डार्लिंग - नेटफ्लिक्स - आलिया, शेफाली vs विजय वर्मा

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2022 - 18:31

डार्लिंग्स - नुकताच पाहिला. क्लास पिक्चर. स्टोरीलाईन म्हटली तर थोडीफार नेहमीचीच. पण कमाल ट्रीटमेंट. बरेच दिवसांनी मी हिंदीत काहीतरी हटके पाहिले.

शीर्षकात लिहिलेल्या तिघांच्या अभिनयाची नुसती जुगलबंदी. तिघांवर वेगवेगळे लिहावे असे.
आलिया तर बिलकुल नेपोटीजमवाली स्टारकिड नाहीये.
विजय वर्माला आधी पाहून सहजच नवाझ आठवला. पण नंतर बघता बघता त्याने पिक्चर खाऊन टाकला.
आणि शेफाली शाह तर.. ..ऊफ्फ!! काय डोळे बोलतात त्या बाईचे.. ("मुझे तो खाला क्यूट लगती है".. या डायलॉगनंतरचे तिचे एक्स्प्रेशन तर नुसते.. चुम्मा!!)

ईतर दोन तीन कलाकारही लक्षात राहतात. त्यात मराठीचा टक्काही आहे हे बरे वाटते.

पिक्चरच्या सादरीकरणाला साजेशी बॅकग्राऊंड म्युजिक, आणी जी काही आहेत ती गाणीही छान, काही पुढे ढकलावेसे वाटलेच नाही.

पण सगळ्यात कमाल आणि पिक्चरचे बलस्थान असे म्हणावे तर तर कॉमिक डायलॉग्ज. ह्यूमरचा वेगळाच दर्जा. क्लास. हल्ली अभावानेच आढळतो. अगदी शेवटी तो पोलिस ईन्स्पेक्टरच्या तोंडचा डायलॉग ऐकल्यावर एवढावेळ साठलेले स्माईल एकदमच चेहर्‍यावर पसरते Happy

जरूर बघा. आणि चर्चा करायला लगेच ईथे या.

क्लायमॅक्स आणि त्यासोबत येणारे सारे ट्विस्ट टर्न्स आवडले, आणि त्यातून आलेले विचारही पटले. पण त्यावर आजच लिहायला नको. आधी बघून घ्या...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीकेंडला पहिला. Sonalisl +1 मलाही हाच प्रश्न पडला होता. शिवाय हमजाला बांधून ठेवलेलं तेव्हा त्याला सहज आरडाओरडा करून इतर लोकांचे लक्ष वेधून घेता आलं असतं असं वाटलं (त्याला शुद्ध असताना).
तरीही या काही खटकलेल्या बाबी असूनही हटके ट्रीटमेंट आणि कलाकारांचा अभिनय यामुळे खूप आवडला.

सोनाली, हो.
तो प्रश्न मलाही पडलेला +१
पुढे ती कथानकाची गरज म्हणून त्या नादात चूक झाली असावी.

..

दिल हमारा लाईलाज है.

हे गाणे आज एका फेसबूक रीलला ऐकले. आवडले. ओळखीचे वाटले. कुठले ते शोधले. तर यातलेच निघाले.

https://youtu.be/Ee7zS3lXI2Y

अरिजित भैयांचा दर्द आहे यात नेहमीचा..

आवडला. मुख्य म्हणजे अभिनयासाठी. शेवटी रेल्वे लाईनपासून परत येताना आलिया, शेफाली छाया आणि तो खाटिक (खोसला का घोसलामधे हा बोमन इराणीचा असिस्टंट आहे का?) यांनी नुसत्या नजरेतून काय मस्त अभिनय केलाय!
शेवटी शेवटी जरा जास्त ताणत नेलाय असं वाटलं.

आणखी एक मजेदार रिकरिंग थीम म्हणजे जेथे एकवचन वापरायला हवे किंवा जेथे स्वतःबद्दल उल्लेख असताना शब्दाला शेवटी "एस" लावत नाहीत (वर्तमानकाळाबद्दल) - तेथे त्या इंग्रजी शब्दाचे अनेकवचन वापरणे किंवा तसा "एस" लावणे . शीर्षक - डार्लिंग्ज - हे ही त्यावरूनच असावे. पिक्चर मधे अनेक वेळा अनेक जण असेल बोलतात - विशेषतः आलिया.

I loves you! वगैरे. सोशल नेटवर्क वर इंग्रजी ग्रामर नीट माहिती नसताना लिहीणारे सहसा असे लिहीतात.

यांनी नुसत्या नजरेतून काय मस्त अभिनय केलाय! >>> हो त्याला संवादच नाहीत किंवा अगदी कमी आहेत - बहुधा जे आहेत ते फक्त खाटिककामासंंबंधी आहेत. पण जितका रोल आहे तो सॉलिड केला आहे त्याने.

हात बांधून रेल्वे लाईनवर झोपवले होते आणि त्याने आत्महत्या केली असे दाखवणार होते. रेल्वेने चिंधड्या केल्यावर ते पुन्हा जाऊन बांधलेले हात सोडणार होते का?>> संपूर्ण सिनेमात खटकलेला हाच एक प्रसंग.

>>शीर्षक - डार्लिंग्ज - हे ही त्यावरूनच असावे<<
आय्ला, हे तसं आहे होय? मला वाटलं ते अनेकवचन आहे - दोन डार्लिंग्ज आहेत म्हणुन... Wink

खाटीक - राजेश शर्मा
चिल्लर पार्टीमध्येही त्याचे पोरांसोबत असेच सीन आहेत. संवाद कमी नजरेचे शॉट.
धोनीमध्येही लास्ट सीनला यांचीच रिॲक्शन मला आवडली होती. हात पुढे करून छातीवर मारत काही न बोलता.. मेरा बच्चा है, प्राऊड ऑफ यू हे न बोलता सांगून जाणारी.. माझ्या धोनी पिक्चर रिव्यूमध्येही हा उल्लेख मी केलेला.

अरे काय हे... धाग्यात आणि प्रतिसादात कुठेच शाहरूखची कंपनी रेडचिलीज प्रॉडक्शनचा उल्लेख नाही Happy
कहाणी भलती ठिसूळ असली (लूपहोल्स) तरी संवाद मजेदार असल्याने एकदा बघण्याजोगा आहे. मात्र ते 'खाला क्यूट' पटलं नाही. एवढी क्यूट वाटते तर मिक्सर का नाही दिला १०० रूपयाला Light 1 ....प्यार करे और नोट भी मांगे...

काल पाहिला आणि आवडला. आलियाचे जे काम पाहिले ते आवडलेले आहे, यातही छान केलेय. गोड बोलण्याला फशी पडणार्याच जास्त असतात, म्हणुन डो व्हॉ होत राहतात हेमावैम. पण तोडगा मस्त. लिगली काहीही तोडगा निघत नाही, असे नवरे जळवासारखे चिकटुन राहतात.

शेवट आवडला. हात पाय बांधुन झोपवला तेव्हा मलाही हे लोक स्वतःलाच अडकवताहेत असे वाटले. पण तिघेही थोडे मुर्खच दखवलेत अधुन मधुन. सामान्य माणसेआहेत ती, ठरवुन खुन पाडणारे गुन्हेगार नाहीत. त्यांना फक्त सुटायचे आहे, काय चुक केली ते नंतर कळले असते Happy

आलियाही एक प्रोडुसर आहे चित्रपटाची.

मिक्षर १०० लाच घेते ती. तो तयार नसतो तरी. आलिया विचारते तेव्हा १००च म्हणते ती. प्यार जिवंत राहायला पोट भराय्ला नको का? नंतर डब्याच्या धंद्यात मागत नसेलही. उरलेले खाउन पोट भरत असेल. Happy

मला चित्रपटाबद्दल काहीही माहित नसताना इथले वाचुन बघायला घेतला. सुरवातीच्यस एक दोन प्रसंगातच उच्चारांवरुन हे मुस्लिम दिसताहेत असे वाटले. चांगले घेतलेय. कमी शिकलेले लोक ऐकुन जसे इन्ग्रजी शब्द वापरतात तसेच घेतलेय यात. आलिया प्लिज चा ज जहाजातला न उच्चारता जगातला उच्चारत असते.

मिक्सर विकणारा आलिया ऐवजी शेफाली वर प्रेम असल्याचे सांगतो त्यावेळी आलिया आणि शेफालीचे एक्स्प्रेशन असलेली चार पाच मिनिट देखील जबरदस्त आहेत.....
अख्या मूव्ही मध्ये शिष्ट दाखवलेली शेफाली चे त्या दृष्या नंतर स्वतः मध्ये हरवून जाणे आणि तो धक्का पचविताना आलियाची झालेली तारांबळ त्यावेळी दोघींच्या अभिनयाच्या छटा लाजवाब .

आलिया प्लिज चा ज जहाजातला न उच्चारता जगातला उच्चारत असते. >>> हो. अँथनी गोन्साल्विस गाण्यातही तोच उच्चार आहे Happy

मिक्सर शेवटी पन्नास रुपयांना घेते ना ती. >> पन्नास तरी देतात का त्याला? का आलिया तो चहा काढून घेते तसे ते पन्नासही घेते? Happy

पण तिघेही थोडे मुर्खच दखवलेत अधुन मधुन. सामान्य माणसे आहेत ती, ठरवुन खुन पाडणारे गुन्हेगार नाहीत. त्यांना फक्त सुटायचे आहे, काय चुक केली ते नंतर कळले असते >>>
करेक्ट... नेफ्लिवर सिनेमाच्या इंट्रो मजकुरातही हे म्हटलेलं आहे, की सूड उगवायचं ठरवतात पण clumsily, फार विचार न करता.

डार्लिंग्ज - याचं फारएण्डनं दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा करेक्ट. मलाही तसंच वाटलं.

मला त्याच्या इंग्रजीमध्ये एक वाक्य खटकलं
आलिया 'आय लव्हज यू ' म्हणते.शेवटी गाणेही आहे .
पण मला वाटते आजकाल कोणालाही म्हणजे अगदी कोणालाही आय लव्ह यू हे वाक्य माहित आहे, त्यात लव्हज अशी चूक होणार नाही Or am I wrong ?

'आय लव्हज यू ' हे मी पहिल्यांदा गोलमाल सिरीज मध्ये आपल्या अश्विनी काळसेकर कडून ऐकलं. तिनेच ती स्टाईल फेमस केली

शीर्षक - डार्लिंग्ज - हे ही त्यावरूनच असावे. पिक्चर मधे अनेक वेळा अनेक जण असेल बोलतात - विशेषतः आलिया.>>>>>>>>>>
मला वाटले ते फॅमिली म्हणुन असावे. जस कि , Graham family : Grahams , Trump Family : Trumps (Insta Trend also)
तस त्या दोघी डेरिंग Darling family आहेत. दोघींची फॅमिली एकच आहे. लग्न झाले तरी. दोघीं चे फॅमिली सारखे एकमत आहे.

'आय लव्हज यू ' हे मी पहिल्यांदा गोलमाल सिरीज मध्ये आपल्या अश्विनी काळसेकर कडून ऐकलं. >>> गोलमालच्या आधी सलाम नमस्ते आला आहे. त्या जावेद असेच बोलत असतो…. https://youtu.be/0SIBnmv4WYs

>>>अगदी कोणालाही आय लव्ह यू हे वाक्य माहित आहे, त्यात लव्हज अशी चूक होणार नाही Or am I wrong ?
मार्मिक नीरीक्षण आहे.

अरे यावर किती चर्चा Happy
हे असे आय लव्हज यू बोलणे वा प्रत्येक वाक्यात एका शब्दाला मुद्दाम एस जोडत ईंग्रजीत बोलायचे फॅड आम्ही कॉलेजला असतानाही फार होते. आणि हे कॉमेडी म्हणून बोलले जायचे. मी नाही बोलायचो कधी. कारण माझी मुळातच ईंग्रजीची बोंब Happy
जावेद जाफरी - सलाम नमस्ते - कर्रेक्ट.. तसेच बोलले जायचे.

शेवटी तो पोलिस ईन्स्पेक्टरच्या तोंडचा डायलॉग ऐकल्यावर एवढावेळ साठलेले स्माईल एकदमच चेहर्‍यावर पसरते >>> कोणता डायलॉग? आठवत नाहिये.
मला खूप आवडला हा चित्रपट. खरंच हटके स्टोरी आणि कॉमिक टायमिंग जबरदस्त जुळुन आलेलं.

इनफॅक्ट स्कीपच करा.>>> च्रप्स तुमची कॉमेंट स्कीप करण्यायोग्यय त्यापेक्षा Wink

रेल्वेने चिंधड्या केल्यावर ते पुन्हा जाऊन बांधलेले हात सोडणार होते का?>> अगदी हाच विचार आला होता मनात. पण ते फारसे हुशार लोक मुळातच नाहित त्यात इरादा ठिसूळ.. म्हणुन तसे असावे.

पोलीस स्टेशन मधून परत येताना taxi मध्ये हम्जा, झुल्फि आणि शम्सु मागे असतात , बद्रू काही तरी सांगायला मागे वळते. त्या अर्धवट शुद्धीतपण हम्जाचे expressions मजेशीर आहेत. आणि बद्रू त्याला म्हणते, और तुम मुझपे शक कर रहे थे.

>>>> झुल्फिला शमशूच्या गळ्यात हात टाकायचा असतो पण बद्रु अचानक मागे वळते ... भारी सीन आहे

Pages