डार्लिंग - नेटफ्लिक्स - आलिया, शेफाली vs विजय वर्मा

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 August, 2022 - 18:31

डार्लिंग्स - नुकताच पाहिला. क्लास पिक्चर. स्टोरीलाईन म्हटली तर थोडीफार नेहमीचीच. पण कमाल ट्रीटमेंट. बरेच दिवसांनी मी हिंदीत काहीतरी हटके पाहिले.

शीर्षकात लिहिलेल्या तिघांच्या अभिनयाची नुसती जुगलबंदी. तिघांवर वेगवेगळे लिहावे असे.
आलिया तर बिलकुल नेपोटीजमवाली स्टारकिड नाहीये.
विजय वर्माला आधी पाहून सहजच नवाझ आठवला. पण नंतर बघता बघता त्याने पिक्चर खाऊन टाकला.
आणि शेफाली शाह तर.. ..ऊफ्फ!! काय डोळे बोलतात त्या बाईचे.. ("मुझे तो खाला क्यूट लगती है".. या डायलॉगनंतरचे तिचे एक्स्प्रेशन तर नुसते.. चुम्मा!!)

ईतर दोन तीन कलाकारही लक्षात राहतात. त्यात मराठीचा टक्काही आहे हे बरे वाटते.

पिक्चरच्या सादरीकरणाला साजेशी बॅकग्राऊंड म्युजिक, आणी जी काही आहेत ती गाणीही छान, काही पुढे ढकलावेसे वाटलेच नाही.

पण सगळ्यात कमाल आणि पिक्चरचे बलस्थान असे म्हणावे तर तर कॉमिक डायलॉग्ज. ह्यूमरचा वेगळाच दर्जा. क्लास. हल्ली अभावानेच आढळतो. अगदी शेवटी तो पोलिस ईन्स्पेक्टरच्या तोंडचा डायलॉग ऐकल्यावर एवढावेळ साठलेले स्माईल एकदमच चेहर्‍यावर पसरते Happy

जरूर बघा. आणि चर्चा करायला लगेच ईथे या.

क्लायमॅक्स आणि त्यासोबत येणारे सारे ट्विस्ट टर्न्स आवडले, आणि त्यातून आलेले विचारही पटले. पण त्यावर आजच लिहायला नको. आधी बघून घ्या...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेफाली वैद्य ????
ती शेफाली शाह आहे , विपुल शाह ची बायको ( आधीची शेफाली छाया, त्या आधी शेफाली शेट्टी.)

हो चुकून वैद्य यांचे नाव डोक्यात आले
अशा कशा चुका करतोस तू? शेफाली वैद्यचं नाव एका बॉलीवूड ( त्यांच्या भाषेत खानवूड) चित्रपटाला जोडून तू आता भक्त लोकांचा रोषाला सामोरे जाण्यास सज्ज हो. त्राहिमाम त्राहीमाम करत ते आतापर्यंत इंद्रदरबारी पोचले असतील.

संपवला आज... मध्ये मध्ये प्रचंड बोर आहे.. हुमर एकही जाणवला नाही... स्किप केला तरी चालेल...
इनफॅक्ट स्कीपच करा...

मला आवडला. One time watch आहे.
आलिया च घर आवडलं. पण जुन्या चाळीच्या मानाने फारच मोठं आहे.

मीही पहिल्याच दिवशी पहिला. मला तर आवडला. सिनेमाचा टीझरपण पहिला नव्हता. त्यामुळे कशावर आहे काहीच माहित नव्हते. डार्क ह्युमर आहे एवढे फक्त वाचलेले. पहिले ५ मिनिटे बघून वाटले abusive नवरा वगैरे स्टोरी दिसतेय.पण नंतर पकड घेतली.
शेफाली शाहचे expressions नेहमीच छान असतात. विजय वर्माही आवडतोच. आलियाचेही काम आवडले. एखाद्या सामान्य स्त्रीचे पाव भाजणे , आम्लेट करणे खूप छान पकडले आहे.
१५-२० मिनिटे टाळता आली असती. उदा. हमझाच्या ऑफिसचे सीन्स जरा बोर झाले.

मी तर टीझर ट्रेलर सोडा.. असा चित्रपट आहे हेच मला काल समजले.. चित्रपटाचा जॉनर कथा वगैरे काहीच माहीत नव्हते. पण जी दोन चार मते वाचली त्यातून प्रचंड चांगला ते बोअर अशी मते जाणवली मग आपण कुठे आहोत हे बघायची ईच्छा चाळवली. पहिल्या दहा पंधरा मिनिटात आपण या दोघांच्या मध्ये राहणार असे वाटत असतानाच हळूहळू चित्रपटाच्या जॉनरशी समरस होत गेलो आणि त्यातले बारकावे टिपता येऊ लागले. त्यामुळे संपेपर्यंत मलाही प्रचंड आवडला Happy

आताच संपवला. मला आवडला. ॲक्टिंगकरता पहावा. गोष्टीचा जीव छोटा असला तरी प्रत्येक कॅरॅक्टर खूप बारकाईनं आणि सशक्तपणे उभं राहतं.

आत्ताच पाहून संपवला.. बऱयाच ठिकाणी बोअर झाला.. ॲक्टिंग सगळ्यांचीच मस्त पण बऱयाचदा ढकलावा लागला.. जरा फास्ट हवा होता..बहुतेक माझ्या जास्तच अपेक्षा होत्या ह्या पिच्चरकडून

जनरल बाफ वरून इथे कॉपी. परवाच पाहिला.

आलिया, शेफाली व विजय वर्मा व त्या झुल्फीचे काम केलेल्या कलाकारांची कामे मस्त. स्क्रिप्टही काही ठिकाणी एकदम मजेदार आहे. पण जरा पेशन्स ने पूर्ण करावा लागतो. इंटरेस्टिंग आहे म्हणेपर्यंत बोअर होतो आणि बोअर आहे म्हणून बंद करावा तर एकदम चांगला सीन येतो Happy

थोडेफार आपण ज्याला "डायरेक्शन" म्हणतो तसे सीन्सही आहेत पण खूप जमलेले नाही. आधी वाटेत कोणीतरी टाकलेला लिंबू दिसला तर बाजूने जाणारी आलिया नंतर मांजर आडवे गेले तरी सरळ पुढे जाते, तो सीन किंवा वरच्या मजल्यावर मारहाण सुरू आहे असे खालच्या मेक अप वालीच्या सलून मधे त्यांना वाटत असते, तेव्हा ती सलूनवाली "बायकांचे नशीब" वगैरे संवाद टाकते आणि तेव्हा तिच्यासमोर लग्नाच्या मेक अप करता आलेल्या मुलीची रिअ‍ॅक्शन वगैरे काही चांगले सीन्स आहेत. नीट पाहिले नाहीत तर निसटतील.

एक मात्र मला आवडले. मुंबईतील एक सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब/चाळकरी लोक. हिंदी मधे स्टीरीओटाइप मुस्लिम व्यक्तिरेखा असतात तशा अजिबात न दाखवता सादर केल्या आहेत. त्यांचे मुस्लिम असणे व आपल्यासारख्यांना दिसणारे त्यांचे वेगळेपण हे एखाद्या उत्तरेकडच्या हिंदी बेल्टमधल्या हिंदू फॅमिलीच्या पिक्चरमधले त्यांचे वेगळेपण जितके दिसते तितकेच यात दिसते. नेहमीच्या बोलण्यात "तुमच्यात -आमच्यात" जितपत येते तितकेच सहजतेने यांच्या संवादांत येताना दाखवले आहे. त्याचा उगाच बाऊ ही नाही. बाकी ते इतर मुंबईकरासारखेच कुटुंब आहे.

त्या मुस्लिम फॅक्टरचा मी सुद्धा विचार करत होतो.
कथानकात मुस्लिम जोडपे दाखवल्याने काय फरक पडला. किंवा हिंदू असते तर कथानकात काही बदल असते का?

एक मात्र नक्की डोमेस्टीक वॉयलन्स जो पर्यंत एका लिमिटबाहेर जात नाही तोपर्यंत शेजार्‍यांना काही पडले नसते. आमच्या चाळीतही पाहिले आहे हे. मार खाणार्‍या बाईला वाचवायचे असेल तर फार तर मारणार्‍या नवर्‍याला "जाऊ दे भाऊ, एकदा तिला माफ करा" म्हणून त्याचा राग शांत केला जातो. कदाचित त्या बाईलाच आपला संसार वाचवायचा असल्याने तिच्यासाठी कोणी तिच्या नवर्‍याशी वाकडे घेतले आणि तीच पलटली तर ही भिती असते..

अवांतर - शेफालीचे नाव शमशू दाखवले आहे. पुर्ण काय होते का बघायला हवे. बहुधा शमशुनिस्सा. पण आमच्याकडे एका न्हाव्याचे नाव शमशू आहे. बहुधा शमशुद्दीन पुर्ण नाव. मला पिक्चर बघताना तोच आठवत होता Happy

ॲक्टिंगकरता पहावा. >> याला +७८६

आई मुलीचे असे बॉन्डींग असलेले चित्रपट शोधावे लागतील.
पण त्या मायलेकींचे जे आंखो आंखो मे ईशारे आहेत ते अफाट जमले आहेत Happy

मला भयंकर बोर वाटला चित्रपट.. बराच काळपर्यंत "अरे भा ई केहना क्या चाहते हो" झाले.
कमी वेळ असताना असला पिक्चर बघायला घेतल्याबद्दल वैताग आला.
पळवत कसाबसा finish केला..

शमसुन्निसाच असते. तो इन्स्पेक्टर म्हणतो तिला "आमच्यात निशा असते"

मुस्लिम असल्याने काही फरक नाही पडला. पण मुस्लिम कुटुंबांच्या अशा सर्वसाधारण कथा कमीच दिसतात. ज्यात ते इतरांसारखेच केवळ सामान्य नागरिक असतात. मुस्लिम म्हणून काही वेगळे दाखवण्याचा यात अट्टाहास नाही.

काही चांगले सीन्स आहेत. नीट पाहिले नाहीत तर निसटतील >>> अगदी अगदी. पोलीस स्टेशन मधून परत येताना taxi मध्ये हम्जा, झुल्फि आणि शम्सु मागे असतात , बद्रू काही तरी सांगायला मागे वळते. त्या अर्धवट शुद्धीतपण हम्जाचे expressions मजेशीर आहेत. आणि बद्रू त्याला म्हणते, और तुम मुझपे शक कर रहे थे.

मामी +1
फारएन्ड +1

मला आवडला. पुन्हा बघेन एकदा परत. आणखी बारकावे पाहीन तसा आणखी आवडेल.

आलिया प्रिविलेज्ड आहे पण टॅलेंटेड ही आहे. नेपो कीड नसती तर कदाचित स्ट्रगल जास्त करावा लागला असता पण तरली असतीच इंडस्ट्री मध्ये.

डोमेस्टिक अ‍ॅब्युज सारखा विषय घेऊनही नेहमीची हाताळणी टाळत लाईटर वेन ठेवूनही कुठेही विषयाचे गांभीर्य जाऊ दिले नाही हे आवडले. सग़यांचीच कामे मस्त आहेत नि पंचेस खुमासदार आहेत. मला तरी कुठेही बोअर झाला नाही. थोडा छॉटा असता तरी चालला असता पण अगदीच खटाकण्यासारखे काही वाटले नाही.

@ मुस्लिम कुटुंब,
गल्लीबॉयमधील चित्रीकरण मला आवडलेले. मुंबईला हार्बर लाईनला येता जाता आजूबाजूच्या मुस्लिम वस्त्यांचे आणि तिथल्या पोरांचे जे बाहेरून निरीक्षण करायचो त्याच्याशी अगदी मेळ खाणारे होते. त्यामुळे आतून जे दाखवले ते ही विश्वासार्ह वाटले.
तो पिक्चरही दर्जेदारच होता.

मला आवडला.

गंभीर विषयाला ह्यूमरची ट्रीटमेंट - हा प्रकारच मुळात मला आवडतो.
आलिया भटने हा रोल स्वीकारला यातच तिचं वेगळेपण जाणवतं.

पण नेटवर या सिनेमाचं एक मेन पोस्टर दिसतं, ते स्टोरीतलं मुख्य ट्विस्ट खुलं करणारं वाटलं मला.

अगदी शेवटी जे झाले ते नसते दाखवले तरी चालले असते. एण्ड ओपन ठेवायला हवा होता.
जर बेडकाने ठरवले होते की त्याने विंचवाचा बदला घ्यायला विंचू बनायचे नाही तर मग त्यासोबत येणारे परीणाम भोगायलाही तो तयार आहे असे दाखवायला हवे होते. नियतीनेच विंचवाचा काटा काढून बेडकाचे आयुष्य सोपे केले हा टिपिकल सुखांत झाला.

अगदी शेवटी जे झाले ते नसते दाखवले तरी चालले असते. एण्ड ओपन ठेवायला हवा होता.>> तसं केलं असतं तर पार्ट -२ नक्की आला असता.

हात बांधून रेल्वे लाईनवर झोपवले होते आणि त्याने आत्महत्या केली असे दाखवणार होते. रेल्वेने चिंधड्या केल्यावर ते पुन्हा जाऊन बांधलेले हात सोडणार होते का?

Pages