Submitted by deepak_pawar on 25 October, 2022 - 03:36
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ
अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ.
रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा
वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा
जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ.
संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे
रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे?
उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल.
छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू
ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू
कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छेडूनी दुखास माझ्या आता हे
छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू
ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू
बहोत खूब, दीपकजी!
पहिली ओळ छान सुचली आहे. पण
पहिली ओळ छान सुचली आहे. पण पुढच्या ओळी जबरदस्तीने रचल्यासारख्या वाटल्या.
केशवकूल, भरत आपले मनःपूर्वक
केशवकूल, भरत आपले मनःपूर्वक आभार.
पहिली ओळ छान सुचली आहे. पण पुढच्या ओळी जबरदस्तीने रचल्यासारख्या वाटल्या.<<<< बऱ्याच वेळा पहिल्या दोन ओळी सुचतात. दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्या दोन ओळी दिवसभर डोक्यात घुमत राहतात आणि आपोआप पुढील कडवी सुचत जातात. घरी आल्यावर त्यावर संस्कार करून कविता पूर्ण होते. तसं प्रत्येक कविता ही जुळवाजुळव केल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण ह्या दोन ओळी सुचल्या नंतर सात आठ महिने तरी पुढं काही सुचतच नव्हतं शेवटी एक दिवस बसून पूर्ण केली. त्यामुळे कदाचित कृत्रिमता आली असावी.
धन्यवाद.