मेजाकग्वा उर्फ कोरियन "पाकातील चंपाकळी”

Submitted by Barcelona on 21 October, 2022 - 23:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप मैदा,
१/२-१ टेबलस्पून आले रस,
चिमूटभर मीठ,
१/२ कपपेक्षा थोडे कमी पाणी
१ टी स्पून साखर (ऐच्छिक)

पाकासाठी-
पाव कप साखर,
पाव कप पाणी.

क्रमवार पाककृती: 
  • मैदा, आल्याचा रस, मीठ, साखर एकत्र करून पुऱ्यांच्या कणके इतकं घट्ट भिजवावे.
  • एक मोठी पोळी करून त्यातून २ सेंमी बाय ५ सेंमी च्या पट्ट्या कापाव्या. अंदाजपंचे नको, फूटपट्टी /मेजरटेप वापरणे जरूरी.
  • आता प्रत्येक पट्टीला चंपाकळीला मारतो तशा तीन खाचा माराव्या. वरचे टोक मधल्या खाचेतून वळवून घेतले असता तिपेडी वेणीगत आकार येतो. आता ह्या तिपेडी वेण्या तळून घेणे. (कोरियन मंडळींचे व्हिडीयो बघा)
  • साखर, पाणी एकत्र करून अगदी मंद आचेवर ७-१० मिनिटे ठेऊन पाक करावा. (एक तार- दोन तार काही विचार करू नये… ओप्पा, गन्नम स्टाईल!!! )
  • पाक गार झाल्यावर वेण्या १०-१५ मिनीटे पाकात मुरू द्याव्या आणि मग बाहेर काढून जरा खुटखुटीत होऊ द्याव्या.
  • वरून तीळ, बदाम भरड, पाईननट भरड इ जे असेल ते भुरभुरावे.
वाढणी/प्रमाण: 
२-४ लोकांना अल्पोपहार
अधिक टिपा: 
  • फार वेळखाऊ काम आहे.....पण "रे लथ गाड दूँ, रे जाडा पाड दूँ" म्हणायचं नि भिडायचं ...
  • सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
    कोरियन चंपाकळी खाऊन 'शब्दखुण' मिळेल का?

https://youtu.be/7Au368_6efo?t=203
https://youtu.be/Uqb7EapjQ1Q

माहितीचा स्रोत: 
https://youtu.be/7Au368_6efo?t=203
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळी लक्षात राहत नसेल तर पाडव्याला मिसेसला चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास भरवायला सांगू शकता
>>> ओह .. पर्सनल अट्याक Wink

मी गम्मत करत होतो.. हॅप्पी दिवाळी....

>>>साखर, पाणी एकत्र करून अगदी मंद आचेवर ७-१० मिनिटे ठेऊन पाक करावा. (एक तार- दोन तार काही विचार करू नये… ओप्पा, गन्नम स्टाईल!!! )>>>

पा़क कसा बनवाय्चा याचा अर्थबोध झाला नाही.

लहानपणीचा आवडता पदार्थ - पाकातल्या पुऱ्या.
आकार वेगळा पण पदार्थ त्याच्या जवळ जाणारा. (पुऱ्या आंबटगोड मधुर लागतात. आंबटपणा हा लिंबाचा नसून आंबवलेल्या पिठाचा असतो.)

जिलबीचंही असंच आहे.
गुजराती लोकांच्या प्रमाणाच्या दुकानात मिळणाऱ्या जिलब्या कडकडीत आणि लिंबू टाकून आंबट केलेल्या पिठाच्या असतात. मारवाडी लोकांच्या भुजिया गाठ्यांच्या दुकानातल्या जिलब्या मऊ आणि मधुर असतात. त्या दुसरे दिवशी आणखी मऊ आणि आणखी सुमधुर लागतात.

पदार्थ आणि तुझा लेख - दोन्ही खुसखुशीत >> +१

मस्त दिसतो/ते आहे मेजाकग्वा. खालच्या टीपा पण भारी. त्यात अजून एक गाणं टाकता येईल - उड जा रे (मेजा)कगवा, लेके (कोरियन) संदेसवा...

सोंदेस बंगाली असतात ना!
पण चंपाकळी कोरियन असली तर सोनदेसने काय घोडं मारलंय! त्यामुळे असतील कोरियन. Proud

ओह हां! पण किम जोंग उन म्हणाला की तुम्ही कोरियन संदेसवा घेऊन जा, तर आपली काय टाप आहे पुन्हा विचारायची?

किम जोंग उन म्हणाला की तुम्ही कोरियन संदेसवा घेऊन जा, तर आपली काय टाप आहे पुन्हा विचारायची?>> अय्या पण तो उत्तरेचा आपण दक्षिण कोरीआचे फॅन आहो. जय जिम जय जिमिन जय जंगकुक. ते खात्यात काय पन गोड मानून . पाक चुकला तर चालतंय पोरांना.

आता आमचे जिमिन, जुंग्कुक, व्ही, जे होप आर्मीत भरती व्हायला चालले आहेत त्यांच्या बरोबर डबा भर देइन.

नवीन Submitted by अश्विनीमामी on 22 October, 2022 - 00:22 >>>>>द्याच व थोड्या जास्त J HOPE ला जास्त द्या नाहीतर तो आर्मी ट्रैनिंग मध्ये chicken noodle soup गाणं गात बसेल। हा हा हा हा।

धन्यवाद. कोरियन टीव्ही शोज बघणारी बरीच मंडळी आहेत की... त्यांच्यात "गाजर का हलवा" छाप काय फेमस असतं ते शोधायला हवे.

बीटीएस आर्मी भारतात १९ मिलिअन आहे. त्यात आम्ही एकटेच व्हाइट हेअर्ड सेनापती भानामती असु. ह्याम्चा एक चँट असतो तो शोधून लिहिते.
ह्यात सर्वांची नामे आहेत आर्मी सतत नामस्मरण करत असते. कोरी अन टीव्ही शो वेगळे. त्याचे हिरो हिरविणी पन लै ग्वाड असत्यात. व बॉय गर्ल
ब्यांड वेगळे. ब्लॅक पिंक ट्वाइस हे मुलींचे बीटीएस स्ट्रेकिड्स मुलांचे. प्रत्येक फॅन बेस ला पण नाव आहे.

धन्यवाद. कोरियन टीव्ही शोज बघणारी बरीच मंडळी आहेत की... त्यांच्यात "गाजर का हलवा" छाप काय फेमस असतं ते शोधायला हवे.>>>>>>> गाजर का हलवा? हे बघ हे तीन पदार्थ
तोक बोकी, किम्बाप, किमची हे तिन्ही ( अमांने दिलेलं कॉपी केलं) आणि रामेन न्युडल्स प्रत्येक सिरीयल मध्ये असायलाच हवेत.
तोक्कबोक्की असा उच्चार ऐकू येतो. एकंदरीत कोरियन लोकं जरा लाडातच बोलतात.

थँक्यू अमा, धनुडी.
Happy ऋ, धागा बरोबर जागी, बरोबर व्हिजिबिलीटीत होता. तुलाच ते १९३ चाहते, ५०० धागे, प्रत्येकी १५० प्रतिसाद असले करायची सवय. कसं जाणार लक्ष? मला कोरियन शब्दखुण हवी आहे. असल्या लो एफर्ट-हाय इंपॅक्ट-पाकीटढकलू अ‍ॅक्टीव्हिटीत मी रमते. बरं, धागे वर ठेवण्यासाठी आवश्यक तुला ते ४३% वगैरे सांगून हुकमी व्हल्नरेबल होणे जमते. Happy वैसे कमिनेपनपे मैं भी उतर आँऊ तो... पाचपट अजून गोड वाटेन .... मी माझ्या 'ऑल इज वेल' तोर्‍यात बरी. तूच जंटलमन मित्रागत दोन-तीन महिन्यातून एखादेवेळी प्रोफाईलला चक्कर मार आणि काढलेल्या नव्या धाग्यांना जमेल तसा सपोर्ट कर...

हिंदी डब्ड कोरीयन चित्रपट: सबसे बडा वोन
कलाकार: याँग जलाल आणि डाँग मेहरा:

कोरिया की नारी करे चंपाकळी पोरी अई जो अई
अई जो अई! तिपेडी वेणी पिळाने ये छोरा अई गयो अई.
हाट! कोरिया की नारी करे....

मेजाकग्वा थाली मे बैठी है सोलह शिंगार कर के
ऐसे ही खाऊंगा क्या मै बिना पाक मे घोल के
बाजू मे रखा है बोल, पाक है उसी मे घोल
कैसी ये लगती है रे सही सही
ओट! कोरिया की नारी करे चंपाकळी पोरी अई जो अई

Pages