कथाशंभरी - एक बातमी - अमितव

Submitted by अमितव on 1 September, 2022 - 14:47

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय.. आणि तिने लेकीचा हात घट्ट पकडला. हसू क्षणार्धात मावळलं. चेहेराच काय अंगांग ताठर झालं. ती भिती/ घृणा होती का हादरल्याची भावना? तरळू लागला २२ वर्षांपूर्वीचा काळ. गरोदर असताना माहेरी आलेली तो दिवस. घरदार पेटण्याआधी काढलेला पळ. तीन वर्षाच्या मुलीचा नराधमांनी दगडावर आपटून घेतलेला जीव. अगदी कंसाने घेतल्यासारखा. तलवारी परजताना नाव मात्र कृष्णाचं. कलेवराची केलेली सामुहिक विटंबना! ही बेशुद्ध पडली म्हणून वाचली. पण भिती त्याची न्हवती. भिती वाटली दूरदर्शनवरची एक साधी बातमी वाचुन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages