Submitted by संयोजक on 6 September, 2022 - 23:45
शब्दखेळ - एकोळी कथा
काल करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.
हे वाक्य बऱ्याचजणांनी लहानपणी ऐकलेलं/ म्हणलेलं आहे. त्यात भर सुद्धा घातली आहे. आज असेच वेगवेगळी अक्षरे घेऊन जितकं लांब करता येईल तेवढं वाक्य करा.
आज आमच्या आईने आणि आरवने आडापलीकडून आवळे आणले.
नियम:
१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. एकाने एक अक्षर घेऊन वाक्य लिहिलं की पुढील प्रतिसादकाने कोणतंही वेगळं अक्षर घेऊन वाक्य लिहावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे! काहीच्याकाही चालु आहे
अरे! काहीच्याकाही चालु आहे Lol
पुरले? Rofl चेटूक वगैरे करायचं होतं की काय त्यांना?>>>++1
::)
मगल्सना नाही कळणार
मगल्सना नाही कळणार
मायबोलीवरच्या मंडळात मैलो
मायबोलीवरच्या मंडळात मैलो मैलीवरच्या मराठी माणसांनी मराठी मौतिकसुमने मुक्तहस्ते मांडल्यामुळे माझे मन मिळावू मन मनोमन मोहरले.
देवघरातील देवाला दिवे
देवघरातील देवाला दिवे दाखवायला दगडूने देवराइतील दगडी देवळापासून दमणी दामटली.
आईने अकबरी आलं आणि अमितच्या
आईने अकबरी आलं आणि अमितच्या ऑखोंमे आत्यंतिक आनंदाने आसू आलं.
हा हा .. आईने अकबरी अजूनही
हा हा .. आईने अकबरी अजूनही त्याची आठवण जागवून आहे तर !
धमाल धाग्यांच्या धुमाळीत
धमाल धाग्यांच्या धुमाळीत धवलने धोपटून धागा धकवला !
मायबोलीवर मातृभाषेच्या
मायबोलीवर मातृभाषेच्या माध्यमातून मराठी मन मिळून मिसळून मोठ्या मानाने मिरवले
सी ने सालस, समंजस सामोला
सी ने सालस, समंजस सामोला सारखे सारखे सतावून सोडले.

गायत्री, गणपतीबाप्पाच्या
गायत्री, गणपतीबाप्पाच्या गोडव्याचे गाणे गा गं.
सगळ्या एकोळ्या वाचून मी
धमाल धागा धाव धाव धावतोय.
धमाल धागा धाव धाव धावतोय.
बांबूच्या बेटाच्या बांधावरील
बांबूच्या बेटाच्या बांधावरील बाकावर बावळट बंडूच्या बेरकी बायकोने बासुंदीची बरणी बरबटवली
ए अश्वे हा फ्रॉड आहे. ती
ए अश्वे हा फ्रॉड आहे. ती बेरकी आहे. तो बावळट आहे ना? मग त्याला काय तो बावळटपण करुदेत कि बरबटवायचा
कोंडाजीने कोडग्या कुशाला
कोंडाजीने कोडग्या कुशाला कोठीत कोंडलं.
कवे, आलं होतं लक्षात पण
कवे, आलं होतं लक्षात पण बदलायचा कंटाळा केला
Pages