हस्तलेखन स्पर्धा- मोठा गट-अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 2 September, 2022 - 19:50

'जयोस्तुते श्रीमहन्मंगले' हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले स्तोत्र माझे आवडते आहे. त्यातील पहिली दोन कडवी लिहिलीत. हातावर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. गोड मानून घ्या. Happy

Screenshot_20220902_184258.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. पहिली ओळ सोडली तर सर्व अक्षरे एकाच मापाची, दोन शब्दांमधले समान अंतर, शिरोरेखाही व्यवस्थित.
ख हे अक्षर जुन्या पद्धतीने लिहिलेय.

कृष्णा, मानवदादा, शंतनू, प्राचीन,ऋन्मेष, धनुडी, कुमार सर,वावे,हर्पा, हीरा, लोना...
कौतुकासाठी आभार. Happy

हीरा, निरिक्षण आवडले. पहिल्या ओळीसाठी वेगळी पेन वापरलीये.

अस्मिता, मस्त आहे अक्षर. मला असं आडव्या बांध्याच अक्षर आवडत. (अक्षरात ही आडवा बांधा, उभा बांधा... हा हा हा)

ममो , बांध्याचा पॉईन्ट बरोबर आहे. धन्यवाद. Happy
शंतनू, तुम्ही 'त' चं वळण म्हटल्याने लक्षात आले, यात 'त' अनेकवेळा आले आहे. Happy

छान!

एकाच ओळीत नभात आणि आकाशी हे दोन शब्द का असा प्रश्न कोणाला पडला नाही का?

परवशता नभात आहे. पण तू (स्वातंत्र्य) आकाशी होशील.
वर मानव म्हणताहेत तसं, सद्य परिस्थीत पारतंत्र्याच्या ढगांनी झाकोळलेली आहे, पण तू (स्वतंत्रते) आलीस की हे नभ पार विरुन जातील आणि चिरकालील आकाशात तू ..स्वातंत्र्य येईल असाच अर्थ मलाही लागला.
एडिट: पण नाही... नभ म्हणजे आकाशच ना? ढग नाही. आठवा: नभ मेघांनी आक्रमिले. मग काय मिटर मध्ये बसवायला मखलाशी असेल! Proud Wink
सेकंड एडिटः म्हणजे साधा अर्थ आहे. स्मार्टअ‍ॅस करायची संधी घालवली. परवशतेच्या ढगांत तूची आकाशी होशी करायला हवं होतं. Proud

Screenshot_20220904-200514_Chrome.jpg

एकच ओळ वाचून अर्थ लागत नाही, तीन ओळी वाचाव्या लागतात - "हे स्वतंत्रते भगवती, परवशतेच्या नभात तूच आकाशातील चमचमती, लखलखती चांदणी होतेस " . परवशतेचा नभ आणि आकाशातील चांदणी ह्या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत असल्याने एका वाक्यात नभ आणि आकाशी आले आहे.

छान चर्चा.

परवशतेच्या ढगांत तूची आकाशी होशी >> फुटलो Lol

>>> परवशतेच्या ढगांत तूची आकाशी होशी Lol

परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती, चांदणी!
चमचम लखलखशी!
अर्थात,
परवशतेच्या नभात दिशादर्शक अशी (ध्रूवतार्‍यासारखी) चांदणी झाली आहेस तू, स्वतंत्रते! तुझ्या दिशेने ही मार्गक्रमणा सुरू आहे.
(नभ म्हणजे स्काय आणि आकाश म्हणजे स्पेस - असंही असू शकेल.
अमित, तुला 'धागे तोड लाओ चाँदनी से नूर के' आठवलं नाही का? फारएन्डाला विचार म्हणजे काय ते! Proud )

( 'अन्यथा ग्रहण नष्ट तेची'चं कोडं नंतर सोडवू. Happy )