लेह लडाख वारी भाग सात

Submitted by pravintherider on 19 September, 2022 - 12:37

खरंतर आज आमचा दिवस रात्री बारा वाजता सुरू झाला होता. समीर ला तर पाणी पण पिण्याची इच्छा नव्हती. गणेश ला पण झोप येत नव्हती आणि मला पण. आम्ही फक्त घड्याळ कडे पाहत होतो. साधारण पहाटे चार वाजता गणेश बोलला, की बाहेर जावून एकदा गाडी चालु करून बघ बोललो टाईम तर बघ बाबा चार वाजले आहेत थांब जरा. मग पाच वाजता मी बाहेर येवुन गाडी चालु केली एक मिनिट वेळ घेतला पण चालू झाली नि थोड्या वेळातच हळू हळू उजाडायला सुरू झालं. मग लगेच यांना गाडी मध्ये बसवून आम्ही लेह कडे निघालो. सरचू पासून रस्ता छान आहे आणि आता तर आम्हाला उतार सुरू झाला होता. सरचु नंतर आज आम्हाला पहिलं मोठं आव्हान होतं ते गाटा लूप... जवळ जवळ एकवीस हेअर पिन वळणे आणि ते पण रस्ता बराच खराब आणि अरुंद आहे. गाडी विरळ हवे मुळे थोडा पॉवर लॉस दाखवत होती त्यामुळे मी थोडी जास्त पॉवर वर गाडी चालवत होतो आणि साधारण दुसऱ्या वळणावर वरुन जोरात ट्रक आला नी मी पण जोरात असल्याने गाडी ब्रेक मारत असून पण ट्रक जवळ जावून थांबली. ट्रक चालक खरच चांगला होता मी त्याला साईड देण्यासाठी गाडी मागे घेत होतो तर आवाज देवुन बोलला, आरामात घे मागे, घाई करू नका. मी एक मिनिट खूप घाबरलो होतो पण लगेच शांत पने साईड ला गाडी घेतली. दोन वळणा नंतर मिलिटरी च्या गाड्या दिसत होत्या मग त्यांच्या मागे चालू लागलो. जेणकरून बाकी गाड्या मला त्रास देणार नाहीत आणि तेच झालं. एक तर मिलिटरी गाडी पाहून ट्रक चालक त्यांची गाडी गुपचूप साईड ला लावत होते. गाटा लुप जावून आम्ही नकीला पास पार केला नी लाचुंग ला कडे निघालो. या दोन्ही पास वर गाडी ने त्रास दिला नाही एक तर रस्ता पण छान होता नी ट्रॅफिक पण नव्हती. लाचूंग ला उतरताना मात्र रस्ता खुप खराब चालू झाला पण उतार असल्याने काही वाटत नव्हत. ईकडे बुरहान आणि समीर दोघे पण एकदम शांत बसले होते. गणेश ची डोके दुखी रात्री पासून वाढली होती आणि मी विनाकारण बडबड करत त्यांना त्रास देत होतो. एकतर मी पण जवळ जवळ पूर्णवेळ जागी होतो, त्यात मी काल दिवस भर ड्रायव्हिंग केली होती आणि आज पण ड्रायव्हिंग मीच करणार होतो. लाचुंग ला चा उतार थोडा बाकी असताना मला वाटलं की गाडी नीट चालत नाही. सपाट जागा आणि बाकी गाड्यांना वाट ठेवून गाडी उभी केली तर मागील चाक पंक्चर होत. आम्ही साधारण पंधरा हजार फूट उंचीवर होतो. कसं बसं आम्ही टायर बदली केला नी पांग कडे निघालो. पांग मध्ये आम्हाला एक पंक्चर वाला भेटला त्याला बोललो दे पंक्चर काडून तर तो बोलला की सामान संपल आहे तर मी हवा मारून देतो त्या टायर मध्ये मी बोललो नको, माझ्या कडे हवा भरायला साधन होत पण बरं झालं कि हवा भरून नाही घेतली कारण.... पुढे समजेलच. पांग ला पण भारतीय सैनिक कॅम्प आहे, त्यांनी सांगितलं की अजून जास्तीत जास्त पंधरा वीस किमी जा नंतर लेह पर्यंत मस्त रस्ता आहे. पण पंक्चर वाला कमीत कमी ऐंशी किमी अंतरावर असेल. मग आम्ही सरळ पांग ची चढाई चालू केली नी पुन्हा एकदा एका वळणावर अचानक ट्रक समोर आला त्या वेळी मागे  घेताना चुकून दरी कडे गेली कारण धूळ जमा झाल्याने कॅमेरा मध्ये मला काही दिसत नव्हते. पण ट्रक चालक उंचीवर असल्याने त्याने लगेच मला लाईट देवुन सांगितलं की, थांब मागे जावू नको मी लगेच गाडी पुढे घेतली. मग त्याने त्याची गाडी मागे घेवुन मला रस्ता दिला. माझी गाडी उतारावर होती त्यामुळे मला अंदाज आला नाही. त्या वेळी बाकी तिघांना याची कल्पना पण नव्हती. आज दोन वेळा ट्रक चालकानी माझी मदत केली होती. त्यामुळे काल आलेला अनुभव विसरून गेलो. पांग नंतर लगेच रस्ता रुंद झाला नी मूरे प्लेन चा अप्रतिम रस्ता चालू झाला. हा रस्ता खरचं खुप खुप सुंदर आहे. या रस्त्यावर बुरहान ची गाडी चालवण्याची खुप इच्छा होती पण वेळ अशी होती की त्याने एक फोटो पण नाही घेतला. मी एका ठिकाणी थांबून गाडी चे काही फोटोज् घेतले. गणेश ने काच खाली न करता माझे एक दोन फोटो घेतले नी आम्ही लगेच निघालो. विचार करा की, तिघांची पण हालत कशी असेल.
आता आमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान होत ते, टांग लांग ला. मनाली लेह रोड वरील सर्वात उंच पास. टांग लांग ला सुरू झाला तो पर्यंत गणेश ची झोप झाली होती. त्यामुळे टांग लांग ला ची चढण पार करताना नेहमीच असं वाटतं की अरे हे वळण गेलं की पोहचलो पण हा एक दृष्टीभ्रम आहे. खुप वेळ या डोंगरावरून त्या डोंगरावर चालत असतो. रस्ता एकदम मस्त आहे आणि चढण पण कमी मात्र अंतर खुप आहे त्यामुळे टांग लांग ला काहीही त्रास न होता आम्ही पार केला. तिथे पण मी माझे आणि गाडी चे काही फोटोज् घेतले. गणेश पण खाली उतरला आणि एक दोन फोटो घेवून मध्ये बसला. टांग लांग ला नंतर उतार जास्त आहे त्यामुळे समुद्र सपाटी पासून ची उंची लवकर कमी होवुन ऑक्सीजन मध्ये वाढ होते. त्यामुळे  बुरहान ला थोड ठीक वाटत होत. आम्ही आता बरेच अंतर खाली उतरून आलो होतो तो पर्यंत बुरहान आणि गणेश मध्ये खुप फरक पडला होता. एकतर टांग लांग ला नंतर झपाट्याने उंची कमी होत जाते. जसं जसं खाली आलो तस बुरहान ची मग बडबड चालू झाली त्यामुळे मला पण बरं वाटलं. रूमस्ते नंतर लेह चढ उतार कमी आहेत आणि रस्ता मस्त नदी च्या बाजू बाजू ने आहे. काही ठिकाणी भातशेती पण दिसत होती.
उपशी मध्ये आम्हाला एक पंक्चर वाला भेटला त्याकडे गेलो तर तेव्हा समजलं की टायर दोन इंच फाटला आहे. हेच जर मला पांग मध्ये समजलं असतं तर मग पूर्ण रस्ता धाकधूक लागली असती. हवा भरून घेतली नाही ते बर झालं असं वाटलं. त्याला विचारलं काही उपाय करता येइल का तर बोलला पॅच मारून देतो,  हजार रुपये होतील मग बोललो की, अजून आपला खुप प्रवास बाकी आहे. जमलं तर टायर आपण सर्व्हिस सेंटर ला देवुन नविनच टायर घेवू. मग मात्र आम्ही सरळ लेह कडे निघालो. आता आम्हाला लेह चे वेध लागले होते. त्यात  बुरहान ला आता वाटायला लागलं की, काल चिकन सूप मागवलं त्यामुळे त्याला त्रास झाला. गणेश ला त्रास कमी झाला, मला तर खूप कमी त्रास झाला. त्याला फक्त उलटी होत होती, डोके दुखी किंवा इतर AMS चे लक्षणं नव्हते. त्यामुळे त्याने परत एकदा ठरवलं की पुढे घरी जाईपर्यंत मांसाहारी जेवण नाही म्हणजे नाही.
आम्ही लेह मध्ये पोहचलो नी, हॉटेल पाहायला परत एकदा बुरहान च गेला. भाउ आता न पेक्षा ठीक झाला होता. मग १०००/- मध्ये रूम ठरवून च परत आला ते पण २४ तास वायफाय आणि गरम पाणी. आम्ही मग सामान लावून, फ्रेश वगैरे होवून समीर ला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आणि जवळच एका हॉटेल वर जेवायला गेलो. कारण सहा वाजून गेले होते मग जेवण करून आज आराम करु हे ठरवलं. जेवण इतके खराब होत की आम्ही कसं तरी थोड खाल्ल नी निघालो. समीर तस पण काही खात नव्हता मग सफरचंद घेवून आलो नी त्याला सांगितलं हे जर नाही खाल्ल तर सकाळी तुझी तिकीट काढून तुला विमानाने मुंबई ला पाठवून देवु मग मात्र त्याने दोन सफरचंद खाल्ले नी ज्यूस आणायला मलाच पाठवलं. सर्वांनाच आरामाची खुप गरज होती. मग मोबाइल पाहता पाहता झोपी गेलो. उद्याचं दिवास्वप्न पाहत की काय काय करायचं नी समीर... उद्या नीट नाही झालो तर हे लोकं खरच मला घरी पाठवतील का याचं टेन्शन घेवुन.

#आमचे काही निर्णय चुकले पण एकमेकांना दोष न देता आम्ही शेवट पर्यंत एकत्र राहून सर्व संकटे पार केली. कदाचित यामुळे आमची मैत्री अजूनच मजबूत झाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users