदन.

आता आधीपासूनच सुरू असलेल्या ईंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात हा मराठी अभ्यासक्रम कसा सामावून घेतला जाईल हा प्रश्न पडला आहे.
तसेच मराठीत शिकलेल्या मुलांना पुढे करीअरबाबत तितक्याच संधी उपलब्ध असतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. >> सहमत. मला वाटतं की ह्याकडे अभ्यासक्रम म्हणून बघण्यापेक्षा पूरक वाचन म्हणून बघावं. अभियांत्रिकी व्यवसायात सध्या तरी इंग्रजीला पर्याय नाही. परंतु ते शिकताना इंग्रजीतील काही गोष्टी नीट समजत नसतील तर मराठी समजायला सोपं जावं अशी अपेक्षा आहे, तेवढ्यापुरता उपयोग होईल. मराठीकरण करताना फक्त वाक्ये मराठी लिहून मूळ इंग्रजी संज्ञा तश्याच ठेवल्या तर बरं. उगीच पर्यायी अतिक्लिष्ट संस्कृतोद्भव संज्ञा तयार करून पोरांचा गोंधळ वाढवू नये.

अस केल कि खूप मज्जाच मज्जा येईल. ISRO मध्ये मराठी इंजिनिअर मराठीत, तमिळ इंजिनिअर तमिळ मध्ये... इत्यादी रॉकेट म्हणेल. "माताय! कुठल्या तरी एका भाषेत बोला."
आता मी ऐकल कि एमबीबीएस पण हिंदीत करता येईल.
मी आधीच माझे शिक्षण संपवले. सुटलो ह्यांच्या तावडीतून.
माझ्या मते टपोरी भाषा सगळ्यांना समजते नि आवडते पण. अभ्यासक्रम त्यातून शिकवावा. मधूनच च्यायला मायाला असे शब्द टाकावेत म्हणजे म्हणजे मुलांना अगदी मातृभाषेेत चांगले समजेल.
एका "माणसाला" इंग्रजी येत नाही म्हणून सर्व देशाला इंग्रजीशी फारकत घेण्याचा खटाटोप.

१) मातृ भाषेत शिक्षण मिळाले तर ते उत्तम समजते.
हा पॉइंट योग्य आहे.
स्किल पण उत्तम रीत्या आत्मसात केले जाते.

२) पण अभियांत्रिकी शिक्षण मराठी मध्ये घेवून जॉब दुसऱ्या राज्यात किंवा विदेशात करताना अडचणी येतात
३) सर्वांना चांगले माहीत आहे प्राथमिक शिक्षण आणि पुढचे उच्च माध्यमिक शिक्षा करिअर मध्ये काहीच कामाचे नसते.
आणि कॉन्व्हेन्ट मध्ये शिकला आहे म्हणून मेडिकल ल प्रवेश मिळेल आणि मराठी mediam मध्ये शिकला म्हणून मिळणार नाही.
अस काही नसते.
यशस्वी होणे हे त्या वर अवलंबून नसते.

मग तुम्ही प्राथमिक शिक्षण कॉन्व्हेन्ट मध्ये घ्या किंवा मराठी mediam मध्ये.
काही फरक नसतो .
भाषा च आत्मसात करायची असेल तर ती कधी ही आत्मसात करता येते.

मराठी म्हणजे बोलीभाषा मराठी प्रकारे पुस्तक नसणार,रोजच्या भाषेत नसणारे अतिउच्च मराठी शब्द असणार, त्यापेक्षा इंग्लिश परवडली असं होईल विद्यार्थ्यांना

नाहीतरी हल्लीचे प्रोफेसर तरी कुठे इंग्रजीत शिकवताहेत.
"पिस्टनच्या मागचे प्रेशर वाढले कि ते पिस्टनला पुश करते..." इत्यादी.

इंजिनिअरिंग, मेडिकल मधले कितीतरी शब्द असे निघतील की मराठी/हिंदी पेक्षा इंग्रजीत बरे समजतील. बँकेचे फॉर्म किंवा स्लीपस् बघा.
आताच शिक्षणाची सुरूवात करणार्या मुलांसाठी चांगलं आहे. पण ऑलरेडी पाण्यात उतरलेल्यांसाठी फार उपयोगाचे नाही.त्यापेक्षा प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यास जास्त चांगलं होईल. जसं आमच्या वेळेस झालं.

योग्य नियोजन आणि प्रामाणिक हेतू असेल तर च परिणाम चांगले येतील.
राजकीय स्टंट असेल तर शिक्षणाचा खेलखंडोबा हे aadani,मूर्ख सत्ता धारी करत आहेत असेच म्हणावे लागेल.
शिक्षण विषयी कोणताही निर्णय हा दूरदृष्टी ठेवूनच घेतला गेला पाहिजे.
हे निर्णय च धोरणात्मक असावे लागतात.
पाया पासून कळसा पर्यंत सर्व ठिकाणी बदल करावा लागतो.
आणि त्याला वेळ लागतो.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी वृत्ती चालत नाही

बातमीची लिंक देऊन किंवा न देता, या विषयावर इथे चर्चा करता येईल असा एक ओळीचा धागा होता हा. यात प्रतिसादकांकडे स्वबुद्धी आहे व ते आपण स्पून फिडींग केलं नाही तरी स्वतःचं मत मांडू शकतात असा आदरभाव व्यक्त होतो. पण एखाद्या लहान बाळाला समजवावे अशा पद्धतीने धागा निघाला कि प्रतिसादक वैतागतात. इथे हे कुणा एकाला उद्देशून नाही. पण पहिलीतल्या मुलांना शिकवणारी टीचर जर त्याच पद्धतीने एम फिलच्या मुलांचा क्लास घेऊ लागली तर ती मुलं वैतागतात. हेच या धाग्यांचं सार आहे. सुरूवातीच्या धाग्यात भांबावलेला धागाकर्ता मग लोकांना उकसवणे हेच माझे यश आहे असे भासवून खोडकर जित्याचं बेअरिंग घेऊन वावरतो हे लोकांना जास्त इरीटेटिंग होतं.

असे करताना वेड घेऊन पेडगावला जाणे , पाहुण्याच्या काठीने विंचू मारणे असे उद्योग धाले करत असतो.
इंजिनिअरिंग आणि मेडीकलचे शिक्षण जागतिक स्पर्धेत भारतासारख्या खंडप्राय देशात कोणत्या भाषेत असावे याची कल्पना धालेला नसेल असे संभवत नाही. आणि खरंचच नसेल तर मग अशा माणसाने जर आपल्या प्रतिसादांवर वाद घातला तर भिंतीवर डोकं का आपटून घेऊ नये असे का वाटणार नाही ?

वेघेपेजाचे उदाहरण बघा.

कारण, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे. तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. तर ऊच्चशिक्षण तरी का त्यापासून वंचित राहावे.

या वाक्यात ठाम मत मांडलेले आहे. जर या वाक्याला विरोध केला कि यामुळेच मातृभाषा मरतेय वगैरे फाटे काढले जातील ज्याचा लॊजिकशी काहीच संबंध नसणार.

पण...

फक्त आता आधीपासूनच सुरू असलेल्या ईंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात हा मराठी अभ्यासक्रम कसा सामावून घेतला जाईल हा प्रश्न पडला आहे. तसेच मराठीत शिकलेल्या मुलांना पुढे करीअरबाबत तितक्याच संधी उपलब्ध असतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

इथे प्रश्नार्थक वाक्यरचना केली आहे. म्हणजे मांजर तर मारायचं पण काशीलाही जायला लागू नये ही हुषारी आहे. इथे ठाम मत मांडायचे हुषारीने टाळले आहे. कारण या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर मग आधीचे जे ठाम मत मांडले आहे ते वेड्यात निघते. आणि आधीच्या ठाम मताला अनुसरून जर या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित धरले तर ते होकारार्थी येते. ते वस्तिस्थितीला धरून असेल का यावरून लोक इरीटेट होणार...
’हा धागालेखकाचा हेतू आहे. स्वत:वर कुणाला बोट उगारायची संधी न देता कुस्तीचा फड सुरू करण्याची ही खुमखुमी असल्याने चांगल्या चर्चेचं मातेरं धाग्याच्या मांडणीतच झालेल आहे.

खरे तर प्राथमिक शिक्षण दहावी पर्यंत हे मातृभाषेत असावे.
भाषा हे subject वेगळेच असावेत तसे आता पण आहेत.
Kg ते पाचवी पर्यंत हसत खेळत शिक्षण..उगाच मुलांना त्रास देवू नका.
परीक्षा घेण्याची गरज नाही.
नंतर हळू हळू शिक्षण l
मुलांचे बालपण कोमोजुन बिलकुल गेले नाही पाहिजे
बारा तास दहावी पर्यंत अभ्यास करून आणि९९ टक्के मार्क मिळवून पण ती मुल आयुष्यात पूर्ण अपयशी होतात.
शारीरिक बाबतीत पण कमजोर होतात.
खरे शिक्षण बारावी पुढे च.
आणि ते बारावी च्या मार्क वर अवलंबून नसते.
प्रवेश परीक्षा वेगळीच असते.

व्यावसायिक शिक्षण हे इंगर्जी मध्येच हवं.
परीक्षा पण इंग्रजी मध्येच.
पण अभ्यासक्रम मधील मातृभाषेत भाषांतर केलेली अधिकृत पुस्तक पण उपलब्ध हवीत.

शब्द ना शब्द भाषांतर.
ज्याला योग्य वाटेल त्या भाषेत तो समजून घेईल

व्यावसायिक शिक्षण हे इंगर्जी मध्येच हवं.
परीक्षा पण इंग्रजी मध्येच.
पण अभ्यासक्रम मधील मातृभाषेत भाषांतर केलेली अधिकृत पुस्तक पण उपलब्ध हवीत.

शब्द ना शब्द भाषांतर.
ज्याला योग्य वाटेल त्या भाषेत तो समजून घेईल >>> पूर्णपणे सहमत!

आठवीपासून सेमी-इंग्लिश माध्यम घेतल्यावर मीही असेच केले होते. But I never faced any language barrier after transitioning from Marathi Medium to a Semi-English Medium. I had Mathematics and Science in English, and the remaining subjects were in Marathi (Actually, I was one of the brightest students in the school and would always stand first or second among more than 120 students (Sorry for the self-praising)). Yet, I also bought Science books in Marathi in the Eighth class for reference, which I hardly used, and after that, I never purchased them in the ninth or tenth class. In fact, my parents were doubtful if I would continue my previous performance in a Semi-English medium, which I did even after the transition.

पुढे BAMS करतांना आयुर्वेद शास्त्र हे प्रामुख्याने संस्कृत मध्ये असल्याने, वर्गात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत शिकवल्या जात असे. तसेच विद्यापीठाच्या परीक्षेत कोणत्याही भाषेत लिहिण्याची मुभा होती/आहे. अगदी एक उत्तर मराठी वा हिंदी व दुसरे इंग्रजीत लिहू शकतात/असे. MBBS व BAMS चा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. केवळ काही विषयांत आयुर्वेदशास्त्राच्या संदर्भाने शिकवल्या जातो (अलीकडे बराचश्या विद्यापीठांनी कालानुरूप BAMS मध्ये बहुतांशी विषयांत आयुर्वेद व मॉडर्न मेडिसीन असा दोन्ही अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे). For the fact of matter, ऍनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा सर्जरीचाही (असे अनेक विषय) अभ्यास करतांना आयुर्वेदातील काही विवेचन मराठीत शिकावे लागत असे आणि मग मॉडर्न मेडिसिनचीही पुस्तके अभ्यासावी लागत (जसे ऍनाटॉमीसाठी बायबल समजलं जाणारे, बी. डी. चौरासियांचे ह्यूमन ऍनाटॉमी). खरं तर आयुर्वेद शास्त्रातील काही लेखकांनी मॉडर्न मेडिसिनमधल्या अनेक पुस्तकांची मराठीत/हिंदीत भाषांतरे केली आहेत तरी त्यातल्या बऱ्याच शब्दांना मराठीत/हिंदीत पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थी मॉडर्न मेडिसिनमधलीच मूळ पुस्तके वाचतात.

त्यामुळे अगदी आताही मध्य प्रदेशात किंवा अन्य राज्यात मातृभाषेतून वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी किंवा अन्य शास्त्रे शिकतांना/शिकवतांना असेच होणार आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

अल्जिरिया ही फ्रेंचांची वसाहत. त्यामुळे अरेबिक आणि फ्रेंच भाषा सत्तर वर्षे मुले शिकली.
पण
आता मुले पहिलीपासून इंग्रजी शिकणार. अरेबिक,फ्रेंच आणि इंग्रजी.
"इंग्रजी सायन्सची भाषा शिकणार. फ्रेंच शिकून काही फायदा होत नाही. आणि लवकरच फ्रेंचला डच्चू देणार."

<<<<कारण, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे.>>>
<<<<शाहरूख खान कोणत्या माध्यमातून शिकला ? दिल्लीच्या फर्डा इंग्लीष कॉन्वेन्ट मधून शिकलाय. मग आपण मातृभाषेतल्या शिक्षणाला समर्थन कसे देऊ शकतो. >>>
हा हा! लग्गेच दुमत !
माझी खात्री आहे भारतात असे असंख्य लोक आहेत जे मायबोलीवर येऊन फुक्कट चर्चा (?!) करण्यापेक्षा काहीतरी उपयुक्त करतील.

इथे ६० वर्षांपूर्वी आलेले माझे सगळे मित्र कॉलेजमधे जाईपर्यंत मराठीतून शिकले. आता त्यांनी भर अमेरिकेत नोकर्‍या धंदे इथल्या लोकांपेक्षा चांगले केले.
जे शिकायचे ते नीट शिकणे, समजणे महत्वाचे आहे.
आमच्या कॉलेजच्या जीवनात अनेक जण बिगारीपासून कॉन्व्हेंटमधे शिकलेले लोक होते, पण त्यापैकी कुणाचाहि नंबर कधीहि पहिल्या दहात आला नाही.
म्हणजे मराठीतून विषय शिकायचे नि इतर भाषात पण ते सांगता आले पाहीजेत! दुप्पट काम.
आता या जगात अमेरिका नि चीनशी बरोबरी करायची तर जरा दुप्पट प्रयत्न करायलाच पाहिजेत. २०० वर्षे जातीपाती करण्या शिवाय काही केले नाही, आता दुप्पट काम करायलाच पाहिजे.

माझा कयास आहे की मराठी इंजिनिअरिंग कॉलेज उघडलं तर एकही सीट भरणार नाही त्यातली. 'अस्तित्त्वात नसलेले प्रश्न सोडवणे' कॅटेगरी आहे ही.
वर कुणी म्हटलं आहे तसं मराठी समजणारे शिक्षक असतील तर ते भाषेचा त्रास असलेल्या मुलांना पहिल्या वर्षी चांगली मदक करू शकतील. इंग्रजीचा गंध नसलेली ती मुलं नक्कीच नाहीत तर थोड्या मदतीची गरज असलेली आहेत. जुजबी इंग्रजी भाषेचं ज्ञान इंजिनिअर व्हायला पुरेसं आहे. तरीही कुणाला मराठीत शिकायचं असेल तर सोय झाली ही चांगलीच गोष्ट आहे.
मराठी माध्यमातील इंग्रजी हे पोर्टेबल स्किल नाही. त्यामुळे तोडकं मोडकं इंग्रजी तरी बोलाच. भाषेवर आत्मविश्वास असो की नको, ज्ञानावर मात्र हवाच. असं तोडकं मोडकं इंग्रजी बोलणारे उत्तम आणि यशस्वी इंजिनिअर अनेकोनेक माहितीत आहेत.

मुलायम मुख्यमंत्री असताना हिंदी मीडीयम मधून डिप्लोमा केलेल्या एकाला मुमं कृपेने एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी मधे नोकरी लागली. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या कामात त्याची नेमणूक झाली. त्याला साध्या साध्या गोष्टी समजायच्या नाहीत. बॉस चिडला कि आम्हाला हिंदीत असे नाही शिकवले सांगायचा. एक दिवस त्याला त्याला जमेल असे कॅलक्युलेशनचे टेबल वर्क दिले. तर संध्याकाळी काहीही काम झाले नव्हते.

साहेबच म्हणाले "मेरी ही गलती है, हिंदी कॅलक्युलेटर लाकर देना चाहिए था. मुलायमजी से शिकायत मत करना बेटा"

माझ्यामते टेक्निकल टर्म ईंग्रजीत आणि बाकी सारे मराठीत हे उत्तम राहील.
जसे की कॉलेजला असताना वायवा उर्फ तोंडी परीक्षांना ईंग्रजीचीच सक्ती झाली तर माझे टीटीपीपी व्हायचे. पण तेच एक्स्टर्नल मराठीत एक वाक्य जरी बोलला.. कसा आहेस बाळा, काय येते तुला.. तर मात्र माझ्या तोंडाचा पट्टा नॉनस्टॉप सुरू व्हायचा.

मराठी मिडीयम शाळेमधून कॉलेजला जाताना ज्या मुलांचे ईंग्लिश चांगले नसते त्यांचे ईतर विषय चांगले असूनही त्यांच्या आत्मविश्वासालाच जो तडा जातो त्यातून सावरणे कित्येकांना शेवटपर्यंत जमत नाही.

मातृभाषेतून शिकण्याचा पर्याय जरूर असावा
सक्ती नसावी
जर हा पर्यय नसेल तर मात्र ती ईंग्लिशमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती होईल. ते चूक ठरेल.

मराठीतून शिकलेल्यांची नंतर बोंब होईल हे ठरवायची घाई आपण का करावी? येणारा काळ ठरवेल..

मातृभाषेतून शिकण्याचा पर्याय जरूर असावा
सक्ती नसावी
जर हा पर्यय नसेल तर मात्र ती ईंग्लिशमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती होईल. ते चूक ठरेल. >> बरोबर.

मातृभाषेतून शिकण्याचा पर्याय जरूर असावा
सक्ती नसावी
जर हा पर्यय नसेल तर मात्र ती ईंग्लिशमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती होईल. ते चूक ठरेल. >> बरोबर. >> +१

मातृभाषेतून शिकण्याचा पर्याय जरूर असावा
सक्ती नसावी
जर हा पर्यय नसेल तर मात्र ती ईंग्लिशमधूनच शिक्षण घेण्याची सक्ती होईल. ते चूक ठरेल. >> मग मातृभाषेतून उपलब्ध असलेले शिक्षण घ्यावे.इंजीनियरिंग च्या नादाला लागू नये Happy

मग मातृभाषेतून उपलब्ध असलेले शिक्षण घ्यावे.इंजीनियरिंग च्या नादाला लागू नये Happy
>>>

माझा मुद्दा क्लीअर झाला या पोस्टने.
ईंग्लिश असेलही महत्वाची. पण तिची मोनोपोली नको.
ती सुद्धा मातृभाषेला डावलून

जगातले किती टक्के ईंजिनीअर ईंग्रजी भाषेतून शिकलेले असावेत ?
आणि उरलेले उपासमारीने मरणाऱ्या ईंजिनीअरची संख्या किती आहे?

जगातले किती टक्के ईंजिनीअर ईंग्रजी भाषेतून शिकलेले असावेत ?>> हे पहा सर ऋन्मेऽऽष तुम्ही चुकीचा दृष्टीकोन धरत आहात. युरोप मधल्या देशात त्यांच्या भाषा इंग्रजी इतक्याच पहिल्यापासून प्रगत आहेत. त्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची गरजच नाही, आपल्या भाषा जर्मन, फ्रेंच वा जापनीज एव्हढ्या प्रगत आहेत काय? आता जर तुम्हाला चाकाच्या शोधापासून सुरवात करायची असेल तर करा बापडे.

Pages