कथाशंभरी - २ -सवय - अमितव

Submitted by अमितव on 9 September, 2022 - 16:28

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत त्याच्या अंगावर काटा आला. बांधकाम झाल्यावर नव्या-नवरीगत सजलय घर! कधीही कोसळू शकेल अशा घराच्या जोताकडे बघितलं. वणव्याने राखरांगोळी झाली. बाजुच्या झाडाकडे सवयीने बघितलं तर ते वाढून चांगलं आभाळात पोहोचलं होतं. बिया पेरुन दोन दिवसही झाले नसतील.

शेजारचा रघू वारला काल! पंचक्रोशीत इतका देखणा मृतदेह नसेल कोणाचा. त्याचा गृह्यसंस्कार पेपरात येऊन गेल्याला तीन वर्षे तरी झाली असतील ना? दीड वर्षांपूवीच त्याला वैकुंठ मध्ये अग्नी दिला आपण! सहा दिवसांनी तेराव्याची तयारीही करावीच लागेल. मेल्याचं अंग अजुनही तापाने फणफणलंय! पाण्याच्या घड्या आणायला तो सवयी प्रमाणे घरात शिरला. पण कुठल्या?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वंदना आणि र्म्ड.
आपल्याला कथा किंवा इतर काहीही वाचताना एकसलग वाचायची 'सवय' असते. अर्थात तेच अपेक्षित असतं. पण जर प्रत्येक वेळी वापरलेली सर्वनामे एकाच नामासाठी नसली तर? कथेच्या दोन वाक्यांनी कायम एकच धागा पुढे नेला पाहिजे का? त्या दोन वाक्यांचे रुळ एकापुढे एक नसून एकमेकांना समांतर असे असले तर? असा काही तरी विचार करुन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी ते रुळ खरेच समांतर होते का? इतकं समांतर खरंच काही असू शकतं? या द्विधेत करण्याचा प्रयत्न होता.

मध्यंतरी केशवकूल यांच्या रेकोवरुन 'द बाल्ड सोप्रॅनो' नाटक वाचायला सुरुवात केली. ते अर्थात मोबिअस स्ट्रिप संकल्पनेचा साहित्यिक अविष्कार आहे. पण त्यात अशा अनेक गमती/ फॉर्म (मला नीट समजले असतील तर) आहेत. त्याची नक्कल करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
मला त्यात पुढे जाऊन वेगवेगळी वाक्ये ठेवूनही ती एकत्र वाचली तर एकसंध परिणाम आणि वेगळी वाचली तर आणि एक वेगळा परिणाम असं काही करायचं होतं. पण ते १०० शब्दांत बसवायला अजुन बरंच इंजिनिअरिंग करावं लागेल. बघू परत कधी तरी! Happy

प्रयोग जमलाय

पहिल्यांदा वाचली तेव्हा 'सवयीने' सिक्वेन्स ऑड तर नाही?असे वाटले. मग 'सवयीने' शफल करुन बघितले 'सवयीचा' सिक्वेन्स लावून वाचून पाहिले. मग 'सवयीनेच' मोडून टाकले. मला ही रुबीक क्युब सारखी वाटली.

पंचक्रोशीत इतका देखणा मृतदेह नसेल कोणाचा.>>>काहीच्या काहीच. डार्केस्ट डार्क!
दीड वर्षांपूवीच त्याला वैकुंठ मध्ये अग्नी दिला.>>वैकुंठ म्हणजे म्हणजे देव जिथे राहतात ते ?
फार्महाऊस- फाईव मध्ये असा नॉनलिनिअर टाईम चा प्रयोग केला आहे. त्याची आठव आली.
सहा दिवसांनी तेराव्याची तयारीही.>> गणित पण हेवायर झाले.
मेल्याचं अंग अजुनही तापाने फणफणलंय!>> मेल्याचं अंग आणि ताप!
प्रत्येक वाक्यात अमितव दे धमाल.

वैकुंठ हे पुण्यातल्या स्मशानभूमीचं नाव आहे.>>आणि वैकुंठ म्हणजे स्वर्ग. तेथे सगळे अमर! . अश्या शब्दांच्या आणि आशयाच्या कोलांट्या उड्या.
आता अमितवला काय अभिप्रेत आहे? आपल्याला काय करायचं. आपण एन्जॉय करुया .

बाकी मला काही समजलं नाही. >>>> + १. आजिबात काहीही कळलं नाही. तुझी पुढची पोस्ट वाचूनही काही समजलं नाही. Happy
संत्र सोला.