पुरुषोत्तम करंडक कुणालाही न देणे योग्य आहे का?

Submitted by हरचंद पालव on 22 September, 2022 - 00:18

पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतर्महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही गेली काही वर्षे function at() { [native code] }यंत नावाजलेली स्पर्धा आहे. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कीर्तिवंत हे ह्या स्पर्धेत एकेकाळी स्पर्धक होते. स्पर्धेत पारितोषिके मिळालेल्या अनेकांची दखल पुढे घेतली गेली, ज्यातून त्यांना नाट्य आणि चित्रपट व्यवसायात पाऊल ठेवण्यास एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

विषय आहे ह्या वर्षीच्या स्पर्धेचा आणि त्यावर वादही चालू आहे. झाले असे, की ह्या वर्षी हा करंडक 'पुरेश्या दर्जाच्या अभावी' कुठल्याच एकांकिकेला किंवा महाविद्यालयाला न देण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोजक आणि परिक्षकांनी घेतला आणि वादाला तोंड फुटले. मुळात ही स्पर्धा कशी चालते हे जाणून घेऊ.

महाराष्ट्रीय कलोपासक ह्या संस्थेतर्फे ही आयोजित केली जाते. सर्व नियम हे आयोजकांचे असतात. function at() { [native code] }इशय निष्पक्ष आणि काटेकोर राहण्याकडे त्यांचा कल असतो - अशी ख्याती असल्यामुळेच स्पर्धेचे स्थान अजून टिकून आहे. पहिल्या फेरीत सर्व सहभागी महाविद्यालयांना आपली एकांकिका सादर करायची असते. त्यातून नऊ संघ हे दुसर्‍या, म्हणजेच अंतिम फेरीसाठी निवडले जातात. अंतिम फेरीतल्या नवांना आणखी सरावासकट पुन्हा एकदा एकांकिका सादर करण्याची संधी मिळते. काही नावाजलेले कलाकार आणि समीक्षक ह्या फेर्‍यांचे परीक्षण करतात. ह्या फेरीनंतर काही वैयक्तिक (पु कलाकार, स्त्री कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत संयोजक इत्यादी) आणि काही सांघिक पारितोषिके (रोख) आणि करंडक दिले जातात. सर्वांगिण उच्च कामगिरी केलेल्या संघाला मानाचा पुरुषोत्तम करंडक (फिरता) देण्यात येतो.

यंदा सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागात कोणीच पात्र न वाटल्यामुळे ही पारितोषिकेच जाहीर केली गेली नाहीत. शिवाय पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या (पीआयसीटी) 'कलिगमन' ह्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम) जरी दिले गेले, तरी ती करंडकास पात्र नसल्यामुळे त्यांना पुरुषोत्तम करंडक न देण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या 'भू भू' या एकांकिकेस मात्र दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक आणि हरी विनायक करंडक जाहीर झाला आहे.

हा निर्णय function at() { [native code] }इशय दुर्दैवी आणि चक्रावून सोडणारा आहे. ह्यावर दोन्ही बाजूंची मते वाचायला मिळत आहेत. एकीकडे स्पर्धेच्या दर्जाशी तडजोड न केल्यामुळे आयोजक आणि परीक्षकांचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे मधल्या करोनाकाळात विद्यार्थ्यांवर आलेल्या संकटांची आणि त्यांच्या तशाही परिस्थितीत घेतलेल्या कष्टांची दखल न घेतल्याची टीकाही होत आहे. लोकसत्तेच्या अग्रलेखात तर परीक्षक आणि आयोजकांना मंबाजी संबोधून वाभाडे काढले आहेत.

हे सर्व बाहेरून बघणे फारच भंडावून सोडणारे आहे. आपल्यापैकी कुणी ह्या स्पर्धेला प्रेक्षागृहात होते काय? आपला अनुभव काय आहे? यापूर्वी ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा प्रेक्षागृहात असणार्‍या लोकांचे काय म्हणणे आहे? आपण ह्यापैकी कुणी नसाल तरीही आपल्याला ह्या निर्णयाबद्दल काय वाटते? कळवावे.

तळटीपा:
१. निपुण धर्माधिकारी याने ह्या वादात न पडता आता आपल्याकडून काय करता येईल ह्याचा विचार करत सहभागी स्पर्धकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे, हे स्तुत्य वाटले.
२. मिलिंद शिंत्रे यांनी अंतिम स्पर्धक, आयोजक आणि परीक्षक यांचा एक परिसंवाद आयोजित केला आहे. त्यातून काही कळल्यास उद्बोधक ठरेल.
३. वरच्या लेखात "function at() { [native code] }" सोडून अन्य चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लक्षात आणून दिल्यास नक्कीच सुधारणा करेन. function at() { [native code] } मात्र तशीच ठेवण्यात येईल - ती चूक माझी नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

In many ways, the work of a critic is easy. We risk very little yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face, is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so.

- अँटोन इगो, रॅटाटुई. Happy
(हे काय माझे मतच आहे असे नाय. फक्त काल हे बघितले आणि या धाग्याची आठवण झाली. चूप सिनेमा पण त्यावरच आहे म्हणे.)

लई भारी कोट आहे! एकदम फ्रेम करुन ठेवावा असा.
पिंका वाचायला अत्यंत आवडत असल्या तरी ग्रँड स्किम ऑव थिंग्ज्स विसरुन चालणार नाही. Happy

Pages