मेजाकग्वा उर्फ कोरियन "पाकातील चंपाकळी”

Submitted by Barcelona on 21 October, 2022 - 23:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप मैदा,
१/२-१ टेबलस्पून आले रस,
चिमूटभर मीठ,
१/२ कपपेक्षा थोडे कमी पाणी
१ टी स्पून साखर (ऐच्छिक)

पाकासाठी-
पाव कप साखर,
पाव कप पाणी.

क्रमवार पाककृती: 
  • मैदा, आल्याचा रस, मीठ, साखर एकत्र करून पुऱ्यांच्या कणके इतकं घट्ट भिजवावे.
  • एक मोठी पोळी करून त्यातून २ सेंमी बाय ५ सेंमी च्या पट्ट्या कापाव्या. अंदाजपंचे नको, फूटपट्टी /मेजरटेप वापरणे जरूरी.
  • आता प्रत्येक पट्टीला चंपाकळीला मारतो तशा तीन खाचा माराव्या. वरचे टोक मधल्या खाचेतून वळवून घेतले असता तिपेडी वेणीगत आकार येतो. आता ह्या तिपेडी वेण्या तळून घेणे. (कोरियन मंडळींचे व्हिडीयो बघा)
  • साखर, पाणी एकत्र करून अगदी मंद आचेवर ७-१० मिनिटे ठेऊन पाक करावा. (एक तार- दोन तार काही विचार करू नये… ओप्पा, गन्नम स्टाईल!!! )
  • पाक गार झाल्यावर वेण्या १०-१५ मिनीटे पाकात मुरू द्याव्या आणि मग बाहेर काढून जरा खुटखुटीत होऊ द्याव्या.
  • वरून तीळ, बदाम भरड, पाईननट भरड इ जे असेल ते भुरभुरावे.
वाढणी/प्रमाण: 
२-४ लोकांना अल्पोपहार
अधिक टिपा: 
  • फार वेळखाऊ काम आहे.....पण "रे लथ गाड दूँ, रे जाडा पाड दूँ" म्हणायचं नि भिडायचं ...
  • सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
    कोरियन चंपाकळी खाऊन 'शब्दखुण' मिळेल का?

https://youtu.be/7Au368_6efo?t=203
https://youtu.be/Uqb7EapjQ1Q

माहितीचा स्रोत: 
https://youtu.be/7Au368_6efo?t=203
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान व सोपी पाककृती. धन्य वाद व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आता आमचे जिमिन, जुंग्कुक, व्ही, जे होप आर्मीत भरती व्हायला चालले आहेत त्यांच्या बरोबर डबा भर देइन.

कोरियन चिरोटे,
आल्याचे चिरोटे?
आकार सुबक आहे.

मस्त दिसतेय ... मोहनराव हवेच मैद्याच्या पदार्थात नाहीतर ते (चंपाकळी) कडकड तात कोरियन नाही का ..... एक शंका

मस्त आहे पाकृ. कोरियन वर्षसणाचा पदार्थ वाटत आहे अगदी. तिथल्या बायका म्हणत असतील, सगळं झालं फराळाच आता फक्त मेजाकगवा राह्यलाय..माझी आजी काय सुरेख मेजाकगवा करायची Proud

सगळ्यांना धन्यवाद!!
आल्याचे चिरोटे छान नाव आहे.
साखरेचा पाक फोबिया होतो खरा पण कोरियनांच्यात फक्त प्रक्रियेवर आपले नियंत्रण मग व्हायचं ते होऊ दे असा कर्मयोग असल्याने हा पाक एकदम सोपा आहे.
ह्या कृतीने कडकडीत चंपाकळ्या होतात. हवं असेल तर मोहन, जायफळ इ घालायचं Happy एक दुसरा प्रकार म्हणजे मैद्याऐवजी केक फ्लॉवर (७/८ कप मैदा+ २ चमचे आरारूट) घालून करणे. हा प्रकार फार कडकडीत होत नाही.
लंपन Happy याचे यूट्यूबवरचे व्हिडीयो पाहिले की लक्षात येते की किती विविध प्रकारे करतात!!!

चंपाकळी खाल्लेली नाही पण >>>>>>>>>>>>>> अरे देवा!!! काय लिहू बराच वेळ विचार केला. जाऊ दे, मीच करून आणेन कधी.
उन्नी म्हणजे ताई की वहिनी? ताई असावे. अमाने लिहीलेले के-ड्रामा मधले काही असावे. कोरियन सिरीजचा चस्का नाही लागला तरी कोरियन खाणे मजेदार आहे याचा साक्षात्कार झाला आहे Happy

Happy छान गाणे. चिरोटा, चंपाकळीवर आपण अडकलो पण कोरियन क्यूझिन मध्ये एक "मंजू" नावाचा खाऊ आहे. आपण पुरणाचे दिंड करतो तसलाच काहीसा मात्र बेक्ड प्रकार. पण त्यासाठी ममो, मंजूताई, जागूताई इ अशा पारंपारिक पाककृतीतील मंझे हुए कलाकारांबरोबर कोलॅब लागेल. किचकट प्रकार आहे.

अंजू, धन्यवाद Happy

कोरीअन क्युझीन वर एक लेख तो बनता है.

अमाने लिहीलेले के-ड्रामा मधले काही असावे. >> अगं बीटी एस म्हणून एक जगप्रसिद्ध कोरिअन बॉय बँड आहे के पॉप जॉनरा त्यातले कलाकार आहेत. कोरिआत कंपलसरी आर्मी सर्विस असते तरुणांना तर हे कलाकार आता आर्मीत जॉइन होणार आहेत. त्यासाठी बँड पर्फॉरमन्स बंद ठेव णार म्हणून बीटी एस फॅन्स आर्मी जर अपसेट व भावुक झालेली आहे. त्यांचे लास्ट कॉन्सर्ट परवा बुसान मध्ये झाले त्याला भयंकर व्युअर शिप होती. आपल्याकडे कसे सरहदपे रहने वाले जवानोंको डब्यात लाडू चिवडा पाठवतात तसे पाठवावे म्हटले. जंगकुक जिमिन कित्ती गोड आहेत. ह्या मिठाई सारखेच. एकाचे नाव पण सुगा आहे.

तोक बोकी, किम्बाप, किमची, इथे मुंबईत मिळते कोरीअन फूड. घरी सध्या मराठी पेक्षा कोरीअन जास्त ऐकले जाते त्यामुळे लेख फोटो लिहा अशी लापि.

उत्तूके, एवढं कोरियन शिकवल़ं तरी, आरास्सू आरास्सू, सांगते , तू जो अर्थ काढला आहेस तो बरोबर आहे. Proud .
उन्नी : मोठी बहीण, ( नूना म्हणजे पण बहिणच) तूच मला उन्नी म्हण मी आपलं कोरियन वापरता यावं म्हणून म्हंटलं.

Proud सुगा माहिती आहे - That that I like that मध्ये येतो!!! दिवस सुग्याचे सुरू जाहले अशी कविताही मनोमन केली आहे Wink बीटीएस माहिती पण त्यांची नावे माहिती व्हावी इतकी माहिती नाही. हो हो, त्यांना डबा द्यायला हवा Happy
लेख जमेल तसं Happy
ओक्के नूना, कोरियन लोकांच्यात "पान वाढलं" ह्याला म्हणे शब्द आहे "बापसांग". म्हणलं भारतात जेवणापूर्वी संध्या/चित्राहुती इ मध्ये गोत्र इ सांगतात तसं ह्यांच्यात बाप सांगावा लागतो का काय... पण बाप म्हणजे भात आणि सांग म्हणजे टेबल!!

धन्यवाद वर्णिता, मृणाली.

तर वाहत्या धाग्यांवर कुणीतरी मायेचं म्हणतं 'रेसिपी टाकलीस तर सलमा हायेकचा स्टार देईन'. आपणही नेहमीचीच हात बसलेली एखादी पाककृती टाकायच्या ऐवजी ठेवणीतील फक्त काही लोकांसाठीच करू अशी पाककृती ३-५ तास खपून करतो, लिहीतो, फोटो टाकतो.....

ती आयडी येते प्रतिक्रिया देते. स्टारचा विषयच नाही. बरं, ती खरंच खूप बिझी असते, विसरली असेल. आपणही आठवण द्यायला त्या गप्पांचा स्क्रीनशॉट घेतलेला नसतो. आणि मागणंही बरं दिसत नाही. त्यात दिग्गजांच्या पाककृतीसारख्या ह्या रेसिपीला शंभरेक प्रतिक्रिया आलेल्या नसतात. पण मनात पक्की खात्री असते की ही नवीन पाककृती आहे- स्टार मिळायला हरकत नाही.

कुठं वाट बघा किंवा दुसर्‍याला त्रास द्या म्हणून आपणचं आपल्या रेसिपीला एक स्टार देऊन मोकळे होतो. स्वतःच द्यायचा आहे तर कंजूसी कशाला... कसलेल्या नायिकेचा द्यावा. झाsssssssssलं!!! "जर्रा पेशंस नाही", "अशी कशी स्वतःलाच स्टार देते", "गर्व नुसता", "बरं, निदान एली केंपर वगैरे छुटपुट स्टारलेटचा तरी द्यायचा तर थेट मेरील!" ब्लाह ब्लाह ब्लाह..... गप ऐकावं लागतं... उलट उत्तर देण्यातही अर्थ नसतो कारण चुकून लक्षात आलं नि दिला तिने सलमा हायेकचा (किंवा इतर कुणीही कुठलाही स्टार) तर तो ही हवाच असतो!!!

Happy देतील तेव्हा देतील... तोवर हा स्टार बरा पण... गुलाबो जरा इत्र गिरा दो"

MerylStreep.png

Rofl अगं , मी विसरले नव्हते. फक्त दिवाळीच्या दिवसात आगावपणा सुरू ठेवावा की नाही कळत नव्हतं. मला माहिती आहे तुलाही सलमा हाएक आवडते व राधिका मदन तिच्यासारखी वाटते. दोघींचेही स्क्वेअर जॉज किती सुंदर!
तर आता तुला दिलेल्या वचनाचा एक व आठवण करून द्यायची वेळ आणल्याचा एक असे दोन स्टार ... व्हूपी गोल्डबर्ग आणि सलमा हाएक Happy
Screenshot_20221024_092916.jpg
*
Screenshot_20221024_103649.jpg

फोटो # मीच

नाही. ढाब्यावर खायची सवय लागली की घरच्या साखरभातातील लवंगही खडा वाटते. मराठीत कळीच लिहीतात. मराठीत कली शब्द राक्षसाला उद्देशून वापरतात. (या राक्षसाचे आणि कल्कीचे कलियुगात युद्ध होणार वगैरे वगैरे आख्यायिका). कळी लक्षात राहत नसेल तर पाडव्याला मिसेसला चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास भरवायला सांगू शकता Happy

अस्मे, निवांत संध्याकाळी लिहीते. सध्या फक्त थँक्यू. Happy

खिळते है गुळ यहा मिळके बिछडणे को
असं म्हटलं तर दाताखाली विटा आल्यासारखे वाटेल.
त्यानंतर चंपाकळी म्हटलं तर दाताखाली पनीर नाही तरी शेंगदाण्या एवढे मॅनेजेबल लागायला हरकत नसावी.

Lol मानवदादा.
वाह वाह!! दोन स्टार्स म्हणजे एकदमच हॅप्पी दिवाळी झाली. सलमा हायेक दिसायला आवडतेच आणि नंतर प्रोड्यूसर झाल्यावर फ्रिडा, बेट्टी इ नवीन पद्धतीच्या नायिका पुढे आणल्या. तर बॉलिवूडात ह्या खुशी, अनन्या नि जाह्नवीच्या गोतावळ्यात राधिका मदन फार पुढे यायची नाही. पण कुठे नाही गेली तरी आपला मेजाकग्वा डबा तिच्यासाठी. व्हूपी गोल्डबर्गचा "सिस्टर अ‍ॅक्ट" सिनेमा मास्टरक्लास आहे. "बिच्छू ये बिच्छू मुझे काट खायेगा"चे ओरिजिनल गाणे त्यात आहे. जीझसचे गाणे पण उर्मिला-आशाने काय केलं त्याचं!! (शाहरूख सुहाना दिसतो!) भलती अवांतर पण थँक्यू साठी जरूरी पोस्ट पूर्ण.

Pages