प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.
बालपणीचा काळ सुखाचा. शाळा सुटली आणि गृहपाठ झाला रे झाला की बाहेर खेळायला जायची कोण घाई. विटी -दांडू, लगोरी, कबड्डी, खो-खो, आंधळी कोशिंबीर ,गोट्या,लपाछपी, भोवरा या खेळांत तासनतास कसे जायचे कळायचं नाही.
घरात खेळा म्हणलं तरी उत्साह तोच असायचा.
भातुकली, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, नवा व्यापार,बाहुलाबाहुली लग्न, साबणाचे फुगे ... खेळ काही संपायचेच नाहीत. वर्गात सुद्धा बाकावर बसल्या बसल्या फुल्ली-गोळा खेळायला धमाल यायची. मंडळी,
आजचा विषय हाच आहे. खेळ.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.
वरच्या चेसच्या फोटोंना झब्बू.
वरच्या चेसच्या फोटोंना झब्बू.. आमच्याकडेही नुकतेच खेळायला शिकलेत
Pages