पाककृती स्पर्धा २: पौष्टिक टोस्ट - मंजूताई

Submitted by मंजूताई on 9 September, 2022 - 02:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
१) १ वाटी आवडीप्रमाणे १ किंवा कितीही कडधान्ये मोड आलेली (मूग व मटकी घेतलीये)
२) १ मिर्ची, लसणाच्या चार पाकळ्या व मूठभर कोथिंबीर
क्रमांक १ व २ जिन्नस मिक्सर, पाटा वरवंटा, रगड्यात
वाटून घ्या.
* मीठ हळद - आपल्या आवडीनुसार
* तेल - तळणार असाल तर जास्त लागेल शॅलो फ्राय केलं तर कमी आणि कुरकुरीत हव्या असतील तर तेल जास्त लागेल.
*पाणी

टोस्ट आहे तर अर्थात ब्रेड लागेल ४ स्लाइस ( पौष्टिकता वाढवायला मल्टीग्रेन ब्रेड घ्या)
वरील साहित्य अंदाजपंचे दाहोदरसे आहे. कडधान्यांचे वाटण जास्त झालं तर त्याचे आडई करता येतील.

क्रमवार पाककृती: 

वाटतात मीठ हळद टाका. फोटोत दाखवल्याप्रमाणे ब्रेड लागेल इतपत सरबरीत पीठ होण्यासाठी पाणी.
20220908_180123.jpg
ब्रेडचे त्रिकोणी/आयाताकृती तुकडे करून घ्या. तवा तापायला ठेवा. तव्यावर तेल टाका. पीठात ब्रेड दोन्ही बाजूंनी बुडवून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. आपल्या आवडीनुसार चीज किसून टाकू शकता.
20220908_192102.jpg
सॉस/चटणी बरोबर छान लागतात किंवा एखादं आपल्या आवडीचे डीप.
20220908_192102.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार .
अधिक टिपा: 

काही साहित्य/कृतीत दिल्या आहेत. अधिक : तयारीचा वेळ १ दिवस दिलाय पण तयार मोड धान्य आणली तर वेळ वजा होईल. ऋतु व स्थानानुसारही वेळ बदलेल. उरलेली उसळ खपवायला करता येतील. त्यात भर घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी..!
वरचा फोटो अगदी तोंपासू..!

मी बेसनचेच करते, चांगले लागतात, आंबट गोड (आयडी). सोबत थोडं तांदूळ पिठ किंवा मुगडाळ पीठ असेल तर घालते.

हे अजून चविष्ट लागतील, करून बघायचेत मला.