रात्र..

Submitted by _आदित्य_ on 20 August, 2022 - 11:15

हा चंद्र जुना, पण रात्र नवी..
पाहून म्हणें भावांध कवी,
"ही तीच तरी वेगळी कशी?"
नच कळली; सरली जरी विशी ! || 1 ||
सर्वत्र जसा तम घनदाटे..
तो सूर्य ! तरी त्यां भय वाटे !
सुमसाम दिशा अन वहिवाटा..
निद्रार्त हवेच्या मृदू लाटा.. || 2 ||
तारका काय सांगू बघती?
त्यां पाहून डोळां ये स्थगती !
मालकंस कानावर पडतो..
का गूढ प्रकार असा घडतो? || 3 ||
तो हरवतसे निजल्यांनंतर !
हे काय असे जंतर-मंतर?
स्वप्नात जगे तो सत्य दुजे..
पण त्यांस कुठे काही उमजे? || 4 ||
अंतरी शब्द साठत जाती..
मग पहाट घेऊन ये दीप्ती..
तांबडे फुटे; उगवतो रवी..
कवितेसोबत जागतो कवी ! || 5 ||

- आदित्य..

Group content visibility: 
Use group defaults

छान