आमच्या घरातल्या भिंती बोलतात..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 September, 2022 - 17:06

आमच्या घरातल्या भिंती बोलतात..

छे!, भुताटकी नाही. चमत्कार तर बिलकुल नाही. पण खरेच आमच्या घरातल्या भिंती बोलतात. घरात गोकुळ नांदतेय याची साक्ष देतात. (हि उपमा मायबोलीकर विशाल कुलकर्णी यांच्या प्रतिसादातून ढापलेली Happy )

तर कुरीअरवाला असो वा स्विगीवाला, कोणीही सेल्समन दारात आला की सवयीने घरात डोकावतोच. आणि भिंतींवर नजर पडताच चार शब्द बोलल्याशिवाय त्यांना राहावत नाही. काहीजण तर भिंती बघायला मुद्दाम चार पावले आत येतात. कारण त्यांना भिंतीवर रेखाटलेल्या बालगोपाळांच्या कला खुणावतात.

----

चार पाच महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. एका शाळेच्या ईंटरव्यूला मुलाला काहीच लिहीता येत नाही म्हणून ॲडमिशन मिळाली नव्हती. अर्थात यात शाळेचा दोष नव्हता. वॅकेन्सी कमी होत्या आणि कँडीडेट जास्त. त्यामुळे त्यांनी हुशार मुलांना पहिली संधी दिली.

अर्थात यात आमच्या मुलाचाही काही दोष नव्हता. त्याचे प्लेग्रूप, नर्सरीला जायचे वय आले तेव्हाच कोरोनाचा जन्म झाला. लॉकडाऊन लागले. शाळा ऑनलाईन झाल्या. काही मुलांना ते ऑनलाईन प्रकरण झेपले. आमच्या पोराला नाही झेपले.

बर्रं, घरात आम्हीच शिकवावे म्हटले, तर आम्हाला दाद द्यायचा नाही. कारण त्याने कधी शाळाच बघितली नव्हती. शिक्षण हा प्रकारच माहीत नव्हता. त्यामुळे हात धरून लिहायला त्याला कधी शिकवू शकलो नाही. अगदी गेल्या दोन तीन महिन्यांपुर्वी त्याला पेन्सिल पकडून साधी स्ट्रेट लाईन मारता येत नव्हती.

.... 'पण अपना टाईम आयेगा' म्हणत एक दिवस दिव्यशक्ती प्राप्त झाल्यासारखे ऊठला. पेन, पेन्सिल, खडू, स्केचपेन जे हातात सापडेल ते घेऊन भिंती रंगवत सुटला. आम्ही त्याला अडवले नाही. कारण त्या भिंती त्याचीच वाट बघत होत्या. आम्ही स्वतःदेखील तो कधी भिंती रंगवायला सुरुवात करतोय याची वाट बघत होतो. आणि "देर आये पर दुरुस्त आये" म्हणत एकदा सुरुवात करताच त्याने मागे वळून बघितले नाही. एवढ्या काळाचा बॅकलॉग जो भरून काढायचा होता.

आता त्याला कोणी काही शिकवायची गरज पडत नाही. टीव्हीवर यूट्यूब चॅनेल लावतो आणि तिथे जे दिसते ते मोठमोठ्याने गात लिहून काढतो. अक्षरे लिहितो, आकडे लिहितो.. ईंग्लिश लिहीतो, मराठी लिहितो.. कॅपिटल लिहितो, स्मॉल लिहितो.. चित्रे काढतो, ती रंगवतो.. कधी जमिनीवर झोपून, तर कधी सोफ्यावर ऊभा राहून.. तर कधी कपाटावर चढून लिहितो. नवनवीन कोर्‍या भिंती शोधमोहीमेत त्याचे वॉश बेसिन आणि किचन सिंकवरही चढून झालेय. आणि आता अखेरीस घरच्या भिंती कमी पडू लागल्या म्हणत त्याने नोटबूक आणि ब्लॅकबोर्डवर लिहायला सुरुवात केली आहे.

तरीही भिंतींवरचे प्रेम कायम आहेच. आधीच्या लाईट कलर पेन्सिलींच्या लिखाणावर नवे लिखाण पुन्हा ठळक ऊठून दिसावे म्हणून आम्ही आता त्याला स्केचपेन द्यायला सुरुवात केली आहे. कधी मूड आला तर क्ले पासून शेप बनवत तेच भिंतींवरही चिकटवतो. सभोवताली चारही दिशांना पसरलेला कॅनव्हास पुरेपूर वापरतो Happy

ही त्याचीच काही झलक..
आमच्या बोलक्या भिंती Happy

१)
01.jpg
.
२)
02.jpg
.
३)
03.jpg
.
४)
04.jpg
.
५)
05.jpg
.

लिहिण्यासाठी कितीही ऊंचावर चढायची तयारी.. उच्च उच्च शिक्षण म्हणतात ते हेच Happy
६)
07.jpg
.

आणि तिथून कोसळून हात गळ्यात आला तरी आमचा उत्साह काही मावळत नाही Happy
७)
06.jpg
.

नवीन घर शोधताना एखादी छोटीशी रूम किड्स रूम असावी, आणि आपण ती छान सजवावी अशी बायकोची फार ईच्छा होती. ईथले जागेचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते सोपे नव्हते. पण आता त्याचे काही वाटत नाही. लिविंग रूम असो वा बेडरूम वा मास्टर बेडरूम, किचनपासून बाथरूमपर्यंत सारेच किड्स रूम वाटतात आता Happy

८)
08.jpg
.

पण तरी एक बरे आहे अजून वॉटर कलर त्याच्या आयुष्यात आले नाहीत. आज ना उद्या येतीलच. कारण त्याच्या ताईच्या आयुष्यात ते येऊन गेलेत. हे भिंती-चित्रांची सुरुवात करायचे श्रेय तिलाच तर जाते.

चला तर आता थोडे फ्लॅशबॅकमध्ये जाऊया .....

-----------------------------

हे तिचे अगदी पहिले भिंतीवर काही रेखाटलेले. लहानपणी मुंबईतल्या एका घरात. साधेसेच काहीतरी. अगदी टेबलावर चढून वगैरे.

९)
09.jpg
.
१०)
10.jpg
.

या पहिल्या रोपट्याचा कौतुकाने फोटो काढला. अन बघता बघता त्याचा वटवृक्ष झाला. मुंबईतले हे घर लवकरच सोडल्याने ईथे पुर्ण रंगरंगोटी करता आली नाही. पण नवी मुंबईत एक आमचे भाड्याचे आणि एक आजोळचे हक्काचे, अशी दोन घरे तिला मिळाली. शक्यतो साधी पेन्सिल वा रंगीत खडूच द्यायचो. जेणेकरून ते पुसून पुन्हा कोरी जागा तिला देता यावी. पण जेव्हा ईतर रंगप्रकारांशी तिची ओळख झाली तेव्हा ते ही भिंतीवर अवतरायला सुरुवात झाली.

नव्या भाड्याच्या घराचे उद्घाटनच असे आपले नाव लिहून झाले. पोरगी जेमतेम सव्वादोन वर्षांची होती. त्या वयात आपले नाव लिहिते, ते देखील बापापेक्षा छान अक्षर काढून याचेच जास्त कौतुक होते.

.
दारावर तुमच्या नावाची पाटी आहे तर खिडकीवर माझ्या नावाची हवी Happy
११)
11.jpg
.

आणि मग हळू हळू भिंती भरू लागल्या...
१२)
12.jpg
.
१३)
13.jpg
.

लोकांच्या घरात लक्ष्मीची पावले उमटतात, आमच्या घरात हे असे हात उमटले Happy
१४)
14.jpg
.
१५)
15.jpg
.

आमच्या लक्ष्मीने आपली स्वतःची पावलेही रंगवायची सोडली नाहीत.
१६)
16.jpg
.

हातात पेन्सिल असो वा पेंट ब्रश. हवा तसा, हवा तिथे स्ट्रोक फिरवायला तिचा हात कधी कचरायचा नाही. त्यामुळे आम्हीही कधी तिला अडवले नाही.
१७)
17.jpg
.

वॉर्डरोब देखील यातून सुटले नाही.
१८)
18.jpg
.

पोरगी मुळातच हुशार होती. गणितही चांगले होते. त्यामुळे पाच वर्षांची होईस्तोवर ती तीन अंकी संख्यांची बेरीज करू लागलेली. पण हे तेव्हा आऊट ऑफ सिलॅबस होते. त्यामुळे पुस्तकात अशी गणिते नव्हती. मग मी आकडे बोलायचो, आणि ती भिंतींवर लिहून त्यांची बेरीज करायची.

१९)
19.jpg
.

पुढल्या वर्षी लॉकडाऊन लागला तेव्हा घरबसल्या खेळायच्या अनेक खेळांपैकी हा एक आमचा आवडीचा खेळ होता Happy

२०)
20.jpg
.

लॉकडाऊन काळातीलच एक घटना. त्या घरात एक मुलांच्या फोटोचे कोलाज करत मोठाले पोस्टर बनवलेले. एक दिवस ते भिंतीवरून निखळले. आणि त्याची मागची पांढरीशुभ्र बाजू उघडी पडली. एवढा मोठा कॅनव्हास लेकीच्या नजरेतून लपणार थोडी होता. मग ते पोस्टर उलटे करून त्यावर तिने आपला हात साफ केला. मोठ्या भिंतींवरचीच खेळाडू असल्याने तिने पंधरा वीस मिनिटातच पुर्ण जागा व्यापून टाकली. एक संध्याकाळ सत्कारणी लागली Happy

२१)
21.jpg
.

पुढे मग हाच पोस्टर आमच्या त्या घराची शान वाढवत होता.
२२)
22.jpg
.

काही भिंती तिच्या कलाकारीने छान दिसायच्या, तर काहींना तिने घाण केले. अर्थात आम्हाला तरी कधी तसे वाटले नाही. आपलीच पोरं, कौतुकच वाटणार. पण समोरून येणार्‍या प्रतिसादांमध्ये नेहमीच कौतुकाचे बोल नसायचे.

"मुलांनी भिंती किती घाण करून ठेवल्यात. तुम्ही त्यांना अडवत का नाहीत.. ओरडत का नाही.. बूकमध्ये लिहायची सवय का नाही लावत.. " असेही कधीतरी ऐकावे लागायचे.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण हौसेला मोल नसते. आणि आपल्या हौसेचे मोल कोणाला पटवून द्यायच्या भानगडीत पडूही नये.
आमच्या दोन्ही घरात मात्र प्रत्येकालाच मुलांच्या या रंगरंगोटीचे कौतुक आहे. रोज दिवसभरात त्यांनी जे प्रताप केले त्याचे फोटो काढावेत आणि फॅमिली ग्रूपवर टाकावेत हे रुटीन आहे.

आज पोरगी जे काही झरझर स्केचेस काढते... किंवा रंगरंगोटी करते ... जे काही छान असेल, वा ठिकठाक असेल.. पण मनात कसलाही किंतु परंतु न ठेवता जे पटपट तिचा हात चालतो. त्याचे बीज कदाचित यातच रुजले असावे. तो कॉन्फिडन्स कदाचित तिला या बिनधास्त भिंती रंगवण्यातून मिळाला असावा.

ते भाड्याचे घर सोडताना त्यातील भिंती सोबत नेता येणार नाहीत याचेच सर्वात जास्त वाईट वाटत होते. त्यात बरेच गोड आठवणी सामावल्या होत्या. जाण्यापुर्वी त्या सर्वांचा एक छानसा विडिओ काढायचे मनात होते. पण कोविडकाळात घर शिफ्ट करायच्या धांदलीत ते डोक्यातून निसटलेच.. Sad

नवीन घरातल्या कोर्‍यापान भिंती पाहून, राहून राहून त्यांचीच आठवण येत होती. जमिनीवरील खेळण्यांचा पसारा जिवंतपणाची साक्ष रोज द्यायचा. पण भिंती अजूनही सुप्तावस्थेतच होत्या. लेकीचीही भिंत रंगवायची हौस आता फिटली होती. त्यामुळे छोट्या ऋन्मेषवरच भिस्त होती. थोडी वाट बघायला लावली त्याने. पण एकदा तो रंगात येताच पुन्हा आमच्या घरात गोकुळ नांदू लागले.

हा चार दिवसांपुर्वीचा फोटो. सध्या त्याला भिंती कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्याने भूखंड हडपायला सुरुवात केली आहे Happy

२३)
23.jpg
.

आणि हो, आता फायनली आम्ही त्याला पाटी पेन्सिल आणून दिली आहे. ती वापरून त्याची सेल्फ स्टडी चालू आहे. आयुष्यात पुन्हा कधी ईंटरव्यू द्यायची वेळ आली तर आता चिंता नसावी Happy

२४)
24.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा, फार सुरेख. कौतुक मुलं आणि पालक सर्वांचं.

आम्ही तिघं भावंडंही लहानपणी अशाच भिंती रंगवायचो, आई बाबांनी कधीच अडवले नाही.

धन्यवाद अंजू

माझ्याकडे रंगवायची कला नव्हती. त्यामुळे मी घरभर स्टिकर लावायचो. आईबाबा अडवायचे नाहीत. पण आज्जीच्या जाम शिव्या खायचो Happy

हौस, कौतुक सगळे स्वत:च्या घरी ठिक आहे. पण दुसऱ्यांच्या घरात, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर कुठेही, जे आपले नाही तिथे लिहू नये हे मात्र शिकवावे.

सुंदर लेख आणि फोटो.

>> हो, तो स्टिकरही ऑर्डर करतो. तो काढताना आणखी घराचा कलर निघून यायचा ही भिती होती. >>

काय अनुभव आला या स्टिकर्सचा... उपयोग होतो का?
बहुधा व्हाइट बोर्ड मार्कर पेन वापरावे लागत असावेत. पुन्हा लिहिण्यासाठी आधी लिहिलेलं पुसले जाते का व्यवस्थित?

घराचा कलर निघून यायचा ही भिती >> हे कळायला वेळ लागेल असे वाटते.

काय अनुभव आला या स्टिकर्सचा... उपयोग होतो का?
>>>>

मीत बरी आठवण केलीत. परवाच आलेत हे. अजून पार्सलही फोडले नाही दिवाळी साफसफाईच्या नादात.
उद्या चेक करतो. ईथे अभिप्राय जरूर देतो.

घरात लहान मुलं असतील आणि घराच्या भिंतीवर एकही रेघोटी उमटली नसेल तर मग ते घर कसल?
हे असं बोलकं घरंच मनाला जास्त भावतं.

भिंतीवरून आठवले. नात्यात भिंत असू नये. माणुसकीचे जिवंत उदाहरण असलेल्या, शाहरूख खानाला अन्नाला लावणार्‍याच्या बाबतीत तर असे अजिबात होऊ नये. नात्यातल्या भिंती बोलत नाहीत. शाखाच्या फॅन्सनी त्यांच्या आयडॉलवरच्या उपकाराचे ओझे म्हणून काहीतरी करायला हवे. या भिंती तुटायला हव्यात..
uday-and-nargis-1471163055.jpg

एका मायबोलीकर मैत्रीणीने हे व्हॉटसप फॉर्वर्ड पाठवले. तिला हे वाचून हा धागा आठवला. मलाही ही पोस्ट पटली आणि आवडली. म्हणून ईथे शेअर करत आहे.

===================

माझ्या आणि मुलीच्या लहानपणीची गोष्ट :
गिरगीटायनम:

म्हणजे मी तीन वर्षाचा पालक होतो, तेव्हाची गोष्ट आहे ही.
माझी मुलगी भिंतीसमोर उभं राहून भिंतीवर दे दणादण उभ्या रेघा मारत होती. मी लांबूनच हे सारं पाहात होतो.
तिने माझ्याकडे वळून पाहिलं, आणि तिला समजलं की, ‘मला काहीच कळलेलं नाही.’ ती मला समजावत म्हणाली, “मी आपल्या घरात झाडं लावते आहे झाडं!
मग जेवायला बसायच्यावेळी मी तिला म्हणायचो, “चला.. झाडाखाली जेवायला बसूया.”
आता तिने झाडांना पानं न काढता डायरेक्ट फळंच काढली. त्यामुळे आता आमच्या भितींवरल्या बागेत नारळाची, आंब्याची, कलिंगडाची, काकडीची आणि बटाट्याच्या भाजीची झाडे ऊभी राहिली. मग रोज जेवताना वेगवेगळ्या झाडाखाली आम्ही बसू लागलो.
काही दिवसात आमच्या बागेत हायब्रीड झाडे आली. म्हणजे आंब्याच्या झाडावर आंबे आणि नारळ तर लागलेच पण त्यावर गुलाब पण फुलले. नारळाच्या झाडावर पेरू पण लागले आणि मोगरे फुलले.
मग मी लोकांना सांगत असे, “श्रीमंत माणसांच्या बागा घराबाहेर असतात आणि त्यांना झाडे वाढण्यासाठी वाट पाहावी लागते. पण आम्ही अती श्रीमंत आहोत. आमच्या घरातच बाग आहे. आमच्या बागेतली झाडे आम्हाला पाहिजे तशी आणि पाहिजे तेव्हाच वाढतात!’’
एका भिंतीवर बाग फुलल्यावर समोरच्या भितींवर मुलीने काही गिरगीट चित्र काढली. अर्थातच मला ती चित्रे समजली नाहीत. तिच्याशी गप्पा मारल्यावर मला कळलं की, ते सर्व प्राणी असून ते आमच्या बागेत येण्यासाठी निघाले आहेत.
काही दिवसातच आम्ही घर बदलायचं ठरवलं.
हे घर विकत घेण्यासाठी जे पहिले गृहस्थ आले ते आमच्या भिंती पाहून हबकलेच. त्यांना काही कळेचना. भिंतीकडे बोट दाखवत आणि माझ्याकडे पाहात त्यांनी विचारलं, ‘‘हेss हे काssय?”
मी आनंदाने म्हणालो, “हे होय.. ह्या आंब्याच्या झाडाला आंबे आणि नारळ लागलेत आणि त्यावर हे गुलाब पण फुलले आहेत!”
मला वाटलं ते हे ऐकल्यावर खूश होतील. म्हणून मी त्यांना उत्साहाने विचारल, “आणि हे झाड कुठलं आहे ते सांगू का?”
माझ्या डोळ्यात वेडाची झांक दिसते का हे पाहात ते दचकून म्हणाले, “नको.नको. जागेची किंमतच सांगा.”
तुमच्या लक्षात येतंय का, ‘मुलांनी आपल्याला समजेल अशी चित्र नाही काढली पाहिजेत तर.. मुलांनी काढलेलं चित्र आपण समजून घेतलं पाहिजेत.’

या आणि अशा गिरगिटमुळे मला अनेक साक्षात्कार झाले, खूप शिकायला मिळालं. आपण मोठी माणसं जे एकमेकांशी बोलतो किंवा आपण जे पुस्तकातून वाचतो ते आपणा सर्वांना समजतं कारण आपली बोलण्याची आणि वाचण्याची भाषा प्रमाणित आहे. पण प्रत्येक मुलाचं गिरगीट ही त्याची-त्याची अप्रमाणित भाषा आहे. शक्यता आहे की, एखादवेळेस एका मुलाची अप्रमाणित भाषा दुसर्‍या मुलास कळेल ही. पण आपणाला मुलाची गिरगीट भाषा समजून घ्यायची असेल तर आपण आपला अहं बाजूला सारुन मुलाला शरण जायला पाहिजे!
या निरागस मुलांची गिरगीट भाषा, अभिव्यक्ती आपल्याला समजणं अशक्य का होतं? कारण आपल्यातलं खट्याळ निरागस मूल प्रौढ झालं असेल तर असं होतं. आपण मुलांकडून शिकायला उत्सुक नसू तर असं होतं. तुम्हाला जर सतत मुलांना शिकवायचीच आणि उपदेश करण्याचीच सवय असेल तर असं होतंच होतं!

भिंतीवरचं किंवा कागदावरचं गिरगीट हे जरी ‘आपल्याला गिरगीट’ वाटत असलं तरी ते तसं नसतं कारण ती त्या मुलाची ‘स्वतंत्र अभिव्यक्ती’ असते! म्हणून मुलांच हे गिरगीट प्रकरण जरा वेगळ्याप्रकारे किंवा गंभीरपणे समजून घेतलं पाहिजे. वय वर्ष तीन ते सुमारे साडेचार वर्षापर्यंत मुले हातात खडू किंवा पेन्सिल आली की मिळेल त्या पृष्ठभागावर गिरगीट करतात. आणि मुख्य म्हणजे हे त्यांच्या निरोगी मनस्वास्थ्याचं लक्षण आहे.
मुलांना आपल्या भाषेत आपल्या मनातील विचार सांगायचे असतात. यासाठी आवश्यक शब्दसंपत्ती आणि संकल्पना याची वानवा असल्याने ते गिरगीटच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करत असतात. अशावेळी मोठ्यांनी जर समंजस भूमिका घेतली तर मुलांच्या कल्पनाशक्तीला पालवी फुटून मुले अधिक सर्जनशील होतात.
पण सर्वच घरात असे घडते असे नाही. पण कुठल्या घरातील माणसे समंजस आहेत आणि कुठल्या घरातील नाहीत हे मुलाचे गिरगीट पाहूनही ओळखता येते.
समंजस पालकांच्या घरात :
• मुलांच्या गिरगीटचे फटकारे (स्ट्रोक्स) हे मोठे असतात, खूप आडवे किंवा खूप ऊभे पण असतात.
• हे फटकारे तुटक नसतात तर ते आत्मविश्वासपूर्वक मारलेले फटकारे सलग असतात.
• हे फटकारे अनेकवेळा कागदाच्या कडांपर्यंत जाऊन भिडलेले असतात.
• गिरगीट हे कागदाच्या मध्यभागी असते, मध्यातून ते पसरत गेलेले असते.
• काहीवेळा ‘गिरगीट मालीका’ पण असते.
• काहीवेळा ‘ऊभ्या’ आणि ‘आडव्या’ गिरगिटांची एक रचना केलेली असते.
• गिरगीटखाली उभ्या आडव्या रेषा मारून आपण काहीतरी लिहिले आहे, असं ही मुले सांगतात.
• ही मुले कधीही गिरगीटला चौकट आखत नाहीत.
• गिरगीट कागदाच्या कोपर्‍यात काढत नाहीत.
• हातात खडू आल्यावर ‘आता काय काढावं?’ असा विचार करत बसत नाहीत.
• मुख्य म्हणजे, ‘आता मी काय काढू? कुठलं चित्र काढू?’ असं विचारून मोठ्या माणसांच्या तोंडाकडे पाहात, त्यांच्या परवानगीची वाट पाहात बसत नाहीत.
• सर्वात मुख्य म्हणजे, गिरगीट हा उत्स्फूर्त आविष्कार आहे, त्याची सक्ती करता येत नाही.
ही यादी आणखी पण वाढवता येईल.
पण ‘गिरगीट’ मागील काही महत्वाच्या गोष्टी पालकांनी गंभीरपणे समजून घेणे महत्वाचे आहे.

 शक्यता आहे की तुमच्या मुलाने हातात खडूच न मिळाल्याने किंवा घरातल्यांच्या धाकाने त्याने गिरगीटला वेगळा पर्याय शोधला असेल तर त्याला प्रोत्साहित करा. (उदा. खेळण्यांचे तुम्हाला न कळणारे आकार करणं, उशांचा डोंगर करणं इत्यादी)
 गिरगीट करण्यासाठी मुलांना मोठा कागद आणि ऑइल पेस्टलस् द्यावेत. (हे नॉन टॉक्सिक असतात)
 मुलांचे गिरगीट मुलांकडून समजून घ्यावे. शब्दसंपत्ती कमी असल्याने काहीवेळा समजावून सांगताना मुलांचा गोंधळ होतो. अशावेळी शांत राहून त्याला पुरेसा वेळ देणे.
 मुलाला त्याचे गिरगीट नाहीच समजावून सांगता आले तरी काही हरकत नाही, हे लक्षात ठेवावे.
 मुलांची सर्जनशीलता आणि अचाट कल्पनाशक्ती गिरगीट मधूनच सुसाट धावत असते, हे पक्‍कं लक्षात ठेवा.
‘जे पालक आपल्या लहान मुलांची लहान-सहान गिरगिटं समजून घेतात त्यांचीच मुलं ‘खरोखर मोठी’ होतात’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.
................................................................................
- राजीव तांबे
- rajcopper@gmail.com

नवे घर, नवे रंगकाम..

मुंबईच्या घरात मुलाने पहिले पाऊल टाकताच डिक्लेअर केले, "अरे वा, आता इथल्या भिंती मी रंगवणार.." केवढा तो कॉन्फिडन्स Happy

FB_IMG_1689528784807.jpg

FB_IMG_1689528787582.jpg
.
FB_IMG_1689528790640.jpg

Pages