पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगी सॅलड..मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 9 September, 2022 - 03:11

तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. असो. तरी प्रयत्न केलाय.

पालक, गाजर ,टोमॅटो घालून तिरंगी भात किंवा असंच काहीतरी किंवा मग कृत्रिम रंग घालून काहीतरी करणे एवढंच सुचत होतं. तिरंगी मोदक करण्यासाठी रंग आणले ही विकत पण ते हिरव्या नारिंगी मोदकाना (उकडीचे नाही लिहिलं तर उकडीचेच कारण मोदक आम्ही फक्त उकडीचेच करतो , तळून मोदक फक्त करंज्या केल्या तर एखादा शास्त्रापुरताच Happy ) घरात माझ्यासकट कोणी हात ही लावणार नाही आणि कष्ट वाया जातील म्हणून ते रद्द केले.

खाली फोटो दाखवतेय, गाजर, मुळा , फरसबी आणि वाली च्या शेंगा वापरून सॅलड केलं आहे. तसं सोपं आहे , गाजराच्या मुळ्याच्या चकत्या काढून त्याना V शेप मध्ये कट देऊन फुलं केली आणि प्लेट मध्ये फुलदाणी सारखी रचली. नेहमीच्या सॅलड सारखं हे कोणत्या तरी डिप मध्ये बुडवून किंवा मीठ मिरपूड घालून किंवा नुसतं ही खाऊ शकता. हे मोडायचा धीर नाही झाला तर सजावट म्हणून टेबलावर मस्तच दिसेल.

20220909_100033~3_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुबक आणि नेत्रसुखद आहे.

एकदम सुबक पाक'कला' कृती Happy >> + १ हेच लिहायचे होते पण ममो ना न दुखवता कसे लिहु कळत नव्हते.
मलासुद्धा असे वाटते की ही पाककृती नाही तर पाक"कलाकुसर" म्हणु शकतो.
ममो, मी तुमच्या लिखाणाची मोठी फॅन आहे आणि तुमच्याबद्दल पुर्ण आदर आहे कृपया गैरसमज करुन घेउ नका Happy

Pages