पुरुषोत्तम करंडक कुणालाही न देणे योग्य आहे का?

Submitted by हरचंद पालव on 22 September, 2022 - 00:18

पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतर्महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही गेली काही वर्षे function at() { [native code] }यंत नावाजलेली स्पर्धा आहे. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कीर्तिवंत हे ह्या स्पर्धेत एकेकाळी स्पर्धक होते. स्पर्धेत पारितोषिके मिळालेल्या अनेकांची दखल पुढे घेतली गेली, ज्यातून त्यांना नाट्य आणि चित्रपट व्यवसायात पाऊल ठेवण्यास एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

विषय आहे ह्या वर्षीच्या स्पर्धेचा आणि त्यावर वादही चालू आहे. झाले असे, की ह्या वर्षी हा करंडक 'पुरेश्या दर्जाच्या अभावी' कुठल्याच एकांकिकेला किंवा महाविद्यालयाला न देण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोजक आणि परिक्षकांनी घेतला आणि वादाला तोंड फुटले. मुळात ही स्पर्धा कशी चालते हे जाणून घेऊ.

महाराष्ट्रीय कलोपासक ह्या संस्थेतर्फे ही आयोजित केली जाते. सर्व नियम हे आयोजकांचे असतात. function at() { [native code] }इशय निष्पक्ष आणि काटेकोर राहण्याकडे त्यांचा कल असतो - अशी ख्याती असल्यामुळेच स्पर्धेचे स्थान अजून टिकून आहे. पहिल्या फेरीत सर्व सहभागी महाविद्यालयांना आपली एकांकिका सादर करायची असते. त्यातून नऊ संघ हे दुसर्‍या, म्हणजेच अंतिम फेरीसाठी निवडले जातात. अंतिम फेरीतल्या नवांना आणखी सरावासकट पुन्हा एकदा एकांकिका सादर करण्याची संधी मिळते. काही नावाजलेले कलाकार आणि समीक्षक ह्या फेर्‍यांचे परीक्षण करतात. ह्या फेरीनंतर काही वैयक्तिक (पु कलाकार, स्त्री कलाकार, दिग्दर्शक, लेखक, संगीत संयोजक इत्यादी) आणि काही सांघिक पारितोषिके (रोख) आणि करंडक दिले जातात. सर्वांगिण उच्च कामगिरी केलेल्या संघाला मानाचा पुरुषोत्तम करंडक (फिरता) देण्यात येतो.

यंदा सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागात कोणीच पात्र न वाटल्यामुळे ही पारितोषिकेच जाहीर केली गेली नाहीत. शिवाय पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या (पीआयसीटी) 'कलिगमन' ह्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम) जरी दिले गेले, तरी ती करंडकास पात्र नसल्यामुळे त्यांना पुरुषोत्तम करंडक न देण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या 'भू भू' या एकांकिकेस मात्र दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक आणि हरी विनायक करंडक जाहीर झाला आहे.

हा निर्णय function at() { [native code] }इशय दुर्दैवी आणि चक्रावून सोडणारा आहे. ह्यावर दोन्ही बाजूंची मते वाचायला मिळत आहेत. एकीकडे स्पर्धेच्या दर्जाशी तडजोड न केल्यामुळे आयोजक आणि परीक्षकांचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे मधल्या करोनाकाळात विद्यार्थ्यांवर आलेल्या संकटांची आणि त्यांच्या तशाही परिस्थितीत घेतलेल्या कष्टांची दखल न घेतल्याची टीकाही होत आहे. लोकसत्तेच्या अग्रलेखात तर परीक्षक आणि आयोजकांना मंबाजी संबोधून वाभाडे काढले आहेत.

हे सर्व बाहेरून बघणे फारच भंडावून सोडणारे आहे. आपल्यापैकी कुणी ह्या स्पर्धेला प्रेक्षागृहात होते काय? आपला अनुभव काय आहे? यापूर्वी ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा प्रेक्षागृहात असणार्‍या लोकांचे काय म्हणणे आहे? आपण ह्यापैकी कुणी नसाल तरीही आपल्याला ह्या निर्णयाबद्दल काय वाटते? कळवावे.

तळटीपा:
१. निपुण धर्माधिकारी याने ह्या वादात न पडता आता आपल्याकडून काय करता येईल ह्याचा विचार करत सहभागी स्पर्धकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे, हे स्तुत्य वाटले.
२. मिलिंद शिंत्रे यांनी अंतिम स्पर्धक, आयोजक आणि परीक्षक यांचा एक परिसंवाद आयोजित केला आहे. त्यातून काही कळल्यास उद्बोधक ठरेल.
३. वरच्या लेखात "function at() { [native code] }" सोडून अन्य चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लक्षात आणून दिल्यास नक्कीच सुधारणा करेन. function at() { [native code] } मात्र तशीच ठेवण्यात येईल - ती चूक माझी नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

function at() { [native code] }
हे अतिशय अत्यंत लिहिताना झाले आहे
ते अ तिशय / अ त्यंत असे अ नंतर स्पेस देऊन लिहा आणि मग स्पेस काढा.

हो ऋन्मेष, ते मी पूर्वी करत असे. पण आता सारखं सारखं हे आधी असं चुकून मग पुन्हा टाइप करायचा कंटाळा येतो, तेही स्वतःची चूक नसताना. मागे मी कटाक्षाने हे शब्द टाळून खूप, भरपूर - असे शब्द वापरायला लागलो होतो. पण मग वाटले की माबोवरच्या बगमुळे उबग येऊन मी माझी भाषा कशाला बदलायला हवी? वेमा ह्यात लक्ष घालतील काय?

हपा ओके .,

लेखाच्या विषयाबद्दल जाणकार म्हणून तर काही मत नाही. पण हे असे पहिल्यांदाच झाले असेल तर स्पर्धकांसाठी फारच फ्रस्टेटींग असेल. जिंकूनही तुम्ही त्या लायकच नव्हता हा शिक्का अपमानास्पदच म्हणायला हवे.

कोणीच पात्र न वाटल्यास पुरुषोत्तम करंडक न देणेही चालते असा लिखित नियम असेल तर हे नियमानुसार म्हणता येईल. पण जर लिखित नियम नसताना केले असेल तर अगदीच चूक आहे. अश्यावेळी येणार्‍या वर्षासाठी नियम बनवू शकतो.

पण जर हे नियमावलीत असेल तर भले हे पहिल्यांदा झाले असेना, वा कितीही दुर्दैवी, निराशाजनक का असेना, स्पर्धकांनी हे स्विकारावे हेच उत्तम.

असो, या वादापेक्षाही चिंतेची बाब ही की खरेच स्पर्धकांचा दर्जा घसरलेला का? हे या एका वर्षालाच झालेय की गेले काही वर्षे सातत्याने घसरतोय?

स्पर्धेला प्रेक्षागृहात होते काय? आपला अनुभव काय आहे? यापूर्वी ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा प्रेक्षागृहात असणार्‍या लोकांचे काय म्हणणे आहे? आपण ह्यापैकी कुणी नसाल तरीही आपल्याला ह्या निर्णयाबद्दल काय वाटते? >>> मी ह्यांपैकी कुणीही नाही.

निपुण धर्माधिकारी याने ह्या वादात न पडता आता आपल्याकडून काय करता येईल ह्याचा विचार करत सहभागी स्पर्धकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे, हे स्तुत्य वाटले. >>> हे वाचलं होतं. खरंच फार स्तुत्य वाटलं.

ह्या संदर्भात खालच्या लिंक मधला लेख आवडला
https://www.loksatta.com/sampadkiya/features/the-purushottam-karandak-is...

या विषयावर मला काय वाटतं ते नंतर लिहिते पण हपा, function at() { [native code] } हा दोष माबोचा नाही तर ब्राऊझर चा आहे. ब्राऊझर बदलून बघा. इतर साईट्स ना पण येतो हा error.
तुम्ही ते बदला असं म्हणणं नाही पण यात वेमा काही करू शकत नाहीत.

पुरूषोत्तम स्पर्धा/एकांकिका ही एक रसिक म्हणून अनेकदा बघितली आहे. आणि अर्थातच खूप आवडतात ही सादरीकरणं.
परिक्षकांचा निर्णय हा आदरपूर्वक मान्य करायला हवा.
काही वर्षांपूर्वी “ठिय्या” ह्या एकांकिकेत एका मुक्या व्यक्तीची भूमिका करणार्या कलाकारास उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले होते की हा कलाकार बंगाली भाषिक असून त्याला मराठी भाषा येत नसल्याने त्याला ही भूमिका देण्यात आली आणि त्या कलाकाराने त्या भूमिकेचे चीज केले.

निर्णय बरोबर आहे.
जर त्यांच्या निकषात न बसणाऱ्या प्रवेशिका आल्या तर उगीच तडजोड करून कोणालातरी पहिला नंबर देण्यापेक्षा ठीक आहे.

लोकसत्तेचा अग्रलेख आक्रस्ताळी वाटला.
वर लिंक आलेला त्याच पेपरातला लेख आवडला.
आक्रस्ताळी या अग्रलेखामुळे हा दुसरा लेख लिहिला गेला असावा.

अत्यंत .
आता सरळ लिहिता आलं. मध्ये ते कोड्स आले नाहीत.

मी दुसरीकडे वाचलं त्याप्रमाणे त्यांच्या निकषात ना बसणाऱ्या प्रवेशिका आल्या असे नसून सादरीकरण त्यांच्या निकषाप्रमाणे दर्जेदार झाले नाही असे आहे. तांत्रिक साहाय्याचा अतिरेक, गिमिक्स चा अतिरेक, वगैरे कारणे होती.

हल्ली ह्याबद्दल काही माहीती नसतं मला.

नातू (भाचीचा मुलगा) फर्ग्युसनला होता तेव्हा फेसबुकवर समजायचं, तो लेखन, दिग्दर्शन, अभिनय करायचा कॉलेजतर्फे. तेव्हा वेगवेगळे करंडक, स्पर्धा कुठे काय समजायचं.

पुरुषोत्तम करंडक नावाजलेला, एक वलय असलेला आहे मात्र. कॉलेज नाट्यस्पर्धा म्हटलं की पहिलं हेच नाव आठवतं.

अनुची पोस्ट पटली. इथे नंबर दिलाय पण करंडक नाही म्हणजे त्या उंचीला पहिल्या नंबरची पोचली नाही, पुरुषोत्तम करंडकासाठीच्या अपेक्षा पुर्ण करू शकली नसावी.

मला मायक्रोसॉफ्टचे इंडिक लँग्वेज मराठी फोनेटिक वापरताना, वर उल्लेख केलेली एरर अजिबात येत नाही. पूर्वी गुगल इनपुट टुलस वापरतानाही येत नव्हती.

ब्राऊझर मी गुगल क्रोम वापरते.

कालच माधव वझेनींही (ज्यांच्या नावाने पुरुषोत्तम चषक देण्यात येतो त्या पुरुषोत्तम वझेंचे पुत्र) परीक्षकांचा निर्णय योग्यच आहे असे मत मांडले आहे. त्यांनीही पूर्वी पुरुषोत्तम चषकाच्या आयोजनाची व परिक्षणाची जबाबदारी उचललेली आहे आणि अंतिम फेरीतील एकांकिकांचे दर्जेदार सादरीकरण नसले तर केवळ क्रमांक घोषित करून चषक न देण्याची पूर्वीपासूनच तरतूद असल्याचे सांगितले.

आणि मलाही एक वाचक, प्रेक्षक किंवा रसिक म्हणून परीक्षकांचा निर्णय योग्यच वाटतो. शेवटी सगळी मंडळी चषकासाठी स्पर्धेत उतरतात. पण त्यांचा दर्जा उत्तम नसल्यास तो चषक न देण्यात काहीही वावगे नाही. तेवढाच सुधारणेला वाव आहे. कित्येकदा गृहीत धरण्याचा जो प्रकार चालतो, त्यास जरा निर्बंध येईल.

अगदीच लोकसत्ता चा अग्रलेख हा स्कोर सेटल करण्यातला प्रकार वाटला
मंबाजी काय आणि परीक्षकांच्या क्षमतेवर प्रश्न
इतकेच जर परीक्षक नसते चांगले तर त्यांना मुळात नेमलच का हा प्रश्न नाही पडला का?

लोकसत्ताचा अग्रलेख वाचल्यावर त्यांचं काहीतरी बिनसलं आहे हेच जाणवलं.
नाही कोणी सापडला पहिल्या पारितोषिक दर्जाचा तर नाही. पिरिएड. उगाच तडजोड करुन वासरांत लंगडी गाय करायची काय गरज?

मी फर्युसनला असताना मी असलेल्या आमच्या नाटकाला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

'करंडकाला' साजेशी एकांकिका नसेल तर करंडक नाही दिला ह्यात काहीही वावगं नाहीये. करंडक न मिळालेल्या बर्याच एकांकिका असतात. ते सगळे 'चला, आपल्याला नाही तर नाही, कुणाला तरी मिळाला ना करंडक! ह्याचंच समाधान आहे' असं म्हणत नाहीत. मग तसंच, 'कुणीच चांगली एकांकिका केली नाही आणि करंडक कुणालाच मिळाला नाही' हे मान्य करणं इतकं अवघड नाहीये. शेकडोंनी एंट्रीज येतात, त्यातल्या ९ फायनल ला जातात, त्यातली एक करंडक जिंकते. नवात नसलेल्यांना सुद्धा वैय्यक्तिक पुरस्कार मिळतात आणि नवातल्यांना सुद्धा मिळतात.

"मिलिंद शिंत्रे यांनी अंतिम स्पर्धक, आयोजक आणि परीक्षक यांचा एक परिसंवाद आयोजित केला आहे. त्यातून काही कळल्यास उद्बोधक ठरेल." - कुणाचं काहीही होवो, आपलं दुकान चालू रहायला हवं हा मिलिंद शिंत्रेचा बाणा स्पृहणीय आहे. Happy

एकांकिका करंडक देण्यायोग्य नाही पण बक्षीसपात्र आहे याला काय लॉजिक आहे. बक्षिस पण देऊ नये ना मग. 100 संघामधून सर्वाधिक गुण मिळणाऱ्याला बक्षीस असं साधं सोपं गणित असायला काय हरकत आहे.
अशा निर्णयामुळे पुढच्या वर्षी भाग घेणाऱ्यांचा निम्मा उत्साह इथेच संपेल. तसही आता सोशल मीडिया या मुलांच्या हातात आहे. कष्ट करून इथे येण्यापेक्षा सरळ युट्युब वर अपलोड केली एकांकिका तर जास्त लोकांपर्यंत पोचेल असा विचार करतील पुढची पिढी.

इतके वर्ष ज्यांना करंडक दिले ते सगळेच पात्र होते का?
काहीही फालतू निर्णय... करंडक द्यायचाच नव्हता तर एंट्री कशाला घेतल्या...

छान चर्चा. सर्व प्रतिसादकांचे आभार. नताशा, लोकसत्तेतल्याच दुसर्‍या बाजूचा लेख दिल्याबद्दल विशेष आभार.

रीया. प्रश्न ब्राउझरचा नाही. मी गूगल क्रोम वापरतो व यावरून मला मिसळपाववर विनासायास टंकता येते. तिथे ही एरर येत नाही.
अन्जू, तुमचं निरीक्षण अचूक आहे. फोनेटिक कळपाट वापरताना (मायक्रोसॉफ्ट किंवा गूगल इन्पुट) हा प्रॉब्लेम येत नाही. पण फोनेटिक कळपाटांचा प्रॉब्लेम हा की ते आपल्याला पाहिजे ते टंकू शकत नाहीत. त्यासाठी त्या कळपाटांच्या डेटाबेसमध्ये असलेलेच शब्द वापरावे लागतात आणि काहीवेळा ते चुकीचेही असतात. काही कळपाट र्‍ह, र्‍य ऐवजी र्ह, र्य उमटवतात. मला तिथे 'ज्ञ हे अक्षर संस्कृतात ज् + ञ असे बनले आहे' अशा प्रकारचा प्रतिसाद सरधोपटपणे लिहिता येत नाही; फार कसरत करावी लागते. त्यामानाने मायबोलीची गमभन सुविधा चांगली आहे. ती अक्षरागणिक ट्रान्स्लिटरेट करते. फक्त त्यातल्या काही त्रुटी निस्तरल्या जाव्यात ही अपेक्षा अवाजवी नसवी.

आर्च, तुमचं बिलेटेड अभिनंदन Happy . तुमच्या स्पर्धेच्या आठवणी वाचायला आवडतील. विशेषत: परीक्षक/ आयोजकांचा तुम्हाला आलेला अनुभव, तुम्ही तुमच्या एकांकिकेसाठी घेतलेले सांघिक कष्ट आणि शेवटी मिळणार्‍या फळानंतर उमटलेल्या स/नकारात्मक भावना (जेव्हा करंडक मिळाला आणि जेव्हा नव्हता मिळाला) - हे सगळं वरील विषयाच्या दृष्टीने जाणून घेणे रोचक ठरेल.

काहींनी 'पहिलं बक्षीस दिलंच आहे तर मग करंडक द्यायला काय प्रॉब्लेम आहे' असा रास्त मुद्दा मांडला आहे .पण वरील चर्चेतून असं दिसतं आहे की करंडक-पात्रतेसाठी काही वेगळे निकष (सुरुवातीपासूनच नियमावलीत) असावेत. ते माहीत झाल्यास करंडक न देता फक्त बक्षीस का दिलं हे कळेल.

हो फोनेटिकमध्ये विशेषतः जोडाक्षरे prblm देतात, तेव्हा मी त्या शब्दापुरतं इथलं वापरते. कधी कधी बदलायचा कंटाळा करते, वरती टूल्स शब्दाबाबत कंटाळा केला, फोनेटिक मध्ये ल स एकत्र नाही आला.

“ इतके वर्ष ज्यांना करंडक दिले ते सगळेच पात्र होते का?” - ‘नव्हते’ असं का वाटतं तुम्हाला? आम्ही करंडक जिंकला नव्हता, वैय्यक्तिक पारितोषिकं मिळवली होती. पण कॉलेजच्या काळात ज्यांना करंडक मिळाला त्यांच्या दर्जाविषयी अशी शंका कधीच आली नाही.

“ करंडक द्यायचाच नव्हता तर एंट्री कशाला घेतल्या” - एंट्रीज घेतल्या म्हणून करंडक द्यायलाच पाहिजे असा नियम नाहीये (किंबहूना कुणीच पात्र नसेल तर करंडक देऊ नये अशी तरतूद आहे).

अमा Happy

गेल्या काही वर्षांत नाटके तांत्रिकतेच्या आहारी गेल्याचे प्रकर्षाने अनुभवास आले आहे. तशातच सकस लेखन आणि अभिनय यांची त्रुटी ही लक्षणीय आहे.
त्या दृष्टीकोनातून निर्णय कदाचित योग्य असेलही ... पण पुढे हे सगळे बदलण्यासाठी काय करायचे यावर विविध स्तरांवर चिंतन होणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रथितयश मंडळींनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे.
महाविद्यालयीन मुलांकडे उत्साह आणि ऊर्जा भरपूर आहे. त्यांच्यासमोर म्हणावे तसे आदर्शच नाहीत असेही एक कारण असू शकेल.

एका वर्षी पुरूषोत्तमच्या एका फायनलला सगळ्या (बहुधा ९) एकांकिका पाहायला मिळाल्या होत्या. अ ति शय दर्जेदार होत्या. इतरत्र बघायला मिळणारी नाटके व तुलनेने पुरूषोत्तमची नाटके यातील आशय, अभिनय वगैरे वरच्या दर्जाचा असे. एकूणच कॉलेजच्या काळात या स्पर्धेचा दबदबा असे. काहीतरी जबरदस्त केल्याशिवाय पारितोषिक मिळत नसे. मधली काही वर्षे तोच दर्जा राहिला आहे की नाही वगैरे काहीच माहीत नाही. पण पुण्याच्या कॉलेजेस मधे जे लोक नाटके वगैरे करत त्यांच्या दृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व प्रचंड होते हे कायमच पाहिले आहे.

करंडकच कोणालाही द्यायचा नाही हे लॉजिक मलाही समजले नाही. पण खाजगी संस्था आहे. त्यांनी काय लॉजिक लावले असेल ते असेल. सामान्य कलाकृतींना चॅनेल्स मधून लावलेली मोठमोठी विशेषणे, वाटल्यासारखी दिली जाणारी मोठ्या नावांची पारितोषिके (फुटकळ लोकांनाही मिळाल्यावर "पारितोषिकाची शोभा वाढणे" वगैरे) या गदारोळात एखादे पारितोषिक/करंडक जर अप्राप्य राहात असेल आणि तो मिळाल्यावर त्याचे अप्रूप राहणार असेल तर चांगलेच आहे.

"निपुण धर्माधिकारी याने ह्या वादात न पडता आता आपल्याकडून काय करता येईल
>>>> हे पटले.
तुमचेही function at native mode साठीचे संयत प्रोटेस्ट आवडले. I am impressed! Happy

अनुचे पटले.

Pages