शब्दखेळ - एकोळी कथा.

Submitted by संयोजक on 6 September, 2022 - 23:45

शब्दखेळ - एकोळी कथा

काल करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.

हे वाक्य बऱ्याचजणांनी लहानपणी ऐकलेलं/ म्हणलेलं आहे. त्यात भर सुद्धा घातली आहे. आज असेच वेगवेगळी अक्षरे घेऊन जितकं लांब करता येईल तेवढं वाक्य करा.

आज आमच्या आईने आणि आरवने आडापलीकडून आवळे आणले.

नियम:

१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. एकाने एक अक्षर घेऊन वाक्य लिहिलं की पुढील प्रतिसादकाने कोणतंही वेगळं अक्षर घेऊन वाक्य लिहावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खडकीच्या खंडेरायाने खुल्दाबादच्या खिल्जीला खंडाळ्याच्या खिंडीत खिळवून खमंग, खरपूस खापरोळ्या खिजवत खिजवत खाल्ल्या.

काकूंनी काल केळ्याचे काप करपवले , काकांना कळल्यावर कसले किंचाळले! काका कोणत्याही कारणावरून किंचाळतात .

जाई जपून जहाजातून जपानला जा , जाता जाता जमल्यास जलपरिनां जहाजात जेवण्यास जमव .
(हे काहींच्या काही होतय, पण आता सुचलेच तर लिहिले :-))

पडवीसमोरच्या पारिजातकाच्या पारावर पहाटे पडलेली पांढरीशुभ्र पुष्पं पल्लवीने पळतपळत पोलादपूरच्या पंकजकडे पूजेसाठी पोचवली.

गोबर्‍या गालाची गितांजली गोडबोले गोड गाणे गात गात, गेटवर गुरकावणार्‍या गणू गुराख्याला गांगरवून गरीब गोर्‍या गुणी गायीच्या गोठ्यात गोवर्‍यांसाठी गेली.

प्रधानाचार्या पद्मा पाटलांनी पोंक्ष्यांच्या परीक्षितचे पाचवीचे प्रगतीपुस्तक परवा पहाटेच पाठशाळेच्या परसात पुरले.

शितळ शिमग्यात शेवग्याच्या शेंगा शेकोटीवर शेकता शेकता शेवटी शरद शहाणे शकटातून शिंदेंच्या शिवारातील शेतावर शिंकला.

पवारांचा परश्या पारावरच्या पोपटसह पाणवठ्यावर पोचला पण पल्याडच्या पावण्यांनी पाणकोंबडे पाटीतून पळवले.

फणसवाडीची फुलवा फणींद्रनाथ फडकुले फुरसुंगीच्या फाजील फास्टर फेणेने फुरसतीत फुसक्या फुलबाज्यांनी फसवल्याने फिस्कारली

मराठवाड्यातील मुधोळच्या मधुवंती ने मधुमालतीचा मांडव मातीसह मखरीतून महाराष्ट्रभर मिरवला

मामाच्या मुलीला मैत्रिणीचे मस्तीखोर मांजर मारुतीच्या मंदीरामागील मंडईत मासोळीवरच्या माशा मारतांना मिळाले.

Pages