लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2022 - 13:23

हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे Happy
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232

तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.

पण नुकतेच गेल्या काही दिवसात अचानक पुन्हा काहीतरी गिरगटवायला सुरुवात केली. जे आधीपेक्षा नेक्स्ट लेव्हलला गेलेय हे जाणवले.
तेच शेअर करायला हा धागा.

जर हि आवड पुढेही कायम राहीली तर यात आणखी काय करता येईल यावर तज्ञ आणि जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आवडेल Happy

-------------------------------------------------

हे एक सायन्स पोस्टर - हे तिच्या शाळेतही बोर्डावर लावले आहे - हे मला त्या दिवशी पॅरेंट टीचर मिटींगला गेलो तेव्हा समजले Happy

science poster.jpg

हा असाच फावल्या वेळेतला चाळा. अशी चित्रे कोणीही काढली की मला त्यांच्या चिकाटीचे कौतुकच वाटते Happy

fine art.jpg

हे आपले असेच, मध्यंतरी काही नाही सापडले तर एक बंद मोबाईल रंगवून काढला. आता तो घेऊन खोटे खोटे बोलायची स्टाईल मारत रस्त्याने फिरतेही Happy

mobile painting.jpg

आणि हे नुकतेच काढलेले स्केचेस, ज्यामुळे कौतुकाने हा धागा काढावासा वाटला. जवळपास दहाबारा स्केचेस एकाच बैठकीत आणि पटापट काढलेली आहेत. काही कलर केलेलेही आहेत. काही स्केचेसचे मूळ चित्रासोबत कोलाज केले आहे. कारण मला चित्रकलेतील काही कळत नसले तरी मूळ चित्राचीच साईज आणि प्रपोर्शन हे माझ्या ईंजिनीअर मनाला फार भावले Happy

स्केचेस १

sketches 1.jpg

स्केचेस २

sketches 2.jpg

स्केचेस ३

sketches 3.jpg

स्केचेस ४

sketches 4.jpg

स्केचेस ५

sketches 5.jpg

स्केचेस ६

sketches 6.jpg

स्केचेस ७

sketches 7.jpg

स्केचेस ८

sketches 8.jpg

स्केचेस ९

sketches 9.jpg

स्केचेस १०

sketches 10.jpg

स्केचेस ११

colour sketch 1.jpg

स्केचेस १२

colour sketch 2.jpg

स्केचेस १३

colour sketch 3.jpg

कोलाज १

collage 1.jpg

कोलाज २

collage 2.jpg

कोलाज ३

collage 3.jpg

कोलाज ४

collage 4.jpg

कोलाज ५

collage 5.jpg

कोलाज ६

collage 6.jpg

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर..! दिवाळीची उत्साही सुरवात..

कशापासून बनवले आहेत ?...ते ग्लास सारखे आहे ते काय आहे?

स्वान्तसुखाय , उबो .. धन्यवाद

@ स्वान्तसुखाय, ती ग्लास / बाटली मॅकडी मधून मिल्क शेक मागवलेला त्याची आहे. टाकाऊपासून टिकाऊ Happy

फेअरी लाईट माझी बायको तिच्या केक डेकोरेशनसाठी वगैरे आणते. आणि पोरगी त्या लाईट बेडरूमच्या भिंतींवर वेगवेगळ्या डिजाईनमध्ये लावते. तिच्या आवडीचा खेळ आहे हा.. कधीतरी बाकीच्या लाईटस बंद करून त्या फेअरी लाईटसच्या प्रकाशात गप्पा मारत झोपायला फार छान वाटते Happy

खूपच सुंदर!!!! किती अचूक रेखाटले आहेत! किती सखोल आहे हे काम! तिचं खूप खूप कौतुक. चित्र ९ फ्रोजनमधल्या एना/ एल्साचं तर नाहीय ना? Happy

स्केचेस सुंदर आहेत.
आणि फैरी लाइट्स वाली बॉटल/छोटा कंदील पण मस्तच. त्यावर काढलेले छोटे ब्ल्यु हार्टस् किती क्यूट !!

धन्यवाद.. मार्गी.. मृनाली.. संजना..

@ मार्गी,
फ्रोजनमधल्या एना/एल्सा आहे की नाही मला नाही ओळखता येतं.. पण त्यांची फॅन ती लहानपणी होतीच.. आता जरा मोठी झाली तर ब्लॅक पिंक आणि बिटीएस ने त्यांची जागा घेतली Happy

IMG_20240129_100210.jpg
.
IMG_20240129_100222.jpg

IMG_20240129_100237.jpg
.
IMG_20240129_100250.jpg
.
IMG_20240129_100318.jpg

गाईड करायला कोणी नाही आमच्याकडे. माझी स्वताची चित्रकला धन्य केटेगरीतील. त्यामुळे क्लास लावायचा का म्हणून विचारत असतो अध्य्मध्ये. पण अजून तरी ईच्छा दाखवत नाही. मी फोर्स करत नाही कारण मध्येच मूड आला तर चार दिवसात चौदा चित्रे काढते. नंतर चार सहा महिने एकही नाही.

फारच गोड चित्रं आहेत. त्यात आय कॅन सी यू वालं विशेष आवडलं. दिसायला जरी खूप रॉ असलं, तरी त्या चित्रात फार डीप काहीतरी आहे. त्यातले डोळे , मास्क आणि एकंदर हावभाव - मी बघतच राहिलो.

धन्यवाद सर्वाचे...
सामो, हो.सहमत आहे. प्रयत्न करतो क्लास लावायला तयार व्हावी यासाठी Happy

परवा रात्रीची गोष्ट.
मी किचनमध्ये, तर लेक चित्रकलेचा पसारा मांडून हॉलमध्ये.

परी - पप्पा, किचनमध्येच आहेस तर मला एक वाटी दे ना..

मी - (भांडे घासायचा त्रास कमी म्हणून सर्वात छोटी वाटी तिला दाखवून) ही घे..

परी - अरे मोठी देss..

मी - (त्यापेक्षा मोठी वाटी घेऊन) हि चालेल का?

परी - अरे अजून मोठी असते ना ती दे..

मी - (त्यापेक्षा मोठी वाटी घरात नसल्याने वाडगे दाखवून) हे बघ, आता हेच सगळ्यात मोठे आहे..

परी - अरे यापेक्षा मोठे नाही का मिळत तुला.. मम्मा बरोबर बोलते, तू काही कामाचा नाहीस.

मी - (चिडून) यापेक्षा मोठा टोप असतो.. हा बघ.. हा देऊ का? यापेक्षा मोठे हवे असेल तर बादली आणून देतो.

परी - अरे हाच पाहिजे होता.

मी - अरे मग सरळ टोप बोल ना. वाटी वाटी काय लावले होते.

परी - अरे मी लहान आहे. नादान आहे. मला काय माहीत याला वाटी नाही टोप बोलतात..

कप्पाळ..!
मग मी तिला दोन तीन टोप दाखवले. तिने पेपरच्या साईजनुसार हवा तो निवडला. तो पेपरवर उपडा ठेवून एक छानसे गोलाकार सर्कल काढले.. आणि त्यात खालील चित्रे रेखाटली.

IMG_20240220_112743.jpg
.
IMG_20240220_112800.jpg

आणि हे चित्रकलेचे साहित्य - टोप आणि ब्रशपेन.. कोणाला आवड असल्यास स्वतःसाठी किंवा मुलांसाठी घ्यायचे असल्यास एक पर्याय म्हणून शेअर करतोय.

IMG_20240220_155037.jpg

कलाकार आहे परी खरंच
किती creative
Fly above expectations आवडलं
सगळेच छान आहेत
रंगसंगती देखणी

छान आहेत सर्व चित्रे. आमच्याकडे त्या भांड्याला छोटे पातेले म्हणतात. टोप हे पहिल्यांदाच ऐकले. Happy

Pages