बबन बोंडेज दिवाळी - अ लाडू टू किल!

Submitted by सखा on 23 October, 2022 - 02:42

मित्रांनो ऐन दिवाळीतील घटना, सर जॉनी इंग्लिश, सर ऑस्टिन पॉवर्स आणि माननीय जेम्स बाँड यांना दिवाळीच्या फराळाला आपला लाडका भारतीय गुप्तहेर बबन बोंडे यांनी अर्थातच अत्यंत गुप्तपणे बोलावलेलं नसेल तरच नवल होतं. बबनची माजी गर्लफ्रेंड प्रियांका मस्का (जीने जणू काही भारतात श्रीमंत आणि वीर परंतु बुटके पुरूष अजिबात नाहीतच अशा अविर्भावात एका बुटक्या अमेरिकन माणसाशी लग्न केले, अशी माहिती विकिपीडिया वरती उपलब्ध आहे. असो.) तिने आपल्या बबनशी जरी लग्न नाही केलं तरी ती आजही बबनला दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवते याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेले संस्कार मुख्य म्हणजे ती स्वतःच्या हातांनी करून पाठवते.
जगातले चार महत्वाचे गुप्तहेर एका ठिकाणी आहेत म्हटल्यावर त्यांच्या गुप्त शत्रूने घातपाती हल्ला न केला तरच नवल असे तुमच्या मनात आले असणारच आणि तुम्हाला गुड न्यूज देतो अगदी तसेच झाले. गुड न्यूज त्यांच्यावर हल्ला झाला ही अर्थातच नाही. गुड न्यूज ही की हल्ला होणार हा तुमचा अंदाज अगदी शंभर टक्के खरा निघाला! फराळाला सुरुवात लाडू ने करावी की चकलीने या विचारात आपले माननीय गुप्तहेर असतानाच अचानक चार भयंकर अतिरेकी तिथे प्रकट झाले. त्यांच्या हातातल्या ऑटोमॅटिक मशीन गन्स ने या जागतिक दर्जाच्या चारही गुप्तहेरांचा क्षणात खात्मा झाला असता मात्र गुप्तहेरांच्या ट्रेनिंग मध्ये शिकवले असते की हातात असलेल्या गोष्टीला वेपन मध्ये कन्व्हर्ट करा तद्वत ऑस्टिन पॉवर्स, जेम्स बॉण्ड आणि जॉनी इंग्लिश यांनी प्रत्येकी प्रियांकाने स्वतःच्या हाताने तयार केलेला रव्याचा लाडू, चकली आणि करंजी पापणी लवायच्या आत तीन अतिरेक्यांना फेकून मारून त्यांना तिथेच तात्काळ बेशुद्ध केले. आता तुम्ही म्हणाल चौथ्या अतिरेक्यांचे काय झालं? आपला बबन काय फक्त चिवडा खात बसला? नाही मित्रानो
बबनने मात्र आपल्या पिस्तूल मध्ये काडतूस नसल्याने चिवड्यातला शेंगदाणा विद्युत वेगाने पिस्तूलात भरला आणि शेवटच्या आणि सर्वात भयंकर अतिरेक्याला निव्वळ शेंगदाण्याने टिपले आणि त्याची चटणी झाली! सध्याच्या क्षणी जरी हे समयोचित नसले तरी बबनच्या चरित्र लेखकाला मराठवाड्यातील शेंगदाण्याच्या चटणीला या जगात तोड नाही हे इथे नम्रपणे नमूद करण्याचा मोह आवरत नाही आहे. कोवळ्या हुरड्या सोबत शेंगदाणा चटणी अहाहा..... असो. बॅक टू द सीन.
सगळी सारवासारव झाल्यानंतर सगळी मंडळी पुन्हा एकदा फराळाला बसली तेव्हा बबन म्हणाला थॅंक गॉड, आय मीन... प्रियांका की लाडू करंजी आणि चकली अंमळ टणक होती.
चकलीला खालून वरून पाहत जॉनी इंग्लिश यांनी आपले खास मिस्टर बीन्स सारखे एक्सप्रेशन दिले त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच हसू आले तर सर जेम्स बॉण्ड यांनी आपला आज उपास असल्याने आपण फक्त Martini अथवा पाणी पिऊ ते पण "Shaken, not stirred" असे एकदा लाडवाकडे तर एकदा आमच्याकडे बघत नम्रपणे सांगितले. काहीही म्हणा ब्रिटिश नरम ह्युमर वेगळाच.
सर ऑस्टिन पॉवर यावर हातातल्या गोल परंतु लोखंडा पेक्षा टणक लाडू कडे बघत मिश्किलपणे म्हणाले "O behave!"
अर्थातच आपल्या ब्रिटिश पाहुण्यांसाठी पर्यायी फराळाची व्यवस्था तत्काळ करण्याचे काम मी केले. आता आमच्या घरचे बऱ्यापैकी टेस्टी आणि मऊ लाडु खाताना सर जेम्स बाँड मला म्हणाले "बबनच्या मित्रांना दिवाळीला फराळाला बोलवण्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय करता?" मी अभिमानाने म्हणालो की "सर, मी बबनचा बालमित्र आणि चरित्र लेखक आहे." यावर सर जॉनी इंग्लिश यांनी यासोबत जोडलेल्या फोटोतले एक्सप्रेशन दिले तर सर ऑस्टिन पॉवर पुन्हा एकदा मिश्किलपणे म्हणाले, "O behave!"
दिवाळी पहाटेच्या निमित्ताने आज एव्हढेच. दिवाळीच्या शुभेच्छा! ❤️
#babanbonde
#spoof
#repost
FB_IMG_1666345133771.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Lol

बाकी सगळ्यांनी आपापले फोटो डकवले आहेत पण आपला बबन मात्र 'अवतारा'त आहे.

मामी,
बबनचा फोटो पाहिला की परदेशातील मुली वेड्या होतात म्हणून अनेक देशांनी UNO मध्ये विनंती केली होती की त्याचा खरा फोटो टाकू नये. त्या मुळे बाकी काही नाही.

सखा
येऊ द्या अजून अड्वेनचर्स ऑफ बबन बोंडे!
बबन बोंडेचे मायबोलीवर स्वागत आहे.