लेह लडाख वारी भाग नऊ

Submitted by pravintherider on 24 September, 2022 - 01:58

लेह ते हुंडर दिनांक १९-०८-२०२२ अंतर १३० किमी

आज पहाटे लवकर जाग आली होती, मग एकमेकांना त्रास देत मस्ती करत तयार झालो. आज कोणालाही कसला त्रास जाणवत नव्हता त्यामुळे मस्ती जास्त चालू होती. साधारण नऊ पर्यंत ड्रायव्हर आणि गाडी दोघे हजर झाले. त्यांनी सांगितलं की, पाणी इकडेच जास्त विकत घेऊन ठेवा पुढे महाग मिळेल. आज आम्ही खरदूंग ला चढनार होतो. समुद्र सपाटी पासून साधारण १७५०० फूट उंचीवर आहे. तिकडे श्वास घेण्यासाठी त्रास होतो तर कमी वेळ थांबा म्हणजे त्रास होत नाही.

लेह पासून निघालो तर मध्ये एक दोन गाड्या आम्हाला दिसल्या ज्यांना कदाचित विरळ हवे मुळे त्रास होत होता. खुप हळू हळू चालत होत्या त्यापैकी एक स्विफ्ट होती बंगाल ची आणि एक सोनेट हरयाणा ची. रस्ता थोडा खराब होता. काही वळणावर तर समोरील गाडी पण दिसत नाही पण ड्रायव्हर खरच छान होता.

विनाकारण घाई करत नव्हता. एका ठिकाणी थांबून मस्त लेह शहर आणि आमचे पण फोटोज् घेतले. साधारण दीड तासात आम्ही वर पोहचलो होतो. गर्दी होती पण पटकन फोटो घेतले नी मला थोडा श्वास घेण्यासाठी त्रास होतो असं जाणवायला लागलं. तस पण जास्त वेळ थांबणार नव्हतो मग लगेच खाली निघालो. नुब्रा व्हॅली कडे उतरताना मात्र रस्ता खुप खराब आहे आणि काम चालू असल्याने धूळ पण खूप होती. आम्ही खारदुंग ला उतरलो नि लगेच एका ठिकाणी नाष्टा करायला थांबलो कारण मला भूक लागली होती.

समीर, बुरहान, गणेश मागे नदी जवळ फोटो काढायला गेले तर मी मस्त नाष्टा केला. नूडल्स आणि गरमा गरम चहा. त्यांनी नाष्टा केला नाही याचा त्यांना नंतर त्रास झाला. पुढील थांबा होता फ्युचर बुद्धा म्हणून प्रसिद्ध असलेली भव्य मूर्ती... मात्र त्या आधीच खालसर च्या पुढे एका ठिकाणी रिव्हर राफ्टिंग चे बोर्ड बघितले. नुब्रा व्हॅलीत श्योक नदी मध्ये रिव्हर राफ्टिंग होते. मी सोडुन बाकी तिघांना पण रिव्हर राफ्टिंग करायची होती. इकडे मला पोहता येत नाहीच पण दोन फूट पाण्यात पण मी जात नाही आणि हे लोक १०००० फूट उंचीवर मला बोलता चल रिव्हर राफ्टिंग करायला. त्यांनी जावून त्यांची नावं दिली मी मस्त गाडी मध्ये विचार करत होतो की, इकडे बाकी लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. दोनच दिवस आधी यांना एवढा त्रास झाला होता तरी इतक्या उंचीवर त्यांना रिव्हर राफ्टिंग करायची आहे पण ऐकतील ते मित्र कसले... तो पर्यंत बुरहान अन् समीर मला येवून, चल रे, परत कधी येणार आणि आलो तरी आपण सोबत असू नसू. मला इतकं इमोशनल ब्लॅकमेल केलं की बोललो चल होईल ते होईल. रिव्हर राफ्टिंग दोन अंतराची होती एक चार किमी आणि एक आठ किमी अन् यांनी आठ किमी अंतर असणारी रिव्हर राफ्टिंग ठरवली.

आम्हाला त्यांनी कपडे, हेल्मेट आणि लाईफ जॅकेट दिलं. बर्फ वितळला होता त्यामुळे पाण्याला चांगलाच वेग होता.   सुरवातीला थोडी भिती वाटली पण नंतर मात्र खरंच खूप मजा आली. आज पण विचार करतो तेव्हा जाणवतं की, जर नसतो गेलो तर खूप मोठी चुक केली असती. मी घरी फोटो पाठवले तरी कोणाला विश्र्वास नव्हता की मी असं काही केलं असेल.

जेव्हा व्हिडिओ पाठवले तेव्हा त्यांना खरं वाटलं. आम्ही तिकडून परत येई पर्यंत तिघांना पण खायला मिळालं नाही अन् त्यामुळे मी त्यांची थोडी मजा घेत होतो. तिथेच एक छान हॉटेल पाहून मस्त पैकी दाल तडका, पुलाव, रोटी आणि पापड मागवलं.

आता आम्ही डिस्किट कडे निघालो होतो, मी ड्रायव्हिंग करत नव्हतो त्यामुळे आज पूर्ण वेळ मी व्हिडिओ शूटिंग करत होतो. आज चा रस्ता काही ठिकाणी खराब होता मात्र दोन्ही बाजूला खुप सुंदर डोंगर रांगा आणि रोड जवळून वाहणारी श्योक नदी. लडाख मध्ये एकाच वेळी वाळवंट, वाहतं पाणी, हिरवळ, बर्फ आणि डोंगर एकाच फ्रेम मध्ये पहायला मिळत. आज आम्हाला खुप मराठी लोक, बाइक रायडर भेटत होते. खरंच जगाच्या पाठीवर कुठेही जा, मराठी माणूस आणि प्लास्टिक मिळेलच... असो.

डिस्कित मॉनेस्ट्री आणि भव्य दिव्य अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. आज आम्हाला हुंदर मधील उंट आणि वाळवंट पहायचं होत नी दोन कुबड असलेल्या उंटाची सफर करायची होती. उंटा ची सफर करायला नाही मिळाली कारण २०० च्या वर लोक नंबर लावून उभे होते.

आम्ही मग वाळवंटात खुप सारे फोटो आणि व्हिडिओ घेवुन परत गाडी कडे आलो. उंटाची सफर नाही मात्र फोटो मिळाले कारण लहान पिल्ले तिकडेच फिरत होती.

आज रहाण्याची व्यवस्था अगोदरच केली होती मग निवांत गेलो. काही कारणास्तव तिकडे वायफाय बंद होत तस समीर कडे पोस्ट पेड कार्ड होतच पण हॉटेल वर शक्यतो आम्ही वायफाय वापरत होतो प्रवासात समीर जिंदाबाद. जसं जसं अंधार पडायला सुरुवात झाली तशी थंडी वाढत चालली होती.

तंबूत एकदम मस्त सुविधा देण्यात आल्या होत्या. पिण्यासाठी गरम पाणी पण होत. थोड्याच वेळात मस्त चहा आणि बिस्कीट आणून दिले.
रात्री जेवणात चायनीज आणि भारतीय पदार्थ दोन्ही होते. मस्त पोटभर जेवण करून बाहेर आलो तर त्याने सांगितल की उद्या आपण ज्या रस्त्याने जाणार तो रस्ता आज बंद झाला आहे. मग उद्या सकाळी लवकर निघायचं ठरवलं की जेणेकरून ट्रॅफिक कमी मिळेल. आम्ही जिकडे थांबलो त्यांनी पॅक लंच करून देवु सांगितल. उद्या आमच्या पूर्ण ट्रीप मधील एक महत्वाच्या ठिकाणी जाणार किंवा नाही जाणार या टेन्शन मध्ये होतो अर्थातच पंगोंग लेक. आम्हाला पुन्हा एकदा हिमालया ने धक्का दिला होता... सर्वच आपण ठरवलं तस नाही होत अशी मनाची समजूत घालुन आम्ही झोपी जायचा प्रयत्न करत होतो...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

TURTUK la jaaylach hava hota.....worth visiting location aahe....near from HUNDER.

मालिका मस्त आहे.

फोटो दिसत नाहीयेत अजूनही.

१. तुमचे फोटो गुगल फोटोस च्या एका स्वतंत्र अल्बम मध्ये अपलोड करा
२. अल्बमचे link sharing on करा.
३. आता फोटो ओपन करून त्यावर right click करून Copy Image Link करा (हे क्रोमकरता लिहिलय. इतर ब्राउझरवर शब्द थोडे वेगळे असू शकतात)
४. मायबोलीवर येऊन < img src = ' ' > असे टाइप करा (< आणि img मधली स्पेस काढून टाका ) .
५. त्या दोन ' ' च्या मध्ये तुम्ही कॉपी केलेली फोटोची लिंक पेस्ट करा.

हा फोटो मी तसाच दिला आहे.