असाही घडलाय भारत!

Submitted by पराग१२२६३ on 14 August, 2022 - 13:55

स्वातंत्र्यानंतरची गेली 75 वर्षे भारतासाठी काही नकारात्मक आणि काही सकारात्मक घडामोडींची ठरली आहेत. माध्यमांचा तसेच समाजातील काही घटकांचा सातत्याने त्या नकारात्मक बाबींकडेच बोट दाखविण्यावर भर असतो. त्यातून आजचा भारत घडविण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या सकारात्मक घटनाक्रमाकडे दुर्लक्ष होत राहते.

बांगलादेशाची निर्मिती भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण घटना होती. या युद्धाद्वारे भारताने आपल्या लष्करी क्षमतेचे, कौशल्याचे आणि कुटनीतीचे प्रदर्शन साऱ्या जगाला घडविले होते. अमेरिकेने सातवे आरमार भारताच्या विरोधात पाठविलेले असतानाही त्या दबावाला न जुमानता भारतीय लष्करीदलांनी ही अद्वीतीय कामगिरी बजावली होती.

बांगलादेश निर्मिती आणि अणुचाचण्या या दोन घटनांमुळे जगातील महत्त्वाच्या राष्ट्रांनी भारताची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली. परिणामी भारताची वाढती क्षमता रोखण्यासाठी त्याच्यावर निर्बंध लादण्यात पाश्चात्त्य राष्ट्रांनी पुढाकार घेतला. त्यासाठी अणुचाचणीबंदीसारखे (Non-Proliferation Treaty) करार करण्यात आले. मात्र हे करार पक्षपाती असून अशा प्रकारचे कोणतेही करार आपण कधीही स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यास भारताला या अणुचाचण्यांनी आजपर्यंत बळ दिले आहे.

तंत्रज्ञान हस्तांतरावरील निर्बंधांमुळे अडचणी आल्यावर दीर्घपल्ल्याचे क्षेपणास्त्र आणि अवजड प्रक्षेपक यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजनिक इंजिनांची भारतीय तंत्रज्ञांनी स्वबळावर यशस्वी निर्मिती केली होती. त्याचीच चाचणी `जीएसएलव्ही'च्या प्रक्षेपणाच्या निमित्ताने झाली होती. आज भारताने अग्नी, पृथ्वी, के-15 अशी विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि पीएसएलव्ही, जीएसएलव्हीसारखे उपग्रह प्रक्षेपक विकसित केले आहेत. त्याचबरोबर पहिल्याच प्रयत्नात चांद्रयान आणि मंगळयान मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची कामगिरीही केलेली आहे. आज अणुपाणबुडी, विमानवाहू जहाज आणि अन्य युद्धनौका, तोफा, रणगाडे आणि चिलखती वाहने, हलके लढाऊ विमान-तेजस इत्यादी लष्करी साधनसामग्री देशातच बांधण्याची क्षमता भारताने प्राप्त केलेली आहे.

भारताच्या गेल्या 75 वर्षांमधील प्रगतीत भारतीय रेल्वेचाही वाटा मोलाचा आहे. 1980 च्या दशकात देशात संगणक युगाची सुरुवात झाली. त्यानंतर भारताने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून आज या क्षेत्रातील महत्वाची सत्ता भारताकडे पाहिले जात आहे.

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतानाच भारतीय रेल्वेचेही 170 वे वर्ष सुरू आहे. आज भारतीय रेल्वेवर राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, गतिमान अशा विविध वेगवान रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यांचा वेग आणखी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय रेल्वेचा वाफेच्या इंजिनापासून सुरू झालेला प्रवास आज भारतीय रेल्वे 100% विद्युतीकरणाकडे निघाला आहे. विदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने WAG-12, WAG-7, WAG-9, WAP-5, WAP-7, WDG-4D, WDG-5 या अत्याधुनिक अश्वांसह (इंजिने) LHB आणि Train-18 यांसारखे अत्याधुनिक डबेही देशातच बांधले जात आहेत.

देशातील स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाच्या घडामोडींवर विचार करताना यांसारख्या सकारात्मक घटनाही आवर्जून विचारात घेणे आवश्यक आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/08/blog-post_10.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.
आणखी काही गोष्टी म्हणजे १९५२ साली पहिल्या आशियाई स्पर्धा भारतात झाल्या.

१९७४ च्या अणु चाचण्यांचा परिणाम The Nuclear Suppliers Group (NSG) was created following the explosion in 1974 of a nuclear device by a non-nuclear-weapon State, which demonstrated that nuclear technology transferred for peaceful purposes could be misused.

आणि मग At an extraordinary NSG Plenary in Vienna, convened by the 2008 NSG Chair (Germany), PGs adopted a policy statement on civil nuclear cooperation with the IAEA-safeguarded Indian civil nuclear program - INFCIRC/734
दोन्ही त्यांच्याच संकेतस्थळावरून

७५ म्हणजे काहीच नाहीत एका अजस्त्र देशाच्या अन् लिव्हिंग हिस्ट्री म्हणवला गेलेल्या भुभागाच्या आयुष्यात.

आत्ता कुठं धडपडत पावले टाकत मान ताठ करून जगाकडे आम्ही बघतोय, जग कुतूहलाने आमच्याकडे बघतेय, अजून खूप पल्ला आहे गाठायला, गुरुदेव रवींद्रनाथ म्हणतात तसे where the head is held high and the mind is without fear, अशी एक सुंदर सर्वसमावेशक संस्कृती निर्माण झाली तर खूप उत्तम होईल.

असो, आजच्या सकारात्मक वातावरणात जास्तच स्वप्नाळू आशावादी लेखन झाले आहे बहुतेक, पण जे झाले मनापासून झाले.

ह्या सकारात्मकतेचा समारोप आजच्या पुरता करण्यासाठी ही एक नितांत सुंदर कलाकृती

ग्रीक शैलीतील "बाल अजा पालक चंद्रगुप्त, भारत अखंड करण्याचे स्वप्न पाहत असताना, स्थळ - भारतीय संसद भवन, सेंट्रल स्क्वेयर

images (19)_0.jpeg

बऱ्यापैकी आढावा घेतला आहे, लेखात आणि प्रतिसादांतही, पण अपुरा आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील तीन भव्य पोलाद कारखाने, (बुखारो, रूर्केला, दुर्गापूर ), दुग्ध क्रांती, ग्रीन रिवॉल्युशन, बँकांचे राष्ट्रीयीकरण वगैरे.
बँक राष्ट्रीयीकरण हा तर फार मोठा क्रांतिकारी निर्णय होता, आय टी लाटेचा जसा आणि जो परिणाम १९९०-२०१० मध्ये झाला तसाच परिणाम मध्यम वर्गाचा विस्तार होणे, निम्न आर्थिक वर्गातल्यांना मध्यम वर्गात बढती मिळणे, गृहनिर्माण आणि गृह खरेदी वाढणे, रोजगार वाढणे, लोकांच्या अन्न वस्त्र ह्या दोन मूलभूत गरजा थोड्याफार ( तुलनेने अधिक) प्रमाणात भागवल्या जाणे, अर्थसाक्षरतेशी मध्यमवर्ग परिचित होऊ लागणे, प्रवास, यात्रा, पर्यटन ह्यासिली उलाढाल अनेक पटींनी वाढणे वगैरे बँक राष्ट्रीयीकरणामुळे झाला.
मुंबई - महाराष्ट्रापुरते पाहिले तर व्यापार, -उदीम, दळण वळण, वाहतूक ह्याला चालना देणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या. वाशी खाडी पूल, मुंबई गोवा रस्ता, मुंबई अहमदाबाद ( पुढे कोटा,आग्रा वगैरे) रस्ता, मुंबई नाशिक आग्रा सुधारित रस्ता, मुंबई पनवेल हार्बर रेल्वे, पुढे कोंकण रेल्वे, हार्बर रेल वेचा बोरिवली पर्यंत विस्तार, ठाणे वाशी रेल्वे, बांद्रे - वरळी सागरी सेतू, सांताक्रूझ कुरले जोड रस्ता, जोगेश्वरी विखरोळी जोड रस्ता, पश्चिम लिंक रोड, पूर्व मुक्त मार्ग, अनेक उड्डाण पूल, विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईची विस्तारित महानगरी होणे, ड्रेनेज, पाणीपुरवठा सुधारणे वगैरे.
तसेच अनेक मोठी धरणे महाराष्ट्र आणि देशपातळीवर बांधली गेली. भाखड़ा नांगल, हिराकुड, उकाई, कोयना, उजनी, जायक वाडी, गोसी खुर्द, राजीव गांधी, अपर वर्धा, इंदिरा गांधी कालवा - राजस्थान ( हा आणखी एक क्रांतिकारी प्रकल्प.) दामोदर व्हॅली वगैरे.
देशात तर अनेक गोष्टी घडल्या. कम्प्यूटर क्रांती, उदारीकरण ह्या ठळक घटना.
असो. जंत्री वाढत चालली.

असा घडला भारत .
ह्या विषयाला अनुसरून व्यक्त व्हायचे असेल तर .
फक्त स्वतंत्र नंतर चे 75 वर्ष हे लिमिट साफ चुकीचे आहे.
1) भारत आता जो आहे.
ह्या एकसंघ भूमीवर एकच केंद्रीय सत्ता राज्य करत आहे.
एकाच केंद्रीय सत्तेच्या अधिकारात भारताचा भू भाग आणला तो ब्रिटिश लोकांनी..
त्या मुळे त्याचे श्रेय त्यांनाच देणे भाग आहे.
२) प्रशासकीय व्यवस्था,सैन्य व्यवस्था,न्याय व्यवस्था ह्या निर्माण केल्या ब्रिटिश लोकांनी त्याचे श्रेय त्यांना देणे आवश्यक च आहे.
३) मतदान घेवून सत्ता धारी निवडणे ही पद्धत पण ब्रिटिश काळात च भारतात होती.
मतदान हक्क मर्यादित होता पण सुरुवात त्यांनी च केली.
४) बंदर,लोकसभा,राष्ट्र पती भवन ह्या सर्व प्रशासकीय इमारती त्यांनी च उभारल्या.
५) सती बंदी कायदा आणि असे अनेक कायदे त्यांनी च आणले.
६) रेल्वे,रस्ते, ह्यांची सुरुवात त्यांनीच केली.
देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला सर्व तयार भेटले.
प्रशासकीय व्यवस्था.
न्याय व्यवस्था
मतदान मधून सरकार निवडणे ही व्यवस्था.
Railway.
आपण १९४७ नंतर काय केले.
विविध सरकारी उत्पादक कंपन्या उभ्या केल्या.
विविध शैशिनिक संस्था निर्माण केल्या.
सर्रास सर्वांना मतदान चा हक्क दिला.
Railway marg च vistar केला.
प्रांतीय पद्धत बदलून विविध राज्य निर्माण केली.
चार पाच युद्ध लढली.
देशाचे विभाजन थांबवू शकलो नाही.
ही फक्त आपली uplabdhi

असं नाही. फक्त मुंबईचंच उदाहरण घ्या. १९४७ ऑगस्टपर्यंत मुंबई फक्त वांद्रे आणि शीव पर्यंतच होती. पुढे खूप मोठा भूभाग त्यात सामील केला गेला. त्या भूभागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, नवे रेल मार्ग, हमरस्ते, राष्ट्रीय महामार्ग, वीज जोडण्या, टेलिफोन जोडण्या, टाऊन प्लॅनिंग अशा सर्व सुविधा नवीनच उभ्या केल्या गेल्या. नवी मुंबई हे व्यवस्थित नियोजन केलेलं जोड शहर उभारलं गेलं. खाडीपारच्या मुख्य भूमीला जोडणारे रस्ते, पूल , उड्डाणपूल बांधले गेले. इतरत्र, धरणांची संख्या खूप वाढली.
पुण्याचं तर रूपच बदलून गेलं आहे. इतरही अनेक शहरांनी कात टाकली आहे.
स्वातंत्र्यानंतरचा हा आपल्या डोळ्यांदेखत झालेला बदल नाही का?

फक्त स्वतंत्र नंतर चे 75 वर्ष हे लिमिट साफ चुकीचे आहे.<< वास्को ड गामा ला १४९८ ला सापडला भारत त्याचे श्रेय द्यायचे राहीले की राव तुमचे

मुंबई शीवपर्यंत होती. G I P रेल्वे मुंबई ते कलकत्ता आणि मुंबई ते दिल्ली अशी विस्तारली होती. पुढे ह्या सर्व रेल कंपन्या भारतीय रेल्वे मध्ये सामील होऊन पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे असे विभाग पडले.
ब्रिटिशांची मध्यवर्ती शासन व्यवस्था होतीच. टपाल, रेल्वे वगैरे. पण स्वातंत्र्यानंतर लहान सहान शहरेही वाहतूक साधनांनी जोडली गेली.

स_सा
खोटा अभिमान आणि सत्य नाकारणे हे खूप धोकादायक..
खोटा अभिमान बाजूला ठेवून आणि सत्य स्वीकारून चुका सुधारता येतील.
मला तरी हेच वाटते.

एकसंघ भूमीवर केंद्रीय सरकार ब्रिटिश सत्तें मुळेच आले.
मतदान करून सत्ता धारी निवडणे ही त्यांची च गिफ्ट आहे
पण ब्रिटिश वसाहती असणाऱ्या सर्व देशात आज निवडणूक घेवून सरकार निवडले जाते का?
हा प्रश्न घेतला तर त्याचे उत्तर नाही हे आहे.
आपण मतदान घेवून सत्ता धारी निवडणे ही पद्धत अजून develop केली आणि सर्रास सर्वांना मतदान चा अधिकार दिला ही आपली उपलब्धता आहे.
अभिमान आहे.

हेमंत, <<एकाच केंद्रीय सत्तेच्या अधिकारात भारताचा भू भाग आणला तो ब्रिटिश लोकांनी..>>
यासारख्या तुमच्या काही मुद्द्याशी मी सहमत आहे.