लेह लडाख वारी भाग बारा

Submitted by pravintherider on 29 September, 2022 - 05:36

श्रीनगर ते सोहनेवाल अंतर ४९७ किमी
आजची सकाळ जरा जास्तच आल्हाददायक होती, एक तर लेह लडाख च स्वप्न पूर्ण झालं होतं आणि ते पण मनाली श्रीनगर पूर्ण सर्किट. समीर आणि मी तयार झालो तो पर्यंत बाकी दोघे अजून साखर झोपेत होते. त्यांना पटकन आवरायला सांगून आम्ही गाडी बाहेर घेवून थोडी साफ केली.
साधारण सहा पर्यंत आम्ही श्री नगर मधून निघालो, दोन्ही बाजूला पंजाब हरयाणा सारखी शेती आहे. रस्ता मस्त चार पदरी होता. भारतीय सैनिक पूर्ण रस्ता तपासताना दिसत होते, रात्री कोणी रोड वर किंवा गवतात काही आक्षपार्ह वस्तू ठेवली असेल तर. आम्ही अनंतनाग पार केलं, नी मला काही वर्षा पूर्वी अमरनाथ यात्रा साठी याच भागात मुक्काम केला होता ती आठवण आली. (बस वर दगड फेक झाली होती, त्या नंतर लगेच मिलिटरी कॅम्प मध्ये आम्हाला आश्रय दिला होता) थोड पुढे आलो तर जवाहर टनेल च्या पाच सहा किमी आधी सर्व गाड्या अडवल्या होत्या. आम्ही गाडी साईड ला लावून विचारायला गेलो तर समजलं की, ८ वाजता ट्रॅफिक सुरू होणार आहे तो पर्यंत आजू बाजूला खुप विक्रेते जमा झाले होतेच. मग काय समीर परत सुरू झाला, नशीब त्यांच्या कडे स्वाइप मशिन नव्हती. तरी पण अक्रोड, बदाम, लहान जॅकेट आणि बॅट घेतलीच त्याने. मी पण बॅट आणि अक्रोड घेतले. आठ वाजता ट्रॅफिक सुरू झाली, तस तर जोजीला नंतर गाडी चा त्रास कमी झाला होताच त्यामुळे गाडी एकदम जबरदस्त चालत होती. जवाहर टनेल पार केला नी परत ट्रॅफिक लागली कारण रोड च काम चालू होत त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक चालू होती. काल परवा पर्यंत बनिहाल मध्ये दरड कोसळली होती त्यामुळे रस्ता खुप खराब होता. काश्मिर मध्ये बाहेरील गाडी अडवून काही लोक पैसे मागतात, टुरिस्ट टॅक्स. काल श्रीनगर च्या आधी आणि आज बनीहाल नंतर आम्हाला अडवलं होत, आम्ही काही न बोलता पैसे दिले. आम्हाला कुठे ही भांडणं करायचं नव्हत आणि शंभर दोनशे रुपये साठी तर नक्कीच नाही. या लोकांचा काही भरोसा नाही पुढे फोन करून गाडी अडवणार किंवा भांडणं करणार... असो.
रस्ता खुप खराब आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती, त्या ठिकाणी तर खूप जास्त चिखल होता. खरंतर ज्या ठिकाणी रोड आणि रेल्वे ची काम चालू आहेत त्याच भागात दरड कोसळन्याच प्रमाण जास्त वाढले आहे. बानिहाल पासून ते चेनानी पर्यंत रस्ता खराबच होता. चेनानी नाशनी टनेल पार केल्या नंतर लगेच रस्ता चार पदरी झाला या बोगद्या मुळे कमीत कमी ४०-५० किमी आणि दोन तास नक्की वाचतात. चेनानी नाशनी बोगद्या नंतर पूर्ण रस्ता चार पदरी असेल हे माहित होत, मग एक मस्त हॉटेल बघितलं नी नाष्टा करायला थांबलो. छोले भटुरे, आलू पराठा मागवलं. नाष्टा करून निघालो, नी त्यांना विचारलं वैष्णो देवी मंदीर जायचं आहे का ? पावसामुळे त्यांनी नकार दिला, पुढे ट्रॅफिक मध्ये वाढ झाली होती. उधमपूर मधून एक  शॉर्टकट दिसत होता जो सरळ पठाणकोट ला जातो आणि अंतर पण पन्नास साठ किमी कमी दिसत होत पण मी हा रस्ता सोडायला तयार नव्हतो. एक तर हा पूर्ण रस्ता मला माहित होता नी अनोळखी रस्ता ने जावून त्रास करण्या पेक्षा थोड अंतर वाढले तरी चालेल या मताचा मी आहे. गाडी कोणत्या रस्त्याने न्यायची हा निर्णय शेवटी नेहमीच माझा असायचा. (गूगल वाली बाई ऐकायलाच तयार नाही) मग थोडा वेळ तिला गप्प केलं नी जम्मू बायपास ने निघालो, तावी नदी वरील भव्य पुल पार केला. ट्रॅफिक मुळे थोडा वेळ गेलाच होता आणि मग एका ठिकाणी थांबून मस्त ज्यूस घेतला. काही वेळातच आम्ही जम्मू आणि काश्मीर सीमा रेखा पार केली नी, सर्वांचे मोबाईल लगेच वाजायला लागले. समीर चा एक मित्र दासुआ च्या जवळच राहतो. पठाणकोट ते अंबाला पर्यंत हॉटेल विराट नावाची चेन आहे त्यांची. समीर ला त्याने आधीच सांगीतलं होतं की, या रस्त्याने गेला तर सांग पण आमचा प्लॅन मनाली मार्गे परत जाण्याचा होता. त्याने आज त्याच स्टेटस पाहून त्याला कॉल केला की तू जम्मू वरुन आला आहेस आणि मला एक फोन नाही केला, मग आम्ही कुठे आहे ते विचारून पुढे पंधरा किमी अंतरावर असलेल्या त्याच्या हॉटेल मध्ये आमची जेवण्याची सोय केली. मस्त फाईव स्टार सुविधा आणि अप्रतिम जेवण करून आम्ही हॉटेल ची मस्त सैर केली. त्यात आमचे दोन तास आरामात गेले, फिरून आलो तर म्हणे तुमच्या साठी रूम अरेंज केली आहे आज इकडेच आराम करा. आम्ही विनम्र पने नकार दिला नी पुढे निघालो. आज आम्ही अंबाला पोहचणार नाही याची खात्री पटली होती, मग जालंधर मध्ये मुक्काम करू शकतो असं ठरवलं पण उजेड होता मग जालंधर बायपास करून आम्ही सरळ अंबाला कडे निघालो नी रोड च काम चालू असल्याने खुप ट्रॅफिक लागली. यात वेळ पण गेला आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती, मग सोहनेवाल जवळ एक छान हॉटेल पाहून त्या मध्ये रूम घेतली. जेवण्याची इच्छा नव्हती. रूम आज पण आम्हाला १२०० /- मध्ये भेटली होती. आज जास्त थकलो नव्हतो मग खाली फिरायला आलो तर हॉटेल मध्ये मस्त गर्दी होती. मग मस्त मिक्स भजी, पराठा ची ऑर्डर दिली. नाही नाही म्हणता पोटभर खाल्लच वरून पंजाबी लस्सी मागवली. आज चा दिवस एकदम मस्त गेला होता. रूम वर येवून सर्व हिशोब केला,
उद्या जास्तीत जास्त अंतर जायचं ठरवलं, तस् पण उद्या दोन तीन तास मला आराम होता, कारण हरयाणा ट्रान्स वे वर बुरहान गाडी चालवनार होता. मग मस्त AC चालू केला नी झोपी गेलो...

दिवस तेरावा...
सोहनेवाल ते चितोडगड अंतर ७९७ किमी
आज जवळ जवळ सर्व रस्ता माहीत होता, सकाळी सहा वाजता निघालो आणि साधारण आठ वाजता एक होटेल पाहून नाष्टा करायला थांबलो. पंजाबीच नाष्टा करायचा होता, मग दोन तीन प्रकारचे पराठे मागवले आणि सोबत बटर... मस्त मजा आली. नाष्टा करून निघालो नी बुरहान कडे गाडी दिली चालवायला मी आणि समीर मागे बसलो होतो. मग काय फुल्ल टू मस्ती चालू झाली. नारनौल पर्यंत अडीचशे किमी त्याने न थांबता गाडी चालवली आणि नंतर परत मी चालवायला बसलो. कारण राजस्थान पोलिसांचा वाईट अनुभव. आज मात्र आम्ही जयपुर च्या आधी पासून मोबाईल वर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली होती. कारण आज आम्ही चुक नसेल तर बिलकुल ऐकणार नव्हतो, पण काहीही न घडता आम्ही जयपूर पार केलं. एक छान हॉटेल पाहून जेवायला थांबलो नी जोराचा पाऊस चालू झाला. इकडे तोपर्यंत जेवण की नाष्टा हे ठरत नव्हत मग त्याला विचारलं गरम काय आहे तर बोलतो की पराठा, छोले भटुरे, मसाला पूरी, पाव भाजी या करता फेमस आहे. मग सर्व एक एक प्लेट मागवलं. आज चित्तोडगड च्या जवळपास मुक्काम करायच ठरवलं होत पण पाऊस होता. मग आरामात गाडी चालवत, चितोडगड च्या थोड आधी एक छान हॉटेल पाहून थांबलो. त्याने १०००/- मध्ये रूम दिली ती पण AC आणि सकाळी गरम पाणी. जेवण आता पण एकदम मस्त भेटलं... भरपेट जेवण करून आम्ही झोपायला गेलो. बाहेर चिखल होता मग फिरायला जायचं टाळलं. पण झोपण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर निघून न थांबता घरी जायचं की उज्जैन जायचं यावर बराच वेळ चर्चा केली. पहाटे लवकर निघालो तर घरी जाणे शक्य तर होत पण यांना मुंबई ला जायचं होतं मग  ठरवलं की उद्या उज्जैन दर्शन आणि सराफा बाजार जावू आणि परवा दुपार पर्यंत घरी... मग जास्त विचार न करता झोपी गेलो.

#दोन दिवस आम्ही कुठे ही जास्त न थांबता प्रवास केला.  गाडी ने जाताना त्रास दिला होता पण येताना कुठे ही त्रास दिला नाही.
#सर्व लोक बोलतात पण, एक गोष्ट खरी आहे की सर्वात खराब रस्ते महाराष्ट्र राज्यात पहायला मिळतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users