कथाशंभरी - वारसा - आशूडी

Submitted by आशूडी on 7 September, 2022 - 06:11

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
दोघी एकमेकींकडे बघून सहेतुक हसल्या. ती आली आणि भरभरून बोलत सुटली, "अग, काय सांगू तुम्हाला... धमाल चालू आहे नुसती गणेशोत्सवाची. पाककला, झब्बू, कोडी, गाणी , चित्र, हस्ताक्षर एकापेक्षा एक कार्यक्रम चालू आहेत. "
" ..आता सगळ्यांना विसर पडला असेल ना राजकारण, धर्म, संस्कृती आणि इतर विषयांवरच्या वादाचा..?" दुसरी विचारत होती.
" एवढंच नाही, तर लोक अगदी भरभरून कौतुक पण करत असतील एकमेकांचे." - पहिली म्हणाली.
"म्हणजे, तुमच्या वेळी पण असंच होतं..? " तिसरीने आश्चर्याने विचारले.
मायबोली ९९ आणि मायबोली २०१० मनमुराद हसल्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्ट...
आता सगळ्यांना विसर पडला असेल ना राजकारण, धर्म, संस्कृती आणि इतर विषयांवरच्या वादाचा..?" >>> कालच हे डोक्यात आलं... जिथे तिथे पुढे पुढे पुढे करणारे, वाद घालणारे आय्डी उडाले की काय अचानक असं वाटुन २-३ जणांचे प्रोफाईल बघुन पण आले काल... खोटं कशाला बोला Wink

मस्त Happy