लेह लडाख वारी भाग दहा

Submitted by pravintherider on 24 September, 2022 - 01:59

हूंडर ते पंगोग लेक अंतर २४० किमी
आज आमचा दिवस लवकर सुरू झाला होता, साधारण सहा पर्यंत आम्ही तयार होवुन निघालो तो पर्यंत होटेल मालक आमचं पॅक लंच घेवुन आला होता. त्यांना धन्यवाद देवुन आम्ही लगेच निघालो. रोड ला आलो तर मिलिटरी ट्रक सियाचीन कडे चालले होते. दोन मिनिट त्यांना अभिवादन करून आम्ही काल आलो त्याच रस्त्याने खालसर कडे निघालो. काही अंतर गेल्यावर उजवीकडे गेलं तर खार्दुंग ला आणि डावीकडे गेलो तर आगम, श्योक, दुर्बुक अशा वेगवेगळ्या गावातून जातो. आज जवळपास पुर्ण रस्ता नदी किनारा किंवा नदी मधून जाणारा होता. नदी मधून जाणारा रस्ता खुप खराब आहे आणि काही ठिकाणी तर आता दरड आपल्यावर कोसळणार की काय वाटत राहतं. आम्ही सकाळी निघालो त्या मुळे वॉटर क्रॉसिंग ला पाणी कमी आहे असं ड्रायव्हर सांगत होता. गुडघाभर पाणी पण कमी वाटतं कमाल आहे. दोन तीन चांगल्या मोठ्या वॉटर क्रॉसिंग आज आम्ही पार केल्या. पुढे श्योक गावात आम्ही एका ठिकाणी नाष्टा करायला थांबलो. पॅक लंच सोबत होता मग गरमा गरम चहा घेतला नी पुढे निघालो. पुढे आम्ही आगम मध्ये पण थांबलो. श्योक, आगम या गावाबद्दल आधी पण वाचलं होतं त्या मुळे दोन्ही ठिकाणी आम्ही मस्त फोटोज् घेतले. आगम नंतर थोडा वेळ रस्ता छान आहे मात्र खूप छोटा आहे त्यामुळे काही वेळा ट्रक आले तर गाडी मागे किंवा खाली घेवून वाट द्यावी लागते.
साधारण तांगस्ते पर्यंत रस्ता खराबच होता असं म्हणायला हरकत नाही. येथून पुढे लगेच उजवीकडे चांग लांग ला आणि डावी कडे पंगोंग लेक. तांगस्ते नंतर मस्त रस्ता चालू झाला. दोन्ही बाजूला मस्त हिरवळ आणि पाणी सतत दिसत राहत. एका ठिकाणी लडाख मधील प्रसिद्ध प्राणी दिसला. बरेच लोक उभे राहून फोटोज् काढत होते.

थोड्याच वेळात पुन्हा एकदा रस्ता खुप खराब चालू झाला, हा तोच रस्ता जो काल बंद होता. शेवटचे काही किमी रस्ता खराब, खुप ट्रॅफिक, काम चालू त्या मुळे एक बाजू बंद अशा एक ना अनेक अडचणी समोर आल्या पण ज्या वेळी आम्ही त्या तलावा जवळ पोहचलो त्या क्षणी समजलं की, का लोक एवढे वेडे आहेत. इतका त्रास सहन करून ईकडे येतात. खुप सारे फोटोज्, पाण्यामध्ये जावून उभा राहिलो. एक वेगळीच अनुभूती जी शब्दात व्यक्त करता येत नाही.

आम्ही सकाळी नाष्टा केला त्या नंतर काही खाल्ल नव्हत. उशीर पण झाला होता मग ठरवलं की पुढे जावून जेवण करू. मग पुन्हा तांगस्ते पर्यंत आलो नी आता डावीकडे वळून चांग ला कडे निघालो. रस्ता सुरवातीपासून खराब चालू झाला. हि चढण खुप जीव घेते गाडीचा. खुप ठिकाणी गाड्या दरीत दिसत होत्या. रस्ता तर इतका खराब आणि लहान आहे की इनोवा आणि स्थानिक ड्रायव्हर असून पण त्रास होत होता. आज मात्र नक्कीच वाटलं, आपण आपली गाडी आणली नाही हे खुप योग्य केलं. चिखल, पाणी आणि मोठ मोठे खड्डे या मुळे त्रासात अजून भर पडली. जेव्हा वर पोहचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. येथे पण श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि हवा खुप थंड होती. आता मात्र पूर्ण उतार मिळेल आणि त्रास कमी होईल असं वाटलं पण ....
आम्ही चांग ला पास उतरायला सुरुवात केली, पण रस्ता मात्र अजून पण खराब होता आणि तो अजूनच खराब होत चालला होता. चांग ला पास हा खर्दुंग ला पेक्षा जास्त अवघड आहे हे नक्की. चांग ला पास खरच अवघड आहे. साधारण शक्ती च्या आधी रस्ता छान होता. थोडा ट्रॅफिक चा त्रास झाला पण साधारण सात पर्यंत आम्ही पुन्हा लेह मध्ये आलो. हॉटेल वर येवून मस्त तयार झालो नी पुन्हा एकदा मार्केट ला गेलो. थोडी खरेदी आणि नंतर जेवण करून आम्ही रूम वर परत आलो.
रूम वर येवून आमची आज बैठक झाली, कारण आमचा प्लॅन हा मनाली मार्गे परत जायचा होता पण आता समीर बुरहान ची पुन्हा त्याच रस्त्याने परत जाण्याची इच्छा नव्हती. तो पर्यंत पावसाने हिमाचल आणि जम्मू मध्ये हाहाकार उडवला होता. मनाली रस्ता दोन दिवस बंद झाला होता आणि जम्मू श्री नगर रस्ता पण बंद झाला होता. आम्ही आता दोन्ही बाजूंनी अडकलो होतो पण तरी  उद्या गुरुद्वारा, मग्नेटिक हिल आणि कारगिल युद्ध स्मारक पाहू. कारगील / द्रास मध्ये मुक्काम असा साधारण प्लॅन बनवला. पण पुन्हा एकदा उद्या हिमालय आम्हाला चकवा देणार होता की....

# मी आधी जम्मू श्रीनगर सोनमर्ग या रस्त्याने प्रवास केला आहे, त्या मुळे मला खात्री होती की हा रस्ता मनाली पेक्षा जास्त सोपा आहे.

# सर्वात महत्वाच म्हणजे की, लेह कडून श्रीनगर पर्यंत उतार जास्त आहे आणि मनाली जाताना चढ जास्त आहे.       लडाख मध्ये स्थानिक लोक गाडीचा AC वापरत नाही. आम्ही येताना AC बंद केला तेव्हा गाडी ने हिमालयात कमी त्रास दिला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup chhan lihit aahat. Waiting for Next episode. Please do share.
sorry Marathi jamat nahi so writing in English. Pudhachya bhagachya pratikshet

प्रविण, आज एका दमात सगळे भाग वाचुन काढले.

छान लिहीले आहे पण तुम्ही हिमालयात ज्या ठिकाणी गेला होतात तिथले फोटो टाकले असते तर या लेखांची मजा द्विगुणित झाली असती. ( खर सांगायचे तर अश्या ट्रिपचा एडिटेड व्हिडियो ब्लॉग बघायला अजुन मजा आली असती. तुम्ही बर्‍याच ठिकाणी खरच म्हटले आहे की तुम्ही अनुभवत असलेल्या हिमालयातल्या ठिकाणांचे, डोंगर रस्त्यांचे , तिथल्या नद्यानाल्यांचे सौंदर्य व ते बघुन आपल्याला काय वाटते ते शब्दात पकडणे खरच कठिण आहे)

एवढ्या मोठ्या प्रवासाचे धाडस केलेत त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण म्हणतात ना व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे! आणी हा अनुभव, तोही जिवलग मित्रांसोबत! त्याला किंमत नाही!