प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

Submitted by संयोजक on 7 September, 2022 - 23:34

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

डोळ्यासमोर छान हिरवंगार शेत पसरलेलं आहे . आणि मध्येच एखादं (एखादच हं) नारळाचं झाड डौलात उभं आहे. काय म्हणत असेल बरं मग ते?
अकेले है तो क्या गम है ....

ओळखलंत ना मंडळी? आजचा विषय काय आहे ते.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
खेळायला नवीन मंडळींना साधारण कल्पना यावी म्हणून संयोजकांनी प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात टाकले आहे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

Screenshot_20220908-090035_Gallery.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फाऊल आहे बरं कृष्णा , किंवा ते इंजिनिअरिंगमधल जीटी का काय ते >>

Lol
आता दोन्ही कडे फिट बसतो हा फोटो मी तरी काय करू?

होय हो Happy
जरा गंमत केली. रागावू नका हं

हर्पेनला झब्बू.
nondani-karyalay-thane.jpg
हर्पेन आपला दोघांचा एकाच कार्यालयातील नसेल (माझ्या ठाण्यातील आहे) तर वरचे दिवे, त्या भिंतीला लावलेल्या प्लायवुडचा रंग आणि अर्थात रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत अखिल महाराष्ट्रकिती समान आहे! जय महाराष्ट्र! Proud
माझ्या फोटोत पण दाराला एक फ्रेम लावलेली आहे असं दिसतंय. Lol

न्युझिलंड मधिल Lake Wānaka इथे असलेले एक फेमस झाड 'वनाका ट्री' - पाण्यात एकटे डौलात उभे आहे हेच त्याचे वैशिष्ट
2018-12-30 11.49.53.jpg

सुर्य कसला कातील दिसतोय.

मावळत्या दिनकरा आठवलं आणि कुसुम्बी सावळे निळे, उदे अनंत जांभळे, मेघ मेघ सुर्य सुर्य मावळे ही आठवलं.

सर्वांचे फोटो भारी एकदम.

Pages