"मेरे रश्क़-ए-कमर" या गझलेचा अर्थ हवा आहे

Submitted by chioo on 19 August, 2022 - 05:16

"मेरे रश्क़-ए-कमर" या मूळ गझलेचा अर्थ हवा आहे. 'बादशाहो' मधील गाण्याचा नव्हे.
ही रेख्तावरील गझलेची लिंक,
https://www.rekhta.org/ghazals/mere-rashk-e-qamar-tuu-ne-pahlii-nazar-ja...

इथे एक एक शब्द बघून अर्थ लावता येईल. पण असं वाटतं आहे की, एकत्रित अर्थ वेगळा आणि अजून सुरेख असेल.
Literal आणि philosophical (असला तर) असे दोन्ही अर्थ शोधते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घूंघट के पट खोल, तोहे पिया मिलेंगे।
माया, मोहादि षड्विकार ह्यांच्या विळख्यातून बाहेर आल्यावरच ' पिया ' दिसणार, मिळणार.
इथे पिया म्हणजे पिय्य. " देवानाम् पिय पियदस्सी अशोक " मधला पिय, प्रिय.
जेव्हा आयुष्यातल्या प्रेयसाची, ' प्रिय ' ची ओढ, तळमळ लागते, त्यामागे धावताना, एक एक करून सगळे विकार गळून पडतात, खरे जग काय, आपण कोण ह्याची ओळख पटते ( म्हणजेच माया नष्ट होते, शाश्वत, (सत्य) गवसते) तेव्हा ते 'प्रिय' मिळते. ते आपल्यातच आहे, ते आणि आपण वेगळे नाहीत हे कळते.
सर्वांचे प्रतिसाद देऊन झाले आहेत, तेव्हा आता अवांतर होणार नाही, किंवा झाले तरी चालावे अशी आशा.

>>>>>>>देवानाम् पिय्य पिय्यदस्सी अशोक
पाली भाषा वाटते.

खूप सुंदर अर्थ सांगीतलात हीरा.

धन्यवाद सामो!
भाषा पालीच आहे पण edicts जिथे जिथे सापडले तिथल्या स्थानिक संबोधनानुसार देवानां पिय पियदस्सी ह्या संबोधनामध्ये थोडा थोडा फरक आहे. लिपिसुद्धा ब्राहमीचे एक ठराविक रूप - फॉर्म नाही. बदल आहे. आणि ते साहजिक तर आहेच शिवाय त्या त्या भौगोलिक प्रदेशाच्या तत्कालीन भाषा - लिखाण पद्धतीवर आणि प्रमाण भाषा - लिपी ह्यात स्थळानुसार होत चाललेल्या बदलांवर प्रकाश टाकणारे आहे. भाषाशास्त्रज्ञांसाठी ठेवा आहे.

आता अवांतर सुरु झाले आहेच तर मी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेतो.
लेखक जेव्हा लिखाण करतो तेव्हा वाचणारे आपल्याला भावेल तसे अर्थ लावतात जसे मी वरच्या गझलेचा लावला. श्रीमद् भगवद्गीतेेच उदाहरण दिले.
नुक्ता्च एक असेच विचित्र उदाहरण वाचनात आले. युजीन आयनेस्कोव चे एक नाटक आहे "बाल्ड सोप्रानो" हे नाटक अब्सर्डी्समचे क्लासिक नमुना आहे. OK! इथपर्यंत ठीक आहे.
आयनेस्कोवला गणिताचे जुजबी ज्ञान असावे. पण टोपोलोजी ह्या गहन विषयाचे असावे कि नाही याबद्दल संशय आहे. त्याच्या वाचकांनाही असावे किंवा काय याबद्दल संशय. कारण कुणी त्या नाटकाकडे त्या दृष्टीने बघणे शक्य नाही.
चला पुढे.
आता मी वाचले कि हे नाटक Moebus Strip वर आधारित साहित्यात ज्या थोड्याफार कथा/ कादंबऱ्या आहेत त्या पैकी एक आहे. Nobokov च "The Gift" सुद्धा असेच आहे.
Moebus Strip = जर कल्पना शक्तीला पीळ द्यायचा असेल किंवा मेंदूचा भुगा पडायचा असेल (आपल्या किंवा दुसर्याच्या जसा मी इथे वाचकांचा करतो आहे) Moebus Strip बसल्या बसल्या एका मिनिटात बनवू शकता.
जिज्ञासू वाचकांसाठी नील डी ग्रास ह्यांचा हा विडीओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=vLgCq4ikl78&ab_channel=StarTalk

Moebus Strip = जर कल्पना शक्तीला पीळ द्यायचा असेल किंवा मेंदूचा भुगा पडायचा असेल (आपल्या किंवा दुसर्याच्या जसा मी इथे वाचकांचा करतो आहे) Moebus Strip बसल्या बसल्या एका मिनिटात बनवू शकता.>> एशरच्या चित्रांमध्ये आहे. माझ्याकडे आहे ते प्रिंट. सुरेख दिसते.

अवांतर मोड ऑन- Möbius strip आणि Klein bottle वरती कॉलेजमध्ये असताना प्रोजेक्ट केलेला, टोपोलॉजी मधल्या one sided surfaces सारख्या या संकल्पनांनी अचंबित व्हायला होतं हे खरं! बऱ्याच वर्षांनी आठवण झाली. अवांतरास हातभार लावल्याने क्षमस्व. अगदीच राहवलं गेलं नाही.
अवांतर मोड ऑफ

नुसरतचं व्हर्जन जास्त आवडतं आहे

मेघना, अमा
वा वा.
है कोई!!
समझनेवाला.

माझ्याकडे एशरवर पूर्ण मोठे पुस्तक आहे. त्यात अश्या अनेक संकल्पना चित्रातून मांडल्या आहेत. ह्या स्ट्रिपची अजूनही चित्रे आहेत. मासे त्यातुन पक्षी मग घोडे फुले परत मासे असे काय काय. इन्सेप्शन मध्ये पन पॅरा डोक्स कन्सेप्ट मांडलेली आहे. पण इथे प्यारा डॉक्स चालू आहे गाण्यात.

Inter-University Centre for Astronomy and Astrophysics. जयंत नारळीकरांनी चालू केलेली संशोधन संस्था. पुण्यात आहे (विद्यापीठ कॅम्पस).

इथे चंद्र आणि त्याच्या प्रकाशावर काम चालत असावं. त्यामुळे रश्क ए कमर विषयाशी संबंधित चर्चा आहे.

हरचंद पालव
आयुकामध्ये मोबियस स्ट्रिपचं जंगलजिम आहे.>>>
माताय! पुण्यात राहून हे माहित नव्हते.
वरच्या माझ्या प्रतिसादात मोबियस स्ट्रिपच स्पेलिंग moebius असे वाचावे.
चुकीबद्दल क्षमस्व.

अमितव
बाल्ड सोप्रानो वाचाच. तशीच ही अजूनेक मार्वलस कथा हि वाचा. गाजलेली आहे. आपल्या मराठीत ती नारायण धारप यांनी नवल मध्ये लिहिली होती अस अंधुकसे आठवते आहे. . A Subway Named Mobius. सिनेमाही झाला आहे.
इथून ओफिशियली डाऊनलोड करा.
https://www.fadedpage.com/showbook.php?pid=20210556

Pages