कथाशंभरी - एक बातमी - अमितव

Submitted by अमितव on 1 September, 2022 - 14:47

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय.. आणि तिने लेकीचा हात घट्ट पकडला. हसू क्षणार्धात मावळलं. चेहेराच काय अंगांग ताठर झालं. ती भिती/ घृणा होती का हादरल्याची भावना? तरळू लागला २२ वर्षांपूर्वीचा काळ. गरोदर असताना माहेरी आलेली तो दिवस. घरदार पेटण्याआधी काढलेला पळ. तीन वर्षाच्या मुलीचा नराधमांनी दगडावर आपटून घेतलेला जीव. अगदी कंसाने घेतल्यासारखा. तलवारी परजताना नाव मात्र कृष्णाचं. कलेवराची केलेली सामुहिक विटंबना! ही बेशुद्ध पडली म्हणून वाचली. पण भिती त्याची न्हवती. भिती वाटली दूरदर्शनवरची एक साधी बातमी वाचुन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी कळाली नाही.
3 वेळा वाचली.
मी आधी चुकीच्या संदर्भाने वाचत होतो , नंतर लक्षात आले. जमली आहे.

भारी जमलीय..
काल रात्रीच वाचलेली. संदर्भ क्लिक झाला नव्हता.. आता लागला.

Sad

Sad शिव्यांची लाखोली वाहावी तरी कमीच तिथे ७२ शब्दात काम केलं!
लेखन म्हणून आवडलं, नाहीतर हे सगळं वाचायलाही नकोसं आहे.

सगळ्यांना धन्यवाद!
यावेळेला २८ शब्द संयोजकांनी दिले आहेत. आणि त्यात मोकळा वेळ, काही गेलेली वर्षे, पुलाखालुन गेलेले पाणी, अचानक कुठे लक्ष जाणे हे दुवे आहेत. क्रिटिकली बघितलं तर काही वर्षे लोटली आणि पुलाखालुन बरंच पाणी गेलं ची चक्क द्विरुक्ती आहे. हे सांगायला तब्बल १३ शब्द घेतले आहेत. म्हणजे दुवा असा बघितला तर दोन स्त्रीया खूप दिवसांनी भेटल्या आणि काही तरी वेगळं दिसलं इतकंच यातुन समजतंय.

७२ शब्दांत शेवटी काही ट्विस्ट ठेवून पात्र परिचय, वातावरण निर्मिती आणि शेवटचा ट्विस्ट करायला मजा आली. बघुया आणखी काही मजेदार सुचलं तर.

शपथ!
छान कसं म्हणू, सर्रकन काटा आला वाचताना. कंस आणि कृष्णाचं नाव ... किती खरय.न...

जमली आहे.
वर सी ने म्हटले तसे लेखन म्हणून चांगले आहे.......

Pages