प्रोजेक्ट लंच !

Submitted by छन्दिफन्दि on 8 September, 2022 - 18:40
#littlemoments

माझा पहिल्या मोठया कंपनी मधला पहिलाच प्रोजेक्ट होता. साधारण ८-९ जणांची टीम होती. सगळेच २२ ते २५ वयोगटातले. देशातल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आणि एक एकटे मुंबईला येऊन राहिलेले. सगळे मिळून खूप काम करायचो आणि त्या बरोबर अर्थातच धमालही. रात्री अकरा अकरा पर्यंत थांबणे, शनिवार -रविवारी हि काम करणे अगदी नेहमीचचं होत म्हणा ना.

त्या वेळी कंपनीमध्ये साधारण ३-४ महिन्यांनी एकदा कंपनी स्पॉंसरड प्रोजेक्ट लंच असे. म्हणजे सगळी टीम, मॅनेजर सकट मस्त एखाद्या पॉश हॉटेलमध्ये जेवायला जात, पर हेड तीन एकशे असे काहीतरी बजेट असावे (हि गोष्ट साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे दर हि त्यावेळचे ).

आमचं पण प्रोजेक्ट लंच बरेच दिवसापासून रुजू होत. पण कामचं एवढं होत कि रोजच luch करायला जेमतेम वेळ काढायचो तिथे पार्टी साठी कसा वेळ काढणार? अखेर सहा महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर शेवटी एकदाचे पहिले रिलीज पार पडले. आता मात्र कधीपासून लांबलेले प्रोजेक्ट लंच अजून लांबणीवर टाकणे मॅनेजरला कोणी करू देणार नव्हते.

तेवढ्यात त्याने एक पिल्लू सोडलंच, "लंच के लिये जायेंगे तो पुरा दिन जायेगा. ऐसा करते है, डिनर पे जाते है. "

डिनर तर डिनर!

सगळेच तरुण, खादाडखाऊ , एकएकटे राहणारे, एवढे महिने कामाच्या ओझ्याने शिणलेले, त्यात कधीपासून due असलेली पार्टी , पॉश हॉटेलातली, तीही कंपनीच्या पैशांनी, मंडळी भयंकर उत्साहात होती. शेवटी आला तो दिवस, म्हणजे ती संध्याकाळ. सात वाजता ऑफिसच्या जवळच्याच एका तीन किंवा पाच तारांकित हॉटेलात मंडळी पोहोचली. मस्त ४-५ कोर्से चं यथेच्छ जेवण करून, हास्य मजा सगळे काही आटोपून घरी पोहोचायला वाजले रात्रीचे साडेअकरा.

दुसऱ्या दिवशी ऑफिसाला पोहोचायला थोडा उशीरच झाला. बघितलं तर कोणीच जागेवर नाहीये, सगळे गेले कुठे म्हणून इकडे तिकडे बघितलं तर सगळे मीटिंग रूम मध्ये होते.

"आज सकाळी सकाळी कुठली मिटिंग ? बहुतेक अचानक काही अर्जंट आलं असेल . अरे देवा ! रिलीज मध्ये तर काही पांगे नसतील ना ?" असं स्वगत म्हणतच वही पेन घेऊन गुपचूप मीटिंग रूम मध्ये शिरले. तिकडे तर एकदम टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरलेली. मॅनेजर मध्यभागी बसलेला. बाकीचे गुपचूप गोल करून बसलेले, एक दोघे उभे होते. सगळेच गंभीर दिसत होते.

"काल एवढी मजा केली. आणि आता काय झालं बर. नक्कीच काहीतरी गंभीर दिसतंय !" इकडे माझं स्वगत चालूच.

तेवढ्यात "अबे ! तुने क्या लिया था ?" ह्या प्रश्नाने माझी तंद्री तुटली. दुसऱ्या एकाला "तू लिख के ले बराबर " हि तंबी पण दिली.

आता माझी ट्यूब पेटली. " ओह कालच्या डिनरचं चाललंय काय? अरे देवा, हा तर सगळ्यांनी काय काय खाल्लं ह्याची लिस्टच बनवतोय? असं कधी कुणी करत का? ह्याच डोकं तरी ठिकाणावर आहे का? कोणी किती खाल्लं असं मोजतात का ? हे आणि ते.. " शरमेने कान,चेहरा, डोकं चांगलच तापल. तेवढ्यात कोणीतरी कुजबुजलं,"बिल बजेटच्या बाहेर गेलंय, हजार एक रुपयांनी, म्हणून भडकलंय तो. " आता प्रकाश पडला डोक्यात. खोली मध्ये नजर फिरवली तर सगळ्यांचेच चेहरे कसेनुसे झालेले. ह्याच आपलं सुरूच होतं एकेकाला , "तू ?... तू ?" अचानक माझ्याकडे फिरला " ए तुने वो कौनसा डेझर्ट लिया था , इतना फॅन्सी ? कितना था उस्का ??" आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती असे ते प्रश्न आणि परिस्थिती

मी " वो तो सबने खाया था ..." असं पुट्पुटत्ये तोवर त्याने उत्तर पण स्वतः च दिले," दोसो ?" तेवढ्यात त्याच लक्ष एका नवीनच आलेल्या "अससोसिएटे" कडे गेलं. " अबे वो तुने क्या लिया था? वेटर दिखाने के लिये भी लाया था !" तेवढ्यात कोणीतरी पचकलं. " लॉबस्टर "

"हां, लॉबस्टर !! वो जरूर महेंगा होगा . कितने का था ?" "आठसो.. " परत पचकेराम पचकले.

त्याच चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. काल तो जिवंत लॉबस्टर बघून लकाकणारे ते डोळे , आज भूमी मातेलाच जणू साकडं घालत होते , "हे धारणी मते मला पोटात घे. "

मॅनेजर अजून काही खेकसणार तेवढ्यात त्याचा फोने वाजायला लागला. त्यामुळे चडफडत मिटिंग अर्धवट टाकून तो उठला. सगळ्याना नुकताच जे घडलं त्या धक्क्यातून बाहेर पडायला दोन-पाच मिनिटं लागली. मग आम्ही विचार विनिमय करून ठरवलं, थोडे थोडे पैसे काढून वरची रक्कम त्याला देऊन टाकू. कसातरी तो विषय तेवढ्यावर तेव्हा कटला.

तेव्हा अवघडल्यासारखं वाटलं पण नंतर कितीतरी महिने आम्हाला तो विषय कोट्या करायला, मॅनेजरची खेचायला (त्याच्या मागे ) पुरला, हे सुज्ञास सांगणे न लगे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक किस्सा! पण हे असंही होतं?? Submitted by aashu29 << थन्क्स . Happy

१५/१६ वर्षांपूर्वी सुद्धा कोणत्या पंचतारांकित हॉटेल मध्ये ३०० मध्ये जेवण मिळतं होतं?<<< per head...asav majhya athvanipramane

मला वाटले काहींना फूड पॉइजनिंग झाले असावे म्हणून विचारतायत काल काय खाल्ले होते. आमच्या हपिसात असे झाले होते एकदा. ज्यांनी ज्यांनी श्रिम्प की लॉब्स्टर खाल्ले त्यांना दुसर्‍या दिवशी खूप त्रास झाला होता आणि निम्मी टीम ऑफ होती!
बाकी कंपनीचे लंच /डीनर असले की सगळ्यात एक्सपेन्सिव रेस्टॉ. निवडणे, त्यात पण मुद्दाम सर्वात महाग जे असेल ते ते सर्व ऑर्डर करणे असे सर्रास चालते Happy