मोझाइक प्रवास

Submitted by अल्पना on 11 October, 2022 - 15:18

अशात मी काही मोझाइक केले. कोणतेही नविन आर्ट/ क्राफ्ट शिकले आणि केले की मी नेहमी मायबोली वर शेयर करत आले आहे. हे राहूनच गेलं होते.

१० -१२ वर्षांपूर्वी कधीतरी मी फेसबूक वर सिंगापूर ला राहणाऱ्या अंजली व्यंकट नावाच्या एका कलाकाराच्या काही कलाकृती बघितल्या. काचेच्या बाटल्यांना फरनेस मध्ये सपाट करून ट्रे बनवले होते तिने. Bottle slumping म्हणतात बहूतेक त्याला. अजूनही काचेच्या बऱ्याच कलाकृती होत्या तिच्या पेजवर. मला पण ते सगळेच शिकायची इच्छा झाली. पण त्यासाठी लागणारे सामान आणि अवजारे घेणं शक्यच नव्हते. प्रचंड खर्चिक काम आहे हे बघूनच कळलं होते. तरी मी तिच्याशी संपर्क साधून मला काचेसंदर्भात काही शिकता येईल का विचारले आणि तिने मला मोझाइक करून बघ असे सुचवले. पण त्यासाठी लागणारे टूल्स पण भारतात त्याकाळी कुठेही मिळत नव्हते.
५-६ वर्षांपूर्वी काहीतरी शोधताना मला mosaic India नावाची एक वेबसाईट आणि त्याच नावाचा फेसबुक ग्रूप सापडला. तिथे भारतातले या क्षेत्रातले बरेच कलाकार भेटले. तिथल्याच एका कलाकाराकडे मी एक अर्ध्या दिवसाचे वर्कशॉप केले. सिरॅमिक टाइल्स कट करायला थोडे शिकले पण परत जवळपास कुठे त्याचे टूल्स न मिळाल्याने पुढे काही केले नाही.

पण मोझाइक करायचेच हे मी अगदी पक्के ठरवले होते. आमच्या फेसबूक ग्रूप वरून काचेच्या टाइल्स आणि त्या कापायचे टूल्स विकणाऱ्या एका कंपनी चा पत्ता मिळाल्यावर मी थोडे सामान मागवून बघितले ३ वर्षांपूर्वी. पण मला धड कट करायला जमत नव्हते.

लॉक डाऊन मध्ये मी माझा पहिला मोझाइक प्रोजेक्ट केला. घरातल्या खराब झालेल्या नॉन स्टीक फ्रायपॅन वर हाफ फ्राय ऑमलेट. पण या प्रोजेक्ट मध्ये मी काचेच्या टाइल्स किंवा स्टेन ग्लास न वापरता घरातले जुने फुटके कप वापरले. सुरवातीला तर कपड्यात गुंडाळून कप बत्त्याने फोडले. आणि मग नंतर ते मोठे तुकडे wheeled nipper वापरून कट केले.

omlet.jpg

या वर्षी मे मध्ये मात्र मी कसेही करून प्रत्यक्ष कुणाकडे तरी शिकायचे ठरवले आणि माझे पहिले vitreous glass tiles mosaic पूर्ण झाले. या मोझाइक साठी माझेच एक पेंटिंग रेफेरन्स साठी घेतले आहे.

painting_mosaic.jpg

हा ग्राऊट करायच्या आधीचा फोटो -
Tray_ungrouted.jpgTray_mosaic_grouted.jpg
आणि हा नंतरचा. अजून ट्रे च्या बाजू रंगवायच्या राहिल्या आहेत.
माझे आई बाबांनी अशातच घराचे पूर्ण नूतनीकरण केले आहे. त्यांच्यासाठी घराचा नंबर मोझाइक मध्ये करायचा हे माझे मोझाइक लवकर शिकण्याचे महत्त्वाचे कारण होते. जून च्या सुट्टीत आई बाबांकडे जाताना मी माझे सगळे टूल्स आणि थोडया काचा घेवूनच गेले होते. लागणाऱ्या टाइल्स मात्र तिथे मागवून घेतल्या. उरलेल्या एका सिरॅमिक फरशी च्या मागच्या बाजूला हे मोझाइक केलं आहे. माझ्या मूळ डिझाईन मध्ये पांढऱ्या रंगात आकडे आणि काळे बॅकग्राऊंड इतकेच होते. पण बॅकग्राऊंड करायला सुरवात केल्यावर काळ्या टाइल्स कमी पडणार हे लक्षात आले. औरंगाबाद मध्ये कुठेच टाइल्स मिळाल्या नाहीत. ऑनलाइन मागवायला पुरेसा वेळ नव्हता म्हणून मग माझ्याकडे असलेल्या टाइल्स आणि स्टेन्ड ग्लास चे तुकडे वापरून डिझाईन बदलले थोडे.

हा ग्राउट करायच्या आधीचा फोटो.
house number.jpg

आणि हा नंतरचा
grouted house.jpg

गेल्या २-३ महिन्यात दोन छोटे प्रोजेक्ट केलेत ६"*६" चे.
abstract_mosaic.jpg
हे पहिले डिझाईन मायबोली वरच्या प्राजक्ता पाटवे च्या एका डिझाईन वरून इन्स्पायर होवून केलं आहे. मोझाइक मध्ये curve करून बघायचे होते मला.
आणि हा दुसरा ड्रॅगनफ्लाय गेल्या आठवड्यातच पूर्ण झालाय. dragonfly_mosaic.jpg

या दोन्ही मोझाइक चित्रांमध्ये अजून ग्राउट भरायचा राहिला आहे. दोन्ही साठी ग्रे ग्राउट वापरायचा विचार आहे माझा.
याच्या पुढची डिझाईन्स - एक पग चे पोट्रेट, एक छोटी कार आणि ख्रिसमस ट्री असे ठरवून सुरवात केली आहे. पूर्ण झाले की इथे दाखवेनच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक काय मस्त केलंयस! हॅट्स ऑफ तुला. प्रचंड सुरेख दिसतय हे सगळं‌. खुप मेहेनतीचं आणि पेशन्स चं काम आहे.हव्या त्या आकारात टाइल्सचे तुकडे करणं किती कठीण आहे. एकतर ती टाईल किती जाडी असते. _/\_ रिस्पेक्ट.
नंबर प्लेट १ नंबर झाली आहे.तशा सगळ्याच आवडल्या. अजून फोटो शेअर कर. तुझा प्रवास पण आवडला.

अरे वाह मस्तच !
२४ नंबर फार आवडला

तरी का कोण जाणे नेहेमी मोझाइक असाच चुकीचा उच्चार करत आलेय. >>> कारागीर लोकांमध्ये मोझाईकच म्हटले जाते. कॉमन आहे हे.

एकतर ती टाईल किती जाडी असते.>>> मी वापरते त्या तितक्या जाड नसतात गं. ४ मिमी असते जाडी. काही छोट्या टाइल्स आणि स्टेन्ड glass तर ३ मिमी च्या असतात. सिरामिक टाइल्स पण जास्तीत जास्त ५ मिमी वाल्या हाताने कट करता येतात.

करुन बघावं असंही वाटलं>>> तुमच्या देशात सामान सहज मिळेल. तिथे टूल्स आणि टाइल्स आणि काचेमध्ये वरायटी पण मिळते. एक स्माल्टी म्हणून प्रकार असतो काचेचा, भारतात मिळत नाही. खूप छान दिसते ते प्रकरण. टूल्स नको असतील रेडीमेड कट केलेले आकार पण मिळतील तिथे भरपूर. करून बघा.

अल्पना ताई तुला एकदम सॅल्यूट. मला मुळातच चित्रकलेचे अंग नाही, त्यामुळे फाईन आर्ट्स मधल्या लोकांचे मला खूप कौतुक वाटते. त्यात तू जी काही मोझाइक कलाकुसर केली आहेस. ते खूप जिकिरीचे, मेहनतीचे, आणि संयमाचे काम आहे, हॅट्स ऑफ!!!

काल सीरीआ मध्ये पण एक मोठे रोमन मोझाइक सापडले आहे. जमीनीवर केलेले आहे व माणसांची चित्रे त्यात त्यांचे हाव भाव चेहर्‍यावरील भाव हात वारे व्यक्त केलेले आहेत. मस्तच

Pages