कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !! - प्रेरणा कुलकर्णी

Submitted by छन्दिफन्दि on 8 September, 2022 - 14:58

मोरपीस म्हणजे कसं अगदी हळुवार , मुलायम आणि त्याचबरोबर बहुरंगी, आकर्षक,अगदी पुस्तकाच्या पानात हळुवार वर्षानुवर्षे जपून ठेवावं.
आमचे कॉलेज चे दिवस अगदी तसेच होते. आता आठवलं तरी खुद्कन हसू येत, मग अजून काही आठवत अजून थोडं मोठ हसू येतं, अगदी खदाखदा हास्याला लावणाऱ्या आठवणी पण आहेत. आणि मी जरी प्रेमात (बिमात ) पडले नसले तरी अनेकांना (किंवा किना ) मदत तर भरपूर केलीये. आधीच इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये (तेव्हा तरी) मुली खूपच कमी असायच्या, त्यातून एक दोघी तरी थोड्या चक्रम किंवा खडूस कॅटेगोरीतल्या.
मास बंकींग, थोडी छेडछाड, ST/ NMMT चा तुफान गर्दीतला प्रवास, रात्री जागून केलेल्या (म्हणजे छापलेल्या ) assignments, लिमिटेड बजेट मधल्या पार्ट्या प्रत्येकावरती अक्खा एक एक लेख होईल(कधी पासून डोक्यात आहे ).
आत्ता त्या मोरपिशी दिवसांमधील, कॉलेजच्या फायनल इयरला झालेली, एक छोटीशी मजेदार गोष्ट.

फायनल इयरचा एक किस्सा.
अनिल एक अत्यंत आगाऊ, सटक पण हुशार मुलगा. गीता चार चौघीत उठून दिसणारी, थोडी खट्याळ नाठाळ मुलगी. साधारण दुसऱ्या वर्षापासून तिच्या मैत्रिणी तिला चिडवतायत त्याच्यावरून. तो जवळपास फिरकला तर सुरु ह्यांची थट्टा मस्करी! त्याला काही पत्ता नाही . तो आपल्याच गुर्मीत. गीता पण मजे मजेने सगळं हसण्यावारी नेतोय. दुसरं तिसरं चौथं वर्ष आपण फास्ट फॉरवर्ड करूया. मैत्रिणीचं गीताला त्याच्यावरून चिडवणं, तिने मजेमजेने उडवून लावणं चालूच आहे.
चौथ्या, शेवटच्या वर्षीची सेंड ऑफ पार्टी जवळ आली. एक दिवस सगळे टवाळक्या करत बसलेले चौकात. अचानक अनिल (आपला गुर्मितला हिरो) आणि गीताची खूप जवळची मैत्रीण अनिता(वर्गातली अत्यंत संयतशील मुलगी ) दोघहि तिकडे आले. गप्पा गप्पांमध्ये त्यांनी जाहीर केलं "आमचं आहे . "
सगळे एकदम चिडीचुप्प झाले. "यांव ! अरे काहीतरी गंडलय. क्रॉस connection झालाय वाटत ... ???" सगळ्यांच्या डोळ्यात एकाच प्रश्न.
पण अनिल -अनिता ताजं ताज (आमच्यासाठी ) प्रेमी युगुल त्यांच्या धुंदीत निघूनही गेले .
त्याबरोबर जो काही हशा पिकलाय, सांगता सोय नाही. इकडे गीता ही हसत हसत, "अरे तुम्ही सारखं सारखं चिडवतायत, मला पण वाटलं हा ढोम्या खरंच प्रेमात बिमात तर नाही ये ना माझ्या ! च्यायला हे ह्यांचं कधी जमलं ?"
आमच्या कॉलेजचे CCTV कॅमेरे (?) " ह्यांचं कसं आणि कधी जमलं??? आयला! आपल्या लेन्स मधून हे कसं सुटलं ??? " बसले विचार करत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला भारी.. हा सेम माझा किस्सा आहे Happy

मला कॉलेजला एका मुलीवरून वर्षभर चिडवायचे चिडवायचे.. पण ती माझी चांगली मैत्रीणच होती. उलट मी तिची मदत घेऊन आणखी एका मुलीला पटवायच्या चक्करमध्ये होतो. पण मला तिच्यासोबत सारखे बघून आणि आमच्यातली केमिस्ट्री पाहून लोकांना आमच्यातच काही चालू आहे असे वाटायचे.. त्या मैत्रीणीला बहिण मानणारी तिच्या गावची काही मुले फुकटच्या फाकट मला मारायच्याही विचारात होती. पण फायनल एक्झामच्या जस्ट दोनेक दिवस आधी असाच एक बाँब पडला. तिचे माझ्याच एका खास मित्राशी जुळले होते. आणि याचा सर्वाधिक आनंद होणारा मी होतो. त्या तिच्या मानलेल्या गाववाल्या भावांपासून तिच्या प्रियकराला म्हणजे माझ्या त्या मित्राला प्रोटेक्शन देणाराही मीच होतो Happy

मॉरल - आपल्याकडे एक लडका और लडकी कभी दोस्त नही हो सकते मेंटेलिटी अजूनही फार आढळते.

अवांतर - शीर्षकात स्पर्धकाचे म्हणजे तुमचे आयडी नाव टाका. तसा नियम असतो. त्याने प्रत्येकाचा वेगळा लेख चटकन शोधता येतो .